Survival story..भाग दुसरा

Submitted by Abhishek Sawant on 23 February, 2021 - 15:37

अर्धा एक तास चालल्यावर अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. आता मात्र पाऊस खूप जोराचा आणि विजा पण खूप कडाडत होत्या. वारा पण खूप सुटला होता वादळ खूप रौद्र रूप घेत होते. आता मात्र आमची तंतरली. चिंब भिजल्या मुळे आणि वाऱ्या मुळे खूप थंडी वाजत होती. मी तर एवढा कुडकुडत होतो की मला बोलताही येत नव्हते. प्रत्येक वीज ही आमच्यावरच पडणार की काय असे वाटत होते. कानठळ्या बसणारे ते विजेचे आवाज अजून भितीदायक होते.
आकाश पण खूप घाबरला होता पण तो काहीच नाही झालं असा आव आणत होता. मी एक मोठी चूक केली होती गोव्याला एक चक्री वादळ धडकणार आहे अश्या बातम्या मी दोन तीन दिवसापूर्वी वाचलेल्या. पण त्याच्या तडाख्यात आपण सापडू अस वाटले नव्हते .
आम्ही दोघेही कोल्हापूरचे असल्याने वादळ म्हणजे जरा जोराचा वारा आणि फारफार तर विजा कडाडने एव्हढाच काय तो आम्हाला अनुभव.
निसर्गाच एव्हढे रौद्र रूप मी पहिल्यांदाच बघत होतो.
आम्हाला माहिती होती की जंगलात सहसा ओल्या झाडांवर विज पडते म्हणून आम्ही एका दगडा खाली आडोश्याला आश्रय घेतला आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो. मी आकाश ला म्हणालो की आपण मागे फिरू हे वादळ खूप मोठे आहे. तर तो म्हणाला अर्धा एक तास वाट बघू आणि मग सगळे ओके वाटले तरच बीच कडे जाऊ.
पाऊस चांगला एक तास चालला हवेत विलक्षण गारवा पसरला होता. जंगलाची जमीन आता चिखलाने आणि पाण्याने भरलेली होती.
क्षणात सगळे आकाश मोकळे झाले आणि सूर्याची किरणे नुकताच भिजलेल्या पानावरून reflect होऊ लागली मस्त वातावरण झाल होते. आम्ही थोडे फोटो क्लिक केले आणि पुढे चालू लागलो. ऊन पडल्यामुळे माझी थंडी सुद्धा कमी झाली होती. आता मात्र आम्ही पटापट पाउले उचलत होतो कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. आमच्या प्लॅन पेक्षा आम्ही 2-3 तास तरी मागे होतो. शेवटी संध्याकाळी 5 च्या सुमारास आम्हाला लाटांचा आवाज ऐकू येऊ लागला. जवळ जवळ जाऊ तसा तो आवाज मोठा मोठा होत गेला. हळू हळू पायाखालचा चिखल जाऊन लाल वाळू लागु लागली. ती पायवाट संपली तसा आमच्या समोर अथांग समुद्र. खवळलेला फेसाळलेले पाणी मला आवडणारा समुद्र आज दिसत नव्हता. आम्ही जिथून जंगलातून बाहेर पडलो तिथून आमची position अशी होती की आमच्या मागे घनदाट जंगल पुढे खवळलेला समुद्र डाव्या हाताला आणि उजव्या हाताला उंच डोंगर आणि जंगल.
दिवसभराचा थकवा विसरून आम्ही त्या समुद्राचे रौद्ररूप बघत होतो. तेवढ्यात आम्हाला जाणवले की आता या क्षणाला आपल्याशिवाय कोणीच नाहिये इथे.
बीच वर जायला अशी जागाच उरली नव्हती समुद्राचे पाणी इतके बाहेर आले होते की जंगलातून बाहेर पडल्या नंतर 10-15 पाउले चाळता येईल.
आम्ही तिथे जवळच एका दगडावर बसलो आकाश सिगारेट पेटवली आणि स्नॅक्स पॅकेट बाहेर काढले. एकेक झुरका घेत आम्ही सिगारेट आणि ते स्नॅक्स दोन्ही संपवले.
आम्ही प्लॅन केला होता की बीचवर tent लाऊन तिथेच रात्र काढायची पण या वादळामुळे आणि खवळलेल्या समुद्राकडे पाहून ते काही शक्य नाही असे वाटले. Ani जंगलात सुद्धा आतपर्यंत पाणी आल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यामुळे आम्हाला जंगलात रात्र काढण्याशिवाय पर्याय नव्हता आम्ही सूर्य थोडा खाली जाऊ पर्यंत तिथेच बसलो मग जंगलात जाऊन. कॅम्प लावण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागलो. म्हणजे इथे कोणते कोणते प्राणी असतिल याचि आम्हाला खात्री नव्हती. आम्ही समुद्रापासून 200 मिटर च्या अंतरावर कॅम्प लावायच ठरवले. खालची जागा साफ करून आम्ही फ्लोर तयार केला. आणि त्यावर कॅम्प सेट केला पण आत्ताच पाऊस पडून गेल्यामुळे सुकी लाकडे मिळणे खूप कठीण होते तरी पण आणि आकाश फिरून फिरून थोडे थोडे लाकडे जमा केली पण ती रात्र भर पुरणाची शक्यता खूप कमी होती आणि प्राण्यांना लांब ठेवण्यासाठी म्हणा किंवा थंडी घालवण्यासाठी आग पेटत राहणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही सोबत आणलेल्या vartu पैकी टाकाऊ वस्तू जाळायचे ठरवले.

एव्हाना सूर्याने खोल समुद्रात डुबकी मारलेली होती, आम्ही स्टोव्ह पेटवला मॅगी बनवली आणि tent च्या बाहेर बसुन ती खाल्ली. आग पेटवून आम्ही गप्पा मारत बसलो. तेवढ्यात समुद्राचा आवाज खूपच वाढला आणि सोसाट्याचा वारा सुटला. मला ती बोचरी थंडी सहन होत नव्हती. आमची शेकोटी एव्हाना विझली पन होती.
आता मात्र आम्हाला दोघांनाही खूप भीती वाटत होती कारण आम्ही दुपारी हे वादळ अनुभवले होते.

आम्ही प्रार्थना केली की याच्या पेक्षा परिस्थिती वाईट होऊ नये आणि tent मध्ये शिरलो.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याच्या घरी त्याला निखिल म्हणत असत..आणि registered नाव आकाश त्यामुळे लक्षात नाही राहिले मागच्या भागात काय लिहिले होते. तरी confusiya नको म्हणून संपादित केले आहे.

वाचतोय.
फोटोचे तेवढे मनावर घ्या.

फार सॉलिड.
या लेखाचे 3 भाग वाचले, अजून पण पुढचे लिहिले आहेत का?
जमलं तर प्रत्येक भागात पुढच्या भागाची आणि आधीच्या ची लिंक ठेवा.
'भाग दुसरा' हे शब्दात आहे, आणि भाग -3 आकड्यात.जमलं तर यात सारखी स्टाईल ठेवा, नंतर आपल्यालाच सोपं पडतं शोधताना.