शशक पूर्ण करा - लालसा - मेधा

Submitted by मेधा on 13 September, 2021 - 21:36

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो >>>

च्च ! दरवाजा कुठला उघडायला. जमिनीखाली दोनतीन इंच असेन मी फारतर. पाण्याचा आवाजसुद्धा बर्फ वितळण्याचा आहे. १२-१५ इंच तरी असेल बर्फ .

किती काळ झाला मी इथे गाडलेलो आहे! मी तर वर्षे मोजणे सुद्धा सोडून दिले आहे . ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा होता एवढेच आठवते आहे . लख्ख उन्हाचा दिवस होता . ओक ,मेपल, अ‍ॅस्पन , स्वीटगम. वॉलनट आणि अ‍ॅश सगळ्यांची रंगी बेरंगी पानं आसपास विखुरली होती. मी माझ्या भावंडाबरोबर बागडत होतो...

उजेडाची तिरीप चांगलीच मोठी व्हायला लागली आहे . पण , पण हा आवाज कसला कडकड कडाड धप्प! जमीन हलली इतक्या जोरात. डोळे किलकिले करून पाहतोच आता! अरे हा शेजारचा अ‍ॅश ट्री कोसळला एकदाचा. हिरव्या किड्यांनी आतून पार पोखरून काढलं होतं त्याला. बर्फाचा भार सोसवेना त्या पोकळ फांद्यांना.

म्हणून एवढा उजेड! मला लवकर हालचाल करायला हवी. खारोटीने इथे लपवलं त्यामुळेच मी एवढी वर्षं तग धरून आहे. आता उजेड मिळायला लागला की मी पण मान वर काढेन. त्या अ‍ॅशपेक्षाही उंच, बलदंड होईन आणि शेकडो खारींना हजारो एकॉर्न पुरवीन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, मेधा!

A seed knows how to wait. Most seeds wait for at least a year before starting to grow; a cherry seed can wait for a hundred years with no problem. What exactly each seed is waiting for is known only to that seed. Some unique trigger-combination of temperature-moisture-light and many other things is required to convince a seed to jump off the deep end and take its chance - to take its one and only chance to grow...

... No risk is more terrifying than that taken by the first root.

- Lab Girl by Hope Jahren