Submitted by Rudraa on 25 April, 2021 - 05:01
बावरा हा स्पर्श तुझा,
जणू न्याहळतो मला!!!
धुक्यातून कटाक्ष नजरेचा,
धुंद होऊन पाहतो तुला !!!
हिरवळणारा रंग जसा,
बुडतो निळाईत दुरवर !!!
दिसते धुक्यात पुसट,
रंगबेरंगी पाखरांची भिरभिर!!!!
मांडून बसतो तो नटखट डाव,
निळाईत खेळतो रवी लपंडाव !!!!
दंग होती मस्तीत सारे,
घेऊन येते स्वल्पविराम सांज का? रे!!!!!!
रूद्रा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
छान आहे
छान आहे
सुंदर कविता..!!
सुंदर कविता..!!
सुंदर !
सुंदर !
छानच
छानच