अमानवीय..? 3

Submitted by ऩीली on 10 October, 2019 - 07:12

मागच्या धाग्याची मर्यादा पुर्ण झाली.
आता अमानवीय किस्से, अनुभव इथे येऊद्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एके दिवशी भर हिवाळ्यात अंधार असताना सकाळी ७ वाजता मी बस स्टॅन्ड च्या शेजारी असलेल्या स्मशान भूमीत ढाणढाण पेटलेली चिता पाहिली होती.
पण घाबरले नाही कारण,
ते गाव होतं : आळंदी देवाची
स्मशान भूमिचं नाव अमर धाम
आणि चिता एका वारकरी संप्रदायातील महाराजांची होती(he नंतर समजलं, शेजारचे काका म्हणाले पुण्यवान आहेस दर्शन झालं वगैरे )

स्मशानभूमी नेहमीच इतकी भयावह नसते जेवढी कल्पना केली जाते.. आम्ही(मी, माझे मिस्टर आणि आमचा कुत्रा) बर्‍याच रात्री काढलेल्या एके काळी स्मशानभूमीच्या जस्ट बाजूला असलेल्या जागेत तिथे रेस्टॉरंट होतं आमचं.. बर्‍याचदा रात्रीच्या चिता जळत असायच्या, नातेवाईकांचा रडणं कानावर यायचं आणि तो वास पण यायचा body जळतानाचा.
स्मशानभूमीच्या जस्ट समोर महदेवाचं मंदीर आहे त्यामुळे कधी भिती वाटली नाही. जवळजवळ 6 महिने तरी आम्ही राहत होतो तिथे.. धायरी गावात. 2015 साली

माझा हाकामारी भुताचा अनुभव लिहायचा बाकी आहे या धाग्यावर लिहू की त्या धाग्यावर लिहू? कन्फ्युज झालोय.

माझा हाकामारी भुताचा अनुभव लिहायचा बाकी आहे या धाग्यावर लिहू की त्या धाग्यावर लिहू? कन्फ्युज झालोय.>>>>>
त्या धाग्यावर लिहा तिकडे ते चित्र असल्याने फिल येतो अमानवीय धाग्याचा आणि तुमच्या अनुभवावर चर्चा पण करता येते. Wink

झम्पू आणि अमृताक्षर यांचे किस्से वाचून "मानवीय थरार किस्से" (अधिक चांगले शीर्षक सुचवा) धागा काढण्याचे पोटंशियल आहे. कुणी मनावर घेऊन काढा. नाहीतर वेळ मिळाला की मी काढेन. त्यात पुड्या सोडल्या नसाव्यात अशी अपेक्षा आहे.

त्यात पुड्या सोडल्या नसाव्यात अशी अपेक्षा आहे.>>>मग काय मज्जा नाही. खरी मज्जा पुड्या सोडण्यातच असते. पुड्या सोडणे हा प्रकार नसेल तर जग खूपच निरास होईल. मी लवकरच 'पुड्या सोडा' नावाचा धागा काढणार आहे. नाहीतर तुम्हीच काढा.

बोकलत प्लीज तुम्ही तिकडे तुमच्या हक्काच्या धाग्या वर वाटेल तो घोळ घाला. ईकडे तुमची टिवटिव नको.

पुड्याच सोडायच्या तर प्रतिलिपी काय वाईट आहे? बोकलत, पुड्या सोडा असा नवीन धागा काढा. पण तो पटकन भरेल. एकदम ६-७ वर्षे चालेल तो धागा.

पुड्या-नॉनपुड्या मुद्दा कधी निकालात निघणार नाही. पहिल्यासारखी मजा नाही राहिली अमानवीय धाग्यात हे मात्र पक्के. आम्हा वाचकांना काही रोचक वाचायला मिळत असेल तर निदान तो नॉनपुड्या धागा तरी येउद्या आता लवकर.

मागील आठवड्यात आजोळी गेलेलो तेव्हा
मामाच्या मुलाने (मामु) सांगितलेला किस्सा, त्याच्याच शब्दात.

आजोळ मोरगावशेजारी आहे, तिथुन ६ किमीवर.
नागपंचमीला कि आदल्या दिवशी सुहासिनी ववसायला (?) जातात, जनरली गावातील मंदिरात. तेव्हा त्यांच अस ठरलं कि यावेळी मोरगावला च जायचं.

घरातील सगळं आवरून मोरगावला जायच म्हणून जायला निघाले तर त्याची (मामुची) बायको अचानक चक्कर येऊन पडली. सगळ्यांची धावपळ झाली अन तिला घरात आणून तोंडावर पाणी शिंपडून थोड्या वेळाने शुद्धीवर आली. ती शुद्धीवर आल्यावर नवर्‍याला म्हणायला लागली,
“अहो बघा ना मला अंगचं नाही“
मामु तीन ताड उडाला न विचारल काय-काय म्हणालीस?

तर ती हात पायाकडे पाहत बोलली मला अंगच नाही, अन तेच परत परत बोलत राहीली.
घरच्यांनी लगेच डॉक्टर गाठला. डॉ.ने चेक करून इंजेक्शन द्यायला आला तर पुन्हा ती डॉ. ला बोलली,
“डॉ. आहेस कि भिताड? मला अंगच नाही तर इंजेक्शन कुठे देणार? “

मेंदूला नीट रक्तपुरवठा होतोय ना त्याचीही तपासणी करून झाली. पण काही फायदा नाही झाला.

शेवटी एके ठिकाणी बघितल तेव्हा त्यांनी सांगितल २ दिअवसापुर्वी ती कुठुनतरी येत होती तेव्हा तिला बाधा झालीय.

एका विशिष्ट भटक्या जमातीच नाव घेऊन त्यातील स्त्री साठी उतारा ठेवायला सांगितला.

उतार्‍यात दारुची बाटली, गुन्ना, मोठ्याच मटण , अंडी , रोट न आजून काय काय सांगितल होत.

त्याजागी उतारा ठेवल्यानंतर मामुच्या बायकोला आराम पडला (अंग दिसायला लागलं Lol )

मी मामुच्या बायकोला विचारल पन, ताई तुम्हाला त्यावेळच काही आठवतयं का?
त्यांना काहीच आठवत नाही अस सांगितल त्यानी

हा किस्सा १९९८ मध्ये घडला होता.

कॉलेजचा आमचा ट्रॅकिंग ग्रुप होता आणि आम्ही मुलं नेहमी गडांवर भटकंतीला जायचो. नाशिकला असल्यामुळे तिथल्या जवळपासच्या ठिकाणावर जायचो.
नेहमीच्या ट्रॅकिंगला बदल म्हणून दमणला जाण्याचा प्लॅन केला. मित्राच्या भावाची गाडी होती आणि तोच आमचा ड्राइवरपण होता. ठरल्याप्रमाणे दमणला पोहचलो आणि २ दिवस भरपूर धमाल मस्ती केली. परत नाशिकला निघायला थोडा उशीर झाला पण परत निघणे आवश्यक होते म्हणून ४-५ वाजता निघालो. जव्हारच्या जंगलातून जातांना जवळपास रात्रीचे दोन अडीच वाजले होते. गाडीत पुढे मी, ड्राइवर आणि मागे एक मित्र असे तिघेच जागे होतो बाकी मंडळी घोरत होती. घाटात एका वळणावर त्याने गाडी एकदम हळू केली. नीट पहिले तर समोर झाडाखाली ३ मुले उभी दिसली , २ मुले आणि १ मुलगी, साधारण १० -१२ वर्षाचे असतील. अंगावर मळकट कपडे बाकी जवळ काहीच नाही. फक्त उभे राहून गाडी कडे बघत होते. आम्ही गाडी थांबली नाही परंतु इतक्या रात्री हि मुलं जंगलात काय करत असतील असे आमचे बोलणे झाले. त्यावर ड्राइवर म्हणाला इथले आदिवासी असतील, जवळपास त्यांचा पाडा असेल जास्त विचार नका करू. तसंही या मार्गावर गाड्या अडवून लुटण्याचे प्रकार खूप होतात म्हणून न थांबणेच बरे.
आमची गाडी पुढे जात होती आणि पुढील वळणावर परत आम्हला तीच मुले परत तशीच उभी दिसली आमच्या गाडीकडे पहात. काय गडबड आहे आम्हाला तिघांनाही कळेना, भास म्हंटला तर तिघांना एकाचवेळी कसा काय होणार. आम्ही तशीच गाडी पुढे घेतली आणि घाटात पुढील २ वळणानंतर परत तीच मुले आम्हाला दिसली मग मात्र आमची जाम तंतरली. कारण इतक्या कमी वेळात ते तिथे पोहचणे अशक्य होते. मागे पुढे एकही गाडी नव्हती , फक्त आमच्या गाडीच्या दिव्याचा उजेड आणि बाकी सगळं मिट्ट काळोख. गाडीत सरळ हनुमान चालीसाची कॅसेट लावली आणि पुढे निघालो. १०-१५ मिनीटानंतर एक ट्रक पुढे जातांना दिसला तेव्हा कुठे जीवात जीव आला.

ती मुले कोण होती आणि आम्हालाच का दिसत होती याचा खुलासा आज तागायत झालेला नाही.

कोणी तरी प्रँक म्हणून मुलांचे कट आऊट्स तीन ठिकाणी ठेवले असतील.
काही वर्षांपूर्वी पाषाण की बाणेर साईडला तीन माणसे सारख्या कलरची साडी नेसून आणि विग लाऊन ठरावीक अंतरावर ऊभे राहून निर्जन रस्त्यावर लोकांना घाबरवत असत.

काही वर्षांपूर्वी पाषाण की बाणेर साईडला तीन माणसे सारख्या कलरची साडी नेसून आणि विग लाऊन ठरावीक अंतरावर ऊभे राहून निर्जन रस्त्यावर लोकांना घाबरवत असत.>>> पण का?

माझ्या दिरांच्या कंपनी चे एक गोडाऊन पिरंगुटला होते. कधी कधी रात्री ९ नंतर सुद्धा त्यांना तिकडे जावे लागायचे. ते टु व्हीलर जायचे. पण २ ते ३ वेळा त्यांना गोडाऊनच्या अलीकडच्या वळणावर एक बाई केस मोकळे आणी पांढरी साडी नेसलेली अशी दिसली होती. ती म्हणे लिफ्ट मागायची. दिर कधी थांबलेच नाहीत. आणी त्या वेळेस, म्हणजे २००२ च्या आसपास तिकडे रात्री गर्दी नसायची. आता कोणी लुटायच्या बहाण्याने मुद्दाम घाबरवत असेल, आणी त्या बाईचे साथीदार मागे झाडीत लपत असतील. असे असु शकते.

पण लुटायचे असल्यास कोणी थांबावे म्हणून धवलसाडी-मोकळे केस असा भुताटकी अवतार कोणी का करेल ?

करतील की. बाई आहे असे समजून थांबले किंवा भूत समोर आहे असे समजून जरी बाईक थांबवली तरी दोन्ही बाजूने बाईक वालाच अडकणार.

ज्यांचा भूतांवर विश्वास नाही त्यांना लुटण्याची युक्ती असेल ती.
भूतांवर विश्वास असणारे थांबणार नाहीत, नसणारे थांबले की लुटले. म्हणुन भूतांवर विश्वास ठेवत जा लोक हो.

मृणाली, तुम्हालापण वळणावरच दिसली का ? चौक,सिग्नल,नाके भुतांना आवडत नाहीत. शिवाय लहान मुले-स्त्रिया सोडल्या तर तरुण बापे-म्हातारे या भुतांची वर्दळ रात्री कमी होते बहुतेक. Happy
हरितात्या आणि आसा भारी किस्से.

Pages