नवरा नावाचे व्याकरण”
नवरा नवराच असतो
नाही त्याला कुठलाही ‘समानार्थी ‘
बरेचदा ऊभा ठाकतो
आपल्या समोर मात्र’ विरूद्धार्थी’.....
कधी असते त्याचे सर्व ‘सामान्य रूप’
तर कधी मात्र ‘विभक्ति’
कधी असतात प्रेमाची ‘जोडाक्षरे’
कधी कडु शब्दांच्या उक्ती....
उंच स्वरात लावल्या जातात
एकमेकां ‘विशेषणे’
तर कधी घेतल्या जातात आणा-भाका
प्रेमाची एक ना ती ‘अनेक वचने ‘...
एकमेका बोलण्याची
सुटेना एकही ‘संधी’
कधी टोमण्यांचे ‘वाक्प्रचार ‘
तर कधी बोलण्यास पुर्णपणे बंदी ....
तू असे केले अन् तसे केले
वाचतो मोठ- मोठे ‘निबंध’
कधी ‘एका वाक्यात उत्तरे’ देऊन
तोंड मात्र करून बसतो बंद ....
कितीही केली उजळणी तरी
कधी वाटे कठीण तर कधी खुप सोप्पा
अशा ह्या नवरा नावाच्या विषयाने
व्यापलाय मात्र माझ्या दिलाचा कप्पा ...
कधी ‘स्वर ‘तर कधी ‘व्यंजन’
असे हे तुझे अन् माझे ‘समीकरण’
एकमेकांच्या साथीनेच सोडवायचं नाही का
हे जीवन नावाचे व्याकरण !!
...सीमा तुषार
नवरा नावाचे व्याकरण
Submitted by सीमा तुषार on 30 December, 2020 - 23:51
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
छान कविता!!
छान कविता!!
छान !
छान !