मंडेला (तमीळ चित्रपट)

Submitted by सर_जाॅन on 4 June, 2021 - 07:20

तामिळनाडू मधील सुरंगडी एक छोटश गांव जसे प्रत्येक गावात दोन गट असतात तस येथे ही दोन गट आहेत उत्तर व दक्षिण एकमेकांचे कट्टर शत्रू हे दोन गट वेगवेगळ्या उच्च जातीचे व दोन सावत्र भावांचे असतात ज्यांचा बाप हा गावचा सरपंच असतो. दोन्ही गटाच्या आपसातील भाडणा मुळे गावात नावाला सुद्धा विकास नसतो... ना शाळा,... ना रस्ता..., ना सार्वजनिक शौचालय..., ना पाण्याची टाकी पण गाव पैसे देऊन मिनरल वाटर विकत घेत असतो जो ह्या दोघां भावापैकी एका भावाचा प्लॅन्ट असतो तर दुसर्या भावाचा गावात बीयर बार असतो बस तेवढाच काय तो विकास...तर ह्या सगळ्या मध्ये चित्रपटाचा नायक स्माईली पुर्ण गाव ह्याच नावाने हाक मारत असल्याने तो स्वतः ही त्याच खर नाव विसरून गेलेला असतो तर स्माईली व त्याचा नौकर बगल हे दोघे गावाच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली राहत असतात. गावाकर्याची पडेल ती कामे करून व इतर वेळी लोकांची हजामत करून मिळेल ते पैसे घेऊन तर कुणाच उरलसुरल अन्न खावुन कसं तरी जीवन जगत असतात गावचा एक सांगकाम्या म्हणून... स्माईली च स्वप्न असतं की आपण कधी तरी स्वतः सलूनच दुकान येथे टाकायच त्यासाठी तो थोडे थोडे पैसे जमा करत असतो पण ऐके दिवसी स्माईली चे काही पैसे चोरी होतात म्हणून आहे ते पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तो गावातील पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट काढण्याचे ठरवतो सवयीनुसार तो पोस्ट ऑफिस च्या मागच्या बाजूने जातो व तेथे भिंत बघून बगल ला म्हणतो "येथे तर दारच नाही आत जायचं कसं..? कारण तो हलक्या जातीचा असल्याने गावातील घरात त्याला फक्त मागच्या दाराने प्रवेश असतो स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली पण अजूनही गावातील जातीतला उच्च-नीच भेद काही नष्ट झाला नाही ह्याची आठवण हे दृश्य करून देतो. तर साहजिकच स्माईली हे नाव गावकर्यानी दिलं असल्याने व इतर कुठलच आयडंटी प्रुफ नसल्याने स्माईली अकाउंट काढू शकत नाही पण नुकत्याच नवीन आलेल्या पोस्टमन बाईला त्याची दया येते व प्रथम ती त्याला साजेश एक नाव हुडकते पोस्टात येणार्या अनेक पत्रांवरची नावं बघत असताना तिचं लक्ष एका पोस्टाच्या टिकीटावर जात व ते टिकीट असतं नेल्सन मंडेला ह्यांच व येथे स्माईलीला त्याच नवीन नाव भेटत "मंडेला"...मग ईतर कागदपत्रासाठी पोस्टमन बाई त्याला तालुक्याला घेऊन जाते काही दिवसांनी गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागते सरपंच आजारी पडल्याने त्याची दोन्ही मुलं एकमेकांच्या विरोधात उभी टाकतात व मतदार पण दोन्ही कडे बरोबर विभागल्या जातो व जिंकण्यासाठी फक्त एका मताची आवश्यकता असते दोन्ही मुलांचे वागन न पटल्या मुळे सरपंच कुणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतो मग एका मतासाठी दोन्ही गट ऐकमेकांची मत फोडाफोडीचा पर्यंत करू लागतात पण यश काही येत नसतं हा गोंधळ चालू असतांना एक माणूस मंडेला च नवीन मतदान कार्ड घेऊन गावात येतो व सगळ चित्रच पालटते व स्माईलीचा मंडेला सर होतो व येथून मंडेलाचे अच्छे दिन सुरू होतात व मंडेला पण दोघा भावांकडून आपली पाहिजे ती सेवा करून घेत असतो. दोन्ही गट त्याच एक मत आपल्यालाच मिळावं यासाठी काहीही करायला तयार असतात एकदा तर त्याच्या मताची बोली सुद्धा लावली जाते पण लवकरच मंडेलाच्या लक्षात येत की जर आपण एकाला मतदान केलं तर दुसरा भाऊ आपल्याला जिवंत ठेवणार नाही ह्या अश्या मोठ्या कैचीत मंडेला सापडतो...तर मंडेला कुणाला मतदान करतो..? व कुणाचा विजय होतो..., व तो ह्या प्रसंगाला कसा तोंड देतो ..? नंतर त्याच हेच एक मत कसा चमत्कार घडवत व हे सर्व बघण्या सारखं आहे..दिग्दर्शक आश्विन ह्याचा हा पहिला चित्रपट पण तो कमालीचा जमून आला आहे चित्रपट तुम्हाला कुठेही निराश करत नाही व विनोदी ढंगाने आपल्या राजकीय व जातीयवस्थेवर भाष्य करतो व सोबत प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतो. एकदा नक्कीच बघण्या सारखा ....

#नेटफिल्क्स वर आहे इंग्रजी सब टायटल सोबत

https://youtu.be/ES1Oz7cW11M

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चित्रपटाच परिक्षण लिहण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुक भूल झाली तर वाचकांनी सांभाळून घ्यावे ही विनंती

ओके.
मंडेला- योगी बाबू, विनोदी अभिनेता.
बर्याच तमिळ सिनेमात तो हमखास असतो, चांगला अभिनय करतो.

बरोबर मृणाली.....जर चित्रपटाचा मराठी रिमेक करायचा झाला तर योगी बाबू च्या जागी भाऊ कदम फिट बसेल.....काय वाटतं?

छान