चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचे अभिनंदन.

Submitted by सचिन पगारे on 23 February, 2021 - 11:50

AAZAD.jpg

टाईम मासिकाने १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीमध्ये भिम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण ह्यांना स्थान दिले आहे.
ट्विटरच्या प्रमुख वकील विजया गड्डे, युनाइटेड किंगडमचे अर्थमंत्री ऋषी सुनक, इन्स्टाकार्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, डॉक्टर आणि ‘गेट अस पीपीईच्या’ कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि अपसॉल्व्हचे संस्थापक रोहन पावुलुरी या भारतीय वंशाच्या व्यक्तींनाही भीमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत यावर्षी टाईम मासिकाच्या १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.

'रावण' यांना दलित शब्द मान्य नाही ते स्वताला आंबेडकरवादी म्हणवतात. युपिसारख्या राज्यात आंबेडकरवादी तरुणांचा ओढा त्यांच्याकडे आहे.जवळपास सात राज्यांत त्यांची संघटना कार्यरत आहे. दलित नेत्या म्हणुन मायावती ह्या अग्रणी आहेत. पण युपी वा देशात घडलेल्या दलित अत्याचाराविरोधात त्यांनी मौनव्रत घेतलेले असताना रावण मात्र आपल्या पध्दतीने संघर्ष करत आहे. त्यांची दखल जगाने घेतली यातच सारे आले. आपल्या देशात दलित चळवळीला, नेत्यांना कमी लेखले गेले. अभिजन वर्ग हा दलित चळवळीच्या नावाने नाके मुरडतो. तर अशा दलित चळवळीतील नेत्याला हा मान मिळाल्याने बर्याच अभिजन वर्गाच्या भुवया उंचावल्या असतील.

रावण यांच्या अभिनंदनाचा हा धागा. समस्त मायबोलीकरांकडुन रावण यांचे अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीसाठी व नव विचारांचा भारत घडवण्याच्या प्रयत्नात शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान
अभिनंदन

अभिमानी व घमेंडी लोकांमुळे देशाची वाटचाल वेगाने नंदनवन होण्याकडे सुरू आहे , काही आशाकिरण बाकी आहेत , त्यामुळे अभिनंदन गरजेचे आहेच

<< समस्त मायबोलीकरांकडुन रावण यांचे अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीसाठी व नव विचारांचा भारत घडवण्याच्या प्रयत्नात शुभेच्छा. >>
------ सहमत...

चंद्रशेखर आझाद यांचे अभिनंदन आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा .

रावण' यांना दलित शब्द मान्य नाही ते स्वताला आंबेडकरवादी म्हणवतात. युपिसारख्या राज्यात आंबेडकरवादी तरुणांचा ओढा त्यांच्याकडे आहे.जवळपास सात राज्यांत त्यांची संघटना कार्यरत आहे. दलित नेत्या म्हणुन मायावती ह्या अग्रणी आहेत. पण युपी वा देशात घडलेल्या दलित अत्याचाराविरोधात त्यांनी मौनव्रत घेतलेले असताना रावण मात्र आपल्या पध्दतीने संघर्ष करत आहे.>>>>>>>>>>
हे मात्र अगदी खरं आहे !
रावण यांचे अभिनंदन !

यांच्याबद्दल किंवा भिमआर्मी बद्दल काहीच माहीती नाही. विकीपिडीया व्यतिरिक्त अधिक माहीती कुठे मिळेल वाचायला.

राहुल कंवल या इंडिया टुडे तीलपत्रकाराने चंद्रशेखर च्या कार्यक्षेत्रात जाउन त्याची इंटरव्ह्यू घेतली होती. ती स्टुडिओ तील नसुन प्रत्यक्ष त्याचे कार्यक्षेत्र त्याने सुरु केलेल्या शाळा येथुन थेट आहे. ती तुम्हाला यु ट्युब वर मिळेल. यातुन तो व भिम आर्मिबद्दल डिटेल माहिती मिळेल.

नथुराम शब्दाची अ‍ॅलर्जी पण दुसर्‍याची धर्मपत्नी पळवणार्‍या रावणाच्या नावाचे कोण ते कौतूक!

रावणाने स्वतःच्या आईला मारली नव्हती किंवा स्वतःची धर्मपत्नी वार्‍यावर सोडली नव्हती..!!!
----------------------------------

चंद्रशेखर यांचं अभिनंदन..!

रामाच्या देशात रावण नाव का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला तेव्हा आझाद ने उत्तर दिले होते की

आपल्या बहिणीचे नाक कापुन विटंबना झाल्यावर रावण प्रत्यक्ष देवाचा अवतार मानला जाणाऱ्या रामाला भिडला. प्रत्येक बहिणीला रावणासारखा भाउ असावा जो तिच्या मान सन्मानासाठी कुणाशीही नडेल. दलित बहिणींनी काहीही अत्याचार झाले तर सांगावे हा चंद्रशेखर रावणासारखा आपल्या बहिणींच्या पाठीशी राहील.

रावणाने डायरेक्ट युद्ध करायला हवं होतं. स्वतःच्या बहिणीच्या सन्मानासाठी दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार केले. याला काय अर्थ आहे. नाण्याची एकच बाजू दाखवतात.

>>आपल्या बहिणीचे नाक कापुन विटंबना झाल्यावर रावण प्रत्यक्ष देवाचा अवतार मानला जाणाऱ्या रामाला भिडला

अभिनंदनाचा धागा आहे त्यामुळे नाही लिहित इथे .
पण खूप विरोधाभास आहे identity politics मधे

स्वतःच्या बहिणीच्या सन्मानासाठी दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार केले.
कोणत्या स्त्रीवर अत्याचार केला?

हा या धाग्याचा विषय नाही आणि ही सगळी चर्चा इथे योग्य नाही पण स्त्रीच्या संमतीशिवाय तिला पळवून आणून बंदिवासात ठेवणे याला अत्याचार नाही तर काय म्हणतात? केवळ बलात्कार म्हणजे अत्याचार नव्हे. आजकाल समाजात जे मुलीची छेड काढली, तिच्याबद्दल घाणेरड्या शब्दात कमेंट्स केल्या या गोष्टी ठीक आहे त्यात काय एवढं म्हणणारे जे लोकं असतात ती लोकं रामायणातल्या रावणाच्या मेंटलिटी ची लोकंच असतात.

रामायण, राम, रावण यातलं काहीही 100% माहीत नसलं तरी 'तू माझ्या बहिणीचं नाक कापलंस म्हणून मी तुझ्या वहिनीला पळवून नेतो आणि बंदिवासात ठेवतो' हे कोणत्याही प्रकारे आदर्श ठेवावा असं लक्षण नाही याबाबत दुमत नसावं अशी अपेक्षा आहे.

बाकी रामायणातील रावण हा सगळ्या बाबतीत सद्गुणी होता परंतु अति अहंकार, बाइलवेडे पणा आणि संताप या तीन स्वभावामुळे तो व्हिलन बनला. रामायण खरं की खोटं हा मुद्दा बाजूला ठेवुन रावणाला या प्रकारेच पाहिलं तर तो कोणालाच हिरो वाटणार नाही.

याच बरोबर रामाला हिरो बनवताना त्याचा 'संयम, दिलेला शब्द पाळणारा' हा गुण महत्वाचा दाखवलाय. जे गुण रामाला हिरो बनवतात ते खरेच डे टू डे आयुष्यात महत्वाचे आहेत की नाही ते ज्याचं त्याने ठरवावं. बाकी रामायणातल्या रामाने काही चुका केल्याचं नाहीयेत हे ज्याचं म्हणणं असेल त्याला रामायण समजलं नाही असं मी तरी म्हणेन.

DJ, मला तुमचा मुद्दा कळला नाही. कोर्ट आणि पोलीस जे गुन्हे शाबीत नाही करू शकत ते गुन्हे गुन्हे नाहीत का ? त्याकाळी कोर्ट आणि पोलीस नव्हते म्हणून असं एखाद्या स्त्रीला फॉर that मॅटर कोणत्याही व्यक्तीला पळवून आणून बंदिवासात ठेवणं योग्य?

एवढाच भारी होता रावण तर डायरेकट लक्ष्मणाला धरून मारायचं ना सीतेला का पळवून नेलं. त्या आधी स्वतःच्या बहिणीच्या 2 कानाखाली वाजवायचा की बये त्याने नकार दिला तरी त्याच्या मागे मागे कशाला गेलीस स्टॉक करत.
च्यामारी ही एक तर्फी लफडी जामच त्रास देतात बुवा. देव सुद्धा सुटले नाहीत यातून.

**** ही खरोखर शेवटची पोस्ट या विषयावरची कारण इतका चांगला महत्वाचा धागा हायजॅक होतोय

तात्पर्य : सचिनजी पगारेजीं एक पेट्रोलचा बोळा फेकुन बाजुला अ‍ॅसिट्लिनचे सिलेंडर नॉब उघडुन पसार झालेत.

आझाद यांचे काम खरोखर चांगले आहे. विशेष म्हणजे राजकारण्यांपेक्षा उजवे. पण त्यांनी देखील राजकारणाच्या मोहात पडु नये, नाहीतर हकनाक एक सामाजीक नेता आपली ओळख गमवुन बसेल. म्हणूनच आज राज ठाकरे फटकळपणाने नेत्यांच्या चूका दाखवु शकत आहेत.

<< एवढाच भारी होता रावण तर डायरेकट लक्ष्मणाला धरून मारायचं ना सीतेला का पळवून नेलं. त्या आधी स्वतःच्या बहिणीच्या 2 कानाखाली वाजवायचा की बये त्याने नकार दिला तरी त्याच्या मागे मागे कशाला गेलीस स्टॉक करत.>>

----- एक काल्पनिक कथा या पलिकडे जास्त पहाण्यात अर्थ नाही. सिता या रावणाची कन्या होती, आणि सितेला त्या काळात धोका होता (कुणापासून ? - पुन्हा एक उपकथा आहे) म्हणून पिता असलेल्या रावणानीच तिला सुरक्षित स्थळी हलविले. मग आधी आणि नंतर सगळा मसाला भरलेला आहे.
रावणाने सितेला स्पर्शही केला नव्हता... सिता पवित्रच आहे हे माहित असतांनाही सर्वज्ञ रामाने तिला त्यागले... अनेक कल्पना प्रकार वाचायला मिळतात. खरे-खोटे काल्पनेतला रामच जाणो.

<<नथुराम शब्दाची अ‍ॅलर्जी पण दुसर्‍याची धर्मपत्नी पळवणार्‍या रावणाच्या नावाचे कोण ते कौतूक! >>

-------- तुम्ही तुमचे नाव बदला आणि नथुराम ठेवा... Happy म्हणजे तुम्हाला त्या नावाची अ‍ॅलर्जी नाही आहे हे जगाला पटेल.

हा निरागस, बळीचा बकरा ठरलेला नथुराम कधी महात्मा गांधी यांना जिवाने मारतो तर कधी दाभोलकर, कलबुर्गी, कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश..... यांची जिवनयात्रा अनैसर्गिक रितीने संपविण्यासाठी गोळी झाडतो.

प्रत्येक घटनेत नथुरामाचा खांदा वापरण्यात आलेला असतो. खुनाचा कट रचणारे आणि खरा ट्रिगर चालवणारे सर्व काळात मोकळेच असतात.

@हर्पेन +१
भीमाआर्मी चे कार्य, पद्धत, मूल्ये वाचायला आवडतील. कोणाला काही माहीती असल्यास डकवावी. विकीपाडियावर मिळते पण लेख वाचायला आवडेल.
थोडा शोध घेता -
http://164.100.77.196/sites/default/files/1458100632_Ambedkar1.pdf
https://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_01.pdf

हे सर्व वाचायला आवडेल.

Pages