शेवट! (The End Of Relationship )-भाग २

Submitted by रिना वाढई on 1 June, 2021 - 06:35

३-४ दिवसांपूर्वी जयुचा फोन आला होता. जयू पायलची जिवलग मैत्रीण,एकीने आठवण काढावी आणि दुसरीने त्याचवेळी फोन करावे,काही अशीच होती त्यांची मैत्री. जयु आपल्या आयुष्यात फार सुखी नव्हतीच,त्याचीच प्रचिती म्हणून मैत्रीचं नातंही आता आधीसारखं भासत नव्हत.पायलने अनेकदा जयू ला फोन करून तिच्याशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला होता,पण कधी कधी दुःख इतकं मोठं असते कि त्यासमोर मैत्रीही आपले हात टेकते.पायलला कळलं कि तिला अजून थोडा वेळ द्यायला हवा,काळ हा जखमांवर उत्तम पट्टी करू शकतो,म्हणून पायलने स्वतः जयूला फोन करणे टाळले .

खूप दिवसांनी जयू चा फोन आल्याने पायलच्याही मनावरची मरघळ थोड्या प्रमाणात कमी झाली.त्या दिवशी अगदी जुने दिवस आठवून दोघीही खुश होत्या.
पायल,जुने दिवस आठवले कि अर्जुन दा ची आठवण येत असेल ना ग तुला?

हा काय विचारण्याचा प्रश्न आहे का जयू ? तू तर मला चांगल्याने ओळखतेस.मग तूच सांग ना अर्जुन ची आठवण येत असेल की नाही ?

पायल ने जयू ला च प्रतिप्रश्न केला.थोड्यावेळ दोघींमध्येही शांतता होती .

पायल,खूप जीव लावली होतीस ना ग तू अर्जुन दा वर त्यामुळेच तुला इतका त्रास होतो.

जीव लावले कुठे गं, जीव तर लागला होता. गुंतले होते स्वतःला विसरून त्याच्यात अशी काही कि,आताही तो गुंता सुटत नाही आहे ग .
जयू - ए पण खरचं जुन्या आठवणी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी नाही विसरू शकत ग.तुला आठवते ते दिवस किती एन्जॉय केलो आपण.

पायल - हो ना.

जयू - अर्जुन दा तेव्हा नोकरीसाठी शहरात असायचा.तो गावात येण्याची किती आतुरतेने वाट बघायचो आपण.
पायल - आपण ?

पायलने थोड्या मस्करीतच जयूला विचारलं .

जयू - अ गं आपण म्हणजे तू च ग माझी आई, झालं समाधान.आताही तू त्याच्याबद्दल किती पझेसिव्ह आहेस पायल.
आठवते मला,जेव्हा अर्जुन दा गावी यायचा तेव्हा त्याला भेटायला किती आतुरता असायची तुझी.मी आणि पिंकी , दोघीच तर तुला त्याच्या येण्याची बातमी द्यायचो. त्यांनतर त्याला भेटायला त्यांच्या घरी जाण्यासाठी १० बहाणे करावे लागायचे . पिंकीचे बाबा थोडे स्ट्रिक्ट होते म्हणून प्रत्येक वेळेस पिंकी आपल्यासोबत नव्हती येऊ शकत.मी मात्र नेहमी तुझ्यासोबत यायची बरं का,अगदी तू म्हणशील तिथे मी तुझ्यासोबत यायची .
पायल - हो ना जयू ,कधी मागच्या-पुढच्या गोष्टींचा विचारच करत नव्हतो.छोट्याश्या गावात कुणी मुलगी जर मुलाच्या घरी जात असेल तर ती काही छोटी गोष्ट नव्हती हे आता कळतंय.त्याच्या घरी जाण्यासाठी नेहमी काहीतरी ठोस कारण सांगावं लागायचं घरी,त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या घरच्यांनासुद्धा काहीतरी काम असल्यानं आलो म्हणून सांगावं लागायचं . त्याला कळतही होते ग आपले पराक्रम तरी तो किती सोज्वळ होता ना,आपल्याला बसा म्हणायचा.त्याच्या घरचेही नेहमी आदरतेने वागायचे.त्याला पाहण्यातच एक वेगळं सुख होतं गं.जे आताही कायम आहे.फरक एवढाच कि आता परिस्थिती बदलली.आता तो गावात असतो आणि मी शहरात.गावात गेले कि आताही वाटत त्याच्या घरी काही कामानिमित्याने जाऊन त्याला अगदी डोळे भरून पाहावे.त्याच्याशी खूप बोलावे,त्यानेही आपल्याला तेवढ्याच आदरतेने त्याच्या घरी बोलवावे.पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त मनातच राहून जातात जयू .
जयू - हो ना,तेव्हा तर त्याला जाऊन बघणे हे एक मिशनच असायचं आपल्यासाठी,मी आणि पिंकी हा मिशन तुझ्यासाठी पूर्ण करायचो.सायंकाळच्या वेळेस तो घराच्या बाहेर निघेल,म्हणून आपण मुद्दाम एक लोटा घेऊन बाहेर टॉयलेट ला जायचो. हा हा हा हा.त्या गोष्टी आठवल्या कि आताही हसायला येते गं.प्रेम तुझं , अन घरच्यांच्या शिव्या आम्हाला.इतक्या उशिरा पर्यंत त्याची वाट बघत असायचो कि वेळेचं भान नव्हतं राहत.तो दिसला कि लगेच कुठेतरी लपायचो.

घरी आल्यानांतर मग इतका उशीर का झाला,याच काहीही कारण नसायचं आणि मातोश्रीच्या शिव्या ऐकल्यावाचून काही मार्गही नसायचा.
पायल- आठवते जेव्हा इतके प्रयत्न करूनही जर आपला अर्जुनला बघण्याचा प्लॅन फ्लॉप झाला तर पिंकीच्या तोंडातून निघणारे अर्जुन साठीच्या शिव्या ऐकून पोट धरून हसायचो,आणि हे सगळं झाल्यावर मन अगदीच तुटून , रडू न आवरून तुम्हा दोघींसमोर आपल्या अश्रू ला वाट मोकळी करून द्यायचे.मला समजावण्यासाठी मग तुम्हचे एक एक उपक्रम मला समजावण्याचे,तू रडू नको , त्याला काम असेल म्हणून गेला तो लवकर ...अ गं घरी सगळे असणार म्हणून बाहेर निघाला नसेल किंवा खूप थकून असेल तो म्हणून आज आराम करत असेल, भेटेल तो उद्या तुला म्हणून समजावून सांगायच्या. कधी कधी तर इतक्या प्रयत्नानंतरही तो भेटला नाही कि मग तुमचीही हिरमोड व्हायची अन तुम्ही बोलायच्या... जाऊ दे ना , तूच कशाला इतकी मागे लागते त्याच्या, तुला याच्यापेक्षाही कोणीतरी चांगला भेटेल बघ.

आणि या वाक्यावर माझे रिअक्शन काय असणार माहित असून लगेच तुम्ही तिथून पळ काढायच्या.बापरे, सगळंच भारी होत गं एकदम.तेव्हा वाईट वाटलं असेल पण आता या सगळ्या गोष्टी खूप सुखद वाटतात.ते दिवस परत नाही येऊ शकत हि एकच खंत.
गावात तेव्हा टीव्ही ची कमतरता होती,काही मुलं एखाद्यादिवशी चौकात टीव्ही लावून त्यावर पिचर(movie) दाखवायचे . पिचर बघायला लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच यायचे आणि आपण तिघीही तिथे हजेरी लावायचो.तुझा एक वाक्य नेहमी असायचा कि काश !!! अर्जुन दा सुद्धा इथे असता तर....आणि तुझ्या या वाक्याने मला खरचं खूप भरून यायचे. घरी येऊन डायरी काढून मग मी त्यात डोकं खुपसून असायची,ज्यात अर्जुनचे अक्षर होते .अर्जुनने स्लॅम लिहून दिला होता ना एकदा, ते अजूनही जपून आहे.हि एकच गोष्ट त्याची माझ्या जवळ आहे गं,आणि त्यावेळेस तीच जवळ असणेच म्हणजेच तो जवळ असल्याचा भास होता.
जुन्या आठवणी काढून दोघीही अगदी ते क्षण अनुभवत होते,नक्कीच ते क्षण खूप आनंदाचे नव्हते कारण अर्जुन तेव्हाही पायलच्या दूरच होता .मात्र तेव्हा दूर असणे आणि आताचा दुरावा यात खूप अंतर होते .

खूप वेळ बोलून झाल्यावर जयू ने फोन ठेवला.पायललाही जुन्या आठवणींमधून बाहेर पडावं वाटत नव्हते .पण दिवे लागण्याची वेळ झाली होती आणि इतक्यात विवेक केव्हाही घरी येईल म्हणून तिने पटकन आपलं आवरलं . थोडी फ्रेश झाली आणि चहाच आधण गॅसवर ठेवला तोच बेल वाजली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users