अवसानघाताचे प्रकार

Submitted by सामो on 3 September, 2021 - 17:09

हा फार पूर्वी अन्यत्र प्रकाशित केलेला लेख येथे देते आहे.
-------------------------------------------

पुलं देशपांडे यांनी "काही नवे ग्रहप्रयोग" नावाचे एके अफलातून प्रकरण लिहीले आहे. ज्यामध्ये त्यांनी जीवनात घडणार्‍या मजेशीर गोष्टींची सांगड ग्रहांशी, ज्योतिषाशी घातली आहे. हे प्रकरण आठवण्याचे कारण - कोणीतरी जालावरती नमूद केलेले एक विनोदी वाक्य ते म्हणजे - विशेषतः आपल्याला घाई असतानाच पोराची चड्डी ओली झालेली असते आणि ती बदलत बसावे लागते. हे वाक्य वाचून मी खूप हसले. परिस्थितीजन्य विनोदाचे उत्तम उदाहरण आहे हे.
अशी काही उदाहरणे आपल्याला आठवतात का पहा. म्हणजे अवसानघाताची, फजितीची, मार्मीक, विनोदी वगैरे वगैरे.
सुरुवात मी करते. अवसानघात, मुस्कटदाबी किती प्रकारे होऊ शकतो -
(१) मगासचेच उदाहरण आपल्याला घाईघाईत बाहेर जायचे आहे आणि पोराची चड्डी ओली होणे. म्हणजे परत ती बदलत बसा.
(२)ऑफीसात नेट ब्राऊझ करायला आपण सुरुवात केली रे केली की इतका वेळ शांत असलेला आपल्या खुर्चीमागचा ट्राफीक कसा काय चालू होतो देवाला ठाऊक. आपण चोरट्यासारखे कधी विंडो मोठी कर कधी छोटी कर - मोठी कर कधी छोटी कर.
(३) नणंद तिच्या नवर्‍याचे दोष आपले कान किटेपर्यंत सांगते. आपल्याला मात्र तिच्याच भावाचे दोष सांगण्याची चोरी. हे एकतर्फी शेअरींग भयंकर कंटाळवाणे होते.
(४)शेंगदाणे खात असताना नेमका शेवटचा शेंगदाणा खवट निघतो. ती कडू चव जाता जात नाही.
(५)आपण नुकतच बार्बी कल्चरविरुद्ध एक "इंटुक" लेख वाचलेला असतो. त्याच "ईंटुक" पातळीवरून आपण आपल्या मुलीला समजावत असतो की "बार्बी कल्चर घरात नको". सोफ्यावर तंगड्या पसरून बसलेला नवरा खो खो हसत , अतिSSSशय खवचटपणे म्हणतो - "आपल्या घरी बार्बी कल्चर नाहीच आहे ग Wink खी: खी:" (फोडच करून सांगायची तर - You are far cry from being a perfect dolllike woman. ). बरं आत्ताच "ईंटुक" लेख वाचला असल्याने आपल्याला नवर्‍याचं हे वाक्य बोचायला नको पण ते जिव्हारी लागतं आणि आपली बार्बीबाबत नक्की काय भूमिका आहे हाच प्रश्न सामोरा आल्याने भंजाळल्यासारखे होते. I hope I make sense. म्हणजे घरात "बार्बी कल्चर" तर नको पण नवर्‍याला तर बार्बी वाटलो पाहीजे ...... something of that sort
तर असा हा ५ वा भंजाळलेला अवसानघाताचा प्रकार.

सध्या तरी एवढेच आठवताहेत. वाचकांनी भर घालावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी रिसेन्ट-
दर पाच मिनीटाला सू करणारं आमचं पोर घरी आलेल्या पाहूण्यांनी उचलून घेतलं. आम्ही लगेच वॉर्निंग दिली. डायपर नव्हता. पाहूणे एक तासभर होते. नंतर निघूनही गेले. आम्ही आपलं पोपट केलेल्या आमच्या किडूला कौतुकाने उचलून घेतलं आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने सू केली.

बाकी नणंदेने तिच्या सासरच्या लोंकाविरुद्ध किर्तन चालू केलेे की अगदी घुसमटल्यासारखंच होतं बाई. घशात कितीतरी गोष्टी येऊन साठून उड्या मारत असतात पण बोलता येत नाही की बाई माझ्या सासरच्यांच्या तुलनेत तुझ्या सासरचे अगदी देव आहेत हो देव. पण कसचं काय. Uhoh

शिर्षकावरून मला वाटले आपण अवसान (प्रसंगावधान/ धैर्य/हिंमत) दाखवून काही केले आणि घात झाला त्याची उदाहरणे. जसे च्रप्स यांनी दिले आहे.

बाकी मी चिन्मयी यांचा पहिला किस्सा मजेदार आहे Proud

चिन्मयी Lol
बाळाला कंफर्टेबल वाटलं नसेल पाहुण्यांसमोर.

घर ते ऑफिस या रस्त्यावर पूर्वी एक रेल्वे क्रॉसिंग हॉते, तिथे पुलाचे काम सुरू झाले. ट्राफिक दुसऱ्या बऱ्याच लांबच्या रस्त्याने वळवण्यात आली, पण दुचाकी कशा बशा जाऊ शकत होत्या. मला रात्री ऑफिस मधून परतायला दहा अकरा बारा कितीही वाजायचे तेव्हा तिथे एकदम सामसूम होती.
पुलाचे काम सुरू होते, तिथे रस्ता बंद केलाय यासाठी रात्री दिसावे म्हणुन फ्लूरोसेन्ट पेंट वाले काही लावले नव्हते. बस मध्येच मोठमोठे दगड आणुन ठेवले होते.

एका रात्री उशिरा मी स्कुटर वरून घरी परतत होतो.
माझ्या बरेच पुढे दोन तीन दुचाकी स्वार दिसत होते.

त्यातला एक डायव्हर्शन न घेता सरळ पुढे गेला दगडावर बाईक आपटून पडला.
त्याच्या मागचे थोडाच वेळ थांबले आणि डायव्हर्शन घेऊन निघून गेले.
मी तिथे पोचलो, स्कुटर उभी केली आणि त्याच्या जवळ गेलो. त्याची बाईक उभी केली आणि त्याला उठवू लागलो. तो पालथा पडला होता त्याला सरळ केले. पण तो डोळे मिटून गप पडलेला. त्याच्या ढोपरातून थोडेसेच रक्त येत होते, डोक्याला, इतर कुठे निदान जखम तरी दिसत नव्हती.
काय करावे कळेना, याला असेच सोडून पुढे पोलीस स्टेशन मध्ये सांगावे की कसे याचा विचार करत होतो. तेवढ्यात एक बाईक येताना दिसली. मी जाऊन त्याला थांबवले. तो ही बाईक उभी करून बघायला आला. तो म्हणाला डायव्हर्शन ने पुढे पूल बांधणाऱ्यांचे छोटे ऑफिस आहे तिथून पाणी मिळेल.
मी पाणी आणायला गेलो आणि एका पेल्यात पाणी घेऊन यायला लागलो, तर वाटेत मला तो दुसरा बाईकवाला भेटला. म्हणाला जाने दो उसको कुछ नही हुआ, फुल्ल टून है वो आणि तो निघून गेला. मी तिथे गेलो तर हे महाराज " हे त्तेरी, इसकी x की किसने मुझे गिराया, छोडूंगा नही xxxxx" अशा शिव्या देत बरळत बसले होते. मी त्याला पाणी दिले प्यायला तर पाणी पिऊन ग्लास फेकून दिला. "xxx के तुने मेरेकू गिराया क्या xxx" म्हणुन उठायला गेला आणि पडला.
मग मीही तो ग्लास उचलून मुकाट्याने आपली स्कुटर काढली आणि निघालो. मागून तो "अरे रुक जा, मेरा घर नही है, मेरेकू छोड के मत जा xxx" बरळत होता.

चिन्मयी Lol
बाळाला कंफर्टेबल वाटलं नसेल पाहुण्यांसमोर.>>>> झकास!

मानव, भारी किस्सा.

>>>>>>>>आम्ही आपलं पोपट केलेल्या आमच्या किडूला कौतुकाने उचलून घेतलं आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने सू केली.
हाहाहा हाऊ क्युट! शाहाणी आहे ती हे तिने सिद्ध केलय आता.

>>>>>बाकी नणंदेने तिच्या सासरच्या लोंकाविरुद्ध किर्तन चालू केलेे ....
हा अनुभव कॉमन असावा कारण नणंद माहेरपणाला येते सो ती चहाड्या करणारच. आपल्याला मात्र तोंदाबुमा.

मी कुठल्याही दुकानात गेले की रिकामे असणारे दुकान अचानक ग्राहकांनी भरायला लागायचे मग मालक माझ्याकडे दुर्लक्ष करायचा. हे भारतात असताना होतेच होते. इथे थोड्याफार प्रमाणात होते.
च्रप्स, अगदी.
चिन्मयी Lol .

एखादा शेयर वर जात असेल आणि आपण घेतला की बरोबर खाली येऊ लागतो.......

अय्यो सेम पिंच की ओ.याउलट मी एखादा शेअर विकला तर तो एकदम भरभर वाढत जातो.

Lol आपण बसची वाट बघून शेवटी रिक्षा-टॅक्सी धरावी नि बसल्यावर रियर व्ह्यू मध्ये बस दिसते!!!!!!!!

>>>>> रियर व्ह्यू मध्ये बस दिसते!!!!!!!!
@सी हाहाहा

बाळाला कंफर्टेबल वाटलं नसेल पाहुण्यांसमोर.
>>>
यात तथ्य असावे.
मी सुद्धा लहानपणी मुलाला ऊचलून घेतले की तो माझ्या अंगावर सूसू नाही करायचा. पण खाली ठेवताच लगेच एवढा वेळ थांबवून ठेवल्यासारखी करायचा.

मुलगी याच्या ऊलट करायची Happy

रियर व्ह्यू मध्ये बस दिसते!!!!!!
>>>
याचसाठी जुने जाणते लोक म्हणतात. एकदा निर्णय घेतला की मागे वळून बघायचे नसते. तसेच रियर व्ह्यू मध्येही बघायचे नसते.

Lol मस्त धागा, भारी किस्सा मानव, चिन्मयी.
कोणता शेअर घेता ते लिहीत जा इथे. आम्ही ते शॉर्ट करू. >>>> Lol
ऑफिसचे दिवस आठवले. मी कंटिन्युअस काम करत असताना कोणी माझ्या टेबलाशी फिरकायचे नाही, आणि जेव्हा माबो उघडायचे तेव्हा च मांजरीच्या पावलाने माझा बॉस यायचा. . मग माझी फुल्ल गडबड.

तब कहाँथे तुम हाईं जबमैं मानपे खडा रखके काम
कररी थी, और आगये आता जब माबो उघडी Lol
मांजरी आवडतात नं , घे मगं Wink

तसेच रियर व्ह्यू मध्येही बघायचे नसते. >> Lol नाही रे, गर्दी नि बसला लोंबकाळलेली माणसे बघितली की 'अरे दोन पैसे गेले पण जरा बरी घरी पोहोचेन' म्हणता येतं...

अय्यो, नणंद आणि सासर बाबत अगदी अगदी! पण मी म्हणते "खरंय, कुठेही जा सासर सारखंच, कोणाचीही असो सासू सारखीच, ती कधीच आई होऊ शकत नाही"

मलातर रिक्षा, टॅक्सीच्या रिअर व्ह्यू मध्ये आतलेच दिसते.
ड्रायव्हरला दिसते मागचे.
>>>>>

शेअरींग रिक्षामध्ये फोर्थ पॅसेंजर म्हणून बसलात की अर्धे ड्रायव्हर तुम्हीच असता. त्याच्याएवढ्याच फॅसिलिटी तुम्ही ऊपभोगू शकता.

कुठेही जा सासर सारखंच, कोणाचीही असो सासू सारखीच, ती कधीच आई होऊ शकत नाही
>>>>

असे जनरलायझेशन होत असेल तर मला वेगळा धागा काढावा लागेल. मला माझ्या सासुरवाडीचा आणि सासूचा अनुभव कमालीचा छान आहे. कुठेतरी ते डॉक्युमेण्टेशन करावे लागेल Happy

पण मग सुखाची किंमत राहिली नसती, म्हणून देवाने हे प्रकार ठेवले असावेत. सासूच्या हाताखाली राहिल्यावरच आईची खरी किंमत कळते.

बादवे मुद्दाम एखाद्या गोष्टीची आठवण ठेऊन खूप तयारी करावी आणि नेमकं ऐन वेळी ती गोष्ट करायचं विसरून जावं हा घातकी प्रकारही नेहमीच घडतो. अगदी रिसेन्ट हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन रिन्यू करायचं होतं ३१ ऑगस्ट पूर्वी, कारण १ सप्टेंबरपासून रेट्स वाढणार होते. ३० तारखेपर्यंत रोज आठवत होतं. पण ३१ तारीख कुठे गायब झाली काय माहित? डायरेक्ट १ सप्टेंबरला दिसले... वाढलेले रेट्स आणि मी न केलेलं रिन्यूवल.

असे जनरलायझेशन होत असेल तर मला वेगळा धागा काढावा लागेल. मला माझ्या सासुरवाडीचा आणि सासूचा अनुभव कमालीचा छान आहे. कुठेतरी ते डॉक्युमेण्टेशन करावे लागेल >>> नका काढू. मुळात तुम्ही सून नाही आहात. त्यामुळे तुम्ही असला धागा काढणं टोटली अनफेअरच आहे हं. जावयाला सासुरवास स्वप्नातदेखील बघावा लागत नाही. सून ही फक्त सूनवण्यासाठीच असते.

Pages