
झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही..
) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते
. त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात
. शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. 
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून
) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं
) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. 
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे 
एक भा प्र आहे माझा..... नुसते
एक भा प्र आहे माझा..... नुसते घराचे पेपर्स घेउन आणि एखाद्या फुटकळ स्टँप पेपर वर सही करुन एखाद्याचे घर आपल्या नावावर करता येते का ? >>> हे घराचे प्रॉपर्टी पेपर्स म्हणजे हिंदी मराठी सिरिअल्सचा जीव की प्राण आहे. त्याच्यावर सही घेण्यासाठी व्हिलन लोक पूर्ण सिरिअलभर धडपडत असतात व यशस्वीही होतात. पण अर्थातच सर्वगुणसंपन्न हिरोईन त्यातून त्यांना सोडवतेच.
त्या घरांच्या नुसत्या
...
असं नव्हे अस्सं ..! नुसत्या
.....
लेखक दिग्दर्शक यांना घर
लेखक दिग्दर्शक यांना घर विक्री खरेदी याविषयी बेसिक माहिती नाही असं दिसतंय, तशी अनेक गोष्टींंची नाहीये, असो.
ती स्वीटु खुळचटासारखी हसते तेव्हा तोंडाचं बोळकं झालेल्या म्हातारीसारखी दिसते असं वाटतं.
बाकी ओम्याचं प्रकरण पाहून प्रेम आंधळंच नाही तर मुकं, बहिरं आणि मंदसुद्धा असतं याची खात्री पटली.
ओम्या स्टाईल म्हणून तोंड न
ओम्या स्टाईल म्हणून तोंड न उघडता बोलतो ते पण विचित्र वाटतं.
ती स्वीटु खुळचटासारखी हसते
ती स्वीटु खुळचटासारखी हसते तेव्हा तोंडाचं बोळकं झालेल्या म्हातारीसारखी दिसते असं वाटतं.>>

बाकी ओम्याचं प्रकरण पाहून प्रेम आंधळंच नाही तर मुकं, बहिरं आणि मंदसुद्धा असतं याची खात्री पटली.>>
ही सेरिअल पण संपणार आहे अशी आज बातमी वाचली लोकसत्तेत. झीच्या या सिरियल्स ना अपेक्षित टी.आर.पी. मिळत नाही म्हणुन अग्गंबाई सूनबाई, लाय भारी कारभारी देखिल बंद करणार आहेत. देवमाणुस तर अशीही संपतच आहे.
मी एकदाही ही सीरियल पहिली
मी एकदाही ही सीरियल पहिली नाही पण इथे डीजे यांच्या कमेंट्स वाचायला धमाल यायची. आताच मीम पहिल की साळवी बेघर झालेत म्हणे, रस्त्यावर आलेत
म्हणून वाचायला आलोय तर काहीच नाही
येऊ द्या ना काहीतरी भन्नाट
मी तर सुचवेन की तुम्अही स्वतः
मी तर सुचवेन की तुम्अही स्वतः बघा ही सिरीयल.
आम्हीच का सहन करायचंनको, डीजे यांनी केलेलं नली चे
नको, डीजे यांनी केलेलं नली चे वर्णन पाहून कुतूहलाने युट्युब वर बघायला गेलो की खरोखरच तशी आहे का
ते पिंजरलेले केस आणि लाल नाक बघून खात्री पटली की डीजे अजिबात अतिशयोक्ती करत नाहीत
रजिस्ट्रार ऑफिस मधे सह्या न
रजिस्ट्रार ऑफिस मधे सह्या न करताच तायडा ने अखेर घर स्वत: च्या नावावर केलं....
तायडा ने साळव्यांना रस्त्यावर आणलं आहे.त्यांचं सगळं सामान गुंडांकरवी फेकलं.
साळवी वेड्यासारखे भटकत आहेत....अनेक दिवसांनी नली ची शकु अचानक उपटली आहे..ती सगळ्यांना घरी यायचा आग्रह करते आहे. नलीच्या पिंजारलेल्या केसांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात भयानक आवतार काल दिसला...
आणि या सगळ्या भानगडीत चिन्या दवाखान्यात आहे हे विसरले आहेत सिरीअल वाले....
मालविकाने घर ढापलं हे कळलं तरी शकु थंडच...एखादी आई असती तर घरी जाउन मुलीच्या कानाखाली लगावली असती...पण ही शकु आहे...नुसतं "अगं तायडे असं नको करुस गं" ( टिपिकल टीपरे च्या टोन मधे वाचा )..असं गुळुमुळु बोलत बसणार.
आता पुढच्या भागात तायडा स्वीटु ला तीच घराची फाइल परत देउन घर घे पण ओम्या चा पिच्छा सोड असं म्हणतेय...
काय राव यांचं....लोकांनी उगीच मर मर अभ्यास करुन परीक्षा देउन रजीस्ट्रार व्हायलाच नको आता...नुसते पेपर दिले घेतले की झाले घराचे व्यवहार...स्टँप ड्युटी नाही, रजिस्ट्रेशन फी नाही, वकिल वगैरे काही नाही......उगीच वकिलांच्या पण पोटावर पाय...
स्वीटू नाही जाणार एवढ्यात
स्वीटू नाही जाणार एवढ्यात आपल्याला सोडून.. अजून आपल्याला भरपूर सहन करायचे आहे..आणि DJ तुम्हाला पिसांचा बंगला बांधायचा आहे..
नवीन ४ सीरिअल्स येणार आहेत त्यांचे स्लॉट ठरलेले आहेत.
१. ७.०० वाजता बाजिंदे असे काहीतरी आहे ( नायक नायिका भुतासारखे पांढरे ड्रेस घालून पिवळ्या गोंड्याचा जीव घेतायत )
२. ८.३० वाजता तुझी माझी रेशीमगाठ ९.०० वाजता
३. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे आणि
४. १०.३० वाजता ती परत आली आहे..
@स्मिता श्रिपाद : भारी
@ आशुचँप : धन्स
भारी अपडेट्स. मी मिस केलं हे सर्व. पण आता सहनशक्तीच्या बाहेर गेलंय सर्व 

@स्मिता श्रिपाद :
@श्रवू : आता काही कारणास्तव टीव्ही पासून पुर्णत: दूर आहे... आकाशवाणीशी दोस्ती झाली आहे.. आणि खरं सांगू का आकाशवाणी ऐकल्याने डोकं शांत रहातंय..
पिवळ्या गोंड्याचा जीव घेताहेत
पिवळ्या गोंड्याचा जीव घेताहेत
तुझ्या माझ्या कुठली मालिका, कोण कलाकार आहेत. मी प्रोमो नाही बघितला. बाजींदे फालतू असेल असे वाटते. रेशीमगाठ श्रेयससाठी थोडीफार बघेन पण प्रार्थनाचे नाव ऐकून भ्रमनिरासच झालाय. ती परत आली आहे विनोदी वाटते.
तुझ्या माझ्याचा प्रोमो बघितला
तुझ्या माझ्याचा प्रोमो बघितला. हिरवीण ओळखीची नाही. ही मालिका आज बघितली. दादा रात्री जागेवर नाहीत तर पहिले कोणीही बाथरूम चेक करेल ना. मला फिस्सकन हसूच आले. खोटे खोटे झोपलेले सगळे पटापटा जागे झाले आणि बाहेर धावत सुटले. शोधायची खटपट केली न केली तर नशीब (प्रेक्षकांचे) लगेच सापडले. आता दादा साळवी वेडे झाले तर त्यांच्या उपचाराचा खर्च कसा आणि कोण करणार. स्वीटू प्रत्यक्ष आयुष्यात आहे तशीच तरी दाखवायची म्हणजे ओम तिच्या प्रेमात पडतो यावर जरा तरी विश्वास बसला असता.
कोणत्या जगात जगतात हे लोक की पर डे साठी काहीही बोलायचं, त्यांच्या घरचे तरी ती मालिका बघत असतील का 
दादा साळवी आणि ईतर चला हवा येऊ द्यामध्ये आले होते. फ्रेंडशिप डे निमित्त होते कदाचित. साबळे म्हणाला ओमला की तुमच्या दोघांची सध्या सगळीकडे हवा आहे
बॉस ने सांगितले म्हणून कोणी
बॉस ने सांगितले म्हणून कोणी काय असं कोणालाही मारून टाकतात काय ? देवमाणूस कमी होता म्हणून कि काय आता इथे पण खून वैगैरे दाखवायला लागले.. >>>>>>>> मालविका ने सान्गितल मारायला? देवमाणूस निदान सत्यकथा तरी आहे.
बादवे, चिन्या कसा आहे? बरा आहे का?
आता दादा साळवी वेडे झाले तर
आता दादा साळवी वेडे झाले तर त्यांच्या उपचाराचा खर्च कसा आणि कोण करणार>> आता घर गहाण टाकलंय.. उपचारांच्या खर्चासाठी आता एकेका साळाव्याला तायडाकडे गहाण टाकून उपचाराचा खर्च करायला हवा. तिच्या शिवाय या दळभद्री साळव्यांना पैसे देणारे अन त्या बदल्यात यथेच्छ पिळणारे या जगती दुसरे कोणीही नाही.
ज्या स्पीड ने घर गेलं त्याच
ज्या स्पीड ने घर गेलं त्याच स्पीड ने ते परत मिळणार आहे हो.......
मी जर वकील किंवा रजिस्ट्रेशन ऑफिस मधे कामाला असते तर या सिरीअल विरुद्ध तक्रार केली असती की लोकांची दिशाभुल करतात म्हणून
शकु ओम्याला सांगते आहे की तायडा ने सगळं केलं आहे.स्वीटु ला रस्त्यावर आणलं आहे तरी मूर्ख ओम्याला अजुन विश्वास बसत नाहिये. अजुनही मालविका च्या नाटकी रडण्यावर मठ्ठा सारखं तोंड करुन बघत बसलाय..."ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही तर गुण लागला" या न्यायाने साळव्या़ंकडे जाउन ओम्या पण मठ्ठ झालाय.
चिन्या ला पहिल्याच दिवशी कंपनी तर्फे मेडीक्लेम इन्शुरन्स चे पैसे मिळणार आहेत म्हणे आणि आज साळव्यांचा परत त्याच्या घरात गृहप्रवेश आहे असं प्रोमो मधे दिसतय...
साळव्या़ंकडे जाउन ओम्या पण
साळव्या़ंकडे जाउन ओम्या पण मठ्ठ झालाय. >>>++++१११
आज साळव्यांचा परत त्याच्या घरात गृहप्रवेश आहे असं प्रोमो मधे दिसतय...>> ऊद्याच संपवतायत की काय..?? आज रात्री पासुन बघायला सुरुवात करेन... शेवट चुकायला नको.
काल मात्र खूप दिवसांतून धमाल
काल मात्र खूप दिवसांतून धमाल झाली.साचलेल्या डबक्यातील पाण्याला अचानक थोडी वाट मिळावी अन ते कुबट वासाचं पाणी जरा झिरपून जावं तसा प्रकार घडला.
(मी काही हे बघत नव्ह्तो गेले २ महिने... इथल्या प्रतिक्रिया वाचून अन पुढे काय झालं असेल याचे आडाखे बांधून कालचा थोडा भाग पाहिल्यावर आता लिहितोय..)
तर माठ चिन्याचा रेल्वेतून पडून अॅक्सिडेंट झाल्यावर दादा साळव्यांनी १० लाखांसाठी तायडाकडे घर गहाण टाकलं. त्यामुळे त्यांना मानसिक धक्क बसला अन ते शुन्यात नजर लाऊन बसू लागले. त्यांना मख्ख चेहर्याने असं शुन्यात नजर लाऊन पहाणं त्यांना या वर्षीचा झी गौरव बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर साठी नक्कीच नॉमिनेट करेल यात शंकाच नाही. तसं बघायला गेलं तर संपूर्ण साळवी अन खानविलकर कुटुंबीयच झी गौरव साठी तगडे उमेदवार आहेत असं एखाद्याला वाटु शकतं इतके लोक त्यांना दात ओठ खात बघत असतील.
१० लाखांसाठी वेड पांघरून पेडगावला गेलेल्या दादा साळव्यांना माठ चिन्याला इंस्युरंसचे पैसे मिळून घर पुन्हा ताब्यात आलं हे मात्र लक्षात आलं नाही इतकं ते भयानक मख्ख होऊन शुन्यात गेलेत. अगदी नलीच्या पिंजारलेल्या केसांचा, लाल-गुलाबी नाकाचा, लळणार्या ओठाचाही त्यांना विसर पडून ते शुन्यात गेलेत. नली सुद्धा खानविलकरांचा प्रस्ताव सर्वांसमक्ष धुडकावून लावते अन कानकोंडे झालेले खानविलकर व्हिल्यात येतात. त्यांचा व्हिला जुहुला आहे हे काल तायडा कडून कळालं. मग तायडा नलीला फोन करून दमात घेते अन नलीच्या डोळ्यांपुढं शुन्यात गेलेल्य बापाला चहा अन चपाती खाऊ घालणारी ष्विटू दिसते. झाल..! मग अचानक नलीला उपरती होते की ओम्याच भला जावई बनु शकतो.
नली लगेच अंबरनाथहून जुहुला खानविलकर व्हिल्यात पोचते अन तिला तिथं आलेली बघून शकू अन इतर खानविलकर्स (तायडा सोडून..!) फार आनंदित होतात. आल्यासरशी नली ती लग्नाला तयार आहे (ओम्या-ष्विटूच्या) असं सांगून पेढ्याचा बॉक्स उघडून सर्वांना आनंदाचा (अन तायडाला मानसिक) धक्का देते. ते ऐकुन भयाकलेली तायडा (तिचा ड्रेस मात्र नवीन हां एक्दम... पिवळा अन फुलपाखराच्या पंखासारख्या डिझाईनचा.. भारी दिसला तिल...!) नलीचा हात सर्वांसमक्ष धरून चेहर्यावर हास्य दाखवत नलीला घरी पोचवण्याची व्यवस्था करायला जाते असं इतर खानविलकर्सना सांगून (त्यांना पटतं बरं का तिचं..!) खाली नेते. मग व्हिल्याच्या गेटवर जो काही कलगीतुरा सुरु होतो त्याला शब्दांत उतरवता येणं कठीण. पण नली एकदम बदलली बरं. ती तायडाला पेढा भरवत असते पण तायडा तो पेढा जवळजवळ टाकुन देते पन नली तो सावरून हातात घेते तेव्हा तायडा तिच्या बोटांना लागलेलं पेढ्याचं तूप नलीच्या ब्लाऊजला पुसते
. मग नली तिच्या पेटंट टरक्या नजरेने तायडाकडे बघत तिला ओपन चॅलेंज देत सांगते की तिची मुलगी याच व्हिल्यात येऊन तायडाचा माज कसा उतरवते ते बघ.!!
मग इकडे साळाव्यांच्या घरी नेहमीप्रमाणे दळभद्रीपणा सुरुच असतो. तेवढ्यात नली जुहुवरुन अंबरनाथच्या घरी पोचते. सगळे तिची विचारपुस करू लागतात. ती म्हणते श्विटूला आज बघायला पाहुणे येणारेत असं म्हणत ती ओम्याचा फोटो ष्विटूपुढे सरकवते पण त्याकडे न बघताच ष्विटू तिथुन उठुन चहा करायला आत जाते. तिथं डोळे गाळात ती चहा बनवू लागते अन इकडे इतर साळवी (हो..हो.. तेच ते... माठ चिन्या, महामाठ काका अन महामाठ काकी. शुन्यात गेलेले दादा साळवी सोडून) नलीच्या हातातील फोटो खेचुन घेतल्यावर तो ओम्याचा फोटो आहे हे बघून आनंदाने तयारीसाठी धावपळ करू लागतात.
साळव्यांची ही आनंदाची, समाधानाची धावपळ बघितली की त्यांच्या दळभद्रीपणाकडे आपल्या सारख्या पामरांची आपोआप डोळझाक होते अन आपण उद्याच्या भागाची आतुरतेने वाट बघू लागतो.
Dj अगदी चपखल शब्दात लिहिलंय..
Dj अगदी चपखल शब्दात लिहिलंय..
ओम नि स्विटूच लग्न होणार
ओम नि स्विटूच लग्न होणार म्हणजे संपली की काय मालिका ! ह्यांना बरे हवं तसं मिळतं
या सिरीअलच्या दिग्दर्शकांना
या सिरीअलच्या दिग्दर्शकांना एकदा त्यांच्या दृष्टीने जुहू आणि अंबरनाथ मधील अंतर किती आहे ते विचारले पाहिजे! नाही, अगदी ४ बिल्डींग पलीकडच्या मित्राकडे जाऊन यावे तसे एकमेकांकडे जात-येत असतात! शिवाय हे एकतर करोना पूर्व काळात तरी जगात आहेत किंवा ८-१० वर्षे पुढे तरी जगत आहेत, करोना अगदी पार देवी रोगाप्रमाणे समूळ नष्ट झालेला आहे!!! कोणीच मास्क लावताना दिसत नाही, ट्रेनही सुरु आहेत!!!
बाकी, सकाळी सकाळी अंबरनाथ ते जुहू आणि पुन्हा जुहू ते अंबरनाथ एवढा प्रवास करूनही नलू खूप फ्रेश दिसते! इतकी की आल्यावर पाण्याचा एक घोटही न घेता थेट कामाला लागते??? आता अंबरनाथवरून जुहूला जायचे म्हणजे अंबरनाथ ते दादर (सेन्ट्रल), दादरला ट्रेन बदलून पुन्हा दादर (वेस्टर्न) ते विलेपार्ले / अंधेरी पुन्हा तिथून बस / रिक्षा असा प्रवास मार्ग आहे. किंवा निदान ट्रेनने अंबरनाथ ते घाटकोपर, मेट्रोने घाटकोपर ते डी. एन. नगर मेट्रो स्टेशन आणि पुढे जुहूपर्यत बस / रिक्षा असातरी प्रवास करायला हवा! एवढा लांबचा आणि वारंवार प्रवास साधने बदलावी लागणारा प्रवास करण्याचा stamina चांगला आहे!!! की Ola / Uber करतात दर वेळेस???
मुंबईविषयी माहिती नसणाऱ्यांंच्या माहितीसाठी :
जुहू हे ठिकाण मुंबईत पश्चिमेला असून त्याला 'थेट' रेल्वे connectivity नाही. तर अंबरनाथ हे ठिकाण मुंबईच्या बाहेर असून मुंबईनंतर ठाणे, त्यानंतर कल्याण-डोंबिवली ही शहरे ओलांडल्यावर मग अंबरनाथ येते! जुहू ते अंबरनाथ हे रस्तेमार्गे अंतर ५५-६० किमी आहे.
नली ती लग्नाला तयार आहे
नली ती लग्नाला तयार आहे (ओम्या-ष्विटूच्या)
@Shraddha आणि @सूलू_८२ :
@Shraddha आणि @सूलू_८२ :
ह्यांना बरे हवं तसं मिळतं>>
@ विक्षिप्त_मुलगा : डिटेलवार माहिती दिल्याबद्दल आम्ही मुंबैबाहेरील प्रेक्षक आभारी आहोत... तुम्ही मुंबैत आहात तर शिरेलच्या दिग्गुचे कान ओढुन दाखवा हा नकाशा.
वि मु
वि मु
तेजश्री प्रधानची नवीन मालिका
तेजश्री प्रधानची नवीन मालिका झीम वर सप्टेंबर मध्ये सुरु होत इहे.नाव माहित नाही.पण कोणी म्हणत आहे की 8 वाजता असणार आहे तर कोणी म्हणत आहे की चला हवा येऊ द्याला रिप्लेस करणार आहे. पण मला वाटत स्वीटूचीच मालिका संपेल ,म्हणूनच घाईघाईने लग्नाचा ट्रँक आणला आहे।
22 ऑगस्टला रविवारी 2 तासाचा स्पेशल लग्नसोहळा आहे.
म्हणजे बहुतेक या मालिकेलाच नारळ देतील.
तसही झीम ने 5 नवीन मालिका चालू करून कंबर कसलेली दिसत आहे स्टार प्रवाहच्या विरोधात.
काहीही करून गेलेली पोझिशन परत मिळवायची ,असा चंगच बांधला आहे.
5 घोड्यांवर सध्या पैसे लावलेले इहेत.
त्यापैकी एखाददुसर नक्कीच पुढे धावेल
श्रेयस ची नक्की चालेल, निदान त्या लहान गोड मायरासाठी नक्की लोक बघतील.
पण प्रवाहला तरीही नाही मात देता आली तर तोंडावर आपटतील.
तसही झीम ने 5 नवीन मालिका
तसही झीम ने 5 नवीन मालिका चालू करून कंबर कसलेली दिसत आहे स्टार प्रवाहच्या विरोधात.>>>>>>>>>>> त्या ५ सिरियल्सची नावे सान्गू शकाल का कुणी?
पाहिले न मी तुला सुद्दा सम्पतेय का?
हो.. सर्व मालिका संपत आहेत.
हो.. सर्व मालिका संपत आहेत.
याच धाग्यावर वर स्क्रोल करा.. श्रवूंनी सर्व नावे अन् टाईम स्लॉट दिले आहेत.
ओके.
ओके.
काय झालय हे नलीचं ? इतका बदल
काय झालय हे नलीचं ? इतका बदल कसा काय बुवा ?
इतकी हुशार आणि समजुतदार कशी काय झाली अचानक बाई...
आता लग्नाचा ट्रॅक असेल असं दिसतय...
चला काहितरी पुढे सरकतय...
Pages