Submitted by king_of_net on 12 July, 2021 - 03:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ उकडलेली अंडी
तेल - २-३ चमचे
२ मध्यम कांदे - उभे चिरुन
१ मोठा टमॅटो - उभा चिरुन
आलं लसुण पेस्ट - १ टे स्पुन
कडीपत्ता - ७-८ पानं कुस्करुन
लाल तीखट - झेपेल एव्हडं
काळीमीरी पुड - १/२ टि स्पुन (खुप जरुरी आहे)
धणे पुड - १ टे स्पुन
जीरे पुड - १ टि स्पुन
गरम / कीचन कींग मसाला - १ टि स्पुन (मी कीचन कींग वापरला आहे)
मीठ - चवीनुसार
क्रमवार पाककृती:
१. अंड्यांना हलक्या उभ्या चिरा देउन फ्राय करा. बाजुला काढुन ठेवा
२. त्याच तेलात कांदे लालसर फ्राय करुन घ्या
३. टमॅटो टाका
४. आले लसुण पेस्ट घाला
५. कडीपत्ता
६. धणे पुड
७. लाल तीखट
८. काळीमीरी पुड -
९. गरम / कीचन कींग मसाला
१०. जीरे पुड
११. मीठ चवीनुसार
१२. १ चमचा पाणि घालुन, उकडलेली अंडी ह्या मसाल्यात घालावीत
१३. अंड्यांना मसाला कोट होई पर्यंत हलक्या हाताने परतुन, पाव/ब्रेड बरोबर फस्त करावीत
वाढणी/प्रमाण:
२-३
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान रेसिपी.. फोटो हि मस्त..!!
छान रेसिपी..
फोटो हि मस्त..!!
मस्त रेसिपी. मसाला फारच छान
मस्त रेसिपी. मसाला फारच छान दिसतो आहे.
आहा... भन्नाट आहे हे..!!
आहा... भन्नाट आहे हे..!!
मी असा मसाला करून उकडलेल्या
मी असा मसाला करून उकडलेल्या अंड्याचे प्रत्येकी ४/६ तुकडे करून त्यात टाकते. एकीकडे पांढरा, मोकळा भात करून घेते. तो भात अंडा मसाल्यात मिसळून एक वाफ देते.
वन डिश मील तयार!
असा भात भारी लागतो. पटकन होतो. शिळा भात उरला असेल तरी करता येतो.
मस्तच!
मस्तच!
फोटोंमुळे सोपी आणि सुटसुटीत
फोटोंमुळे सोपी आणि सुटसुटीत वाटतेयं , मस्तच रेसिपी..!
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
भातावर टाकून एक वाफ आयड्याही भारी आहे. करुन बघतो.
अशाच मसाल्यात दुकानात मिळणारी शिजवुन फ्रोजन केलेली कोळंबी घालुन एकदम झटपट आणि मस्त भाजी होते + मालवणी मसाला घालायचा. भाकरी बरोबर आवडते खायला.
हा आमचा मार्गारिटा बरोबरचा
हा आमचा मार्गारिटा बरोबरचा ऑटाफे चकणा असायचा लग्नाआधी.
मसाला अंडा राईस awesome लागतोच पण यात चिरमुरे सुद्धा फार मस्त लागतात
छान
छान
सगळ्यांचे आभार!!
सगळ्यांचे आभार!!
हा प्रकार रवीवार स्पेशल नाष्ट्यासाठी बनवला होता.
ललिता-प्रीति, अमितव
दोन्हीं प्रकार बनवुन बघेन.
छान
छान
मी आज केलं होतं हे. छान झालं
मी आज केलं होतं हे. छान झालं होतं. धन्यवाद!
छान !
छान !
फार आवडीचा आणि कैक आठवणींशी जोडला गेलेला प्रकार ..
कारण उकडलेल्या अंड्यांना चार तुकड्यात कापून निव्वळ मीठमसाला लाऊन खाल्ले तरी छान लागले.
वाटल्यास कांदा टमाटर काकडी शिमलामिर्ची वगैरींच्या चकत्या कापून सलाड बनवावे सोबत खायला. अन्यथा नुसती उकडलेली अंडी चार पाच खाल्ली तर गरम पडतात. अनुभव घेतलाय.
पण बेस्ट पार्ट म्हणजे हॉस्टेलवर काहीही सामग्री नसताना मेसमधून अंडी उचलून आणायची आणि रूमवर पाण्याच्या बादलीत गीझर सोडून उकडवायची. मीठ मसाला सुद्धा मेसमध्ये सहज मिळून जातो. काहीही झंझट न करता मॅगीपेक्षाही सोयीचा आणि स्वस्तात होणारा पदार्थ. ज्याच्या पांढरयाशुभ्र सात्विक रंगाकडे आणि मधल्या पिवळ्या बलकाच्या तेजाकडे बघून शाकाहारी लोकंही याच्या प्रेमात पडतात आणि मांसाहारी नाही झाले तरी बैदाहारी होतात
हल्ली मात्र उकडलेली अंडी फारशी खाणे होत नाही. कारण पोरे सगळा पांढरा भाग खाउन टाकतात आणि त्यांच्या वाटणीचा पिवळा बलकही मलाच संपवावा लागतो. दोन्ही पांढरे पिवळे एकत्र बरे वाटते, पण नुसते पिवळे जास्त झाले तर नकोसे वाटते
नुकतंच हे एक वर्जन ट्राय केलं
नुकतंच हे एक वर्जन ट्राय केलं. मस्त लागलं.
अंडी फ्राय करायला वेळ नव्हता. त्यामुळे नुसती उकडलेली अंडी दोन भाग करून त्यावर कच्चा बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला, ब्लॅक पेपर, घरी केलेली पुदिना कोथिंबीर चटणी घालून खाल्ली.
@ वावे/ जागू-प्राजक्ता -
@ वावे/ जागू-प्राजक्ता - धन्यवाद
@ ऋन्मेऽऽष - ड्युप ID नाही ना???
अंडी ऑल टाईम फेवरेट आहेत
@अंजली_१२,
गाडीवर जो अंडा पाव मिळतो तो असाच असतो..
मस्त !
मस्त !
Egg Thokku.
Egg Thokku.