शशक पूर्ण करा - टाईम ट्रॅव्हलर - व्यत्यय

Submitted by व्यत्यय on 12 September, 2021 - 00:34

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
ह्म्म्म... दरवाजा..... म्हणजे बर्‍याच पुढे आलोय मी पण पृथ्वीवरच असणार.
शिट... टाईम-मशिन मधल्या या बिघाडामुळे आधीच्या प्रवासा आगोदर जो स्फोट झाला त्यात बरेच डायनासोर मेले असतील.
मरुदे च्यायला....
आताची उडी मात्र शेवटचीच असायला हवी.
रिअ‍ॅक्टरची उरलीसुरली ताकत लावायला हवी परत जायला. मग या मुर्ख ग्रहाचं जे होईल ते होवो.
च्यायला इंजिनियरच व्हायला हवं होतं.... हे मशिन तरी दुरुस्त करु शकलो असतो....
उगाच पॅशनच्या नावाखाली इतिहास/भुगोल घेतलं आणि या फाल्तु प्रोजेक्टमधे अडकलो..........

असो, सध्या कुठल्या काळात आहे मी? २०२१?!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
पोचलात सहीसलामत वर्तमानात Wink

छान.

>>पोचलात सहीसलामत वर्तमानात Wink
नाही mrunali.samad, पृथ्वी हा तुमचा आमचा ग्रह. २०२१ हा तुमचा आमचा वर्तमानकाळ. पण टाईम ट्रॅव्हलर साठी त्याला त्याच्या ग्रहावर, त्याच्या काळात जायला अजुन एक शेवटचा प्रवास बाकी आहे.

छान

छान.
हे गूगल, आज काय तारीख आहे? ...
परग्रहवासी, वेगळ्या काळातील असला म्हणून काय झालं, हे गूगल तिकडे ही पोहोचलच असेल. असं सांगणारा ही काही मजेदार शेवट सुद्धा करता येईल. Happy

सगळ्यांना धन्यवाद!

अमितव, छान आयडिया. पण आज गौरीच्या सरबराईत बिझी. नंतर प्रयत्न करतो