
झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही..
) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते
. त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात
. शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. 
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून
) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं
) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. 
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे 
ही सिरीय्ल अजुन का चालू आहे?
ही सिरीय्ल अजुन का चालू आहे?
झी ने जोरात झाडू फिरवला होता त्यात गुंतवळा सारखी उडुन परत आली का ही सिरीयल?
कालच्या एपिसोडमध्ये प्रिया
कालच्या एपिसोडमध्ये प्रिया मराठेचं आगमन झालं. ती VM Foods या कंपनीची मालकीण आहे, जिथे स्वीटु आणि ओम्या इंटरव्ह्यू साठी जातात. ती स्वभावाने चांगली दाखवायची असल्याने तिने स्विटू साडी नेसून आल्याबद्दल तिचे कौतुक केले. स्विटू हुशार दाखवायची असेल पण मुळात मठ्ठ असल्याने ती फक्त थँक्स किंवा समयोचित काही न बोलता तुम्ही पण इंटरव्ह्यूसाठी आलात का असा बावळट प्रश्न महाबावळट चेहरा करून विचारते.
त्यानंतर स्विटू आणि ओमची रस्त्यात टक्कर होते, त्याला हा बुलडोझर आधीही दिसत नाही आणि घाईत असल्याने (?) तो सॉरी पण म्हणत नाही. थोडक्यात ते समोरासमोर आले तरीही त्यांना हे माहिती नाही की आपण एकाच कंपनीचं भलं करायला आलो आहोत.
इथे प्रिया CCTV वर दुसऱ्या खोलीत चाललेले इंटरव्ह्यू बघत असते. शेवटी पायावर धोंडा पाडणे किंवा दगडावर डोकं आपटणे असं काहीतरी घडायचं तिच्या नशीबी असावं. म्हणून तिला बाकी सगळे सोडून अतिशय प्रॉमिसिंग आणि एकमेकांना पूरक असे हे दोनच उमेदवार आवडतात!
बावळट प्रश्न महाबावळट चेहरा
बावळट प्रश्न महाबावळट चेहरा करून विचारते.>>
इंटरव्यू घेणारा तिची तारीफ करत असतो तै एक सिन पाहिला काल...
शोचं रिपीट टाईम चेंज झालाय ना? आता कधी लागते..
माझ्या आजीला बघायची असते काल ११.३० ते ३.३० zee marathi लाऊन ठेवावं लागलं पण सिरीयल काही दिसली नाही. तिची आवडती सिरियल आहे. पण रात्री ८ ला स्वामी समर्थांची सिरीयल असते मग आम्ही कोणी तिला बघु देत नाही ही.
@श्रद्धा.. नेमकी चुकीची वेळ
@श्रद्धा.. नेमकी चुकीची वेळ कशी हो निवडलीत?
सकाळी 11 आणि दुपारी 3-30 ला असते रिपीट
आज 11 ला लावून खुश करा आजीला
आधी ११.२७ ला लागायची ना..
@तेजो.. Thx.. आधी ११.२७ ला लागायची ना.. म्हणून तिची तीच लाऊन बसली होती..
ती स्वभावाने चांगली दाखवायची
ती स्वभावाने चांगली दाखवायची असल्याने तिने स्विटू साडी नेसून आल्याबद्दल तिचे कौतुक केले >>
करेक्ट...आणि मालविका तिला साडी नेसुन का जातेस इंटरव्यु ला असे काही मिनिटांपूर्वी हिणवते....म्हणून ती वाईट ..सो ऑब्व्हिअस..लेखक फारच बेसिक आहे....
आता प्रिया मराठे मालविका इतकीच खमकी असणार पण मनाने खुपच चांगली असणार, मालविकाची एम.बी.ए ( ती बिझनेस वुमन आहे म्हणुन हे क्वालिफिकेशन मस्ट आहे ) करतानाची कॉलेजमधली मैत्रिण वगैरे असणार...मग मालविकाला ती वठणीवर आणणार/समजावणार की अग कॉलेजमधे तु अशी नव्हतीस....पैशाच्या मागे धावुन तुझं हे काय झालंय...ई ई....मग मालविका चांगली झाली की #स्वीकार एकत्र येणार...
( #स्वीकार हा इन्स्टावर स्वीटु ओम फॅन्स नी आणलेला ट्रेंड आहे )
rr38>> धन्स फॉर द अपडेटस.
rr38>> धन्स फॉर द अपडेटस. भारी लिहिलंत
( #स्वीकार हा इन्स्टावर
( #स्वीकार हा इन्स्टावर स्वीटु ओम फॅन्स नी आणलेला ट्रेंड आहे ) >>> त्यांना फॅन्स आहेत
त्यांना फॅन्स आहेत Uhoh>>
त्यांना फॅन्स आहेत Uhoh>> कोणाला काय आवडेल सांगताच येत नाही
म्हणजे अजून स्विटू आणि ओम चे
म्हणजे अजून स्विटू आणि ओम चे लग्न झालेच नाहीये होय
मग आता ही त्या मोहित शी लग्न करून वेगळी राहते का
आता ही त्या मोहित शी लग्न
आता ही त्या मोहित शी लग्न करून वेगळी राहते का>> मोहितच्या आईने यांना घरात न घेतल्याने ती खानविलकर बंगल्यात राहात आहे आणि ओम अंबरनाथला नलुकडे राहातोय.
ऑ ही काय भानगड
ऑ ही काय भानगड
निव्वळ फालतूपणा चालू आहे
निव्वळ फालतूपणा चालू आहे मालिकेत
निव्वळ फालतूपणा चालू आहे
निव्वळ फालतूपणा चालू आहे मालिकेत Angry>>> तो पहिल्या एपिसोड पासूनच सुरू आहे
भाजल्यावर Vicco Turmeric
भाजल्यावर Vicco Turmeric creme लावतात??? आजच्या भागात स्वीटू कपड्यांना इस्त्री करतांना मोहितला चटका बसतो, त्यानंतर तो मालविकाशी बोलताना बोटाला मलम लावून हातात Vicco Turmeric ची tube दाखवली आहे! (नाव दिसत नाही पण रंगावरून ओळखता येते, एक साधी burnol ची tube आणू शकत नाही शूटिंगसाठी???)
त्या नलूला सगळं माहितेय तर
त्या नलूला सगळं माहितेय तर तोंड उचकून सांगत का नाही सगळ्यांना खरं काय ते? की करोडपती घरजावई आपल्याच घरात ठेवायचा आणि पोरीला तिकडे पाठवून हळूहळू करोडपती करायचेय तिला? लग्न तिनेच लावून दिलं ना मग स्विटूला प्रश्न पडत नाही का आपली आई ओम्याचे एवढे लाड का करतेय अचानक? की हे सगळं सांगायला लेखकाला अजून डायलॉग्ज सापडत नाहीयेत? काय बै ते एक एक.
भाजल्यावर Vicco Turmeric
भाजल्यावर Vicco Turmeric creme लावतात???
>>>> हो.
कापल्यावर पण लावतात बहुधा
सध्या काय चाल्लय ? कोणी बघतय
सध्या काय चाल्लय ? कोणी बघतय का ?
काल शेवटचे ५ मिनिटे बघितली तर चक्क इनो ची जाहिरात करत होते ...
प्रेक्षकांना शिरेल बघुन अ
प्रेक्षकांना शिरेल बघुन अॅसिडिटी होत असेल हे जाणवल्यामुळे इनोची जाहिरात करत असावेत. किती ती काळजी..!!
ईथेही presentation आलच
ईथेही presentation आलच
मोहीत आणि स्विटूचं वैवाहीक
मोहीत आणि स्विटूचं वैवाहीक आयुष्य सुरू नाही का झालं अजून? ते मंगळू, बांगड्या वगैरे कुठं गेलं?
Aai cha patra haravala
Aai cha patra haravala
मंगळू, बांगड्या वगैरे कुठं
मंगळू, बांगड्या वगैरे कुठं गेलं?>> मंगळसूत्र तिने दुधाच्या ग्लास मधे टाकलेला... परत घातलं नाही काहीच
मग कथालेखक मोहितचं आणि
मग कथालेखक मोहितचं आणि स्विटूचं लगीन झालंय हे विसरलाय की काय? की मोहीतच विसरलाय?
दादा साळव्यांचं एक बरं आहे.
दादा साळव्यांचं एक बरं आहे. जिथं गरज आहे तिथं तोंड शिवुन गप्प बसतील अन वेळ टळली की पोपटासारखा कंठ फुटतो. दळभद्रीपणाचा वंश चालवणार्या साळव्यांच्या या महामेरुला ष्वीटू+ऑम्याच्या लग्नात आत्महत्या करण्याची लहर आली अन थेट मुंबईबाहेर पनवेल कडे एखाद्या सुळक्याकडे त्यांनी कूच केले. बिचारा ऑम्या कुणाला काही न सांगता दादांच्या मागे धावत गेला तरी तो त्यांना कड्यावर पोचून उडी मारे पर्यंत वाचवू शकला नाही पण प्रेक्षकांचं नशीब एवढं चांगलं नव्हतंच. हे दळभद्री शिरोमणी दादा साळवी असेतसे पाठ सोडणारे नव्हते म्हणुन काटकुळ्या ऑम्याच्या साथीला ३-४ हट्टेकट्टे तरूण धावून आले अन त्यांनी प्रेक्षकांचे पांग फेडले. दादा साळवी आत्महत्या करता करता वाचले अन आता तर पोपटासारखे बोलु पण लागलेत. नलीचा पण मेक ओव्हर झालाय. किती गोरीचिट्टी झालीय नली. नलीची टिकली कोणत्या कंपनीची आहे काय माहीत... दादा साळवी जिवंत राहिले हो..!! अन शकूच्या घरी जाऊन दोघांनी शकुला ऑम्या कसा चांगला आहे अन त्याने काहीच चुकीचं केलं नाही हे पटवून सांगितलं... मग शकूचा तो सदानकदा झटका बसल्यागत चेहरा.
उद्याच्या भागात गुलाबी ब्लाऊज अन उंची पोपटी साडी नेसलेली भुंड्या गळ्याची ष्वीटू फोन वरून ऑम्याला झापत असते.
((मंगळसूत्र तिने दुधाच्या
((मंगळसूत्र तिने दुधाच्या ग्लास मधे टाकलेला..))
म्हणजे ????
फाईल, गुलाबजाम डबा आणि
फाईल, गुलाबजाम डबा आणि पत्राची देवाणघेवाण केली तेव्हा ते एका सोसायटीचे पर्किन्ग आहे हे कळत होते. फ्लॅटचे पार्किन नम्बर दिसत होते
उद्याच्या भागात गुलाबी ब्लाऊज
उद्याच्या भागात गुलाबी ब्लाऊज अन उंची पोपटी साडी नेसलेली भुंड्या गळ्याची ष्वीटू फोन वरून ऑम्याला झापत असते. >>
हो ना स्वीटु कडे अचानक नवीन कपडे आणि साड्या कशा काय आल्यात हे एक कोडंच आहे....
ओम्या शी लग्न झालं नाहिये पण खानविलकरांकडुन आलेली आहेराची बॅग मिळाली वाटतं तिला आपोआप...
ओम्या शी लग्न झालं नाहिये पण
ओम्या शी लग्न झालं नाहिये पण खानविलकरांकडुन आलेली आहेराची बॅग मिळाली वाटतं तिला आपोआप...>> तायडा मेहेरबान तो गधा पेहेलवान..!
((मंगळसूत्र तिने दुधाच्या
((मंगळसूत्र तिने दुधाच्या ग्लास मधे टाकलेला..))
Uhoh
म्हणजे ???? >>>>>>>>>>> म्हणजे तिला हे नवराबायकोच नात मान्य नाही. 'आपल्या दोघान्मध्ये काहीच होऊ शकत नाही अस ती म्हणालीये मोहितला.
Pages