संततधार! - स्नेहल आणि मनू!!

Submitted by अज्ञातवासी on 28 February, 2021 - 10:59

त्या मंद प्रकाशात ती बसली होती, एकटी. शांत...
डोक्यातील विचारचक्र थांबत नव्हतं.
तिला कुठलाही मार्ग दिसत नव्हता...
'या कोणत्या चक्रात अडकलोय आपण? का इतकी निराशा? का यातून बाहेर पडू शकत नाही आपण.
इतका मोठा बिजनेस टाकला, इतकी इन्व्हेस्टमेंट केली, आणि आता का???
कोरोना आलाय, येऊ दे ना, सगळं जग का थंडावलय?
होणाऱ्याला होईलच. काळजी घेताय ना सगळे... मग बिजनेस का बंद? सगळं जग थंडावलय...
की आपण मागे पडतोय???'
तिने शांतपणे डोळे मिटून घेतले.
'मी हरलेय, पूर्णपणे...' तिने मोठ्या कष्टाने अश्रू आवरले.
"तू दरवाजा उघडा ठेऊन अंधार का केलाय???" तिला आवाज ऐकू आला...
"मनू.... अरे, किती दिवसानी परत आलास." तिने न राहवून त्याला मिठी मारली.
"वेडी." तो हसला.
"मनू... तूच आहेस ना?"
"हो मीच आहे. अग पण इतका अंधार का? स्नेहल, तू खूप तेजस्वी आहेस आय नो, पण तरीही..."
तिने घाईघाईने दोन - तीन बटणे दाबली. खोली उजळून निघाली.
"मी तुला पाणीही... "
"नको विचारु. मला गरजही नाहीये. पण तू अशी का बसलीयेस?"
"मनू..." तिचा कंठ दाटून आला.
"वेट," तो जमिनीवर तिच्यासमोर बसला, व तिचा हात हातात घेत म्हणाला...
"आता सांग. "
"मी हरलेय. जस्ट हरलेय, मी धावतेय, पण कुठेही पोहोचत नाहीये. धडपडतेय, पण फळ मिळत नाहीये. माझे सगळे एफर्ट्स वेस्ट जातायेत. अंधारात चाललीये मी."
त्याने तिचा हात दाबला...
"नाही काही झालंय."
"सगळं संपलंय."
"तू आहेस, मी आहे, मग जग का संपलंय?"
"मनू?"
"स्नेहल... जोपर्यंत आपण असतो ना, तोपर्यंत कधीही काही संपत नाही. कधीही नाही. हे मोटीवेशन वगैरे मला देता येत नाही, पण...
आपण सोबत जायचं? लढूयात पुन्हा... एकत्रपणे. आपण पडू, आणि पुन्हा लढू."
"आणि हरलो तर."
"सोबत हरू... चालेल ना??? पण लढलोच नाही, तर हरण्याचं जास्त दुःख होईल."
"मी लढले, आणि हरले मनू..."
"आता सोबत लढूयात... कारण इतर कुणाहीसोबत जिंकण्यापेक्षा तुझ्यासोबत हरणंसुद्धा मी प्रिफर करेन. चल, आता सगळं झटकून टाक...
... मी परत आलोय स्नेहल, मनु परत आलाय..."
ती त्याच्याकडे बघतच राहिली...
...आणि त्याच्या सोबतीने लढण्यास सज्ज झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..मला वाटलं तो कोरोनामुळे मेलाय आणि त्याचा आत्मा आलाय. ती पाणी आणायला गेल्यावर फोन येईल तो गेल्याच आणि तिला धक्का बसून ग्लास खाली पडेल वैगरे वैगरे, एकतर मी सस्पेन्स व्हिडीओ जास्त बघायला लागलोय किंवा सगळ्या सस्पेन्स व्हिडीओची स्टोरी अशीच असते.

Nice!! Happy

@तेजो - धन्यवाद!
@लावण्या - धन्यवाद. आहेतच ते एकत्र, याला संततधार भाग -१३.५ म्हणू शकतो.
@स्नेहा रोहित - धन्यवाद... मेबी स्नेहल, पर्वणी आणि मनुकडे अजून खूप देण्यासारखं आहे असं वाटतंय. लेट्स होप फॉर द बेस्ट.
@गौरी - थँक्स
@queen piyu - थँक्स
@रुपाली - धन्यवाद.
@बोकलत - नो वरीज, होतं असं कधीकधी. गेट वेल सून!!!
@मेघा - थँक्स