संधीकाळच्या लांब आणि गूढ सावल्या

Submitted by सामो on 27 June, 2021 - 13:20

गुगल सर्व उत्तरं देतं. सर्व? अगदी सर्व? नाही. कित्येक अनुत्तरीत प्रश्नांची तर गुगल कडे उत्तरेच नसतात - त्याच्या मनात आत्ता या क्षणी माझ्याविषयी काय विचार चालले असतील, How much did he suffer because of my reckless, bipolar behavior?? माझी मुलगी माझ्याकडे काहीही शेअर का करत नाही? ती कधीकधी गप्प गप्प असते तेव्हा काय विचार करते? हे झाले वानगीदाखल प्रश्नं. God forbid! Has she ever gone through one hedious life experience that is part of almost every woma's life & that is sexuala assault? कोण देणार ही उत्तरं? लेकही मला म्हणते "You have given me enough space." मला माहीत आहे ही स्पेस तिला खूप आवडते, आवश्यक वाटते.
How to be positive? हां या प्रश्नाचे उत्तर गुगल देते पण ते उत्तर वास्तवात कसे उतरवायचे याचे स्टेप बाय स्टेप Happiness for dummies गाईड तर मिळत नाही. माझा नकोसा भूतकाळ कसा पुसून टाकता येईल - याचे उत्तर तर गुगलच काय एखादा जिनी आला तरी मिळू शकेलसे वाटत नाही. माझ्या प्रिय लोकांना दिलेल्या वेदनांची धार भलेही काळानुसार, बोथट झाली असेल पण भूतकाळात जाउन, मी माझे कर्म बदलू तर शकत नाही. खूपदा या अशा प्रश्नांचा त्रास होतो, घशात आवंढा दाटून येतो. अगदी औषधे काही नकोशा स्मृती बधीर करुन टाकत असतीलही पण नव्याने निर्माण होणाऱ्या विचारांवर त्यांचे नियंत्रण नसते. अनेकानेक पदर आहेत.
Everyone needs one non-judgemental space. पण थेरपिस्ट नकोसे वाटतात, एक पैसे देउन मिळवलेला shoulder to cry on नकोसा वाटतो. मान्य! थेरपिस्ट हे तद्न्य लोक असतात, ट्रेन्ड, व्यावसायिक आणि खाजगी. पण जेव्हा एक विषण्ण मूड अंगावर कोसळतो, जेव्हा आपल्यात व मुलीत असलेली दरी स्पष्ट जाणवते, ती शेजारी टी व्हीत बुडालेली, आपण काँप्युटरवर, हवे असूनही संवाद होत नाही, हवे असूनही तिला मिठीत घेता येत नाही. तेव्हा अतिशय त्रास होतो. लहान होती तेव्हा बरं होतं, शिंगं फुटलेली नव्हती, कुशीत घेउन मटामट पप्या घेता येत. लाड करता येत, छातीशी कवटाळून घेता येत असे. तेव्हा वाटे - कधी मोठी होइल, कधी स्वसंरक्षण शिकेल. नाही फक्त शारीरिक नाही स्वसंरक्षण मानसिकही असतं. हां हां म्हणता मोठी झाली, शिंगं कसली चांगले अँटलर्स फुटले. Happy पण एक दुरावा आला. मोठी होइल , माझ्यासारखी मध्यमवयीन खरे तर ५० शी कडे झुकेल तेव्हा आपण असू तरी का? तिला आई विषयी तेव्हा काय वाटेल? उदंड आयुष्या लाभो तिला. मध्यवयीन फेझ ही गिफ्ट आहे. किती लोक तर तेही पाहू शकत नाहीत याची मला जाणीव आहे. ईश्वराशी मी या आयुष्याबद्दल कृतद्न्य आहे. जसे वय वाढते तशा रेशमी निरगाठीतर बसत च असतात. कोणाचेही आयुष्य अगदी सरळसोट नसते. मान्य आहे. फार विचार करु नये हे ही कळते. पण कधी कधी उगाचच उदास वाटून येते. May be a cup of tea is all I need. आणि मेबी उगाचच स्वत शी असलेला संवाद कॉम्प्लिकेट करुन ठेवला आहे. खरं तर मे बी सर्वं काही आलबेल आहे.
तुमची सहानुभूती नको, सल्ला नको आणि जजमेन्ट तर त्याहुनही नको. This is my cross, I have to bear. फक्त एक मांडण्याकरता, जागा हवी. Just give me a listening ear बस्स! फार मागणं नाही. तुम्हाला असा त्रास क्वचित होतो का? असेल तर एक सहवेदना अनुभवणारी त्रयस्थ व्यक्ती म्हणुन आपले विचार जरुर मांडू शकता.
---------------------------------------------------------------------
या लेखाने असे वाटले असेल की मी अगदी दु:खात कायमच चूर असेन Always wallowing in self pity. पण तसे नाही. असा मूड क्वचित अंगावरती येतो. येतो तसा निघूनही जातो. लाईक वन राईडस अद वेव्ह्स, आय राईड द मूड .
अजुन एक थेरपिस्ट जे काम करु शकतत ते अन्य काहीही करु शकणार नाही आणि तरीही हे आहेच ना - अपाले कितीतरी श्लोक (मनाचे), एकनाथ-तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरी हा खजिना आहे. कुठलही पान काढून वाचावे, जगण्याचा मंत्र सापडून जातो.
>>>>>>रघूनायकावीण वाया शिणावे जनासारिखे व्यर्थ का वोसणावे
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पापिणी ते नसो दे

अस आणि असेच अनेक श्लोक हे मोट्ठे वाटाड्या आहेत. यांचा उपयोग जो करुन न घेइल तो करंटाच की.
----------------------------------------------------------------------
असो चहाने जादू केली खरी. Happy

Group content visibility: 
Use group defaults

मध्यवयीन फेझ ही गिफ्ट आहे. किती लोक तर तेही पाहू शकत नाहीत याची मला जाणीव आहे. ईश्वराशी मी या आयुष्याबद्दल कृतद्न्य आहे. >>> हे अगदी पटलं. आणि छान लिहीलंयस. तुला तुझी उत्तरं मिळोत.

हिरकणी आहेस गं तू , विसरलीस की चहा घेत जा !!
Wink Happy सदिच्छा आहेतच तुला व सर्वच मातांना त्यांच्या ममतेच्या संघर्षांसाठी _/\_

सहीय हे..!
असं काही लिहून होणार असेल तर अधूनमधून अशा संधीकाळच्या लांब सावल्या येत रहाव्यात तुमच्याकडे पाहुण्या म्हणून.. _/\_

अगदी योग्य शब्दात मांडलंय जे वाटतं ते.
तुमच्या आयुष्यात अश्या फेज आल्या तरी एका चहाच्या कपाने पटकन लांब जावोत.
काळजी करत नाही.

वाचले मी . तुम्हाला शुबेच्छा. कपल्स काउन्सेलिन्ग असते तसे पेरे ट चाइल्ड काउन्सेलिन्ग पण असते. तश्या काही मीटिन्ग घेउन मुलीमधला दुरावा कमी करता येइल हे एका दिवसात होत नाही बट रिलेशन शिप बिल्ड करायच्या दिशेने पावले टाका. हताश होउन दुरावा वाढवू नका. हार्दिक शुभेच्छा.

सर्वांचेच आभार.
>>>>>बट रिलेशन शिप बिल्ड करायच्या दिशेने पावले टाका.
हे खरे आहे. एकत्र काही गोष्टी केल्या पाहीजेत पण तसे होत नाही. ती फार घुमी रहाते. एकवेळ नवर्‍याशी जरा तरी बोलते पण माझ्यापासून दूर रहाते.
पेरेम्न्ट-चाईल्ड' काउन्सिलिंग वापरता येइल. असे वाटते - 'शी हॅज गिव्हन अप ऑन मी. ' पण हे माझ्या मनाचे खेळही असतील.

<>>May be a cup of tea is all I need.>>>
चिंचवडला (पुणे ) आलीस की ये चहाला..मस्त गवती चहा वाला चहा करते....
तू जे लिहिले आहेस ते व्यक्त करायला फार फार हिम्मत लागते. ..

धन्वन्ती नक्की येणार Happy
सियोना, वर्णिता, मंजुताई, अनु, मृणाल, स्वाती, अमितव, रुपाली, पाचपाटील, अस्मिता Happy थँक्स.
ओ पाचपाटील नका हो असं म्हणु .........लोल!!! नकोत या लांब लांब सावल्या, हाहाहा

पोचलं.
<तुमची सहानुभूती नको, सल्ला नको आणि जजमेन्ट तर त्याहुनही नको. This is my cross, I have to bear. फक्त एक मांडण्याकरता, जागा हवी. Just give me a listening ear बस्स!> हे उमजणार्‍या व्यक्ती खरंच विरळा असतात.

विशेषत: जहाँ उम्मीद हो उसकी वहाँ नहीं मिलता.

शुभ प्रभात.

भरत ह्यांना अनुमोदन.

तुम्हाला सल्ला नको आहे पण खालचे लिहिले आहे. पटले नाही तर इग्नोअर करा. फ्रेंटरव्हेन्शन समजा.
मुलांना जेव्हा गरज असते तेव्हा जर आई वडिलांचा आधार किंवा अपेक्षित सल्ला मदत मिळू शकली नाही तर ते त्यांचे त्यांचे मार्ग, प्रॉब्लेम सोडविण्याची स्ट्रक्चरस व मेकॅनिझम कोपींग स्ट्रॅटेजी शोधुन काढतात व पुढे तीच सवयीचा भाग बनून जाते . मुलीची अ‍ॅड्ल्टिंग प्रोसेस पूर्ण झाली असेल तर आता तिला सुद्धा लहान मुलगी- मम्मी इस द बेस्ट ती म्हणेल ते बरोबर हा मार्ग पत्करणे अवघड जाईल. स्वाभिमानी मुलांना आई बाबांची मदत घेणे सुद्धा कमी पणाचे वाट्ते. प्रोफेशनल काउसेलर शी तटस्थ पणे ते बोलू शकता त.

स्वतःला गिल्टी मानून घेणे सोडून द्या हळू हळू. ते तुमच्यासाठीही अवघड आहे.

तुमच्या शंके चे उत्तर शोधायला पॅसिव अ‍ॅग्रेसिव्ह ली दोघीं साठी गायनॅक ची अपॉइंटमेंट घेता येइल माझा हा हा प्रॉब्लेम आहे मी डॉक्टर ला
भेटते आहे येतेस का तुला पण बुक करू का असे आरामा त विचार. हो म्हटली तर बरे नाहीतर तुझी इच्छा म्हणून गप्प बसायचे.

छान लिहिलंय. स्पष्ट आणि धीटपणे तरीही हळुवार. तुमच्या यातना समजू शकतात.
पण ही समस्या सौम्यपणे का होईना, थोड्याफार प्रमाणात सर्वांनाच जाणवते. मुले मोठी होताना आईवडिलांपासून दूर होत जातात. त्यांच्या भावविश्वातले आईवडिलांचे स्थान आक्रसत जाते. कुठलाही मोठा निर्णय घेताना आणि त्यासाठीची यातायात करताना त्यात आईवडिलांचा समावेश नसतो. त्यांची धडपड आईवडीलांपर्यंत पोचावी असे त्यांना वाटत नाही. कदाचित त्यांना काळजी नको ही भावना असेल त्यामागे. सर्व यथास्थित झाले की मग पालकांना सांगितले जाते.
आईवडिलांच्या सभोवतालातही त्यांना रस नसतो. हे मुद्दाम होत नाही. ती जगाची रीतच आहे.
अर्थात तुमच्याबाबतीत थोडेसे टोकाचे घडते आहे. कदाचित मुलगी अधिक मोठी झाली की ती आईला समजून घेऊ शकेल.
अमा यांचा प्रतिसाद आवडला.

सुरेख लिहिलंय! Gray is also a mood. कधीतरी हा पाहुणा यावा. ते ही बरे असते. अर्थात हा पाहुणाच बरा!