बहेनजी मायावतींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Submitted by सचिन पगारे on 15 January, 2021 - 14:21

आज बहेनजी मायावतींचा जन्मदिन. स्वातंत्र्योत्तर काळात ज्या चार स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाने तेजाने झळकल्या त्यापैकी एक म्हणजे मायावती. त्यांना आदराने बहेनजी असेही संबोधले जाते.

उत्तर प्रदेश सारख्या जातिव्यवस्थेचे प्राबल्य असणार्या, पुरुषसत्ताक, पित्रुसत्ताक राज्यात स्वबळावर राज्य करणे, पुरुषांच्या राजकीय मक्तेदारीला आव्हान देत टिकुन राहणे हे साधे काम नाही. एक स्री असणे, तथाकथीत खालच्या जातीतील असणे, प्रस्थापीत नसणे, कुठलाही राजकीय वारसा नसणे, साधन नसणे अशा प्रतिकुल परिस्थितीत त्या युपिच्या राजकारणात पाय रोवून उभ्या राहिल्या.

मायावतींच राजकीय मनोधैर्य हे कमालीचे मोठे आणी आश्वासक आहे. मायावतींनी जातिव्यवस्थेत पिचलेल्या युपितील 'नाही रे' वर्गाला एक स्वाभिमान व दिशा दिली. 'अरे ला, का रे' म्हणण्याची हिंमत दिली.

प्रत्येक कर्तुत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते हे स्त्री वर्गाला गोंजरणारे घासुन घासुन गुळगुळीत झालेल्या वाक्याला मायावतीं सारख्या कर्तुत्ववान स्त्रिया छेद देतात. नवऱ्याच्या पाठीशी उभं राहुन त्याच्या किर्तीत वाढ घालणाऱ्या स्त्रियांपेक्षा आपल्या स्वताच्या संभाव्य क्षमतेत आपण किती घाव घालुन जग बदलु शकतो, काय काय करु शकतो हे जगजाहीर दाखविणाऱ्या स्रियांच मायावती हे एक रुप आहे.

राजकारणात चढ उतार येतात हार जीत होतच असते तो राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. आज बहेनजी मायावतींच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा येणारा काळ हा त्यांच्या कर्तृत्वाने झळाळून जावो अशी सदिच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बहेनजी मायावती अजूनही राजकारणात व लाईम लाईट मध्ये आहेत हे हा धागा बघितल्यावर लक्षात आले. हल्ली मी विसरूनच गेले होते त्यांना,जनता अजून विसरली नसेल बहुतेक.

बहेनजीना शुभकामना... केक पाठवा.

बेन जसोदाबेन

मायावती बेहेन
ममता दीदी
इंदिराबाई
सोनिया मॅडम

यादव राज्य संपवून त्यांनी यूपी साठी रोड मॅप आखून दिला होता . पण आत्मकेंद्रित वृत्ती आणि पुतळे बाजी मुळे घात करुन घेतला !!!!

पक्षांतर्गत आणि बाहेरच्या पुरूषी आणि जातीय सत्तेशी लढत नेतृवपदी विराजमान होण्याचा पराक्रम केलेल्या महिलेस शुभेच्छा !

मायावती नी निवडणूक जिंकली तेव्हा जबरदस्त धक्का सर्वांना बसला.
जातीयवादी समीकरणे पूर्ण बदलून दलित,ब्राह्मण ह्यांचे योग्य संतुलन त्यांनी राखले.
आणि हा धक्का प्रस्थापित ना जोरदार होता.

स्वातंत्र्योत्तर काळात ज्या चार स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाने तेजाने झळकल्या त्यापैकी एक म्हणजे मायावती.>>>
बाकीच्या तिन कोणेत ?
इंदिरा, जयललिता, ममता, सोनिया
यांपैकी ?

इंदिराजी नी पंच वार्षिक योजना आणून गरिबी निवारण करण्याचे लक्ष ठेवले होते ते काही प्रमाणात तरी त्यांनी पूर्ण केले.
एक कर्तृत्व वान ,खंबीर नेतृत्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
ममता जी
प्रस्थापित communist सरकार पासून सत्ता हस्तगत केली एवढेच त्यांचे काम माहीत आहे.
जयललिता नी फक्त वस्तू चे फुकट वाटप करून सत्ता ताब्यात ठेवली बाकी त्यांचे कर्तृत्व नाही.
मायावती नी जे भले भल्याना जमले नाही ते करून दाखवले.

स्वातंत्र्योत्तर काळात ज्या चार स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाने तेजाने झळकल्या त्यापैकी एक
सुश्री. बहन मायावती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. (बहन हे "ब" साधा, "ह" गळा ताणलेला नी खालचा जबडा व तोंड किंचीत पुढे नी "न" साधा असा उच्चारावा अन्यथा ते ब ह न मानले जाणार नाही)
वरचं पंचक पुर्ण करायला त्यात मा.श्री. सचिनजी पगारेजींचे नाव ही समाविष्ट करण्यात यावे.

स्वातंत्र्योत्तर काळात ज्या चार स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाने तेजाने झळकल्या त्यापैकी एक म्हणजे मायावती.>>>
बाकीच्या तिन कोणेत ?
इंदिरा, जयललिता, ममता, सोनिया
यांपैकी ?))))) (((()))

१.इंदिराजी
२.मायावती
३.फुलनदेवी
४.सोनियाजी

अगदी खरे आहे
फुलनदेवी बंदुकीचा धाक दाखवून लोकांना लुटत होती व या बाकी तिघी सत्तेत राहुन.

१.इंदिराजी
२.मायावती
३.फुलनदेवी
४.सोनियाजी >>>>>>>>

ममता गायब ?
६० वर्षांची अबाधित सत्ता घालविणाऱ्या ममता ला मनानियांच्या यादीतून हटविल्या मुळे
कॉम्रेड्स ना उकळ्या फुटल्या असतील ...

खरतर मी दिलेल्या लिस्टमध्ये मायावती ह्या प्रथम स्थानावर हव्यात. कारण युपिसारख्या जातीय दलदलीत रुतलेल्या पुरुषसत्ताक प्रदेशात एक स्त्री तिही दलित समाजातुन आलेली सत्ता काबीज करते आपल्या कर्तृत्वावर राज्यकर्ते होते हे अविश्वसनीय होते. प्रस्थापित समाजाला चपराक देणारी ती ऐतिहासिक घटना होती... परंतु इंदिराजी ह्या जरी प्रस्थापित घराण्यातून आलेल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या काळात जो राज्य कारभार केला त्याने पूर्ण विश्वाला त्यांची दखल घ्यायला लावली. अटलबिहारींसारखा राजकारणीही त्यांना दुर्गा मातेचे रुप म्हणाला.. त्यामुळे त्या प्रथम स्थानी आहेत.

जातीय दलदलीत रुतलेल्या पुरुषसत्ताक प्रदेशात एक स्त्री तिही दलित समाजातुन आलेली सत्ता काबीज करते आपल्या कर्तृत्वावर राज्यकर्ते होते हे अविश्वसनीय होते.
अगदी बरोबर. मायावतीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

मायावतींप्रमाणे जयललिता यांनीही मोठा संघर्ष केला होता. मायावती तरी काशीराम यांच्या उत्तराधिकारी होत्या यांना तसे काही घोषित वगैरे केले गेले नाही. दिवसाढवळ्या भर विधानसभेत त्यांची साडी फाडून त्यांना मारहाण केली गेली. एवढी लांछनास्पद घटना कुठल्याच राज्यात घडली नसेल. नंतर त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर सत्ता मिळवून सगळ्यांचा हिशोब केला. आता सत्ता मिळाल्यावर सगळ्यांचीच नियत खराब होते त्याला वरील स्त्रिया कशा अपवाद असतील?

कारण युपिसारख्या जातीय दलदलीत रुतलेल्या पुरुषसत्ताक प्रदेशात एक स्त्री तिही दलित समाजातुन आलेली सत्ता काबीज करते आपल्या कर्तृत्वावर राज्यकर्ते होते हे अविश्वसनीय होते >>>>>>
सपा आणि बसपा ची यूती तुटली , मुलायम चे सरकार पडले , मग मुलायम च्या गुंडांनी ने गेस्ट हाऊस वर हल्ला केला , मायावती चे कपडे फाडले गेले , त्या हल्ल्यातून भाजप चा आमदार द्विवेदी ने मायावती ला सुरक्षित बाहेर काढले होते , ज्या बद्दल मायावती ने खूप
वेळा द्विवेदी चे जाहीर आभार मानले होते .
त्या नंतर सर्व जाती धर्मातील लोकांचा विश्वास संपादन करून सत्ता स्थापन केली होती ......

जयललिता या सिनेअभिनेत्री होत्या. त्यांनी दक्षिणेचे मॅटीनी आयडॉल एमजीआर यांच्याशी लग्न केले होते. एमजीआर यांची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यांच्या अंत्यविधीला जो जनसागर लोटला होता त्याचे रेकॉर्ड ब्रेक झालेले नाही अजून. त्यांचा पक्ष सुस्थितीत होता. जयललिता यांनी त्यावर क्लेम ठोकल्याने त्याचे दोन तुकडे झाले.

वरती जी नावे दिली आहेत त्यातील फुलनदेवींवर एक लेख लिहायचा आहे.
सोनियाजींवर याआधीच एक सविस्तर असा लेख ' सोनियापर्व' मायबोलीवर प्रसिध्द केला होता त्यामुळे त्यांच्याबद्दल लिहित नाही.

सचिनजी पगारेजी यांना आधीच आतल्या गोटातली खबर होती की काँग्रेसजी ममताजींच्या विरोधात जाणार आहे म्हणूनच त्यांनी या यादीत ममताजींचे नाव लिहिले नाही.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/we-will-fight-the-election-tog...

याला म्हणतात दूरची दृष्टी. हॅट्स ऑफ टू यू. वाह सचिनजी पगारेजी वाह!