मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे ?

Submitted by Dr. Satilal Patil on 10 May, 2021 - 22:43

नमस्कार,
मी महिन्याभरापूर्वीच मायबोलीवर आलोय. मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे याचे कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे लेख खूप छान आहेत. पण

तुमचे लेख खूप छान आहेत. पण चांगल्या लेखनाला इथे प्रतिक्रिया येतीलच असं नाही. आणि जास्त प्रतिक्रिया आल्या नाही म्हणून लेखन कमी लोकांनी वाचलं असं होत नाही. मायबोलीवर भूतं-खेतं, गूढकथा, रहस्यकथा, कोणाशी तरी बोलायचं आहे या ग्रुपवर काढलेले धागे हॉट टॉपिक असतात. इतर धाग्यावर लेख आवडला तरी छान आहे, खूप छान लिहिलंय यासारख्या सिलेक्टिव्ह कमेंट्स असल्या कारणाने त्यावर जास्त प्रतिसाद येत नसावेत. लेख वाचकाला आवडला तर लाईकच्या बटणाची सोय मायबोलीवर देण्यात यावी अशी admin यांना विनंती करतो.

तुमचं लेखन पोहचतंय हो वाचकांपर्यंत, आवडतंय पण. सगळेच वाचून आवडणारे प्रतिसाद देतात असे नाही.
पण एकामागोमाग एक लगेच 5-6 टाकू नका
साधारण 1 आठवडा किंवा 10 दिवसांनी 1 कथा टाकल्यास लोकांना वाचून प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळेल.
चांगलं मटेरियल लोक नक्की वाचणार.तसेच आपल्या विचारपूस मध्ये स्वतःच्या रोचक कथांच्या लिंक देऊ शकता(तश्या त्या लोकांना लेखन टॅब मध्ये जाऊन मिळतीलच, पण तरी हे अधिकाचे प्रमोशन.

mi_anu +१.
प्रतिसाद संख्येवर जाऊ नका.

अनु ला अनुमोदन.
फार मोठे किंवा फार छोटे भाग टाकू नका. योग्य परिच्छेद पाडा. शुद्धलेखन नीट असेल तर ते लेखन पटकन वाचून होते. वाचकांनी काही प्रश्न विचारले किंवा अनपेक्षित प्रतिसाद दिला तर समंजसपणे हाताळा.
चांगल्या माहितीपर लेखांना प्रतिसाद तसे कमीच मिळतात. Conspiracy sells faster than facts..

लेख वाचकाला आवडला तर लाईकच्या बटणाची सोय मायबोलीवर देण्यात यावी >> सहमत. लाईक बटणसह मायबोली झालीच पाहिजे!

mi_anu यांच्या प्रतिसादातील मुद्दे पटले.

छान चालू आहे तुमची लेखमाला. अनु म्हणाली तसं प्रतिसाद ≠ वाचकसंख्या
रच्याकने, पूर्वी कधीतरी माबोवरच्या लेखांखाली वाचने असा टॅब पाहिल्यासारखे वाटते. असायचं का असं काही? वेमांनी अशी सोय करून दिली तर चांगलं होईल.

Mee pan vachatey.
Awadatey.

Sagale vachayala/pratisadala alikade vel mililat nahiye

दोन प्रकारे हे होते

१) काही लोकं प्रतिसादसंख्या बघून धागा उघडतात. तसेच प्रतिसाद आधी वाचून मग लेख वाचणेबल आहे की नाही हे ठरवतात. थोडक्यात प्रतिसाद प्रतिसादाला खेचतात. त्यातही जेव्हा तुमच्या लिखाणाचा विषय जास्तीत जास्त लोकांना रिलेझ्त होतो तेव्हा जास्त प्रतिसाद येतात. थोडा वेळ लागतो पण चांगल्या लिखाणाला मरण नाही.

२) काही लोकं आयडी बघून धागा उघडतात वा तो वाचायचा का नाही हे ठरवतात. या प्रकारात आयडी प्रसिद्ध करायचा असेल तर पहिला धागा एखाद्या वादग्रस्त विषयावर काढावा किंवा कोतबोमध्ये काढावा आणि एखादी टीआरपी खेचणारी वैयक्तिक समस्या मांडावी. शंभरेक प्रतिसाद पडले. हाणामारी वादावादी थट्टामस्करी टाईमपास असं बरेच काही त्या धाग्यावर झाले की लोकं तुमचा आयडी ओळखू लागतात. मग हळूच तुमचे ईतर चांगले लिखाणाचे धागे सोडावे. आधीच्या धाग्याच्या संदर्भाने आणखी काय लिहिलेय बघू या माणसाने ते वाचले जाते Happy

आता तुमच्या या धाग्यामुळेही काही लोकं तुमच्या लेखनात डोकावले असतील. गूड !

या निमित्ताने मलाही माझा पहिलाच धागा आठवला...
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?
https://www.maayboli.com/node/49998
त्यानंतर जी गर्लफ्रेंड मला चिकटली ती कायमचीच...

बघा, आता मी कसे संधी साधून माझ्या एका लेखाची जाहिरात केली. तशी जाहीरातीची रिक्षाही फिरवता आली पाहिजे. बिलकुल लाजायचे नाही. ताकाला जाऊन तांब्या लपवायचा नाही.

आणि हो, एक आगाऊ हितचिंतक सूचना - आज तुम्ही आपल्या लेखाला वाचक शोधत आहात. सर्व प्रतिसाद ईथे प्रोत्साहन देणारेच येतील. मात्र जेव्हा तुमचा पत्ता चालू लागेल तेव्हा टिकाकारही बाह्या सरसावतील. तेव्हा कोणाला उलटे निघा तुम्ही ईथून असे म्हणू नका Happy

तुमचे लोणार तळं आणि चहा वाले लेख मी कालच वाचले.
छान लिहिता.
एकंदर प्रवास वर्णन वाचायचा वेग कमी असल्याने आतापर्यंत राहिले असावेत.
मेक्सिको सात बारा वगैरे शब्द प्रयोग भारीच आवडले.

मात्र जेव्हा तुमचा पत्ता चालू लागेल तेव्हा टिकाकारही बाह्या सरसावतील. तेव्हा कोणाला उलटे निघा तुम्ही ईथून असे म्हणू नका>>> लाखात एक बोललास बघ.

@डॉ पाटील
तुमचा पहिला लेख आत्ताच वाचला. ओघवती भाषा आहे. तुमचे अनुभव आणि इतर लेखही वाचायला नक्की आवडतील. वेळ मिळेल तसं वाचेन हळू-हळू.

ऋन्मेष Lol

मी_अनु, ऋन्मेष +1
ऋ च्या प्रतिसदातला दुसरा मुद्दा आणि त्याखालील प्रतिसाद Lol
तुमचा पहिला लेख - सात देश...... वाचला होता. प्रतिसाद द्यायचा राहून गेला. छान आहे. बाकीचे वाचायचे आहेत.

लेखांचे शीर्षक वाचुन ते पानं उघडुन वाचावेसे वाटले नाहीत. या लेखामुळे ते लेख चाळले. चांगले आहेत.
थोड्या वेगळ्या पद्धतीने आणखी चांगली नावे देऊन बघा. हे "माझे" वयक्तीक मत!

mi_anu +१.

मी तुमचे लेखन वाचायला सुरुवात केलेय, मात्र एकदम लागोपाठ लेख आले की लगेच सगळे वाचणे होत नाही. दुसर्‍या दिवशी ते सगळे लेख दुसर्‍या तिसर्‍या पानावर गेल्याने मग नविन काही वाचायच्या नादात मागे पडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाला मधला अवधी किती हे वेगवेगळे. माहितीपूर्ण लेखमाला किंवा प्रवासवर्णन असेल तर ७-१० दिवसाच्या अंतरानी एक लेख वाचायला बरा पडतो. तेच रहस्यकथा असेल तर १० दिवसांनी दुसरा भाग आला तर लिंक तुटल्यासारखे होते, तिथे रोज नवा भाग आला तर वाचकांचा छान प्रतिसाद मिळतो.

प्रतिसाद संख्येवर जाऊ नये>> +१
खरंय.. इथे बरेचसे चांगले धागे असे पाहिलेले आहेत की जे प्रतिसादांअभावी बेवारस प्रेतासारखे पडून राहिल्याचा भास होतो.. कदाचित ते वाचले गेलेले असू शकतात.. पण ते समजायचा मार्ग नाहीये.. 'कोरा' मराठी सारखा इथं 'अपवोट' किंवा 'डाऊनवोट' चा पर्याय तसेच व्ह्यूज चा डिस्प्ले वगैरे असता तर आणखी चांगलं झालं असतं.. त्यातून जरा अंदाज येतो की आपण जे लिहीतोय ते एकंदरीत बरं जमलंय किंवा कसे, याबद्दल..
अर्थात ज्या त्या साईटची आपापली अशी, बरे वाईट वैशिष्ट्ये असतात म्हणा..
मी सगळी गावं फिरून, इथं मायबोलीवर जरा बरं पब्लिक आहे, या निष्कर्षावर आलो आहे.. Happy

ऋन्मेष Lol

कधीकधी लेखाचं नाव वाचून 'हा आपला विषय नाही' असा निष्कर्ष काढून स्कीप केले जाऊ शकतात
कधीकधी लेख उघडून त्यात खूप शुद्धलेखन चुका, परिच्छेद चुका आणि खूप कंटेंट वाचूनही मुद्दा कळला नाही तर स्कीप केला जाऊ शकतो.
कधीकधी छान शीर्षक आणि आत 5च ओळी असतात.
एखाद्या लेखाला मुद्दाम ठरवून अनेक प्रांतात, क्षेत्रात, देशात पसरलेले सर्व वाचक बेवारशी ठेवतील इतके एकमत कुठेच शक्य नसते Happy

लेखन एखाद्या गृपमध्ये केले तरीही लेख सेव्ह करताना सर्वांत खाली जो ऑप्शन असतो - Group content visibility * तेथे Public - accessible to all site users हा ऑप्शन निवडलात तर लेख त्या गृपपुरताच सीमित न राहता मायबोलीवर आलेल्या सर्वांना दिसेल.

डागदरबाबू
तुम्हाला जर डागदरीतून फावला वेळ मिळत असेल तर माझा पीआर म्हणून काही स्टार्ट अप्स साठी काम बघाल का ?
इथे सल्ले देणा-या सर्वांना तुम्ही हा हा म्हणता वेड्यातच काढलं की ओ. हा धागाच मार्केटिंगची कमाल आहे.
हा हा म्हणता पब्लीकला तुमचे लिखाण माहीती पडले.

थोडक्यात प्रश्न आणि उत्तर
मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे ?
मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे ?
असा धागा काढावा.

व्ह्यूजचा डिस्प्ले वगैरे असता तर आणखी चांगलं झालं असतं..
+1
किंवा असा एखादा लेखनाचा धागा जो कायम पहिल्या पानावर राहील, त्यावर आपण जाऊन आपली लेखनाची लिंक द्यायची. म्हणजे लेख मागच्या पानावर गेला तरी वाचक यावर नोंद घेऊन वाचू शकतील. काही लेखक शेवटच्या एक दोन प्रतिसादांना (रोज येऊनही) सहा महिन्याने किंवा वर्षाने धन्यवाद देऊन लेख पुन्हा वर काढतात. ही एक आयडिया.
याने नवीन लेख मागच्या पानावर जातात , जे अनफेअर वाटते. आपणही आपल्या लेखात गुंतून रहाण्यापेक्षा नवीन काही तरी लिहावं नाही तर दुसऱ्यांचं वाचावं. जुने लेख वाचकांनी वर काढले तर ते फेअर आहे. Wink
अर्थात एकमत होऊ शकत नाही याबाबत अनुशी सहमत. शेवटी ही सगळ्यांची जागा आहे जो तो आपल्या मताप्रमाणे वापरणार. But sharing is caring इथेही लागू होते. मायबोलीवर वाचनमात्र असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्यांच्यासाठी लिहित आहोत हे मनाला पटवावे Wink
चांगल्या प्रतिसादांनी हुरूप येतो हे मात्र खरं आहे.

Happy धमाल.

हा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून नाही तर 'जेनेरिक' One could do these things अशा मोघम अर्थाने आहे -
मूळात जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन गेलं पाहिजे हा आग्रह किंवा दृष्टीकोन नसावा. चांगलं, दर्जेदार, अभ्यासपूर्वक लिहायचं आणि वाचकांवर सोडून द्यायचं. प्रतिक्रियांनी हुरूप येतो हे खरे पण प्रतिक्रिया नाही आल्या तर नैराश्य नको. उलट प्रतिक्रिया नसणे हे अधिक प्रभावशाली लिहीण्यासाठी प्रेरणा ठरलं पाहिजे. संगीताच्या मैफलीत समेवर नकळत जशी "क्या बात है!" अशी दाद येते तशी प्रतिक्रिया उमटायला हवी. त्याची सर कुठल्याही व्ह्यू काऊंटस नि लाईक्सला नाही. वाचलं की वाचक व्यक्त होत नसेल तर तो आपला लेखनदोष मानून सकस लिहीण्याकडे लक्ष द्यावे.

सी, तुझ्या प्रतिक्रियांवरील प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया (व्रात्य Wink )
कुणीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा अतिशय कमी प्रतिक्रिया असल्या की समजावे इतकंSSS उत्कृष्ट लिहिलंय की वाचकांची निःशब्द होऊन दातखिळ बसली आहे , तेवढंच अल्टर इगो खूष. Proud
बादवे हे फिदी दातखिळसारखेच हसते..

#स्वानुभव पण तेव्हा माहिती नव्हते. Wink

जयाप्रदा आणि श्रीदेवी मायबोलीवर असत्या तर त्यांनी एकमेकींना कधीच प्रतिसाद दिला नसता.
जया भागदौडी ने पण खारेला दिला नसता.

चांगल्या प्रतिसादांनी हुरूप येतो हे मात्र खरं आहे.
>>>>>

शंभर प्रतिसाद झाले तरी हुरूप येतो.

हे म्हणजे अगदी क्रिकेटसारखे झाले,
एखाद्या धोनीला कमी धावांची पण मॅचविनिंग ईनिंग खेळून आनंद मिळतो
तर कोणाला मॅचच्या निकालापेक्षा वैयक्तिक शतकाचा आनंद होतो Happy

ईथे कोणालाच्या जागी तुमच्या डोळ्यासमोर कोण आला याचे प्रत्येकाने नाव घेतले तर धाग्याला एक वेगळाच टीआरपी भेटेल.

जर वरच्या वाक्यात टीआरपी भेटेल हे वाचून कोणी बोलले की हल्ली लोकं मिळेल न म्हणता भेटेल असे जास्त लिहितात तरी धाग्याला दुसरा टीआरपी मिळेल

@धागालेखक - थोडी बिझी असल्याने तुमचे धागे आलेले समजले नाहीत.
काही जण नवीन असून त्यांनी शीर्षकात गूढकथा / रहस्यकथा असे लिहीले असल्याने तिकडे चटकन लक्ष गेले. माझा प्रयत्न असतो नवीन चांगले काही असेल तर वाचून प्रतिसाद देण्याचा (सगळेच नाही). तुमच्या बाबतीत काही न काही कारणाने ते जमले नाही.

आणी जर कधी अस आढळलं की आपला लेख अचानक तिसर्‍या चौथ्या पानावर गेलाय. तर स्वतःच जावुन आपल्या लेखावर एक सेंटी प्रतिक्रिया टाकायची किंवा आपल्याच एका जुन्या लेखाची लिंक चिकटवायची लेख आपोआप पहिल्या पानावर तरंगत राहील भले ५० प्रतिसादापैकी ४५ आपले स्वतःचे असतील तरी चालतील.........अस करणारे महाभाग इथे काय कमी आहेत काय. (सध्या ते आपल्याच डुआयडीने आपला लेख वर आणण्याचं कसब तुम्हाला नवे असल्या कारणाने जमणार नाही म्हणुन त्या भनगडीत सध्या पडु नका जसे जसे जुने व्हाल जमेल हळु हळु)

मला वाटतं प्रतिसाद किती ची फार चिंता करू नये.
पूर्वीच्या काळी लेखक अनेक लेख लिहायचे.ते संपादक ऑफिस मध्ये पाठवायचे.त्यातले बरेच न वाचता साभार परत यायचे.काही तर परत पण यायचे नाहीत.संपादक ऑफिस मध्ये रद्दीत जाऊन पडायचे.या लेखकांना आपलं लिखाण वाचकांपर्यंत पोहचण्याची मीनिमम स्टेप पण नाकारली जायची.
मी हे सर्व कधी अनुभवलं नाही.पण खुप जुन्या लेखकांच्या साहित्यात वाचलं आहे.
आपण भाग्यवान आहोत, आपल्याला आपले लिखाण एक क्लिकवर मंचावर मांडता येते.त्याचा ताबडतोब फीडबॅक मिळतो.ते कोणा कार्यालयात रद्दीत सडतंय का, संपादकांच्या भाच्याने स्वतःच्या नावावर कुठे छापून आणलंय का याची चिंता करावी लागत नाही.
जे रिलेट होणारं असेल, ते वर येईलच.

लेखक धागा टाकून गायब झालेत का? इतक्या लोकांनी प्रतिसाद दिलेत त्याचा काही फीडबॅक ?
आता "मायबोलीवर मागितल्या जाण्याऱ्या सल्ल्याच पुढे काय होतं " असा बाफ काढावा का ?

जाई +1
हेच मनात आले होते.

अनु , चांगला मुद्दा आहे.
जे होऊन गेलं ते गेलं. आता त्या गोष्टीशी तुलना करून समाधान कशाला मानायचं ? आताच्या परिस्थितीत आपले लिखाण का दुर्लक्षित राहते हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे की. नवीन माणसाला ते वाचले गेले कि नाही, वाचून दर्जाहीन असल्याने प्रतिसाद दिला नसेल हे कसे समजणार ? यात कुणाचाही दोष नाही. ज्याला जसे योग्य वाटते तसे तो आपले लिखाण इतरांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार. शेवटी कुणीतरी वाचावं म्हणूनच लिहीतात. स्वान्तसुखाय तर डायरीत पण लिहीता येते की.

चांगले लेखक सुद्धा फेसबुकवर मार्केटिंग करतात आपल्या पुस्तकांचे. तो अविभाज्य भाग झालेला आहे असे मला वाटते. माझा एक मित्र आहे. तो गाणी बनवतो / गातो. त्याने सांगितले की सोशल मीडीयाचं अल्गोरिदम लक्षात घेऊन पुढची स्ट्रॅटर्जी ठरवली तरच आपले गाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्यासाठी ही मंडळी जास्त सबस्क्रायबरर्स असलेल्या युट्यूबर्स सोबत चेन बनवतात. एकमेकांना क्लिक्स देत राहतात. त्यामुळे ते व्हायरल व्हायला मदत होते. एक गाणे बनवायला स्टुडीओ, वाद्यांचे भाडे, गायक - तंत्रज्ञ, वादक यांची बिदागी याचा खर्च असतो. तो जर निघत नसेल तर मग गाणे कोण बनवेल ?

हौशी / व्यावसायिक यातला फरक अर्थात मान्य आहे.

राभु, प्रमोशन हा भाग नक्कीच महत्वाचा आहे.आफ्रिकेच्या जंगलात बसून कागदी डायरी लिहून ती जमिनीत पुरण्यातही अर्थ नाही Happy

पण सध्या इतके लिखाण, इतके युट्युब चॅनल्स निघतात, त्यावर फक्त 2-3 व्हिडिओ असताना त्यांचे इतके प्रमोशन होते की अश्या प्रमोशन चे ऍमवे किंवा टपरवेअर एजंट सारखे होईल आणि लोक त्यांना टाळायला लागतील अशी एक भीती वाटते.(आमचेच एक परिचित आहेत.त्यांच्या युट्युब चॅनल वर नवा कंटेंट आला की व्हॉटसप येतो लाईक शेअर सबस्क्राईब चा.तो मेसेज आला की जरा घाबरायला होते.कारण कंटेंट आवर्जून लाईक करावा असा नसतो.)

सातत्याने लिहून, त्याबरील फीडबॅक तपासून, एखाद्या लेखाला जास्त प्रतिसाद मिळाले तर ते का मिळाले हे अभ्यासून लिखाण टाकावे हा योग्य मार्ग वाटतो.सध्या एका साईटवर लोकप्रिय झालेले आपले चांगले लिखाण दुसर्या साईटवर येऊन डायरेक्ट एक दिवसात 15 लेख एकदम टाकण्याची पद्धत आहे.तूमचे लिखाण अतिशय चांगले असेल, पण ते लोकांना हळूहळू पचायला हवे ना?एकदम एका दिवशी 100 पुरणपोळ्या खाऊ घालून दुसऱ्या दिवशी तुम्ही 'या लोकांना किंमत नाही, मी पुरणपोळ्या खाऊ घातल्या त्या पण अपरिशिएट नाही केल्या' म्हणून उद्वेगाने तिसऱ्या ठिकाणी एका दिवसात 100 पुरण पोळ्या खाऊ घालायला निघून जाणार.

नो युवर ऑडीयन्स इतके म्हणावेसे वाटते.
(यातले कोणतेही उदाहरण या धागा लेखकांच्या लिखाणाशी संबंधित नाही.ही जनरीक उदाहरणे आहेत.)

आता आपण जसा त्यांना सल्ला देतोय, प्रतिसदावर जाऊ नका, प्रतिसाद दिला नाही म्हणजे वाचले नाही असे नाही, लिहीत रहा.
तसंच आपणही आपण दिलेल्या प्रतिसदावरही आपण प्रति-प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये.
प्रतिसादेवाधिकारस्ये मा दखलेषु कदाचन
हे परत एकदा नमुद करतो.

तसंच आपणही आपण दिलेल्या प्रतिसदावरही आपण प्रति-प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये.>>
"माझ्या प्रतिसादांची कोणीच का दखल घेत नाही" असा कोतबो मध्ये एक धागा काढता येईल.

थोडक्यात प्रश्न आणि उत्तर
मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे ?
मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे ? असा धागा काढावा.

----------हे अगदी बरोबर आहे.... प्रश्नामध्येच उत्तर शोधलं @पारंबीचा आत्मा

mi_anu
<<,<<नो युवर ऑडीयन्स इतके म्हणावेसे वाटते.>>>>
तो सगळा प्रतिसाद !!!
लेखक आणि हिन्दी फिल्म प्रोड्यूसर मध्ये काही फरक आहे की नाही.
नायिकेची अंग प्र्त्यंग दाखवली आहेत की नाही ?
हीरो ,हिरविण ची किती लव सांग आहेत ?
रेप सीन आहे की नाही ?
फाईटिंगचे किती सीन आहेत ?
माका , बहेणका ,प्यार त्याग बलिदान वगैरे हात रुमाली सीन किती आहेत ?
बेटी दरवाजा खोलो असा रामु चाचा .
कॉमेडीसाठी कोण आहे?
आम्ही कॉलेजला असताना असे सॉफ्ट वेर लिहिले होते.
लेखक असे लिहायला लागले तर ?.

मला कळलं नाही प्रभुदेसाई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते.
आपण जे लिहीतोय त्यावर फीडबॅक, काही चांगल्या सूचना असतील तर त्या तपासून पुढच्या लेखात ते बदल करणे हे लोकांना आवडले म्हणून सिनेमात रेप सीन टाकण्या इतक्या व्यावसायिक लेव्हल चे आहे?
लोकांना आवडले नाही म्हणून लिखाणाचा आत्मा, हाडे, रक्त बदलावे असे मला वाटत नाही. पण लिखाणाचे केस नीट विंचरलेले असावे, स्वच्छ आंघोळ,डाग नसलेले, त्यतल्या त्यात नीट फिटिंग चे कपडे वगैरे अंगावर असावे इतके नक्की Happy

अनु
प्रमोशन दर्जेदार गोष्टींचे हे गृहीत धरलेले आहे. टा़काऊ किंवा भारंभार मागे पडणारच. एखादा टाकाऊ आहे कि नाही हे पण वाचल्याशिवाय /ऐकल्याशिवाय / पाहिल्याशिवाय कसे कळणार ? सुरूवातीला निर्दोष कुणीच नसतं. त्यामुळे प्रोत्साहन, सूचना मिळाल्या तर त्याचा उपयोग होतो. कुणीही प्रतिसाद दिलेच नाहीत तर वाचले गेले नाही असेच गृहीत धरले जाणार.

एखादा चित्रपट खूप चांगला असूनही पडतो. तर टुकार सिनेमे पण चालतात. यामागे ठरवून कुणी काही करत नाही. कधी कधी त्याचं माकेटिंग वाईट असतं, कधी उत्सुकता निर्माण करण्यात अपयश आलेलं असतं, शीर्षक खास नसतं, कलाकार आकर्षून घेणारे नसतात किंवा त्या वेळी एखादा सिनेमा गर्दी ओढत असल्याने ते मागे पडतात असे नेहमी होते. पूर्वी म्हणे असे चित्रपट पुन्हा रिलीज व्हायचे आणि त्या वेळी ते चालायचे.
तर कधी कधी एखादा ध्यानी मनी नसताना फार प्रमोशन न करताही चाललेला चित्रपट असतो (जय संतोषी मा). कारण त्याचा विषय लोकांना आवडलेला असतो. ( इथे चित्रपट पडला म्हणजे पाहिला नाही असे म्हणता येत नाही. तो न पाहिल्यानेच पडलेला असतो इतकाच काय तो फरक).

खूप खोलात नको जाऊयात. नवीन लोकांना असे वाटते त्याला नाईलाज आहे. त्याच बरोबर सक्रीय असलेले वाचक हे काही वाचनाची यंत्रे नाहीत कि आला नव्याचा धागा आता कर्तव्यबुद्धी म्हणून वाचायलाच हवे. त्यांनाही कामे आहेत. आपापले संसार आहेत. त्यातून वेळ काढून त्या वेळी जो नजरेत भरेल तो वाचला जाईल. प्रतिसाद देणं न देणं ही नंतरची गोष्ट.

मला तो अरबस्तानचा इतिहास हा धागा वाचायचा आहे. त्या वेळी अन्य गोष्टीत बिझी होते. मग मालिका पूर्ण होईल तेव्हां वाचू असे म्हटले. आता तो कुठे खाली गेला आहे. कुणी लिहीले ते लक्षात नाही त्यामुळे शोधायचे कसे हा प्रश्नच आहे. असे होते.

Arabastaan. बहुतेक द अर्बन नोमॅड यांचे आहे
त्यांच्या इंग्लिश मध्ये लिहिलेल्या आयडी वर लेखनात शोधल्यास मिळू शकेल.

मित्रांनो, माझ्या प्रश्नाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. प्रश्नाचे उत्तर (..उत्तरे) मिळाले.

पारंबीचा आत्मा, रावल्या मशीनवाला, mi_anu, मानव पृथ्वीकर, धनवन्ती, जिज्ञासा, नानबा, ऋन्मेऽऽष, mi_anu, बोकलत, वर्णिता, अभि_नव, स्वाती२, पाचपाटील, मामी, अस्मिता, रानभुली, सीमंतिनी, जेम्स बॉन्ड, वीरु, शापित आयुष्य आपल्या सूचना आणि अभिप्राय छान आहेत. आपण सुचवल्यानुसार पुढचे लेख मायबोलीवर टाकतो.

कार्यव्यस्ततेमुळे लवकर प्रतिसाद देऊ शकलो नाही त्याबद्दल माफ करा !

पुनःश्च आभार !!

पाटील साहेब, मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कसे पोहचायचे हे बऱ्याच जणांनी वरती सांगितले आहे. मी अजून एक सल्ला देतो तुम्ही मिसळपाववर सुद्दा लिहा म्हणजे मायबोली व्यतिरिक्त जे वाचक असतील त्यांच्या पर्यंत सुद्दा पोहचता येईल.

सिनेमाशी केलेल्या तुलनेशी सहमत आहे. हे माझ्याही मनात आले होते. कोणता सिनेमा हिट होईल कोणी सांगू शकत नाही. तरीही निर्मात्यापासून दिग्दर्शक, अभिनेते, वितरक व अगदी स्पॉटबॉयपर्यंत अनेकानेक जणांनी आपापल्या परीने प्रचंड मेहनत केलेली असतेच. प्रसिद्ध होण्यासाठी जे जे शक्य आहे ते करून आपली कलाकृती/लिखाण प्रदर्शित/प्रसिद्ध करणे इतकेच आपल्या हाती असते. त्यानंतर ते कितीजणांनी वाचावे/पहावे/ऐकावे वा व्हायरल व्हावे न व्हावे हे खरेच आपल्या हाती नसते.

"जे जे शक्य आहे" मध्ये वरती अनेकांनी काय काय करू शकतो ते सुचवले आहेच. मला जे वाटते ते असे कि आपले लिखाण धडाधड सोमिवर टाकून अल्पावधीत भराभर वाचक मिळतील अशी अपेक्षा करणे अवास्तव राहील. लिखाण कितीही दर्जेदार असले तरीही. अपवादात्मक केसेस असतील अशा प्रसिद्धी मिळालेल्या सुद्धा. पण तो राजमार्ग नव्हे. माबोवर आपले लिखाण भराभर प्रसिद्ध करून नंतर गायब झालेले लेखक सुद्धा आठवताहेत. आपले लिखाण किती वाचकांपर्यंत पोहोचले याची त्यांनी फार फिकीर केल्याचे आठवत नाही. पण वाचकवर्ग वाढवणे हे साध्य करायचे असेल तर एकेक लेख सावकाशीने प्रसिद्ध केल्यास चाहते मिळून हळूहळू वाचकवर्ग निर्माण होईल. माबोवर ज्यांचे खूप सारे चाहते आहेत त्यांनी अल्पावधीत खूप सारे लिखाण करून चाहते मिळवल्याचे दिसून येत नाही. शिवाय माबो हे फेसबुक सारखे भराभर लाईक व प्रतिसाद येण्याचे ठिकाण नव्हे. इथे लिखाण मुरायला वेळ द्यावाच लागतो.

Pages