अमानवीय..? 3

Submitted by ऩीली on 10 October, 2019 - 07:12

मागच्या धाग्याची मर्यादा पुर्ण झाली.
आता अमानवीय किस्से, अनुभव इथे येऊद्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती मुले कोण होती आणि आम्हालाच का दिसत होती याचा खुलासा आज तागायत झालेला नाही.>>> तुंम्ही फिरतीला भेटला असणार... ती मुलं तिथेच असणार अन तुंम्ही मात्र त्या वळणावर परत परत येत होता .. Happy

अमुल वगैरेची जाहिरात वाटते. नेमक्या वळणावर, जिथे गाडी स्लो होईल तिथे लावलेली. >> त्याकाळी जव्हार मोखाडा जंगले फार रिमोट होती, बऱ्याच पाड्यात वीज देखील नव्हती त्यामुळे असे बोर्ड नव्हते, तसेच त्याचा फार काही उपयोग पण नव्हता

कोणी तरी प्रँक म्हणून मुलांचे कट आऊट्स तीन ठिकाणी ठेवले असतील. >> शक्यता फारच कमी कारण जंगलातील दुर्गम भाग होता तेव्हा तो

ते झपाट्याचं रान असू शकतं. मला वाटतंय तुम्ही जरा डेरिंग करून गाडी थांबवायला पाहिजे होती. मी असतो तर थांबवली असती. गाडी थांबवली असती तर कोणत्या शक्यता होत्या ते आपण पाहू.
शक्यता 1: ती खरोखरच लहान बाजूच्या गावातील मुलं असतील. त्यांना भूक लागली असेल म्हणून ते तिथे आले असतील.
शक्यता 2: ते दरोडेखोर असतील. तुम्ही गाडी थांबवली की आजूबाजूला लपलेली माणसं येऊन तुम्हाला लुटणार. तुम्ही भरपूर जण होतात त्यामुळे तुम्ही आरामात त्याच्यासोबत फाईट करून जिंकला असतात. जरी तुम्हाला वाटलं असत की तुम्ही हरताय तर तुमच्याकडे गाडी होती त्यात बसून तुम्ही निसटून जाऊ शकत होता.
शक्यता 3: ते खरोखरच भूत असतील. तर दुष्ट भूत असण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते कारण दुष्ट भूत असे रस्त्याला शांत उभे राहत नाहीत दुष्ट भूत असते तर त्यांनी लिफ्ट मागितली असती नाहीतर पारंब्याना लटकलेले असते नाहीतर गाडीसोबत गाडीच्या स्पीडने पळत तरी आले असते.
या झाल्या शक्यता आता मला असं वाटतंय ते खरोखरच भूत होते पण चांगले भूत होते. रस्त्याच्या त्या वळणावर दरी असेल आणि तुमच्या ड्रायव्हरला झोप येत असेल त्यामुळे ते बरोबर दरीच्या ठिकाणी उभे राहून तुम्हाला सतर्क करत असतील जेणेकरून ड्रायव्हर झोपणार नाही आणि गाडी पण व्यवस्थित चालवेल.

काही वर्षांपूर्वी पाषाण की बाणेर साईडला तीन माणसे सारख्या कलरची साडी नेसून आणि विग लाऊन ठरावीक अंतरावर ऊभे राहून निर्जन रस्त्यावर लोकांना घाबरवत असत.>>> पण का? >>>>>>>> जस्ट prank हो. हे एम टिव्ही बकरा मध्ये बघितल होत काही वर्षापूर्वी.

अश्या pranks ची प्रेरणा हे गाणे होत.

https://www.youtube.com/watch?v=Ovcde9PvY20

तरुण बापे-म्हातारे या भुतांची वर्दळ Lol

हो ना
हि काय इथे >>>>>>>>>>दयाबेन भूत बनून त्या भूताला घाबरवून पळवून लावते ते भारी होत.

बोकलत प्लीज तुम्ही तिकडे तुमच्या हक्काच्या धाग्या वर वाटेल तो घोळ घाला. ईकडे तुमची टिवटिव नको.

झम्पू, अमृताक्षर, हरितात्या यांचे किस्से थरारक . वाचून जुन्या धाग्याची आठवण झाली. हवं तर अमानवीय( पुड्या किस्से) असा वेगळा धागा येउदे पुड्यानसाठी. हा नको.

हा धागा सुरु झाल्याचे माहिती नव्हते, अमानवीय २ वर पोस्ट केलेला एक अनुभव इथे तसाच्या तसा पोस्ट करतो आहे.

अमानवीय असेल नसेल, कल्पना नाही..

आमच्या रानात एक गडी होता चंद्रा नावाचा मूळ नाव चंद्रराव पण गाव चंद्राच म्हणायचं, कामाला एक नंबर, हा हा म्हणता पाणी सोडणार, ट्रॅक्टर हाणानार, पण खोड एकच, अधूनमधून देशीच्या गुत्त्यात जाणार, अन् जाऊन आला की गोठ्यात झोपणार, कारण त्याची बायको त्याला पिऊन घरात घेत नसे.

हळूहळू गडी डेली झाला, काम आवरून गुत्त्या वर जायचं हा शिरस्ता झाला, एकदोनदा मी हटकला तर करुण तोंड करून म्हणत असे

"दाद्याव चुकलो रे त्यो एक गल्लास उचलाय नगु व्हता" अन् शून्यात पाहत घळघळ रडत बसायचा. एरवी पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष वगैरे देऊन टुकिने संसार करणारा चंद्रा एकदमच भंजळल्यासारखा वागू लागला, घुम्या झाला, गंमत म्हणजे रोज ज्यांचं सडा सारवण चंद्रा करत असे ती आमची गुरे चंद्रा दारू टाकून गोठ्यात आला अन्चं खाटेवर आडवा झाला की दावणीला हीसडे मारत किंवा अस्वस्थ होऊन गळ्यातील घंटा वाजतील अशी मान हलवत बसत.

चंद्राची बायको एकदा संध्याकाळी दिवेलागणीला घरी येऊन उंबऱ्यावर रडत बसली, तशी आमची आजी ते अशुभ वाटून थोरल्या भावाला म्हणाली,

"आप्पा हीचे बघ की बाबा काहीतरी"

मी बाहेरून आलो तितक्यात, अप्पा चिडून ओरडला होता माझ्यावर,

"तात्या आत्ताच्या आत्ता जा अन् गुत्त्यातून त्या भडव्याला ओढत आण, सोन्यावाणी गृहस्थीला चुड लावतोय भोसडीचा"

आमचं अप्पा चिडला का वेताळ होतो म्हणून मी गप बाहेर पडलो, गुत्ता जवळ आला तशी मी गाडी कडेला उभी करून ठेवली अन् दबक्या पावलांनी खिडकीतून चंद्रा नेमका कुठं बसलाय बघू लागलो, तिथं चंद्रा एकटाच गयावया करत होता अक्षरशः समोरच्या खुर्चीकडे बघून, मला वाटलं चंद्रा अति पिण्यामुळे बरळत असेल पण एकंदरीत तो घरी आला तरी पिल्या नंतर पण शांत असे, तिथं चंद्रा भेसूर रडत होता,

"आर सोडा रे सोडा मला, नका माती करू रे, सोन्यासारखी बायको अन् दोन कच्चीबच्ची उघड्यावर पडतील माझी", मध्येच त्याचा चेहरा पिळवटून निघे, मध्येच हिंस्त्र होई , गुत्त्याचा मालक त्यावेळी त्याच्याकडे कावळा करतो तशी तिरकी मान करून एक डोळा बारीक करून चंद्राला एकटक बघत बसलेला होता.

अर्धातास असे झाल्यावर मालकाकडे कोणीतरी आल्यासारखे त्याचे लक्ष हटले तसे चंद्रा जीवाच्या आकांताने बाहेर पडला मी त्याला थोडे पुढे पळू दिले अन् नंतर त्याच्या मागे जोरात गाडी मारून त्याला सोबत घेऊन घर गाठले, मधेमधे तो मात्र मागे भयातिरेकाने वळून पाहायचा अन् माझा गियर वर असलेला डावा हात घट्ट धरून किंचाळायचा

"दाद्याव मला सोडव"

उत्तम तालीम, गाव उनाडक्या वगैरे करून पोसलेला माझा पिंड पण त्यावेळी टराटर फाटणे म्हणजे काय ह्याचा अनुभव घेत होता कारण चंद्रा मध्येच ओठांची टोके कानांना लावत हिंस्त्र हसे, मध्येच भेसूर रडे, असा काहीतरी झालेला चंद्रा वाड्यावर येईपर्यंत जरा शांत झाला,

परत आल्यावर आजीने चंद्राला पाहून अतिशय विचित्र तोंड करून थोरल्या भावावर ओरडली,

"आप्पा ह्याला मागं पडवीत ने अन् जात्याला बांधून घाल" त्यावेळी मात्र पाच फूट दोन इंच चंद्राने माझा अन् भावाचा तालमीत निघेल त्याच्या दुप्पट घाम काढला होता. मधेच मात्र तो शांत चेहरा करून

"माई (आजी) मला नक्की वाचवत्याल दाद्याव, अप्पासाहेब फार सोसताय तुम्ही मालक" वगैरे बोलत असे.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळ व्हायच्या आधी, आजीने गावातीलच दोन शिकलेले ब्राह्मण बोलवून घरी हनुमानाची काहीतरी पूजा करवून घेतली, त्याचा अंगारा लावून घ्यायला जात्याला बांधून घातलेला चंद्रा मात्र नकार देऊ लागला, जोरात हिसडे मारून त्यानं मनगटे अन् पिंडऱ्यांवर घट्टे पाडून घेतले होते, आजीनं त्यादिवशी चंद्राची बायकोमुले वाड्यावर ठेऊन घेतली होती ती पण घाबरली होती, अश्यातच चौघा पाच जणांनी त्याला धरून अंगारा माखला तशी तो ग्लानी येऊन पडला, पाऊण तासाने उठला तशी एकदम शांत अन् हसरा होता, बायकोला म्हणाला "मला माफ कर धनीण तुझं कुक्कू बळकट म्हणून हनमंताने मला वढून काढलं बघ".

त्यादिवशी रात्री, गुत्त्याच्या मालकाला paralysis किंवा अंगावरून वारे जाते तसे झाले अन् त्यातच तो महिनाभरात खपला, पुढे तंटामुक्त नशामुक्त गाव वगैरे कार्यक्रमात लोकांनी गूत्ता पाडून टाकला, तेव्हा गुत्त्या मागच्या गचपणात पाच शेंदूर फासलेले अन् हळद कुंकू वाहिलेले दगड सापडले, गावातल्या म्हाताऱ्या शहाण्या लोकांनी ते प्रकरण ओळखून लगेच त्या गुत्त्याचा जुना नोकर बोलवून त्याला विचारले तशी त्याने सांगितले की,

एकेकाळी गुत्त्याचा धंदा नीट चालत नसल्याने मालक कुठंतरी जाऊन ही पाच पितरं घेऊन आला होता, त्यासाठी तो जवळपास आठवडाभर गायब होता म्हणे, त्यानंतर तो रोज संध्याकाळी धंदा सुरू करायच्या अगोदर आतल्या बाजूला त्यांची पूजा करून कापूर पेटवायचा अन् एखाद गिऱ्हाईक हेरून त्याच्या पहिल्या ग्लास मध्ये एक चिमूट अंगारा टाकून द्यायचा, नंतर तो त्या गिऱ्हाईकाकडे एकटक बघत बसायचा अन् ती पितरं त्या माणसासमोर बसून त्याच्यावर गारूड घालून त्याला पाजत/ पिण्यास भाग पाडत, अन् जोवर ते गिऱ्हाईक पित बसेल तोवर तिथे राबता राहायचा बेवड्यांचा अन् धंदा उत्तम व्हायचा (म्हणे), अश्या फेऱ्यात चंद्रा अडकला होता अन् म्हणूनच तो संध्याकाळी ओढ लागल्यासारखं तिकडे धावत सुटायचा, पण तिथं गेल्यावर त्याला पश्चाताप होऊन तो त्या पितर अन् मालकांना गयावया करत असे, पण मालकाचे त्याच्यावरून लक्ष उठेपर्यंत तो काहीच करू शकत नसे, एकदा नजर जरा भंगली का चंद्रा धावत तिथून पळून जायचा.

त्यानंतर गावकऱ्यांनी देवऋषी वगैरे बोलवून ती पितरे गावातून घालवून हनुमानाचे पूजन करून भंडारा वगैरे घातला,

हा एक अनुभव आज शेअर करावा वाटला.

माझी पूर्वी कादंबरी नावाची मैत्रीण होती. तिने सांगितलेला किस्सा आहे. कोकणात कोठेतरी तिचे आजोल आहे. साधारण बारा वर्षांची असताना ती उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथं महिनाभर मुक्कामी होती.
घरात काहीतरी समारंभ होता. त्या निमित्ताने पुर्या बनवल्या जात होत्या. कादंबरीने फार हट्ट धरला म्हणून तिच्या आजीने हौस म्हणून तिला पुर्या तलायला बसवले. बैठी चूल होती आणि चूलीसमोर पुरूषभर वर खिडकी होती. बाहेर ओसरीवर आजीने, मामी आणि एक दोन शेजारीशेजारी बायका पुर्या लाटत, बारीक सारीक कामं करीत होत्या. पुरेश्या लाटून झाल्या की कोणीतरी आत चूलीजवल आणून देत होते. कादंबरी स्वयंपाकघरात एकटी तलत बसली होती. घरभर आणी अंगणात लहान मुले बागडत होती. तितक्यात, "मला दे, मला दे. " असा बालिशपणे आवाज आला आणि खिडकीतून एक हात आत आला. पुर्या तलन्याच्या नादात कादंबरीने वर पाहिले नाही आणि म्हणाली, "थांब हं, देते." तिला वाटले , असेल कोणीतरी लहान मूल. तिने बाजूला टोपलीत ठेवलेली एक पुरी उचलली. ती पुरी त्या हातावर ठेवायला ती पुढे झुकायला आणि आजी स्वयंपाकघरात यायला एकच गाठ पडली. " ए चल हाट मेले.... " आजी अर्वाच्य शिव्या देत पुढे आली. तिने कादंबरीला खसकन मागे खेचले आणि पटकन चूलीतले एक जलते लाकूड त्या हातावर मारले. तशी हात मागे गेला आणि जनावर केकाटते तसा दुखरा आवाज काढत एक सावली धावत गेली. कादंबरीला तेव्हा लक्षात आले, लहान मूल इतक्या वर खिडकीवरून हात देणं शक्य नव्हते. आवाजावरून अंदाज लावता मूल साधारण चार सहा वर्षाचं वाटले, पण मग खिडकीची उंची, हाताची लांबी याचे गणित जमत नव्हते. "अगो पोरी , हडल धरनार होती की. नशीबाने वाचलीस." आजी घाबरुन ओरडली. बायका जमा झाल्या आणि स्वयंपाकघराच्या मागील खिडकीसमोर असलेल्या झाडीकडे पहात शिव्याची लाखोली वाहू लागल्या. कोणीतरी कादंबरीला अंगारा लावला आणि द्रुष्ट वगैरे उतरवली."भवाने, माझ्या पोरीला नडलीस तर याद राख." आजी त्वेशाने, ओरडून झाडीकडे थुकली. खिडकीवर अंगारा लावला. त्या दिवसापासून आजीने तिला एकटी फिरू दिले नाही. लवकरच तिला मुंबईला परत पाठवून दिले. एरवी आग्रहाने तिला गावी बोलवणारी तिची आजी, कादंबरीला गावी बोलावणे टालू लागली. त्या हडलीची कादंबरीवर नजर आहे अशी आजीची खात्री झाली होती.

हडळ भारीच सौम्य होती. जहाल असती तर आजीला म्हणाली असती "ये भवाने १२ वर्षाच्या पोरीला एकटीला पुर्‍या तळायला बसवलंस? पुन्हा अनसुपरवाइस्ड पुर्‍या तळताना दिसली ती, तर तुच याद राख" आणि आजीच्या लाखोलीभर शिव्या सव्वा लाख करून परत केल्या असत्या.

बरोबर माधव.
बारा वर्ष मुलीला कुणी एकटीला पुरी तळायला चुलीसमोर बसवेल का?

तो हात नक्कीच एखाद्या गरीब औरत चा असेल...
बारा वर्षाची मुलगी पुऱ्या तळू शकते... गावाकडे सगळे काही लवकर असते...

मी एक नोट केले आहे.
स्वतःचे उदाहरण, आजू बाजू मध्ये राहणारे आणि माहीत असणारी लोक.
मोठ मोठे राजे महाराजे,हुकूम शाह, राज्य करते, उद्योगपती, .
कर्माची फळं दोन पिढ्यां नंतर भोगायला लागतात
सिकंदर पासून औरंगजेब पर्यंत .
प्रचंड सत्ता असणारी घराणी नष्ट झाली आज कोण वारस आहे हे पण माहीत नाही.
दोन पिढ्या अगोदर उद्योग पती असणारी घराणी नष्ट झाली
आज त्यांचे काहीच नामो निशाण नाही.
राजकीय पुढारी .ज्यांचे जनतेच्या मनावर राज्य होते.
अगदी आंबेडकर न पासून गांधी जी पर्यंत,नेताजी सुभाष चंद्र बोस पासून सरदार पटेल पर्यंत सर्व घराणी आज एक तर नष्ट झाली किंवा कमजोर झाली.(कोण वारस यशस्वी आहे असे वाटत असेल तर तो वारस दत्तक असणार त्या घराच खरा वारस नसणार)
जवाहर जी इंदिराजी दोन पिढ्या तिसरी पिढी राजीव जी नष्ट झाली
हे घराणे परत सत्तेत येणे मुश्कील.
दोन पिढ्या नंतर च तिसऱ्या पिढी ल कर्माचे भोग भोगायला लागतात.
अशी अनंत उदाहरणे आहे.त.
आज जी samarthvan लोक आहेत त्यांची तीसरी पिढी किरकोळ सामान्य जीवन जगणार.
तेच त्यांचे नशीब असणार.

हडळीचा किस्सा रोमांचक!
हेमंत यांचा किस्सा नाही समजला. ह्यात अमानवी/ भुताटकी वैगेरे काही असते असं म्हणायचे आहे का?

<पूर्वी च्या काळी असतिल 12 वर्षाच्या मुली काम करत ..
आता कोण करणार नाही ..
>>
पुण्याला माझी तेरा वर्षांची भाची स्वतः फ्रिज मधुन बॅटर काढुन घेऊन डोसा बनवून घेते, अजून बरेच काही पदार्थ करते.

ते असो,पण गरीब कुटुंबातील १२ वर्षांची मुले मुली बरीच कामे करतात, त्यात काही कष्टाची असतात आणि स्वतःच्या हौसे खातर नव्हे तर कुटुंबाची जबाबदारी म्हणुन त्यांना करावी लागतात. आमच्या आसपासच याची उदाहरणे दिसतात.

तरीच उपाशीतापाशी मला वैद्याकडे पळापळ करावी लागली होती... किती वर्षं लोटली अन् आता उलगडा झाला !

ही जी तिकडून पळाली ते डायरेक्ट ब्रह्मस्रच्या सेट वरती अग्निरोधक विमा स्किमसाठी शिवा सोबत डील करायला गेलेली पण ...

हडळीचा किस्सा यापूर्वी कुठेतरी वाचला किंवा ऐकला आहे असं वाटतंय.,>>>>
माझ्या १० पैकी २ कोकणी मैत्रिणींनी याचे वेगवेगळे व्हर्जन्स ऐकवले आहेत

Pages