आज माझी थोडी गडबडच झाली...

Submitted by सुर्या--- on 29 April, 2021 - 04:55

सुचना:- कवितेचा हेतू मनोरंजनात्मक असून, यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. कृपया कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.

सकाळी सकाळी light आमची गेली...
आज माझी थोडी गडबडच झाली...

office ला जायची तयारी मी केली...
कपाटातून पॅन्ट अंदाजानेच काढली...
घाई घाई ने शर्ट त्यामध्ये खोचली...
धावत जाऊन रिक्षाही पकडली...

रिक्षा त बसल्यावर हुश्श झालं...
खिश्यातुन रुमाल मी काढू लागलो...
खिश्यात रुमाल मिळाला नाही...
जीभ चावून शर्टला घाम पुसू लागलो...

सिग्नल च्या पुढे माझा स्टॉप होता...
खिश्यातुन पॉकेट काढू लागलो...
खिश्यात पॉकेट मिळाला नाही...
सिग्नल ला रिक्षातून पळू लागलो...

पळता पळता पॅन्ट खाली येऊ लागली...
खाली पाहिलं तर फजिती झाली...
पॅन्ट चा बेल्ट मिळाला नाही...
अन वडिलांची पॅन्ट मला सावरली नाही...

सकाळी सकाळी light आमची गेली...
आज माझी थोडी गडबडच झाली...
© SURYAKANT_R.J.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहाटे पहाटे जाग मला आली...
उठल्या उठल्या विनोद म्हणून कविता ही वाचली...
आणि माझी थोडी गडबडच झाली...
कविता मला काही केल्या लक्षातच नाही आली...

ह्या कवितेत नक्की विनोद काय झाला?...
काही केल्या तो मला समजू नाही आला...
'खिश्यातुन पॉकेट' वाचताना मात्र मनसोक्त हसलो...
खिसा म्हणजेच पॉकेट - हा विचार करत बसलो...

फजितीबद्दल ही कविता वर्णनात्मक वाटली...
वाक्यांती तीन टिम्बे देण्याची उगाच सवय लागली...
सुरुवातीच्या सूचनेचाही संदर्भ नाही कळला...
हर्पा म्हणे, हे वाचून का असेल कुणी दुखावला?

सुचना:- ह्या प्रतिसादाचा हेतू मनोरंजनात्मक असून, यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. कृपया कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.

@हरचंद पालव
धन्यवाद ... प्रतिक्रीयांमधूनही आम्हाला शिकायला मिळत..

खिश्यातुन पॉकेट' वाचताना मात्र मनसोक्त हसलो...
खिसा म्हणजेच पॉकेट - हा विचार करत बसलो
>>> त्यांना पॉकेट (पाकीट) म्हणायचे आहे बहुतेक

पुढील लेखनासाठी शुभेच्छा

@च्रप्स
धन्यवाद, समजून घेतल्याबद्दल