मैत्री ठेवावी की नाही ?

Submitted by मस्त मगन on 16 May, 2021 - 13:48

मुळात माझा स्वभाव खूप मित्र जमावणारा नाही. काही मोजकेच क्लोज फ्रेंड्स आहेत. कायप्पा वर बोलणे चालू असायचे. बरेचदा भेटी गाठीही. पण गेल्या काही महिन्यापासून हे मित्र मैत्रीण नकोत अशी फीलिंग्स येत आहेत. यात त्यांनी लांब जाण्याऐवजी त्यांचे विचार ऐकून धक्का बसत आहे. काही दोस्तांच्या मनात किती विखार भरला आहे हे आजकाल जाणवते आहे. अजून भांडण नाही झालेय पण हे अशा विचारांचे लोक आपले इतकी वर्षे मित्र होते ह्या विचाराने खूप त्रास होतो आहे. मैत्री पूर्ण तोडावी का नाही हे कळत नाही. मतभेद राजकारणातले तर आहेतच, एखाद्या प्रवृत्तीविरुद्धही आहेत. वयाप्रमाणे लोक बदलतात व विचित्र वागतात हेही माहित आहे. पण तरीही पटत नाहीये व मन अस्वस्थ आहे
काही कायप्पा ग्रुप सोडले ते लोकं केवळ शाळासोबती होते पण हे मित्र जवळचे वाटत होते त्यामूळे जास्त वाईट वाटत आहे आणि आता नवीन कोणी मित्र मिळतील का याची पण भीती वाटते. काय करावे किती संबंध ठेवावा?
माबोवर सल्ला मिळेल का ? please टिंगल करू नका. मी खूप अस्वस्थ आहे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

टेक ब्रेक. सध्या सोशल मीडियावर जास्त न जाणं चांगल. माणसं वैतागलेत या सिच्युएशनला त्यामुळेच फ्रस्ट्रेशन बाहेर पडत असावं. शाळेतील एकदम मैत्री तोडावी हे बरोबर नाही. लॉकडाउनचा वापर करून नवीन गोष्टी शिका.

फेज असते एकेक.
आज तुम्हाला या देवाचे पाय मातीचे आहेत वाटलं म्हणजे उद्या किंवा ५ वर्षांनीही वाटेल असं नाही
सध्या अप्रिय विषय, अती संपर्क टाळून अजून काही महिने, वर्षाने परत संपर्क ठेवून पाहता येईल.
लोक अजूनही बदलतात. बदलत राहतात.

दिवस वैर्याचे आहेत.
लोकांचे वागणे पाहून यातना होतात. सहन होत नाही. सांगताही येत नाही. सतत वादही घालता येत नाही. बरं किती लोकांशी संबंध तोडणार ? त्याचा परिणाम मुलांना भोगावा लागतो.
तोडण्याची हिम्मत असेल तर तोडा. पण एकटेपणाची तयारी असू द्या.

आभासी जगातील असतील तर बिनधास्त तोडावे. त्यांची वायफळ बडबड काय एवढी मनावर घ्यायची ?
पण सख्खे- चुलत नातेवाईक आणि वीसेक वर्षांचे मैत्र कसे तोड़ू शकणार? ते तितकेसे सोपे नाही. मुख्यत: ज्येष्ठ नागरिक बहकल्यासारखे करतात.

माणसांना झाडांप्रमाणे स्वीकारावे असे वाचले कुठेतरी.
प्रत्येक झाडाचा आकार, फांद्या, पाने, फुले सर्व वेगळे असते. दोन चाफ्याची झाडे सुद्धा एकसारखी नसतात. तसेच माणसांना वेडे बागडे काय ते स्वीकारून टाकावे. त्यांनी तुम्हाला/ इतरांना मुद्दाम काही अपाय केला तर मात्र तोडणेच बरे. पण नुसतीच वेडगळ बडबड करून अकलेचे तारे तोडत असतील तर सोडून द्यावे.

आपण आपल्याला ‘योग्य’ वाटेल तसेच वागतो, तसेच इतरही लोकं त्यांच्यामते योग्यच वागत असतात. आपल्याला जसे ते डोक्यावर पडल्यासारखे वाटतात, तसेच त्यांनाही आपण तसेच वाटतो.

थोडक्यात, जास्त त्रास करून घेऊ नये.
मन: शांती ढळते. उद्विग्नता वाढीस लागते. हाती काहीच लागत नाही.
हे सर्व लिहून काढणे हा निचरा होण्याचा राजमार्ग आहे.

राजकीय मतभेद हे जर मुख्य कारण असेल तर ज्या platforms वर या चर्चा चालतात ते platforms सोडा किंवा राजकीय चर्चेत भाग घ्यायचा नाही (खरं तर वाचायच्याही नाहीत) असं पक्कं ठरवून टाका.

जगात कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये मतभेद असणारच आहेत... तुम्हाला जर अगदी तुमच्या स्वभावाचे मित्र पाहिजे असतील, तर ते अशक्य आहे. कारण जेंव्हा कोणाशीही जवळीक वाढत जाते, तेंव्हा त्या व्यक्तीचे बारीक सारीक विचार लक्षात यायला लागतात आणि असं वाटतं की "मी तर याला खूप देवमाणूस समजायचो, पण हा तर देवमाणूस नाही..."

Don't expect very ideal things in life... You will remain frustrated and never be satisfied. Because nothing is completely ideal.

ते चाणक्य पंडित म्हणतात त्याप्रमाणे, "अतिपरिचयात....", तसंच आहे हे सर्व...

मैत्री तोडायचा तर अजिबात विचार करू नका... कारण नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल... वर कोणीतरी सुचवल्याप्रमाणे ज्या विषयात खूप जास्त मतभेद आहेत, त्या चर्चेत भाग घेऊ नका... बस्स.

कोतबो मधे धागा काढलाय याचा अर्थ तुम्हाला एकही मित्र उरलेला नाहीये का ? आभासी मैत्र आणि खरे मैत्र यात गल्लत होतेय का ?
जेव्हांपासून व्हॉटसअ‍ॅप सुरू झाले आहे तेव्हांपासून संबंध बिघडत चालले आहेत. खरे तर या माध्यमाचा वापर कसा करायचा याची जाण यायच्या आधीच देशात ध्रुवीकरण झाले. ते संपूर्ण जगात होत आहे. ध्रुवीकरणामुळे विखारी फॉर्वर्डसची स्पर्धा लागलेली आहे. प्रत्यक्ष भेटीत हा विखार जाणवत नाही.

प्रत्यक्षात भेटीगाठी ठेवा. पर्सनल टच महत्वाचा असतो. तिथेही वाद होऊ लागले तर मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा. पण एका आभासी जगात तुम्हाला काय अनुभव आले त्याबद्दलचे सल्ले तिस-या आभासी जगात विचारून काही फायदा होणार नाही. तुमचे आपसात कसे संबंध होते, आता नेमके किती बिघडलेत, प्रत्यक्षात तुम्ही कसे आहात हे आम्हाला काय माहीत ?

या अशा स्थितीतून गेले आहे. आठवडा आठवडा त्या ग्रूप ला म्युट करून टाका.
समोरच्याला हि काही दॄश्टिकोण असु शकतो, त्याची काही वेगळी मते असु शकतात हे काही लोकाना अजिबात खपत नाही. काही ग्रूप मधे मित्र/मैत्रिण याना फक्त त्याना हवी तशी मान डोलावणारे मित्र हवे असतात. काही काळ दूर राहावे, नंतर ही हात भर लांब रहावे.
आपली मनःशांती ढळता कामा नये. Happy शुभेच्छा!

आपल्याला इतरांचा जेवढा उपद्रव वाटतो तेवढाच इतरांना आपला वाटत असणार का असा एक प्रश्न स्वतःला विचारावा आणि केवळ या एका विचाराच्या आधारावर त्यांना बेनिफिट ऑफ डाउट द्यावा आणि पुढे चालावे.

त्या ग्रूपला म्युट करा. मैत्री तोडायची घाई कशाला. अगदीच सहन होत नसेल तर सरळ सांगा की तुम्हाला अश्या चर्चेत इंटरेस्ट नाही

सर्वांचे आभार.. प्रतिसाद वाचून खूप छान वाटले. सध्याचा काळ कठीण आहे. मी सध्यातरी त्या व्यक्तीशी कमीत कमी संवाद ठेवण्याचे ठरवले आहे. व्हाट्सअँपच्या मेसेजेस कडे दुर्लक्ष करणे, ग्रुप वर कंमेंट न करणे असे ठरवले आहे.. मला ही व्यक्ती racist, misogynist आहे हे इतकी वर्षे जाणवले नव्हते. आता हे विचार खटकले. वरून माणसे कितीही व्यवस्थित बोलली, मोठमोठ्या गोष्टी बोलली तरी खोल मनात काही वेगळेच चालते हे कळून चुकल्यावर त्यांच्याबद्धलचा रिस्पेक्ट कमी होतो. त्यामुळे पुन्हा पूर्वीसारखे संबंध होऊ शकणार नाहीत. पण बघुयात पुढे काय वाटते ते. तसेही आयुष्य खूप unpredictable आहे.

वरून माणसे कितीही व्यवस्थित बोलली, मोठमोठ्या गोष्टी बोलली तरी खोल मनात काही वेगळेच चालते हे कळून चुकल्यावर त्यांच्याबद्धलचा रिस्पेक्ट कमी होतो. त्यामुळे पुन्हा पूर्वीसारखे संबंध होऊ शकणार नाहीत.

true..

राजकीय चर्चेत भाग घ्यायचा नाही (खरं तर वाचायच्याही नाहीत) असं पक्कं ठरवून टाका. >>> +१

हे मित्र जर मूळचे व्हॉटसॅप बाहेरचे असतील तर त्यांचे विचार बिचार ऐकून मैत्री अजिबात तोडू नका. लोक सोशल नेटवर्क्स वर दिसतात तितके ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट नसतात. प्रत्यक्ष जीवनात लोक एकाच विचारावर वर्षानुवर्षे ठाम राहणे क्वचितच होते. काही नग सोडले, तर लोक जसे विविध लोकांच्या सहवासात येतात तशी त्यांची मते बदलतात.

सोशल मीडिया वर आपले "virtue signaling" करणे व आपल्याला ज्याचे पटत नाही त्याला/तिला एखाद्या घाऊक गटात टाकून तुम्ही भक्त आहात, तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही स्युडो लिबरल आहात वगैरे लेबले लावणे एकदम सोपे आहे. पण प्रत्यक्षात लोक प्रचंड कॉम्प्लेक्स असतात. आज एखादी रेसिस्ट बोलणारी व्यक्ती उद्या एकदम इतकी वेगळी वागते की तुम्हाला प्रश्न पडेल यातली कोणती खरी.

जे काय व्हर्च्युअल चालले आहे त्याचे प्रत्यक्ष मैत्रीत काही आणू नका. तुम्हाला वैयक्तिक जीवनात जे प्रत्यक्ष व थेट अनुभव येतील फक्त त्यावरूनच ठरवा. तुम्हाला त्यांची राजकीय्/सामाजिक मते पटत नसतील तर त्या चर्चांपासून लांब राहा.

अगदी फारएन्ड.व्हॉटसप वर फेमिनिस्ट पोस्ट टाकणारे लोक प्रत्यक्षात 'ज्या बायकांना नोकरी करावी लागते त्या सर्वांचे नवरे गां x' किंवा 'ती बघ बाई लिपस्टिक लावून बलात्कार व्हिक्टइम्स साठी सोशल वर्क करतेय' असे डायलॉग टाकू शकतात.

कधीकधी आपण काय कंटेंट टाकतोय, त्यातून काय मेसेज पसरवतोय हेही लोकांना कळत नसतं.