शेवट! (The End Of Relationship )-भाग ८

Submitted by रिना वाढई on 8 June, 2021 - 04:01

काही दिवसांनी पायल आणि विवेक शहरात आले आपल्या घरी.बर्थडेच्या दिवशी अर्जुनने बोललेले वाक्य पायलच्या कानात अगदी तसेच गुंजत होते.एक एक वाक्य तिला आठवत होता.घरी येऊन खूप दिवस झाले,अर्जुनचा मात्र एक फोन नाही कि मॅसेज नव्हता आला.तिला अर्जुनला फोन करून बोलावसं वाटत होत,पण उगाच आपल्यामुळे त्याच्या संसारात चुळबुळ नको म्हणून ती आपले विचार झटकून टाकत होती.

आठवडा झाला...दोन आठवडे नंतर तीन आठवडे होऊन गेले पण अर्जुनच्या फोनचे काही चिन्ह नव्हते.अर्जुनचं नेहमी असंच होत, जेव्हा कधी तो आपल्या भावना व्यक्त करायचा ,त्यांनतर तो पायलशी जास्त बोलणे टाळायचाच.त्याच्या अशा वागण्याने पायल कधी समजूच शकत नव्हती कि तो जो बोलतो ते खरंच त्याच्या मनातले भाव असतात कि फक्त आपल्याला वाईट वाटू नये म्हणून बोलले गेलेले शब्द.

काही दिवसांनी पायलला जयूचा फोन आला.

पायल-बोल जयू , कशी काय आठवण काढली.

जयू-पायल , अर्जुन दा सुद्धा आहे कॉलवर .

अर्जुन फोनवर आहे हे ऐकताच पायल थोडी गोंधळली.एवढ्या दिवसांत त्याने पायलला फोन केला नव्हता आणि आज अचानक त्याच असं असणे.

पायल त्या कॉन्फरन्स कॉल मध्ये जास्त बोलत नव्हती.जयू ला खूप एकटं एकटं वाटत होते म्हणून तिने अर्जुनला फोन केला,सोबतच पायलला हि फोनवर घ्यावे म्हणून तिने पायलला सुद्धा फोन केला.थोडा वेळ बोलून झाल्यावर जयू ला एक काम असल्याने तीने या दोघांना "बोला तुम्ही , मी नंतर बोलते म्हणत फोन कट केला ."

फोन जयू ने च केला असल्याने कॉल डिसकनेक्ट झाला.तोच पायलच्या मोबाईलवर अर्जुनचा फोन आला.

पायल-हॅलो.

अर्जुन-हाय पायल , कशी आहेस?

पायल-फोन कट झाला होता ना,मग कशाला कॉल केलंस तू ?

अर्जुन-तुझ्याशी बोललो नव्हतो ना , म्हणून.आता हे असंच विचारणार आहेस कि बोलशील काही.

पायल-काय बोलू अर्जुन ...जेव्हा बोलायचं असते तेव्हा तू नसतोस...मनात असूनही तुला फोन करू शकत नाही.तुझा एखादा फोन येईल हि आशा असते मात्र काही दिवसांनी त्याची निराशाच होते.एवढ्या दिवसांपासून फोन करावंसं वाटलं नाही का रे तुला ?सांग ना खरचं...
अर्जुन फक्त ऐकत होता , काय बोलावं कळत नव्हते त्याला.

अर्जुन-काही दिवसांपासून काम वाढले आहेत,त्यामुळे वेळ नाही मिळाला.

त्याच्या बोलण्यात पायलला थोडा फरक जाणवला.

असू दे अर्जुन ,नेहमी हेच एक कारण देतोस तू.आपल्याला ज्याच्याशी बोलायचं असते ना त्याच्यासाठी आपण कसेतरी वेळ काढूचं शकतो.

अर्जुनला देखील पायलशी बोलायला आवडत होते , तरीही तो जास्त तिच्याशी बोलणे टाळायचा.सीमाला तर आवडत नव्हते हे एक कारण असलं तरी आपल्यामुळे पायलच्या आयुष्यात काही अडचणी नको यायला हा विचार करून तो तिच्याशी फार बोलत नव्हता.

अर्जुन - तू पुढल्या महिन्यात येत आहेस ना , आशिष च्या लग्नाला.

आशिष हा पायल आणि अर्जुनचा मित्र त्याचबरोबर तो त्यांच्या नात्यातला हि होता.म्हणून आशिष च्या लग्नाला पायल तर जाणारच होती.अजून एकदा अर्जुन ला पाहता येईल हि एक ख़ुशी होतीच तिला.

पण अचानक बोलत असतांनाच अर्जुनचा मोबाईल स्विच ऑफ झाला.

अर्जुन आपल्याशी मोकळेपणाने बोलला नाही , याचे पायलला थोडे वाईट वाटले.आशिषच्या लग्नासाठी अजून एकदा पायल गावाकडे आली होती.२-३ महिने झाले होते अर्जुनला भेटून त्यामुळे साहजिकच त्याला बघायला,भेटायला तिचे मन उत्सुक होते.एवढीच उत्सुकता त्याला असेल काय आपल्याला भेटण्याची,एवढीच ओढ त्यालाही लागली असेल का,असे वाटून तिने त्यावेळी अर्जुनला आपण येत असल्याची खबर नव्हती दिली.आशिष च्या लग्नाला मी येणार हे माहित असणारच ना अर्जुनला ,लग्नाच्या आधी तो येईल एकदा तरी आपल्याला भेटायला या गोडं भ्रमात ती होती.

सकाळपासूनच ती आशिषच्या घरी पोहचली होती,पण अर्जूनच्या आगमनाचे काही चिन्ह दिसत नव्हते.लग्नाला थोडा वेळ बाकी होता.पायलने छान तयारी केली होती.जास्त साडी घालून नसल्याने एवढ्या लोकांसमोर असं नटून थटून जाणे म्हणजे तिला थोडं ऑकवर्ड वाटत होते.त्यामुळे हालमध्येच बसली.थोड्या वेळात मंडपात गर्दी होऊ लागली.समोर बघत असतानाच अर्जुनची गाडी मंडपाच्या जवळ येऊन थांबली.तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.किती आनंद झाला होता तिला...पण जशी तिची नजर सीमावर पडली,अगदीच धस्सस झालं जीवात तिच्या .अर्जुन सीमाला घेऊन मंडपात निघून गेला,तो दिसतपर्यंत पायल त्यालाच बघत होती.अर्जुनचे मात्र लक्ष नव्हतेच.

अर्जुनला सीमासोबत पाहून तिला जरा दुःखच होत होते,कितीही म्हटलं तरी मानवी जीवच ते.आपल्या प्रिय व्यक्तीला दुसऱ्यासोबत पाहून थोडी ईर्ष्या होतेच मनात.थोडा वेळ वाईट वाटलं आणि नंतर तिनेही सत्य असेप्ट केलंच.अर्जुन आत मंडपात गेला माहित असल्यामुळे त्याला शोधायचा प्रयत्न नाहीच केला तिच्या डोळ्यांनी.

लग्नाला आता सुरुवात होणार होती म्हणून पायलही बाहेर निघाली.अंगणात बरेच लोक जमले होते त्यामुळे एका काठे ला ती उभी होती.समोर नजर जाताच अजून एकदा धस्सस झालं तिच्या काळजात .कारण समोर ,अगदी प्रत्यक्षात अर्जुन उभा होता.एवढंच नाही तर त्याची नजर तिच्यावरच होती.तो क्षण तिला किती सुख देऊन गेला , हे शब्दांत देखील मांडता येणार नाही.त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल केली तिने,त्याच्या चेहऱ्यावर तर हसू उमटलेच होते.

ती जशी त्याला बघायला उतावीळ होती,अगदी तेच भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते तिला.एकदम ट्रडिशनल लुक मध्ये पायल कधीच अर्जुनच्या समोर गेली नव्हती म्हणूनच असं साडी मध्ये ....आणि मेकअप जास्त नसला तरी तिलाच कसतरी झालं होत त्याच्या समोर उभं राहायला.फक्त नजरेनीच काय ते बोलले , आणि पायल सटकली त्याच्यासमोरून.
लग्न लागल्यावर अर्जुनशी निवांत बोलू आपण म्हणुन ती वाट पाहत होती.त्याच्या समोर गेल्यावर , सुंदर दिसत आहेस तू आज,हे शब्द कानावर पडतील म्हणून मन आसुसलेले होते तिचे. पायल पूर्ण मंडपात जमेल तिथे अर्जुनला शोधायचा प्रयत्न करत होती.तो दिसला कि, आहे तो इथेच आपल्या जवळ म्हणून खुश होती,पण सायंकाळ झाली...तरी अर्जुन येऊन तिच्याशी एक शब्द देखील बोलला नव्हता.रात्रीच जेवणंही नाही गेलं तिला.सीमा होती म्हणून अर्जुनला आपल्याशी बोलणे नसेल जमले म्हणून त्यावेळेस देखील पायलनेच आपल्या मनाला समजावले होते.पायलने परत जातांना शेवटचं अर्जुनला भेटायचं ठरवलं . रात्रीच अर्जुनला कॉल केला आणि उद्या जातांना आपण भेटू का हे विचारलं . अपेक्षेनुसार अर्जुनने काही कमिटमेन्ट दिल नाही पण नाही सुद्धा बोलला नव्हता . एक आशा अजूनही होतीच तिच्या मनात त्याला पारखण्याची कि जर अर्जुन उद्या मला भेटायला येणार तर अर्जुनच्याही मनात थोड्या भावना असतील अशा .पण अर्जुन नव्हता आला.

यावेळेस परत जातांना तिला जास्त दुःख नाही झालं कारण असं काही झाल्यानंतर दुःख झेलण्याची मनाची तयारी तिने आधीच केलेली होती . एक मात्र नक्की कि मनाला समजावणं एवढं सोपं नव्हतं तिच्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे ही तर पायल व अर्जुन च्या पति व पत्नीची प्रतारणा आहे. डिवोर्स घेउन लग्न करा वे दोघांनी. अस्ले प्लॅटोनिक रिलेशन शिप वाले जीवन उद्वस्त करू शकतात एखाद्याचे. पायल उत्तर भारतीय स्त्री आहे का? हे नाव मराठी समाजात फारसे आढ्ळा त नाही.
कथेचे नावच मिसलीडिन्ग आहे असे वाट्ते. शेवट कुठे आहे? हे तर सस्पिशिअसली चालू आहे की प्रकरण.