लहान मुलांमध्ये कॉमन समस्या - पोटातले जंत आणि डोकातल्या उवा - उपाय हवा आहे

Submitted by ऱोहि on 21 December, 2020 - 23:36

माझी मुलगी आता ८ वर्षाची आहे. तिला मी नियमितपणे जंताचे औषध दरवर्षी देते पण तरीसुद्धा रात्री झोपेत दात खाते. साधारणपणे हे जंत असल्याचे लक्षण आहे ना ? कॅल्शिअम ची कमतरता पण असेल का ? इतक्या लहान मुलीला उगाच कॅल्शिअम चे सिरप द्यावे का ?

दुसरे म्हणजे शाळेत जायला लागल्यापासून सतत उवा होत असतात . सध्या लॉक डाऊन मुळे घरी असून सुद्धा उवा सतत होत असतात .
तरी मी रोज केस विंचरते , मेडीकर , लायसिल सगळे उपाय करते

काही जालीम उपाय आहे का ????

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Calcium सिरप दर 6महिन्यांनी द्यावे. तुमच्या बालरोगतज्ज्ञांकडून विचारुन घ्या.

उवा बद्दल अनुभव आला नाही. एक दिवसाआड केस धुणे पण पुर्णपणे वाळुन देणे. ओल्या केसात लवकर उवा होतात असे माझी आई सांगते. त्यामुळे केस ओले असताना बांधू नये.

सध्या लॉक डाऊन मुळे घरी असून सुद्धा उवा सतत होत असतात .
तरी मी रोज केस विंचरते , मेडीकर , लायसिल सगळे उपाय करते.>>>>> माफ करा.पण तुम्हीपण हे सर्व करा.आठवड्यातून दोनवेळा डोक्यावरून आंघोळ केली पाहिजे.आजुबाजूच्या खेळणार्‍या मुलींमुळेही उवा होऊ शकतात.एवढ्या लहान वयात मेडीकर,लायसिल नका वापरू.केसात लिखा आहेत का बघा.तेलात कापूर खलून लावा.
माझा मुलगा ३-३.५ वर्षांचा असताना त्याला सांभाळणार्‍या मुलीच्या डोक्यात उवा असल्याने त्याच्याही डोक्यात एकदा उवा झाल्या होत्या.बारीक फणीने विंचरून काढले.मला भिती होती की माझ्या डोक्यात झाल्या तर वाट लागेल.कारण केस लांब आणि दाट होते.पण मीही रोज विंचरून पहायचे.नशीबाने मला भेट मिळाली नव्हती.

हं

जंत आणि उवा जात नाहीत , कारण एकालाच उपचार होतात म्हणून

जर फक्त मुलीचेच केस धुतलेत , तुमचे इतरांचे केस आणि तिचे अंथरूण , कपडे नाही धुतले तर 4 दिवसात पुन्हा होतील

जंत औषध एकालाच दिले , इतरांनी नाही घेतले तर फयामिलीत जंत राहिले तर पुन्हा होणार

लायसील , मेडिकर काहीही वापरा , पण त्या दिवशी सर्वांनी वापरले पाहिजे , टक्कल असेल तर त्यालाही सोडू नका , शिवाय त्या दिवशी आधल्या दिवशीचे कपडे , अंथरून पांघरून ही गरम पाण्याने धुवून भरपूर वेळ साबण पाण्यात बुडवून धुवा

जनताचे औषध वर्षातून दोनदा सर्व घरच्यांनी घेणे

ब्लॅककॅट उवांबद्दल ठीक, पण जंतांच औषध सगळ्यांनी त्याच वेळेला घेण्याचं कारण काय? टॉयलेट सीट / एकाच बदलीतून / वॉशिंग मशीन मधून या अंतर्वस्त्रातून त्या अंतर्वस्त्रात असा जंतांंचा संसर्ग पसरू शकतो का?

मेडिकलमधे noworm oral suspension मिळतं ते दर सहा महिन्यांनी द्यायचं.

उवांसाठी उपाय = सीताफळाच्या बिया धुवून सुकवून रोस्ट करायच्या व आतला गर फोडून घ्यायचा त्याला छान बारीक वाटून कडुलिंबाच्या तेलात गरम करून, तेल थंड झाल्यावर केसांना लावायचे. केस व्ययस्थित कपड्याने बांधून ओव्हर नाईट ठेवायचे व दुसऱ्या दिवशी धुवून टाकायचे काळजी एवढीच घ्यायची कि डोळ्यात अजिबात अजिबात जाता कामा नये.

उवांसाठी फक्त मुलीचे केसच नाही तर तिचे अंथरूण, उशीचा अभ्रा सर्व गरम पाण्याने धुवा. केसातील उवा जरी औषधामुळे गेल्या तरी अंथरूण, उशीमधे लिखा राहू शकतात आणि मग परत केसात जाऊ शकतात. त्यामुळे अंथरून, अभ्रा वेळचेवेळी बदलून गरम पाण्यान साफ करा. मुलीचा कंगवा, फणीही वेगळी वापरा आणि वापरल्यानंतर गरम पाण्याने धुऊन घ्या. ती इतर कोणी वापरू नका.

इथेच किंवा दुसरीकडे डॉ. खरे यांनी बँडेक्स (बेंडेक्स) ही गोळी जंतावर सुचवलेली होती. तिने जंतांना लकवा होवुन ते शौचावाटे बाहेर पडुन जातात.
पुन्हा एकदा कंफर्म करुन देवु शकता.

जंतांसाठी एक सुरेख घरगुती उपाय आहे.
१ओवाअर्क पाण्यात मिसळून घेणे.
२.आल्याकांद्याचा(आले+ कांदा) रस, त्यात पहिजे तर लिंबू पिळून सकाळी अनशापोटी घेणे.हे २-३ दिवस लागोपाठ घ्यावे.