A curly tale of मिरची

Submitted by अक्षता08 on 6 September, 2020 - 00:56
mirchi

Container gardening साठी मिरची हे "Most Suitable" झाड आहे (१२-१४ इंच व्यास असलेली कुंडी मिरचीच्या रोपट्यासाठी उत्तम आहे). मिरची हे तस सोप्प झाड आहे लावायला परंतु त्याची तेवढीच काळजीही घ्यावी लागते. मिरची हे "Attention Seeker Plant" आहे. पहिल्यांदी मिरचीचं झाड लावायच असल्यास बरेच अडथळे येऊ शकतात (म्हणजेच फुलं न येणं, फुलं गळून जाणं, फुलांना मिरची न धरणं, पानांना कीड लागणं). परंतु एकदा अनुभव आला की मिरची हे लावायला खूप सोप्प झाड आहे.

मिरचीच्या बऱ्याच जाती / प्रकार आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारच मिरचीच रोपट लावायच आहे त्यानुसार आपण नर्सरीमधून मिरचीच्या बिया आणू शकतो किंवा बऱ्याच नर्सरीमध्ये मिरचीची रोपटीसुद्धा उपलब्ध असतात. मिरचीच्या प्रत्येक जातीनुसार germination period, फळधारणेचा कालावधी बदलत असतो. साधारणतः जानेवारी ते मार्च दरम्यान मिरचीच्या बिया लावाव्या. (मिरचीच्या बिया नर्सरी मधुन विकतही आणू शकतो किंवा घरी असलेल्या मिरच्यांपैकी एखादी लाल झालेली मिरची असल्यास त्याचाही बिया वापरात आणू शकतो)
मिरचीच्या बिया लावल्यानंतर साधारणतः ७-८ दिवसात true leaves येतात, मिरचीचं रोपट २ ते ३ महिन्यांमध्ये मोठं होतं. जोपर्यंत मिरचीला फुलं येत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांनी खत द्यावे. एकदा मिरचीला फुलं यायला सुरुवात झाल्यास दर ७ दिवसांनी खत द्यावे. मिरचीला दोन दिवसांतून एकदा पाणी दिल तरी चालण्यासारखे आहे परंतु मातीत ओलावा असायला हवा. उन्हाळ्यात मात्र मिरचीला रोज पाणी द्यावे. मिरचीच्या रोपट्याला direct sunlight ची आवश्यकता असते.

मिरचीचं झाड ओपन टेरेस मध्ये किंवा जमिनीवर लावलं असल्यास pollination हे नैसर्गिकरीत्या होऊन फळधारणा होते. परंतु मिरचीच रोपट indoor किंवा बाल्कनीमध्ये असल्यास hand pollination कराव लागतं.

मिरचीला पटकन कीड लागते, पानं दुमडल्यासारखी दिसतात, Mealybug चा प्रादुर्भाव होतो त्यामुळे सतत लक्ष ठेवावं लागतं. दर सात दिवसांनी कडूनिंबाच्या तेलाचा फवारा मारणे गरजेचे आहे. मिरचीच्या रोपट्याच्या आजुबाजूला अशी झाड किंवा फुलझाडं ठेवू नये ज्यांना पटकन कीड लागते.

मिरचीच्या एका झाडापासून आपल्याला पुरक मिरच्या मिळतात. पहिल्यांदी मिरचीचं झाड लावून कदाचित एवढे चांगले results मिळणार नाहीत परंतु एकदा त्याचा formula कळला की मिरचीचं झाड बाल्कनीमध्ये लावण खूप सोप्पी गोष्ट आहे.
IMG20200630124141.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित;
हँडपॉलिनेशनचीही गरज नाही.
भरपूर मिरच्या येतात ; भरपूर मिरच्या येतील.
जीवामृतामुळे फूल-फळधारणेमधेही लक्षणीय सुधार दिसून आला.
आमच्याकडचे ३-४ वर्षे झालेले झाड जे काढून टाकायच्या विचारात होतो; त्याला जीवामृताच्या एकाच डोस नंतर भरपूर फुले लागली आणि नंतर
आपोआप मिरच्याही ज्या आधीपेक्षा जास्त लागल्या.

पण मग भरपुर मिरच्या नाही येणार का असं केल्याशिवाय? Sad
Submitted by सस्मित >>>> Happy आधी पहिली तर येऊ दे.
पॉलिनेशन म्हणजे नर आणि मादी जातीच्या झाडांमध्ये / फुलांमध्ये परागकणांची देवाणघेवाण ज्यामुळे फुलाचे फळ होण्याची प्रक्रिया पुढे जाते. एरव्ही हे मधमाशी भुंगा असे कीटक किंवा फुलपाखरे मध पिताना त्यांच्या पायाला परागकण लागून किंवा वारा अशा नैसर्गिक पद्धतीने होते. हे घटक नसतील नर आणि मादी फुले आपापल्या ठिकाणी निष्क्रिय राहिल्याने फळ -- मिरची -- बनत नाही. मग ती मदत हँडपॉलिनेशन करून आपण करायची.

नवरा बायको दोन खोल्यात दोन सोफ्यावर बसून राहिले तर कुटुंब बनते का?
हँडपॉलिनेशन म्हणजे तुम्ही मिरचीच्या रोपाला हनीमूनचे तिकीट काढून देताय.... बाकी काही नाही
पुढे मग हर्पेन म्हणाले तसे मातीचा कस वाढवून मिरच्यांची संख्या वाढवता येईल. चिंता नको.

कारवी, Lol ओके!
हर्पेन, जीवामृत चा स्पेसिफिक ब्रॅन्ड आहे का काही? नर्सरीमधे मिळेलच ना?

तर मोजुन चार मिरच्या आल्या. Happy
पहिली एकुलती एकच होती. मग हळुहळु बाकी दिसु लागल्या.
दोन काढल्या. साखि मधे घातल्या. अजुन दोन आहेत त्या लहान आहेत.
मी एकदिवसाआड घरी असताना झाड बिल्डिंग च्या गेटसमोर काही झाडाच्या कुंड्या आहेत तिथे नेउन ठेवते.

mirachi.jpg एकुलती एक Happy

मस्त आहेत .
सध्या बरेच दिवसांनी ढीगभर फुले आली आहेत.
बघूया एकतरी मिरची लागते का!

माझे मिरची चे झाड चांगले मोठे झालेय फुलं आणि मिरच्या पण बऱ्याच लागल्या आहेत. वरवर हेल्दी दिसते पण परवा खत टाकताना नीट पाहिलं तर भरपूर काळ्या मुंग्या आणि खालच्या पानांवर मागच्या बाजूला पांढरी बुरशी. तिच्यावर फवारा मारला तर या मुंग्यांची काळी अंडी दिसली. काय उपाय करू pls सांगा. निम ऑइल चा फवारा आठ दिवसातून देते आहे पण ते पुरेसं वाटत नाहीये. Pls उपाय सांगा ही कीड समूळ घालवायचा.

सान्वी, same pinch Sad
कालच मी रोपांचे बरेचसे शेंडे खुडून टाकले (हा उपाय नाही , माझी reaction होती) .
बर्यापैकी फुलं येत होती. पण आता २-३ दिवसांपासून काळ्या मुंग्या आणि काळी बुरशी. काय करावे???

काळ्या मुंग्या आणि काळी बुरशी.>>>> हाच माझाही प्रॉब्लेम आहे.माबोवर विचारले असता कांद्याच्या पाण्याचा सल्ला मिळाला.पण माझ्याकडून जास्त पाणी घातले गेले कदाचित.पहिल्यांदा रोप तरारले, नंतर जळून गेले.मस्त मोठ्या मिरच्या आल्या होत्या.

आता एका बाईने सांगितले की कुंडीतली माती पानांना चोळायची.मग ते काळे ठिपके जातील.माहीत नाही काय खरे ते? संत्राच्या सालीचा रस कढीलिंबाच्या पानांना चोळला.त्याच्यावरही काळे ठिपके आले आहेत.

माझ्याही कढीलिंबावर बारके बारके ठिपके आलेत ,खर तर तो आता वृक्ष झालाय. अर्धा भाग ठेवलाय, अर्धा कट केलाय. नवीन पालवी कशी येतेय बघू.

IMG_20210410_112912.jpgIMG_20210410_112901.jpg
मी सुद्धा मिरची लावली आहे.. खूप सारी रोपे आली होती मग मी त्यातली काही खुडून टाकली आणि 4 5 ठेवली आहे एकाच बॉक्स मधे..colour चा बॉक्स वापरला आहे..मला भीती वाटतेय की 4 5 रोपांना हा डब्बा छोटा होईल..रोप सुद्धा एकदम कॉर्नर वाली ठेवली कारण तीच चांगली means healthy दिसत होती. एका कुंडीत किती रोपे असावीत? खत कुठले आणि कसे टाकावे? काही झाडांची पाने थोडी वाळत आहे कशामुळे असेल?

Pages