पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

Submitted by एकुलता एक डॉन on 5 July, 2021 - 07:41

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या

पण सरकारी लोक काय करत असतील ?
पगार तर चालूच असणार
सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ?

पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी
शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ?

रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का
बस सेवा बर्यापैंस्की बंद
जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल
आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ?
पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून

हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण सगळी खाती ऑनलाईन नसणार

आणि सगळ्यानं पूर्ण पगार मिळतो का ?

Group content visibility: 
Use group defaults

पोलीस, शिक्षक हे सरकारी कर्मचारी नाहीत का ? प्रशासन, कलेक्टर कचेरी, तहसीलदार हे बंद होते का ?

पाणीपुरवठा चालू आहे म्हणजे त्या खात्यातील कर्मचारी काम करत आहेत.
रेल्वे चालू आहे म्हणजे ते कर्मचारी काम करत आहेत.
प्रवासी वाहतूक कमी क्षमतेने. चालू असेल पण माल वाहतूक चालू च आहे.
बँका रोज चालू आहेत.
पोस्टात आता कर्मचारी पण कमी आहेत पण त्यांचे काम चालूच आहे.
सर्व विभागात काम कसे चालले आहे त्याचे नियंत्रण आहे म्हणजे प्रशासकीय अधिकारी काम करत आहेत.

पण एक गोष्ट सत्य आहे जेवढं पगार सरकारी कर्मचाऱ्यांना देश देतो त्या मानाने त्यांच्या कडून रिटर्न नगण्य मिळत आहे.
इतका जास्त पगार देवून सरकारी कर्मचारी पाळणे देशाच्या तिजोरीवर विनाकारण बोजा आहे.

इतका जास्त पगार देवून सरकारी कर्मचारी पाळणे देशाच्या तिजोरीवर विनाकारण बोजा आहे.
>>>>>

सरकारी कर्मचार्‍यांना जास्त पगार असता तर हुशार विद्यार्थी सरकारी नोकरी सोडून खाजगी कंपन्यात धावले नसते.
अपवाद काही खाती जिथे वरकमाई असते तिथे तुलनेत काही हुशार विद्यार्थी त्या कमाईच्या आशेने जात असावेत.

अर्थात हा माझा एक मिडलक्लास अंदाज. खरे खोटे जाणकार सांगतील.

बाकी , सरकारी कर्मचाऱयांच्या पगारावर जळू नये

त्यांना आले तरच समाजात चलन फिरणार , तेही आपल्यापैकीच आहेत , 'त्यांच्यापैकी' नाहीत

( आम्ही सरकारी दवाखान्यात पण कंत्राटी आहोत)

इतका जास्त पगार देवून सरकारी कर्मचारी पाळणे देशाच्या तिजोरीवर विनाकारण बोजा आहे > +९९९९
एकदम खरे आहे. सगळे कामचुकार असतात. सगळी सिस्टम अशीच रामभरोसे सुरु आहे. मोदीजींनी खासगीकरणाचे पर्व सुरु केले आहे ते योग्यच केलं.

सरकारी कर्मचाऱयांना पगार जास्त नाही

खाजगी लोकांना कमी आहे , खाजगी लोकांचे पगार वाढावेत , कंत्राटी सिस्टीम जनतेच्याच मुळावर येईल , मग सगळा सरकारी पैसा पगार पेन्शन फक्त आमदार खासदार खाणार का ?

सामान्य मनुष्याला पगार , भत्ते , पेन्शन ह्यातून पैसा मिळत रहावा , असे माझे मत आहे, जर आमदार खासदार खातात तर आम्हाला का नको ? हा प्रश्न अगदी उघडपणे मीही विचारतो. जर आपण नाही खाल्ले तर भ्रष्ट नेते आणि xxचे मश्रुम ह्यात ते जाणार , हे माझे मत आहे
पण सध्याचे म्हणजे भाजप सरकार ह्याबाबतीत हलकट आहे.
(आमचीही स्लॅब वाढ व पगार वाढ 2017 पासून बंद आहे. )

आणि गम्मत म्हणजे ह्याच हलकट सरकारने पेन्शन योजना सुरू करून त्याला अटल पेन्शन योजना नाव देऊन सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे, ज्यात आपणच पैसे घालायचे आहेत आणि त्या पेन्शणीतून 10 वर्षांनी एक वेळचा चहाही येणार नाही, इतकी ती कमी आहे

सगळे कामचुकार असतात. सगळी सिस्टम अशीच रामभरोसे सुरु आहे. >>+१११
मी तर म्हंतो सगळ्या सरकारी नोकरांना हाकलुन दिले पाहिजे आणि सगळी सिस्टीम अंबानी सर, आदानी सर यांच्या हातात दिली पाहिजे.

सरकारी कर्मचारी जेवढं पगार घेतात तेवढे मन लावून काम करत नाहीत.
सामान्य लोकांची अडवणूक ,त्यांच्या कामाची चाल ढकल हे फक्त करत असतात.
त्या मुळे ह्या लोकांविषयी आपुलकी नाही वाटतं जनतेला.
प्रतेक कर्मचारी स्वतः ला देशाचा मालक च समजत असतो.आणि जनता ह्यांची दास.
आयएएस ,आयपीएस तर जहागिरी च ह्यांना दिली आहे देशाची असे समजतात.
राजे ,राजवाडे ,वतनदार गेले आणि हे नवीन जहागीरदार तयार झाले.

सगळ्या सरकारी नोकरांना हाकलुन दिले पाहिजे आणि सगळी सिस्टीम अंबानी सर, आदानी सर यांच्या हातात दिली पाहिजे > +५६
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ? > हापिसात जाऊन सोमीवर कीबोर्ड बडवणे, डबा खाणे, यूट्युबर भोजपुरी गाण्यांचा आस्वाद घेणे, मुलींबरोबर चॅटिंग, सद्गुरू जग्गीजी यांच्या प्रवचनांचे रसग्रहण, हापिस कधी संपते याची वाट बघत घड्याळाकडे टक लावून बसणे अशा गोष्टींत माझा कधी वेळ जातो ते कळतच नाही.
आणि सगळ्यानं पूर्ण पगार मिळतो का ? > हो

हं

आमच्या रुग्णाला दर महा औषध द्यावेच लागते , पण पोलीस , बस , रेल्वे वगैरे कधीकधी अडवतात , मग अशा रुग्णाला जर तो कर्मचाऱयांच्या रूटच्या स्टेशनवर येऊ शकत असेल तर आमचे लोक जाताना त्याला औषध पोच करतात , तो फोन करून सांगतो , इकडे भेटा म्हणून

ह्याला कम्युनिटी डिस्पेनसिंग असे नाव आहे.
याबद्दल कोणताही एक्सट्रा बेनेफीट मिळत नाही.

सध्या औषधाबरोबर गरिबांना रेशनही दिले जाते , रिलायन्स व इतर काही दांनशुराकडून थैल्या आल्या आहेत.

सरकारी बॅंकेतील कर्मचारी हा वेगळाच विषय आहे.

इतका जास्त पगार देवून सरकारी कर्मचारी पाळणे देशाच्या तिजोरीवर विनाकारण बोजा आहे > >>> +१११

इतका जास्त पगार देवून सरकारी कर्मचारी पाळणे देशाच्या तिजोरीवर विनाकारण बोजा आहे.>> हो ना. सत्तर वर्षात कांग्रेसने लाडावुन ठेवले. मोदीजींनी खरे तर वसुली केली पाहिजे यांच्याकडुन. आणि पेन्शनरांना कशाला पाहिजे इतके पेन्शन?

सरकारी दवाखान्याचा नांदेड, पुणे व औरंगाबाद ह्या ३ शहरातील अनुभव आहे.
एकदम top क्लास service आहे
आपण का private ला पैसे खर्च केले असं वाटलं.
एकच गोष्ट ती म्हणजे गर्दी असते, वेळ काढून जावे लागते.

Proud

सरकारी व्यवस्थेबद्दल लोकांच्या दुहेरी अपेक्षा असतात,

ह्यांनी भरपूर काम करावे,
पण मी गेलो की मात्र गर्दी असू नये.

गर्दी नसली की काम लवकर झाले ह्याच्या आनंदापेक्षा हे बसून पगार खातात ह्याचे दुःख जास्त असते

Proud

कंत्राटी जागेवर काम करणार्याला वरिष्ठ सरकारी बाबू पिळून घेतात हा स्वानुभव. (फक्त 2वर्षे सरकारी नोकरी केली होती)

राजकारण खूप असते खालून वरपर्यंत.

प्रायव्हेट कंपनीत काम खूप असते पण पैसेही चांगले कमवता येतात. अर्थात काम करायाची इच्छा असेल तरच. नाहितर पिंक स्लिप.

कळले मला

पण मी लोकांच्या अपेक्षा सांगितल्या

माझा मित्र आहे रेल्वेत टिटी.. घरी बसून पगार होता... मात्र जेंव्हा स्पेशल रेल्वे सोडल्या तेंव्हा जीव मुठीत घेऊन त्यांनीच कामे केली... बाहेरचया राज्यातील लोकांना बाहेर सुखरूप पोहचवण्यासाठी...

@ च्रप्स +७८६

माझे डिप्लोमाचे काही मित्र आहेत बीएमसीत. मी डीग्री करून जितके कमावतोय त्यापेक्षा जास्त ते कमावतात. अर्थात याबद्दल कधी काही असूया नव्हती, कारण मी माझ्या लाईफमध्ये खुश होतो.
पण जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली ना, तेव्हा मी माझ्या घरी कुटुंबासोबत सेफ होतो आणि ते रस्त्यावर उतरून काम करत होते. त्यांना माझ्यासारखा वर्क फ्रॉम होमचा पर्यायच नव्हता. त्यांना फिल्डवर ऊतरूनच काम करावे लागले आणि ते देखील तुमच्या आमच्यासाठी. जवळपास त्या सर्वांनाच कोरोनाने प्रसाद दिला. एखाद दुसर्‍यांच्या घरचेही दगावले.
त्यामुळे म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे..

प्रायव्हेट कंपनीत काम खूप असते पण पैसेही चांगले कमवता येतात. अर्थात काम करायाची इच्छा असेल तरच. नाहितर पिंक स्लिप.>>>>

प्रायवेटमध्ये काही भरवसा नाही.. काही Technical ani IT वाल्यांची चांदी आहे फक्त.. बाकी सगळी कडे मारामारी आहे..
चाटु लोकांना लायकी नसताना प्रमोशन, अवार्ड, चांगली रेटींग सगळं मिळतं..काम करणार्याचं क्रेडीट भलता कुणी घेतं..

अप्राझल नावाची जी तद्दन फालतू प्रोसेस असते त्यात KRA चे मुद्दे असे असतात की, ह्या जन्मात काय तर पुढच्या जन्मात पण 100% मीट होणार नाही..जो कुणी हे KRA ठरवतो ना त्याला तर चपलेने हाणला पाहीजे...

110% Production पाहीजे ह्यांना ते पण विथ 100% Quality..

परत निदान पाच HR Activity मध्ये भाग घेतला पाहिजे..

आयला! इतके स्मार्ट, फास्ट आणि मल्टीटास्कींग असलो असतो आम्ही.. तर NASA जाॉईन केलं असतं..कशाला तडमडलो असतो इथे..

Team Leader असाल तर अजून वाट..Team मध्ये बॉडींग पाहीजे .. हे आणि ते...सतराशे साठ रिक्वारमेंट..

आणि मर मर मरूनही अप्राझल किती होत? ईन मीन 5 ते 8%
TCS सारख्या कंपनीत फक्त 1200रुपये वाढवले आहेत गेल्या वर्षी तर दिलचं नाही..

सरकारी नोकरीत काम करा नंतर नका करु पगार सारखाच वाढणार..वेतन आयोग लागू होणारच..
ठराविक काळानंतर बढती ही मिळणारचं...

अप्राझल नावाची जी तद्दन फालतू प्रोसेस असते त्यात KRA चे मुद्दे असे असतात की...........
......... आणि मर मर मरूनही अप्राझल किती होत? ईन मीन 5 ते 8%
>>>>

हे खरे आहे
पण हे एकदा कळून चुकल्यावर ते KRA वगैरे सिरीअसली घ्यायचे नसते की मरमर कामही करायचे नसते.
ईटस ओके फॉर कंपनी आल्सो
कारण नोकरी सरकारी असो वा प्रायव्हेट एक नियम युनिवर्सल आहे.
ज्याला जास्त काम करायची हौस असते त्यालाच जास्त काम पडते Happy
जर तुम्ही फार आवडीचे, अगदी आपले पॅशनच असलेले काम करत नसाल तर उगाच जास्त महत्वाकांक्षी न बनता आपण पोटापाण्यापुरता काम करत आहोत हे लक्षात ठेवावे आणि पोटापाण्यापुरताच करावे.
एच आर वाल्यांना तर कंपनी अर्धा पगार याचसाठी देते की त्यांनी आपल्यातला काम करायचा किडा वळवळत ठेवावा. पण आपण मात्र तो प्रयत्न हाणून पाडावा.

सध्या ईथे सव्वातीन वाजलेत म्हणून जास्त लिहीत नाही. उद्या सविस्तर बोलूया यावर...

Submitted by व्यत्यय on 5 July, 2021 - 10:05 >>>> भरत, तुम्हाला का कमी केलं नोकरीतून ? Lol

भरत मयेकर , तुम्हाला नोकरीतून कमी केलं. तुमच्या फेसबुक प्रोफाईलवर बायको मुलांच्या ऐवजी भाचीचं नाव नातेवाईक म्हणून आहे. पण तिने तुम्हाला मेन्शन पण केलेलं नाही. असे का हो ? प्रत्यक्ष जीवनात पण तुम्ही माणूसघाणे आहात का ? मैत्री सोडा पण नातीगोती सुद्धा जपता येत नाहीत असे जे बोलले जाते ते खरेच आहे का ? म्हणून तुम्ही इतके ड्युआयडी काढून मायबोलीवर येता का ? मानसोपचार का घेत नाहीत ?

तुमची बायको ( या नोकरी करत नसाव्यात) तुम्हाला सोडून गेल्या आहेत की तुम्हाला कुणी मुलगी देण्यायोग्य समजले नाही ? लग्न झाले असेल तर मुलं किती ? की मुलं झालीच नाहीत ? नसतील तर का नाही झालीत ? तुमचे आणि बायकोचे जमत नाही का ? हेच कारण आहे का एकत्र न राहण्याचे ?
कारण एखाद्या नॉर्मल माणसाच्या फेसबुक प्रोफाईलला बायको मुलांची नावे असतात. भाचीचे नाही. अजून बरेच प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाली कि विचारतो.
bharat.jpg

सहजराव, एखाद्याच्या वैयक्तिक / खासगी गोष्टींची वाच्यता त्याच्या परवानगीशिवाय सोशल मीडीयात केली जाऊ नये.

सहजराव आणि भरत हे दोन्ही आयडी सध्या बिथरलेले आहेत. यांच्या वादात भरत यांच्या सहानुभूतीदार फिल्मी या आयडीने माझ्यावर सुद्धा इतर अनेक आयडींचे पालकत्व थोपवले आहे. तरीही मी या प्रकाराचे समर्थन करत नाही. भरत यांचे आणखी एक सहानुभूतीदार व्यत्यय यांनी असाच प्रकार एका आयडीबाबत केला होता. त्याचेही समर्थन होऊ शकत नाही. माझ्या निरीक्षणात असे आहे की भरत यांचे जे सहानुभूतीदार ड्युआयडी आहेत ते सर्व विधीनिषेध धाब्यावर बसवून इतरांच्या बाबतीत पातळी सोडून आरोप करत असतात. मग भले त्यांचे त्यांनी वाकडे केलेले असो अथवा नसो. भरत हे ही मायबोलीचे ते तारणहार आहेत अशा पद्धतीने मी या आयडीशी बोलणार नाही, या लेखकाचे पुस्तक वाचणार नाही अशा प्रतिज्ञा करत असतात. याने कुणाला खरंच फरक पडतो कळत नाही. पण ते पंतप्रधान असल्याप्रमाणे त्यांना समाधान मिळत असेल तर मिळो. पण त्यांचे सहानुभूतीदार ड्युआयडी काय करतात याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. इतर काय करतात यावरून प्रतिज्ञा करत बसू नये. असे बरेच ड्युआयडी त्यांच्या आजूबाजूला असतात.
जसे फिल्मी. व्यत्यय, झंपु दामले आणि तत्सम आयडींना मायबोलीवर बागडायचे स्वातंत्र्य भरत यांना मान्य आहे तसेच त्यांच्या वाट्याला न गेलेल्या आयडींच्या बाबत त्यांनी धोरण ठेवायला हवे.
सहजराव यांनी वरची पोस्ट काढावी अशी मी त्यांना विनंती करतो. किंवा अ‍ॅडमिन यांनी यात लक्ष घालावे.

टवणे सर, असाच विकृतपणा व्यत्यय आणि फिल्मी हे आयडी नेहमी करत असतात. त्यांचे ट्रोलिंग तुम्हाला मान्य आहे का ?
भरत मयेकर हा आयडी विकृत आहे हे मागेच बेफिकीर यांनी सिद्ध केले होते. जैसी करणी वैसी भरणी.

आयडी ब्लॉक करणे किंवा आयपी ब्लॉक करणे याने प्रश्न सुटत नाहीत. व्यत्यय आणि फिल्मी अशा आयडींना आवर घालणे हे भरत यांचेही कर्तव्य होते. पण ते तर त्यांचीच भाषा बोलताना दिसताहेत. त्यांची नेमणूक माबोपोलीस म्हणून झालेली आहे का ?
अशाने प्रश्न सुटत नाहीत. त्यांना ड्युआयडी चालत नसतील तर त्यांच्या मनाप्रमाणे लिहीणा-या ड्युआयड्यांचे काय हा प्रश्न आहेच ना.

भरत मयेकरहे गृहस्थ अड्डा चालवतात. इथे येणारे आयडी पुरोगामी असल्याचे समजले जाते. भरत यांना हे आयडी मान देतात. पण भरत तसे मनमोकळे आहेत का ? अजिबात नाही. पुरोगामी कंपू मधे अनेक वादी आहेत. साम्यवादी, समाजवादी, गांधीवादी, नेहरूवादी, पवारवादी, आंबेडकरवादी , दाभोळकरवादी इत्यादी. मयेकर हे एक पूर्ववेळ राजकारणी आहेत. त्यांची विचारधारा काँग्रेसी आहे. जोपर्यंत इतर लोक त्यांच्या मनाप्रमाणे बोलतात तोपर्यंत ते त्यांच्या गुडबुक्स मधे राहतात. पण चुकून जरी एखाद्याने मनाविरूद्ध लिहीले की ते मौनात जातात. आणि ड्युआयडीने त्याचा काटा काढतात.

एखाद्या आयडीचा मूळ आयडी उडवण्यासाठी त्याला ड्युआयडीने उकसवण्यात विरोधी आयडींइतकाच हातभार ते ही लावतात. कारण काँग्रेसबद्दल मनाला न पटणारे लिहीले याचा त्यांना राग असतो. आजपर्यंत काँग्रेसच्या ढळ ढळीत चुकांबद्दल त्यांनी ब्र सुद्धा काढलेला नाही हा याचा पुरावा आहे. काँग्रेसच्या काळात मुस्लीम, दलित हत्याकांडे झाली त्याबद्दल मयेकर बोलत नाहीत. ते सिलेक्टीव्ह पुरोगामी आहेत. गोडसे बद्दल २४ तास लिहायला त्यांना कंटाळा येत नाही. पण इतरांच्या प्रश्नावर त्यांना कंटाळा येतो.

फिल्मी आणि व्यत्यय हे कुणाचे आयडी आहेत याची कल्पना नाही. कदाचित त्यातला एखादा टवणे सरांचाही असू शकेल. फिल्मी हा आयडी ज्या दोघांबद्दल सातत्याने लिहीत असतो त्यातल्या एकाने येऊन भडास ओकली आणि तो गेलाही. दुसराही त्याचा त्याच्या पद्धतीने स्कोर सेटल करणार यात शंकाच नाही. फिल्मी या आयडीचे असे उद्योग चालू असताना अ‍ॅडमिन काय करत असतात ? माझ्या माहितीप्रमाणे तक्रारीही गेलेल्या आहेत.

जर हे आयडी सातत्याने एखाद्याबद्दल मोहीम चालवू शकतात तर तेच त्यांच्यावर उलटणारच. यांना संशय आला म्हणून इतरही काही आयडी त्यात भरडले जात आहेत. त्यांना काय वाटते याच्याशी या मंडळींना घेणे देणे नसते. हे राजकारणात मुरलेले माणसातून उठलेले लोक आहेत. चिखलफेक करणे हा यांचा धंदाच आहे. चिखलफेक करून तो मी नव्हेच हा यांचा खाक्या आहेत.

अ‍ॅडमिनकडे मात्र प्रत्येकाचा कालाचिट्ठा असतो. अ‍ॅडमिन / वेमा यांच्या सहनशक्तीच्या बाहेर गेले की मग ते त्यांच्या पद्धतीने ही केस हाताळतात. अशा वेळी अचानक काही आयडी उगवले आणि या आयडींना त्यांच्याच पद्धतीने सरळ केले जाते. पूर्वी रॉबीनहूड करायचे हे काम. निळुभाऊही करायचे .

तरीही यांना समजत नसेल तर मग अवघडच आहे. भरत यांनी इतर आयडींच्या वाट्याला जाऊ नये हे चांगले राहील. तसेच व्यत्यय आणि फिल्मी हे त्यांचे मित्र असतील तर त्यांनाही आवाहना करावे.