अमानवीय..? 3

Submitted by ऩीली on 10 October, 2019 - 07:12

मागच्या धाग्याची मर्यादा पुर्ण झाली.
आता अमानवीय किस्से, अनुभव इथे येऊद्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गढी किस्सा आवडला झम्पू , पूर्वी असे किस्से यायचे , थरार वाटायचा वाचताना.>>>> + १००००

पूर्वीचा भाग १ चांगला होता. नंतरचे भाग असंबद्ध प्रतिसादनी गाळात गेले.

माझ्या आजोबांचे मोठे भाऊ , जे आता 93 वर्षाचे आहेत.
ते 20 - 22 वर्षाचे असताना , गावात लाइट नव्हते. आणि लोक ही 7 ला जेवून 8 पर्यन्त झोपी जायचे.
ही घटना साधारण 1949 - 50 मधली.
ते एकदा लेट कुठून तरी आले , म्हणजे ज्या कामासाठी गेले तिथल्या गावी लेट झाला. परत येताना बराच अंधार , रस्त्यावर लाईट्स नव्हतेच , रस्त्यावर चिट पाखरू ही नाही ,
गावच्या वेशी वरुन ते एकटे च चालत येत होते, त्यांना गावच्या वेशिवर रस्त्यावर खुप जांभळे पडलेली दिसली. अजोबानी ही फरसा विचार न करता ति पटापट उचलून आपल्या जवळच्या कापड़ी पिशवित भरली.
जरा पुढे आल्यावर त्यांना कोणीतरी समोर उभे आहे असं दिसलं. अंधार होता म्हणून त्यांना कळले नाही कोण होतं ते...ती एक बाई होती... त्या बाई ने हाक मारली, तेव्हा आजोबाना कळल की ही त्यांची आई म्हणजे माझी पणजी होती...
त्यांना प्रश्न पडला की इतक्या रात्री आई इथे कशी??? त्यांनी ही तिला हाक मारून थंबायला सांगितलं.
पण पणजी आजी न थांबता तुरुतुरु चालत समोरच्या अंबा देवीच्या मंदिरात गेली.
त्यांच्या मागोमाग आजोबा ही धावत गेले, मंदिरात कोणी नव्हतं. ते बाहेर येत च होते की त्यांना लाम्बुन जोरात आवाज आला , " वाचलास रे sssss "
अर्थात च हे ऐकून आजोबांची घबरगुंडी उडाली. आणि ते कसे बसे घरात गेले. घर मंदिराला लागून च आहे, आणि इतके घाबरले होते ते की त्यांना ताप आला...
दूसरे दिवशी हा प्रकार सर्वाना कळला.. आणि ज्या पिशवित जांभळे भरलेली त्यात दगड आणि माती होती कारण वेशिवर च क़ाय आमच्या पूर्ण गावात जांभळाचं एक ही झाड़ नाही!

रामदास बोट जेव्हा बुडाली ना, तेव्हा वर सांगितलेल्या किस्सयतले माझ्या आजोबांच तिकीट होतं त्या दिवशी च... पण त्यांची बोट मिस झाली कारण चहा प्यायला ते धकक्यावर आले होते , बोटित सामान ठेऊन...
आजोबांच नशीब चांगलं होतं पण त्या सामानचनाही....
रामदास बोटिवर जितकया लोकांचा जीव गेला , त्यातली बरीच लोक आमच्या इथल्या किनाऱ्यांवर दिसत असत।
... आणि "वाचवा वाचवा" असं म्हणत...नंतर हळूहळू हे प्रकार थांबले...

माझा एक सहकारी कुर्डुवाडीचा आहे. त्याचं बालपण रेल्वे क्वार्टर मध्ये गेलं आहे. सध्या त्याच्या सोबत प्रचंड प्रवास घडत आहे. प्रवासामध्ये अर्थातच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतेच. त्याच्या कडून ऐकलेला हा अनुभव.
सहकाऱ्याचे वडील मालगाडीवर मोटरमन होते. त्यांचे कुटुंब रेल्वे क्वार्टर मध्ये रहायचे. कॉलनी इंग्रज कालीन असल्या कारणाने क्वार्टर म्हणजे छोटा 3 खोल्यांचा ब्लॉक. त्यांच्या कॉलनी मध्ये अशे १५-२० ब्लॉक होते. माझा सहकारी तेंव्हा ९वीत होता. ३ ब्लॉक सोडून जे क्वार्टर होते तिथल्या कुटुंबा मध्ये सतत वाद होत असत. सासू आणि मुलाचे सुने सोबत पटत नसत आणि सतत जोरजोरात भांडणांचे आवाज येत असत. असेच एक दिवशी दुपारच्या वेळी खूप जोरजोरात आवाज येऊ लागला म्हणून माझा सहकारी आणि त्याचे वडील बाहेर जाऊन पाहतात तर त्या ब्लॉक मध्ये आग लागलेली दिसली. ब्लॉक मधील लोक बाहेर होतें पण ती सून मात्र एकटीच आता होती. तो जाळ त्या सुनेने पेट घेतलेल्या शरीराचा होता. पोलीस केस वगैरे झाली. स्वयंपाकघरात काम करत असतानी अचानक स्टोचा भडका उडाला म्हणून आग लागली असे सगळीकडे सांगण्यात आले. कुटुंबावर कोणतीही केस नाही झाली. थोड्या दिवसांनी ते कुटुंब क्वार्टर सोडून दुसरीकडे रहायला गेलं. ते क्वार्टर नंतर बंदच राहिलं. कॉलनी मध्ये दबक्या आवाजात मुलानी आणि सासुनी मिळून सुनेला जाळले अशी चर्चा होती. अशी घटना त्या क्वार्टर मध्ये घडली म्हणून कॉलनी मधले लोक तिथून ४ हात दूर रहात. काही वर्षे अशीच गेली आणि मग माझ्या सहकाऱ्याला आणि त्याच्या मित्रांना फार विचित्र अनुभव आला.
माझा सहकारी आणि त्या वेळचे त्याचे समवयस्क ४ मित्र कॉलनी मध्ये गणपती बसवत असत. एक वर्षी असेच सगळे रात्री उशिरा पर्यंत गणपतीचे डेकोरेशन करत बसले होते. रात्री २ वाजता त्यांचे डेकोरेशन संपले आणि सगळे घरी निघाले. ५ मधल्या एकाचे घर "त्या" घराच्या पलीकडच्या बाजूला होते आणि तो एकटा त्या बाजूला जायला घाबरत होता. हो नाही करत असे ठरले की पाचही जणांनी आधी त्या एका मित्राला त्याच्या घरी सोडायचे आणि मग उलटे फिरून आपापल्या घरी जायचे. ५ जणांचा चमू त्याला घरी सोडायला निघाला. वाटेत चेष्टा मसकरी चालली होती. त्या मित्राचे घर आले, मित्राने घराचे दार उघडले आणि निरोप घेण्यासाठी मागे वळाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मित्राचे डोळे त्या बंद घराकडे पहात होते. सगळ्यांनी वळून तो ज्या दिशेने पहात होता तिकडे पाहिले. बंद घराच्या उघड्या खिडकीत एकदम कमी प्रकाशात ती सून उभी होती आणि त्यांच्या कडेच पहात होती. प्रकाश अंधुक असला तरी ती बाई स्पष्ट दिसत होती. हे दृष्य सगळ्यांनीच पाहिले आणि घाबरून जोरात किंचाळायला लागले. ज्याला सोडायला आले होते तो चक्कर येऊन खाली पडला. ह्यांचे किंचाळण्याचे आवाज ऐकून कॉलनीतले लोक जमले, त्या मित्रांना जसे जमेल तसे जे दिसलं ते सांगायचा प्रयत्न केला. त्या खिडकीत अर्थातच आता कोणच नव्हते. सहकारी शपथेवर सांगतो की त्याला आणि त्याच्या मित्रांना त्या खिडकीत खरच ती सून दिसली होती.

आधीच्या कंपनी मध्ये माझी एक मैत्रीण होती ती वसई ला राहायची आम्हाला सगळयांना ड्रॉप असायचा, ekda ऑफिस मध्ये bhut stories चालू होत्या तर ती बोलली तिच्या घरी जाताना थोडा रोड सुनसान आहे तिथे तिला अल्मोस्ट रोज एक बाई दिसते जी तिच्या गाडी समोर चालत असते पण ड्राइवर कधी हि गाडी चा स्पीड कमी करत नाही..आणि मग ते पुढे निघून जात असत मला surprise वाटतं कि ते दोघे घाबरत का नव्हते
I am sure she was not lying हे असले प्रकार सगळयांना का दिसत नाही why selected people ?

मला पण दिसतात अशा अमानवीय गोष्टी>>>माझी एक ताई आहे ती Pranik healing आणि अजून पण बराच काही शिकली आहे ती पण बोलते असते कि तिला आत्मे दिसतात विश्वास ठेवायचं का नाही हा प्रश्न आहे

मी लहान असताना म्हणजे बालवाडीत असनाताची गोष्ट. तेव्हा आमचे आजी आजोबा आमच्याकडे आले होते आणि वर्षभर राहीले. रात्री मी आजोबांजवळ झोपायचो. ते थोपटायाचे, अंगावरून पांघरूण सरकलं व थंडी वाजू लागली की हे अंगावर नीट पांघरूण घालायचे. त्यांना आम्ही दादा म्हणायचो.

वर्ष भराने आजी आजोबा परत गेले विजापुरला.
मग मी एकटाच झोपायचो. एकदा मध्यरात्री केव्हातरी मला खूप थंडी वाजू लागली. मी "दादा मला पांघरूण घाला, मला थोपटा" असे म्हणु लागलो. पण काहीच झाले नाही.
मग माझी झोप उघडली आणि दादांची खुप आठवण आली आणि मी परत "दादा मला थोपटा, पांघरूण घाला" म्हणालो.
तर समोरच्या भिंतीतल्या खुंटीतून दादांचा हात आला. त्यांनी पांघरूण घातले आणि थोपटु लागले, आणि मला परत छान झोप लागली.

समोरच्या भिंतीतल्या खुंटीतून दादांचा हात आला. त्यांनी पांघरूण घातले आणि थोपटु लागले, आणि मला परत छान झोप लागली.>>> भयानक. तुम्ही होतात म्हणून निभावून गेलं दुसरा कोणी असता तर हार्ट अटॅक ने गेलाच असता.

इतक्या लहानपणी अजून आपण भूत प्रेत, हे अमानवीय वगैरे शिकलेलो नसतो, ते आपल्या गावीही नसतं. तेव्हा थोरली माणसं अशी एवढ्या लांबून पोराची हाक ऐकून, खुंटीतून हात काढुन असं करू शकत असतील असे वाटले.

मोठेपणी, जेव्हा मग आपल्याला भूत खेत वगैरे गोष्टी ऐकायला मिळतात तेव्हा हे अमानवीय आहे , ते नाही असं काळायला लागतं. तेव्हा जर असं घडलं असतं नाही हार्ट अटॅक तरी बोबडी नक्कीच वळली असती.

असाच फोटोसारखा एक किस्सा पाहिला होता. काही वर्षांपुर्वी माझी आजी गेली. त्यानंतर तिचा एक छान हसरा फोटो दिवा लावून हॉल मध्ये ठेवला होता. जवळ पास नातेवाईक भरपुर होते त्यामुळे त्यांची ये-जा होती. कोणी जर लहान मुल घरी आले (२-४ वर्षाचे) तर फोटो जवळ जाऊन ते मुल "आजी तू का रडते गं" किंवा "आजी मला बोलावतेय" असे म्हणायचे. एकदम छान हसरा फोटो असताना लहान मुलांनाच असे का वाटायचे बरे?

Light 1 पायाळु असेल ते पोरगं. माझ्या माहितीत एक मुलगी होती जिला नखदर्पण प्रयोगासाठी बोलवलं होतं आमच्या वस्तादने एका नवरात्रात. वयाच्या ८-९वर्षांपर्यंतच असल्या मुलांचा उपयोग असतो नंतर बंद होत दिसायचं. आई-बाप जवळ पाहिजेल नाहीतर मधीच मूल बिचकलं तर म्याटर होऊ शकतो. नखाला ठराविक प्रक्रियेने बनवलेल काजळ वापरतात त्यासाठी. लहान असल्याने तिला नक्की सांगता नाही आलं पण जेवढं दिसलं त्यावरून "त्या" प्रकरणाचा उलगडा झाला ज्यासाठी एवढा उपद्व्याप मांडला होता. नंतर तिची कपडे, मिठाई, पैसे देऊन बोळवण केली व्यवस्थित. Light 1
अलीकडे मी विवेकी आणि विज्ञानवादी झालो असल्याने असल्या गोष्टींवर विश्वास नाही माझा.

अनुभव अमानवीय नाही पण भयानक नक्कीच आहे.
मराठी नाट्यक्षेत्र, मालिका आणि चित्रपटात काम केलेला एक प्रसिद्ध अभिनेता माझा चांगला मित्र आहे. त्याने मला सांगितलेला अनुभव इथे देत आहे.
हे महाशय मूळचे पुण्यातले. तेंव्हा ते पुणे विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत होते तसेच नाट्यक्षेत्रातही धडपड करत होते. त्यांच्याकडे त्याकाळी एक स्कूटर होती. नाटकाच्या तालमी झाल्या की मित्रांसोबत पुणे आणि आसपासच्या परिसरात रात्री-बेरात्री भटकणे हा त्यांचा फिरस्ता. असेच एकदा बऱ्याच उशिरा हे महाशय आणि ३-४ मित्र पाषाण तलावा जवळ बऱ्याच उशिरा सिगारेट फुकण्यासाठी गेले. पुण्यात रहाणाऱ्या आणि पाषाण तलाव पाहिलेल्या लोकांना माहीत असेल की मुंबई - बेंगलोर हायवे तलावाच्या अगदी शेजारून जातो. तलावा लागत हायवे एक वळण घेतो आणि पुढे कात्रज दिशेने जातो. ह्या हायवेवर रात्रीही ट्रक्सची बरीच वर्दळ असते. असेच हायवे कडे तोंड ( तलावा कडे पाठ) करून हे मित्र गप्पा मारत बसले होते. येणाऱ्या रहदारीच्या दिव्यांचा उजेड त्यांच्यावर पडत आणि गाड्या पुढे निघून जात. मित्रांमधल्या एकाच्या लक्षात आले की त्यांच्यावर दिव्यांचा उजेड पडला की त्या त्या मोटारीचा वेग बराच कमी होत होता आणि मग त्या निघून जात होत्या. काही काही ट्रक तर चक्क त्यांच्यावर उजेड पडल्यावर थांबले आणि ५-१० सेकंदानी निघून गेले. आधी ह्या मित्रांना वाटले की एवढ्या रात्री हे सगळे मित्र अश्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते ह्याचं गाडीवाल्यांना आश्चर्य वाटत असेल म्हणून थांबत असतील. पण मग प्रत्येक गाडी बाबतीत असे घडायला लागले आणि त्यांना वाटले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यातल्या एकाचं लक्ष मागे गेले. आधी त्याला मागे काहीच दिसलं नाही पण मग त्याचवेळेस पाठीमागून एक गाडी आली आणि तिचा उजेड समोरच्या झाडावर पडला. त्यांच्या मागे काही अंतरावर असलेल्या त्या झाडावर एका माणसाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते प्रेत हवेत लोंबकळत होते. येणाऱ्या गाड्यांना मागे हे प्रेत आणि पुढे हसत खिदळत बसलेले हे ३-४ लोक दिसत होते आणि म्हणून ते वेग कमी करत होते. ह्यानंतर त्या मित्रांची उडालेली घाबरगुंडी विचारायलाच नको.

अमानवीय पेक्षा डेंजर किस्सा आहे हा.
त्या थांबणाऱ्या लोकांना काय वाटत असेल यांच्या बद्दल? यांनीच खून केलाय आणि बसलेत तिथे चकाट्या पिटत. की सामान्य वेषातले पोलीस आहेत, पुढची टीम येण्याची वाट बघत बसलेत वगैरे.

यावरून मला पण एक किस्सा आठवला कॉलेज च्या वेळीचा. कॉलेज गावाच्या बाहेर असल्यामुळे जायचा रस्ता अगदी निर्मनुष्य आणि जंगलाचा होता. मधेच एक मुख्य रस्त्याला लागून स्मशान देखील होत. नेहमीची सवय असल्यामुळे त्याच कधी काही वाटायचं नाही. नेहमी कॉलेज ला उशीरच होत असल्यामुळे स्कूटी ने भरधाव जाणे असायचे. एक दिवस एक्स्ट्रा लेक्चर असल्यामुळे सकाळी लवकर जायला लागणार होतं. सगळ आवरून सकाळी 7.30 च्या दरम्यान कॉलेज ला जायला निघाले. पूर्ण जंगलाचा निर्मनुष्य रस्ता आणि थंडगार वारा सुटला होता. अचानक स्मशान भूमी जवळ गाडी बंद पडली. पहिले काही भीती वगैरे वाटली नाही. पण काही केल्या गाडी सुरू होईना. तितक्यात 2 माणसे दुरून माझ्याकडे येताना दिसली. मला वाटल माझी मदत करायला येत असतील. पण ते विचित्र नजरेने माझ्या अगदी समोर असलेल्या स्मशान भूमिकडे पाहत होती. मी पण सहज म्हणून माझ्या समोर पाहिले आणि भीतीने माझी गाळण उडाली. स्मशान च्या शेड ला गळफास घेतलेलं एक कृश प्रेत वाऱ्याबरोबर हलत होत. अगदी माझ्या डोळ्यासमोर. मी तेव्हा 16 17 वर्षांची असेल. आयुष्यात कधी कुणाचा मृत्यू पाहिला नव्हता भयंकर घाबरली आणि तशीच पटकन गाडी ला किक मारून तिथून निघाली..पूर्ण कॉलेज चा रस्ता रडत गेली. दिवसभर तेच चित्र डोळ्यासमोर दिसायचं. काही दिवस तर एकटी झोपायची पण भीती वाटली होती तेव्हा.

Pages