डेअर डेव्हिल एग ( मसाला एग)

Submitted by प्राजक्ता on 25 November, 2020 - 14:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एग- ६
कान्दा-अर्धी वाटी बारिक चिरलेला
टोमॅटो- अर्धी वाटी बारिक चिरुन
ढब्बु मिरची-अर्धी वाटि बारिक चिरुन
पिवळी,लाल,केशरी ढोबळी मिरची बारिक चिरुन- अर्धी वाटी
कोथिबिर-पाव वाटी
पावभाजी मसाला किवा किचन किन्ग मसाला-२ टेबल टोमॅटो
धणा-जिरा पुड्,मिठ, हळद्,तिखट.
बटर्,तेल
फ्रेश क्रिम नसेल तर गोडसर घट्ट दही फेटून
ग्रेटेड चिझ मेक्सिकन ब्लेन्ड नसेल तर चेडार किवा पार्मेजान किसुन ( मोझेराला नको)( ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

अन्डी हार्ड बॉइल करुन सोलुन घ्यावी, उभी मधे चिरुन त्यातला पिवळा बलक काढुन एका बाउल मधे वेगळा काढावा. एका पॅन मधे तेल आणि बटर एकत्र करुन गरम करावे त्यात बारिक चिरलेला कान्दा घालुन परतावा, पारदर्शक झाला कि त्यात हळद्,मसाला,तिखट आणि बारिक चिरलेला टोमॅटो घालुन चान्गले परतुन घ्यावे मग सगळ्या प्रकारच्या ढब्बु मिरच्या,मिठ घालुन जरा हाय फ्लेम वर सगळ परतत शिजवुन घ्यावे. भाज्या मधे क्रन्च राहिल अस पाहावे.आच बन्द करुन अर्धे पिवळे बलक यातच घालुन सगळ मिश्रण एकजिव करावे, यात आता एक-दोन चमचे फ्रेश क्रिम नसेल तर गोड दही फेटून घालावे.
हे मिश्रण चम्च्याने अन्ड्यात भरावे वरुन किसलेले चिझ (५ मिनिट किवा चिझ मेल्ट होइस्तोवर) )ओव्हन मधे ठेवुन ब्रॉइल करावे. वरुन अगदी बारिक चिरलेली कोथिबिर भरभरुन सर्व्ह करावे.

थॅन्क्सगिव्हिन्ग पार्टीला डेव्हिल एग्स असतात त्याच हे जरा देशी व्हर्जन.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१) क्रिम घातल्याने जरा रिच चव येते पण नसेल तरी चालतय
२)चिझ घालुन मेल्ट करायची स्टेप पुर्ण ऑप्शनल आहे स्किप करु शकता.
३)कान्दा,टोमॅटो,मिरच्या सगळ अगदी बारिक चिरुन घ्याव.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

test

विदेशी व्हर्जन