अमेरिकन इतिहास - पुस्तके, मिनीसिरिज, डॉक्युमेंटरीज, सिनेमे, पॉडकास्ट

Submitted by मो on 3 March, 2021 - 22:09

माझ्या अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ या मालिकेवर पुस्तके, मिनीसिरिज, डॉक्युमेंटरीज, सिनेमे, पॉडकास्ट यांची छान सजेशन्स आली. ती सगळी एका वेगळ्या धाग्यावर संकलित करण्याची सुचना आली, जी मलाही आवडली. ती सगळी इथे एकत्रित करुन लिहीत आहे.
अमेरिकन इतिहास, स्लेव्हरी, सेग्रिगेशन या विषयांवर शेकडो पुस्तके, सिनेमे, सिरिज आलेल्या आहेत. इथे मी फक्त लेखामध्ये किंवा प्रतिसादांमध्ये आलेल्या गोष्टींची नावे लिहीत आहे. पण कृपया प्रतिसादात तुम्हाला माहिती असलेली, आवडलेली पुस्तके, डॉक्युसिरि़ज, सिनेमे, पॉडकास्ट याबद्दल जरुर लिहा म्हणजे एक छान डेटाबेस तयार होईल.

अमेरिकन इतिहास -
१. A History of US (११ पुस्तकांचा संच) - Joy Hakim

  • The First Americans: Prehistory–1600
  • Making Thirteen Colonies: 1600–1740
  • From Colonies to Country: 1735–1791
  • The New Nation: 1789–1850
  • Liberty for All? 1820–1860
  • War, Terrible War: 1855–1865
  • Reconstructing America: 1865–1890
  • An Age of Extremes: 1880–1917
  • War, Peace, And All That Jazz: 1918–1945
  • All the People: Since 1945
  • A History of US: Sourcebook and Index

२. A People's History of the United States - Howard Zinn

आत्मचरित्रे -
१. The Life and Times of Frederick Douglass - Frederick Douglass
२. 12 Years a Slave - Solomon Northup
३. Incidents in the Life of a Slave Girl - Harriet Jacobs
४. Up From Slavery - Booker T. Washington
५. George Washington Carver: In His Own Words - Gary R. Kremer and George Washington Carver
६. Roots: The Saga of an American Family - Alex Haley
७. Uncle Tom's Cabin - Harriet Beecher Stowe
८. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर

टिव्ही मालिका आणि डॉक्युमेंटरीज -
१. Roots (१९७७) - ८ भाग
२. Ken Burnच्या डॉक्युमेंटरीज

  • The Civil War (1990)
  • Baseball (1994)
  • The West (1996)
  • Thomas Jefferson (1997)
  • Lewis & Clark: The Journey of the Corps of Discovery (1997)
  • Jazz (2001)
  • The War (2007)
  • The National Parks: America's Best Idea (2009)
  • Prohibition (2011)
  • The Roosevelts (2014)
  • The Vietnam War (2017)
  • Country Music (2019)

३. The African Americans: Many Rivers To Cross (२०१३)- Henry Louis Gates Jr.

सिनेमे -
१. Mississippi Burning (१९८८)
२. The Trial of the Chicago 7 (२०२०) - १९६९ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट

रेडिओ/पॉडकास्ट -
NPR (नॅशन्ल पब्लिक रेडीओ) च्या टेरी ग्रोस ने एच डब्ल्यू ब्रँड्स या इतिहासकाराची घेतलेली मुलाखत (त्याच्या "The Zealot And The Emancipator: John Brown, Abraham Lincoln, And The Struggle For American Freedom" या पुस्तकात त्याने इमॅन्सीपेशन संदर्भात जाॅन ब्राउनच्या जहाल आणि लिंकनच्या मवाळ धोरणाचा चांगला ऊहापोह केलाय) -
https://www.npr.org/2020/10/19/925362418/john-brown-and-abraham-lincoln-...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A History of US हा १ पुस्तकांचा संच अमेरिकेत होम स्कूलिंग करणार्‍या माध्यमिक शाळेच्या मुलांमध्ये लोकप्रिय आहे. काहीतरी शोधताना सहजच लायब्ररीच्या वेबसाईटवर याची ऑडिओबूक्स सापडली आणि मी ऐकायला सुरुवात केली. क्रिस्टीना मूरने ही पुस्तके अप्रतिम वाचली आहेत (ऑडियन्स शाळेची मुले समजून). मी एकामागे एक १० पुस्तके ऐकून संपवली. (११ व्या पुस्तकात पत्रे, भाषणे, रेफरन्सेस वगैरे आहेत). सोप्या भाषेत, कुठेही ड्रॅमॅटीक न होता किंवा न लपवता सगळा चांगला-वाईट इतिहास जसाच्या तसा लेखिकेने मांडला आहे. मला पुस्तके इतकी आवडली की मी तो संच विकत घेतला. सोप्या भाषेत पण विस्तृत स्वरुपात अमेरिकन इतिहास समजावून घ्यायचा असेल तर ऑडिओबूक्स छानच आहेत.

सध्या मी रे चार्ल्सचं आत्मचरित्र (ऑडीओबूक) ऐकतेय. १९३० मध्ये आंधळ्या मुलांच्या शाळा+हॉस्टेलमध्येही सेग्रिगेसन होते हे वाचताना काटा आला. रे चार्ल्स म्हणतो की आम्हा आंधळ्यांना जिथे समोरचा काळा का गोरा हे दिसत नसले तरी सेग्रिगेशन कडक पाळावे लागायचे. आम्हा ७-८ वर्षांच्या मुलांना तेंव्हा त्यात काही वाटायचेही नाही. तशीच रीत होती. पण जसा मी मोठा व्हायला लागलो, अगदी प्रसिद्ध झालो तेंव्हाही मला काळ्यांकरता असलेल्या वेगळ्या बाथरुममध्ये जायला लागायचे तेंव्हा ते अतिशय खुपायला लागले. ते आम्हा सर्वांनाच खुपायचे.

छान माहिती.

गॉन विथ द विंड हा चित्रपट, त्याचा अटलांटा मधे झालेला प्रिमियर व त्यातील चित्रीकरणाबद्दलच्या यू ट्यूबवर सुद्धा उपलब्ध असलेल्या चर्चा खूप इण्टरेस्टिंग आहेत.

मो, एक प्रश्न आहे.

इथे फक्त क्रुष्णवर्णियांच्या इतिहासाशी संबधीत संदर्भ अपेक्षित आहेत की एकंदरीत अमेरिकन इतिहासाबद्दलही संदर्भ चालतील?

आफ्रिकन अमेरिकन इतिहासाबद्दलची अजुन एक उत्कृष्ट टीव्ही मालीका/ डॉक्युमेंटरी म्हणजे “ द आफ्रिकन अमेरिकन्सः मेनी रिव्हर्स टु क्रॉस“ बाय डॉक्टर हेन्री लुइस गेट्स ज्युनिअर. अमेरिकेतल्या कुठल्याही पब्लिक लायब्ररीमधुन हा संच तुम्हाला बॉरो करता येइल.( मी सांगीतलेले सगळे केन बर्न्सचे संचही अमेरिकेतल्या कुठल्याही पब्लिक लायब्ररीतुन तुम्हाला मिळु शकतील.)

अमेरिकन पब्लिक लायब्ररी सिस्टीमला तोड नाही. तुम्ही “ Libby” म्हणुन अ‍ॅप डाउनलोड करु शकता. त्या अ‍ॅपवरुन तुमच्या लोकल पब्लिक लायब्ररीतुन तुम्ही कुठलेही ऑडियो बुक बॉरो करु शकता. आत्ताच मी त्या अ‍ॅपवर मो ने सांगीतलेले “ अ हिस्टरी ऑफ यु एस” बाय जॉय हकिमच्या (रेड बाय क्रिस्टिन मोर) संचातले पहिले ऑडिओ बुक बॉरो केले आहे Happy

इथे फक्त क्रुष्णवर्णियांच्या इतिहासाशी संबधीत संदर्भ अपेक्षित आहेत की एकंदरीत अमेरिकन इतिहासाबद्दलही संदर्भ चालतील? >> हो अमेरिकन इतिहासाबद्दलच अपेक्षित होतं. जास्त रेफरन्सेस कृष्णवर्णीयांच्या इतिहासाबद्दल आली म्हणून ती वर टाकली गेली. तुम्ही काल टाकलेली नावे आणि केन बर्न्सच्या इतर डॉक्युमेंटरीजची नावे हेडरमध्ये टाकली आहेत.

अमेरिकन पब्लिक लायब्ररी सिस्टीमला तोड नाही. तुम्ही “ Libby” म्हणुन अ‍ॅप डाउनलोड करु शकता. त्या अ‍ॅपवरुन तुमच्या लोकल पब्लिक लायब्ररीतुन तुम्ही कुठलेही ऑडियो बुक बॉरो करु शकता. आत्ताच मी त्या अ‍ॅपवर मो ने सांगीतलेले “ अ हिस्टरी ऑफ यु एस” बाय जॉय हकिमच्या (रेड बाय क्रिस्टिन मोर) संचातले पहिले ऑडिओ बुक बॉरो केले आहे Happy >> अनुमोदन. मी पण लिबीवरच ऐकलंय. तुम्ही ऑलरेडी खूप वाचलंय/पाहिलंय, आणि या पुस्तकांचा ऑडियन्स मिडलस्कूलर्स आहेत त्यामुळे कदाचित तुम्हाला बेसिक वाटू शकेल. (पण तरी अमेरिकन इतिहासाची सुरुवात करणार्‍यांना खूप छान पुस्तकं आहेत ही).

Libby सर्च फार तापदायक प्रकार दिसतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्च केले पण हवे ते वगळता वेगळीच पुस्तके दाखवत आहे.

पॉपकॉर्न, तुम्ही प्रथम तुमच्या लोकल लायब्ररीचे सभासद असायला हवे. मग अ‍ॅपवर तुम्हाला तुमचे लायब्ररी अकाउंट लिंक करता येते.

मो, पहिल्या भागावरुन समजले की ती माहीती शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आहेत.

ज्यांना खरोखरीच अमेरिकन इतिहासात रस आहे त्यांच्यासाठी हा बीबी उत्तम रिसोर्स ठरु शकतो. मो, हे तु खुप चांगले काम केलेस.

केन बर्न्सच्या डॉक्युमेंटरीज मधे “ द वेस्ट“ हे अजुन एक नाव अ‍ॅड करशील का?थॉमस जेफरसनने नेपोलिअन कडुन ल्युझिआना पर्चेस पुर्ण केल्यावर लुइस अँड क्लार्कला त्याने मिझुरी रिव्हर एक्स्पिडिशन व नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शोधात पाठ्वले जेणेकरुन ह्या सगळ्या ल्युझिआना पर्चेसमधे मिळालेल्या भुभागाचा अभ्यास करता येइल. त्या एक्स्पिडिशन नंतर मिसीसिपीच्या पश्चिमेला अमेरिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन कसे सुरु झाले याची ८ भागात( १२ तास) केन बर्न्सने उत्क्रुष्टरित्या मांडणी केली आहे व माहीती दिली आहे. मस्ट वॉच डॉक्युमेंटरी!

तिच गोष्ट त्याच्या सिव्हिल वॉर व व्हिएतनाम वॉर डॉक्युमेंटरीजबद्दल. युद्धाच्या सगळ्या बाजु, सगळे अँगल्स त्याने तटस्थपणे मांडले आहेत.

मो, तुझा इतिहासाचा व्यासंग व तुझी इतिहासाची आवड बघुन मला कुतुहल आहे की केन बर्न्सच्या सिव्हिल वॉर व इतर डॉक्युमेंटरीजबद्दल तुझे काय मत आहे. बघुन झाल्यावर तुझे मत जरुर लिही इथे.

अजुनही खुप रिसोर्सेस आहेत पण तुर्तास इतके ठिक आहेत.

मुकुंद, लोकल लायब्ररी लिंक केली आहे, पुस्तके लोन करीत असतो पण आपण सांगीतलेले पुस्तक लिबी किंवा ऑडीओ फोर्म मध्ये मिळत नाहीये.

पॉपकॉर्न, मी कुठलेही ऑडिओ बुक इथे नमुद केले नव्हते. मी बहुतेक सगळ्या व्हिडियो डॉक्युमेंटरीजच सुचवल्या होत्या. त्या सगळ्या डी व्ही डी फॉरमॅट मधे तुम्हाला तुमच्या लोकल लायब्ररीतुन जरुर मिळतील.

पण तुम्हाला फोन किंवा टॅब्लेटवर त्या व्हिडियो डॉक्युमेंटरीज बघायच्या असतील तर तुम्हा सगळ्यांना अजुन २ अ‍ॅप सांगतो.

१: कनोपी
२: हुप्ला

तुमच्या लोकल लायब्ररीला कॉल करुन विचारा की तुमची लायब्ररी या पैकी कुठल्या अ‍ॅपशी जुडली आहे. मग त्या अ‍ॅपवर तुमचे लायब्ररी अकाउंट अ‍ॅड करुन तुम्ही या सगळ्या व अजुन अनेक अश्या चांगल्या डॉक्युमेंटरीजचा आस्वाद तुम्ही तुमच्या फोनवर किंवा टॅब्लेटवर घेउ शकता.

केन बर्न्सच्या डॉक्युमेंटरीज मधे “ द वेस्ट“ हे अजुन एक नाव अ‍ॅड करशील का? >> केले.

मो, तुझा इतिहासाचा व्यासंग व तुझी इतिहासाची आवड बघुन मला कुतुहल आहे की केन बर्न्सच्या सिव्हिल वॉर व इतर डॉक्युमेंटरीजबद्दल तुझे काय मत आहे. बघुन झाल्यावर तुझे मत जरुर लिही इथे.>> नक्की!

मो, केन बर्न्सची नविन डॉक्युमेंटरी.. अमेरिका अँड होलोकॉस्ट.

ऐतैहासिक डॉक्युमेंटरीजच्या खजिन्यात अजुन एक अमुल्य भर!

ही डॉक्युमेंटरी बघीतल्यावर अमेरिकन इमिग्रेशन धोरण १९३० च्या दशकात २०२३ मधल्या इमिग्रेशन धोरणापेक्षा फार काही वेगळे नव्हते हे दिसुन येते.

अमेरिका देश जरी इमिग्रेशन व इमिग्रंट्सनी बनलेला असला तरी कधी, कोणाला व कसे या नविन देशात येउ द्यायचे याबाबत अमेरिकन धोरण व अमेरिकेतल्या नागरिकांचे जनमत हे खुपच गुंतागुंतीचे व सोपे उत्तर नसलेले आहे.

१९३० मधे युरोप मधले नाझी पर्सिक्युटेड ज्युज अमेरिकेत बिनविरोध व अनलिमिटेड संख्येने येउ द्यायचे की नाही या प्रश्नाचे उत्तर व अमेरिकन जनमत तेव्हा जेवढे कठिण व काँट्रोव्हरशिअल होते तेवढेच कॉन्ट्रोव्हर्शिअल व कठिण उत्तर व जनमत आजही कोणत्या व किती लॅटिनोंना अमेरिकेच्या सदर्न बॉर्डरवरुन असायलमच्या नावाखाली येउ द्यायचे या प्रश्नाबाबत आहे.

ही डॉक्युमेंटरी बघताना या कठिण प्रश्नाचे उत्तर शोधताना जिव पिळवटतो.

इतिहासप्रेमी व अमेरिकन इमिग्रेशन पॉलीसीचा ज्यांना सखोल विचार करायचा असेल त्यांनी ही डॉक्युमेंटरी जरुर पाहावी.

ही ३ भागांची डॉक्युमेंटरी आहे. मस्ट वॉच!