Survival story..

Submitted by Abhishek Sawant on 23 February, 2021 - 04:16

कधी नव्हे तो सुट्टीचा योग जुळून आला होता, आज शनिवारी प्रजासत्ताक दिन होता. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे मस्त दोन दिवस मिळणार होते सुट्टीचे. गोव्याला येऊन मला 4 वर्षे झाली आहेत गोव्याचा 50% भाग फिरून झालेला आहे. कॉलेज मध्ये शिकत असतानाच मी ठरवले होते की गोव्यालाच जॉब करायचा. आधीपासूनच मला निसर्गाची खूप ओढ होती. गोवा म्हणजे निसर्गाची देणगी लाभलेले ठिकाण. कधी वेळ मिळाला तर आम्ही रविवारी किंवा वीकेंडला फिरायला बाहेर पडायचो.
आज पण तोच प्लॅन होता पण कोण यायलाच तयार नव्हते कारण मी आणि माझा रूममेट आकाश आम्ही दोघांनी मिळून एक मस्त adventures प्लॅन केला होता. आकाश पण फिरायला म्हणले की एका पायावर तयार असायचा.
तर आमचा प्लॅन असा होता की, आम्ही जिथे राहात होतो तिथून 90 किलोमीटरवर एक बीच आहे butterfly बीच. तो एकदम antouched बीच आहे कारण त्या बीच वर पोहोचण्यासाठी जवळजवळ 25 किलोमीटर ट्रेकिंग करावे लागते आणि हा रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. तर या बीचच्या तिन्ही बाजूने घनदाट जंगल आणि एका बाजूला समुद्र अश्या अवघड ठिकाणी हा बीच असल्याने तिकडे लोकल लोक सोडले तर कुणी फिरकत नाही. फुलपाखरांच्या पंखा प्रमाणे या बीचचा आकार असल्याने त्याला butterfly beach असे नाव पडले होते.
तर अर्थात ही सर्व माहिती मी गुगल काकांकडून मिळवली, आणि त्या निसर्गरम्य ठिकाणचे सौंदर्य बघून मला आणि आकाशला पण तिथे जाण्याचा मोह आवरला नाही. तर आम्ही आदल्या दिवशीच्या संध्याकाळी office वरुन घरी आलो मग आमच्या नेहमीच्या चहा च्या टपरीवर जाऊन मस्त गरम चहाचे घोट आणि सिगरेटचे झुरके मारत प्लॅन करू लागलो. अर्थात मला एवढ्या मोठ्या ट्रेकिंग चा अनुभव नव्हता तरी इथून तिथून वाचून आम्ही ट्रेकिंग चि तयारी करू लागलो.
तर सगळ्यात आधी आम्ही bagpack मध्ये काय काय लागणार याची लिस्ट काढली. आम्हाला तिथे एक दिवस camping करायचे होते आणि बीच चे location बघता आम्हाला तिथे कुठे shop's वैगेरे दिसणार नव्हते किंवा रिसॉर्ट पण मिळणार नव्हते. आकाश च्या एका मित्राकडे foldable tent होता मग आम्ही तोच वापरायचा ठरवला. तर दोन दिवस पुरेल इतके पाणी एक छोटासा स्टोव्ह, मॅगी आणि दुसर्‍या खायच्या वस्तू, एक छोटा map घेतला प्रिंट करुन कारण तिकडे रेंज नसेल तर आम्ही चुकलो असतो. तर असे सगळे सामग्रीची लिस्ट रेडी झाली. सगळ्यांची जुळवाजुळव करून आम्ही बॅग रेडी करून ठेवल्या. कारण सकाळी लवकर उठून निघायचे होते. आम्ही excitement मध्ये झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो तर आमचा हिरमोड झाला ढग दाटून आले होते. आणि गोव्याचा पाऊस म्हणजे कहर असतो हे आम्हाला चार वर्षात कळले होते. तरीपण आम्हाला वाटले की जानेवारी चालू आहे आता तर एवढा पाऊस नाही पडणार. आम्ही बॅग उचलल्या तसे आम्हाला कळले की आम्ही खूपच सामान भरलेले आहे तर आम्ही थोडे थोडे सामान कमी केले. आणि बॅग घेऊन माझ्या बाइक वर बसलो. दोघेच जण असल्यामुळे एकाच बाइक वरुन जायच असं आम्ही ठरवले होते. बाहेर पडलो मस्त कडक चहा घेतला.
आम्हाला आधी 50-60 किलोमीटर पर्यंत बाईकवर जायला लागणार होते त्यानंतर थोडा कच्चा रस्ता त्यानंतर मग बाइक तिकडे लाऊन ट्रेकिंग. आम्ही मस्त चहा पिऊन अंतर कापायला सुरुवात केली, आमच्या कडे स्कुटी असल्याने आम्ही थोडे हळूच जात होतो. आम्ही 10 ते 15 किमी गेल्यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. आम्ही रेनकोट वैगेरे काहीच सोबत घेतले नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्या महत्त्वाच्या वस्तू बाईकच्या dikky मध्ये टाकल्या आणि थोडावेळ वाट बघितली पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही परत वाटेला लागलो. जसजसे शहर मागे पडत होते तसे गोव्याचा सुंदर निसर्ग आमच्या डोळ्याला सुखमय वाटत होता.
पुढे गेल्यानंतर एक छोटासा घाट लागला, गर्द झाडी थंड हवामान आणि गोव्याचे सुंदर रस्ते आम्ही फक्त अनुभवत होतो. कितीतरी वेळ आम्ही एकमेकांशी बोललो पण नाही. मग एका ठिकाणी थांबून सिगारेटचा धूर हवेत सोडत संपूर्ण जंगल डोळ्याखालून घातले. दोन चार फोटो क्लिक केले instagram साठी पण रेंज नसल्यामुळे ते अपलोड करु शकलो नाही.
आम्ही गूगल map वर तो टर्न शोधू लागलो जो मेन रस्त्यापासून आत जंगलात जातो. 10-15 किमी पुढे घाट उतरून गेल्यानंतर आम्हाला तो टर्न दिसला. एक छोटासा कच्चा रस्ता जंगलाच्या दिशेने गेला होता. त्या टर्न जवळ एक मोठा बोर्ड लावला होता "leopard Vally". गोव्यातील जंगलात जंगली प्राणी आहेत असे आम्ही ऐकले होते. या भागात leopard किवा गवा रेडा एखादे अस्वल दिसल्याचे आम्हाला माहिती होते पण आम्हाला भीती वाटली नव्हती कारण त्या रस्त्याला दोनचार हॉटेल रिसॉर्ट वैगेरे होते आणि बर्‍यापैकी माणसांची वर्दळ त्या रोडला दिसत होती. एव्हाना दुपारचे 12.30 वाजले होते, पोटात तशी भूक नव्हती पण पावसात भिजल्या मुळे आम्हाला चहा आणि सिगारेट चि तलफ आली होती. आम्ही एका हॉटेल मध्ये जाऊन मस्त चहा आणि सिगरेट घेतली. एक पॅकेट सिगरेट बरोबर घेऊन ते गाडीच्या dikky मध्ये व्यवस्थित ठेवले आणि रस्त्यावरून पुढे जाऊ लागलो. तो रस्ता एक कार जाईल एवढाच होता आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे खूप चिखल झाला होता.
मी कसाबसा गाडीचा balance सांभाळत पुढे जात होतो. अर्धा तास कसरत करत गाडी चालल्यानंतर एक छोटासा ओढा लागला पण त्याच्या आजूबाजूला गुडघा भर चिखल होता त्यामुळे तेथून गाडी पास करणे अशक्य होते म्हणून आम्ही तिथेच बाइक ठेवायचे ठरवले. आणि पायी चालत ट्रेकिंग करायचे ठरवले. आमच्या सगळ्या वस्तू ज्या पाण्यात भिजून खराब होऊ शकतात त्या आम्ही एका प्लास्टिक बॅग मध्ये घातल्या आणि आम्ही निघालो वाटेत फोटो काढत गप्पा मारत आम्ही चालत होतो.
आमचे फक्त 25 किमी ट्रेकिंग आता पावसामुळे आणि चिखलामुळे 30 ते 40 किमी चे झाले होते. पण एकच पायवाट असल्याने रस्ता चुकण्याची शक्यता खूप कमी होती.
आम्ही चालत होतो तसे तसे आमच्या आजूबाजूच्या परिसरात पण बदल होत होते. आता माणसाच्या अस्तित्वाच्या खुणा विरळ होत चालल्या होत्या. कधी पाण्यातून तर कधी दगड धोंड्या मधून आम्ही वाट काढत होतो. आम्हाला दोन तीन गुरे हाकणारे सोडले तर बाकी कोण दिसले नाही. मला वाटले थोडे तरी टुरिस्ट इकडे येत असतिल पण पावसामुळे किंवा ऑप सीजन मुळे कोणीच तिथे दिसत नव्हते...

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्ण झालेला भाग इंटरेस्टिंग आहे. उरलेल्या ट्रेकच्या साहसाबद्दल पुढील लेखांमध्ये वाचायची उत्सुकता आहे. काहीतरी सणसणीत प्रसंग घडला आहे हे नक्की.
थोडीशी स्पेलिंग्ज आणि व्याकरण दुरुस्त करणार का?
उदाहरणार्थ -
आम्ही दोघांनी मिळून एक मस्त adventures प्लॅन केला होता. >>> Adventurous
antouched >>> untouched
Dikky >>>> dicky / dickey
सिगारेट चि तलफ / सिगारेटची तलफ
Bagpack >>>> backpack
ऑप सिझन >>>> ऑफ सिझन

छान. पुलेशु.
आणि भरपूर फोटो पण टाका बरं का.

व्वा... छान पुभाप्र. खास निसर्ग प्रेमासाठी गोव्याला जॉब करताय म्हणजे भारीच.>>>> धन्यवाद बोकलत..मला निसर्गाच्या सानिध्यात रहायला खूप आवडते तेवढीच मनाला शांतता मिळते.

धन्यवाद मृणाली , वावे, एस, वर्णीता.
@मीरा मी मोबाईल वर लिहितो आणि मी प्रचंड आळशी आहे. त्यामुळे मी स्वतः लिहीलेले मी परत वाचत नाही.
तरी पण जर वाचताना अश्या चुकांमुळे मूड जात असेल तर पुढच्या वेळी मी त्या नक्कीच सुधारेल.