A curly tale of मिरची

Submitted by अक्षता08 on 6 September, 2020 - 00:56
mirchi

Container gardening साठी मिरची हे "Most Suitable" झाड आहे (१२-१४ इंच व्यास असलेली कुंडी मिरचीच्या रोपट्यासाठी उत्तम आहे). मिरची हे तस सोप्प झाड आहे लावायला परंतु त्याची तेवढीच काळजीही घ्यावी लागते. मिरची हे "Attention Seeker Plant" आहे. पहिल्यांदी मिरचीचं झाड लावायच असल्यास बरेच अडथळे येऊ शकतात (म्हणजेच फुलं न येणं, फुलं गळून जाणं, फुलांना मिरची न धरणं, पानांना कीड लागणं). परंतु एकदा अनुभव आला की मिरची हे लावायला खूप सोप्प झाड आहे.

मिरचीच्या बऱ्याच जाती / प्रकार आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारच मिरचीच रोपट लावायच आहे त्यानुसार आपण नर्सरीमधून मिरचीच्या बिया आणू शकतो किंवा बऱ्याच नर्सरीमध्ये मिरचीची रोपटीसुद्धा उपलब्ध असतात. मिरचीच्या प्रत्येक जातीनुसार germination period, फळधारणेचा कालावधी बदलत असतो. साधारणतः जानेवारी ते मार्च दरम्यान मिरचीच्या बिया लावाव्या. (मिरचीच्या बिया नर्सरी मधुन विकतही आणू शकतो किंवा घरी असलेल्या मिरच्यांपैकी एखादी लाल झालेली मिरची असल्यास त्याचाही बिया वापरात आणू शकतो)
मिरचीच्या बिया लावल्यानंतर साधारणतः ७-८ दिवसात true leaves येतात, मिरचीचं रोपट २ ते ३ महिन्यांमध्ये मोठं होतं. जोपर्यंत मिरचीला फुलं येत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांनी खत द्यावे. एकदा मिरचीला फुलं यायला सुरुवात झाल्यास दर ७ दिवसांनी खत द्यावे. मिरचीला दोन दिवसांतून एकदा पाणी दिल तरी चालण्यासारखे आहे परंतु मातीत ओलावा असायला हवा. उन्हाळ्यात मात्र मिरचीला रोज पाणी द्यावे. मिरचीच्या रोपट्याला direct sunlight ची आवश्यकता असते.

मिरचीचं झाड ओपन टेरेस मध्ये किंवा जमिनीवर लावलं असल्यास pollination हे नैसर्गिकरीत्या होऊन फळधारणा होते. परंतु मिरचीच रोपट indoor किंवा बाल्कनीमध्ये असल्यास hand pollination कराव लागतं.

मिरचीला पटकन कीड लागते, पानं दुमडल्यासारखी दिसतात, Mealybug चा प्रादुर्भाव होतो त्यामुळे सतत लक्ष ठेवावं लागतं. दर सात दिवसांनी कडूनिंबाच्या तेलाचा फवारा मारणे गरजेचे आहे. मिरचीच्या रोपट्याच्या आजुबाजूला अशी झाड किंवा फुलझाडं ठेवू नये ज्यांना पटकन कीड लागते.

मिरचीच्या एका झाडापासून आपल्याला पुरक मिरच्या मिळतात. पहिल्यांदी मिरचीचं झाड लावून कदाचित एवढे चांगले results मिळणार नाहीत परंतु एकदा त्याचा formula कळला की मिरचीचं झाड बाल्कनीमध्ये लावण खूप सोप्पी गोष्ट आहे.
IMG20200630124141.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mazyakde ek मिरचीचे रोप 2-३ वर्षे होते.बरेचदा मिरच्या लागायच्या.गावावरून आले की आमटी करताना कुंडीतली miरची उपयोगी यायची.काय दुर्बुद्धी झाली आणि त्याच कुंडीत झेंडू लावला.त्यावर पडलेल्या माव्याने मिरची गेली.

आताही मिरची लावली आहे .6-७ मिरच्या आल्या.नंतर kalya मुंग्या आणि पानावर काळे ठिपके (बुरशी) आले आहेत.त्यामुळे फळ धरलेली नाहीशी झाली.

मी यंदा पहिल्यांदाच लावली मिरची
आधी भरभर आली. मग मध्यंतरी पावसाने झोडपून अगदी आडवी झाली. परत बाऊन्स बॅक होत आता तिला फुलेही आली आहेत. मधल्या काळात जास्वंदीची कुंडी बाजूला असल्याने आधी जास्वंदीला मिलीबग्ज लागले मग मिरचीला

नीम तेल/ प्लॅन्ट शॅम्पू वगैरे फवारणी करुन किड आटोक्यात आणली. जास्वंदीलाही जरा दूर ठेवली. तसच पानेही कर्ल झाली होती काही. पण कंपोस्ट मधून मिळालेलं लिक्विड खत डायल्यूट करुन घातले. त्यानंतरच ही फुले आली. फळ धरायला अजून अवकाश आहे बहुतेक

छान माहिती! माझा विचार चालू होताच मिरची लावण्याचा. दोन तीन लाल झालेल्या मिरच्या ठेवूनही दिलेल्या आहेत.
हँड पॉलिनेशन कसं करतात?

वावेचाच प्रश्न मलाही विचारायचाय. मी मार्च महिन्यात लावलेल्या बियांमधून मिरचीची फूटभर रोपे तरारली आहेत. पण hand pollination कसं करायचं. त्याशिवाय येणार नाहीत का फुलं.

घरी सुक्या लाल मिरच्या नेहमी असतातच. मी एक-दोन वेळा त्यातल्याच टपोर्‍या बिया कुंडीत लावल्या. रोपं आली, भराभर वाढली, फुलंही आली पण नंतर गळून पडली.

कीड वगैरे काही लागली नव्हती.

शेतकरी अक्षय्य तृतीयेला मिरचीची पेरणी करतात असं आईकडून कळलं. म्हणून दोन्ही वेळा त्या सुमारासच बिया पेरल्या होत्या.

पॉलिनेशन फुले आल्यावर मग करु शकतो फुले येण्यासाठी पॉलिनेशन नसते. रंगब्रश जो असतो तो घेऊन एका फुलाच्या पोलन ग्रेनवरुन फिरवून दुसऱ्या फुलावर तो फिरवायचा

इतर वेळी वारा किंवा इतर किटक आणि छोटे पक्षी वगैरे जे काम करतात पोलन वाहून नेण्याचे ते काम ब्रशची मदत घेऊन आपणच करायचे म्हणजे हॅन्ड पॉलिनेशन

खूप छान माहिती , मी पण मिरची , पुदिना आणि तुळस लावली आहे. काही विशिष्ट सिझन असतो का मिरचीसाठी ?
आणि वर तू कडुनिंबाच्या तेलाचा फवारा द्या असं लिहिले आहे , कसा द्यायचा.
माझ्यासाठी वेळेवर आला लेख अगदी Happy .

वा अक्षता !छान मिरच्या लागल्या आहेत.
अस्मिता, नीम oil खतांच्या दुकानात मिळते. ते 5मिली घेऊन त्यात 1लिटर पाणी घालायचे. नीट हलवून spray मध्ये भरायचे. मग हवे तेव्हा आपण ते spray करू शकतो. सेंद्रिय पद्धतीने किडींच्या नायनाटासाठी उत्तम आहे.
नीम पेंड पण मिळते खतांच्या दुकानात. भाज्या लावण्यासाठी जेव्हा आपण माती तयार करतो, (potting mix )तेव्हा त्यात 1मूठभर नीम पेंड टाकली, तर एकूणच कीड कमी लागते, असा माझा अनुभव आहे.

आणि पाने दुमडल्यासारखी दिसतात, त्यासाठी पण माझा एक अनुभव सांगते. 100gm दही घ्यायचे. 100gm लसूण सोलुन त्याची paste करायची. ही paste आणि दही मिक्सर मध्ये नीट mix करायचे.
मग हे मिश्रण 2लिटर पाण्यात मिसळून झाकून 7दिवस ठेवायचे. 8 व्या दिवशी गाळून घ्यायचे आणि पानांवर फवारणी करायची. महिन्यातून 3-4वेळा याची फवारणी करू शकतो आपण.

मी आणि माझे mr. बागप्रेमी. टेरेस वर आमच्या 200च्या वर झाडें आहेत.काही दिवसांपूर्वी जी झाडे double होती, ती इतर बागप्रेमी लोकांना देऊन टाकली आणि संख्या कमी केली, तरी आत्ता 120 झाडे आहेत. गेली 8वर्षे करतोय बागकाम, त्यामुळे बऱ्यापैकी अनुभव गाठीशी जमला आहे. त्या अनुभवाने सांगते, आपण बी टाकून रोप उगवण्यापेक्षा नर्सरी मधून आणलेल्या झाडे जास्त healthy राहतात आणि त्यांना मिरच्याही जास्त येतात. मी पाहिला पाऊस पडला, की रोपे लावते. नीट काळजी घेतली, तर एक मिरचीच्या झाडाला पाव किलो मिरच्या सहज येतात. एवढ्या नाही आल्या पहिल्या प्रयत्नात, तरी आपली दैनंदिन गरज भागेल, एवढ्या नक्कीच येतात. मला कधीही हिरवी मिरची विकत आणावी लागली नाही.

माझ्याही गॅलरित मिरचिची रोपे आली आहेत. अजुन तरी ती फुट्भर लांब झालेली नाहीत. पण बरेच दिवस झाले तरी त्या पेक्षा अजुन जास्त ती वाढताना दिसत नाहित. खर तर एव्हाना रोप मोठे होउन फुले यायला हवी होती. तसेच भोपळ्याचा वेल लावला होता. त्याला अत्ता पर्यन्त १५-२० फुले येउन गेली पण भोपळे काही आले नाहीत. मेथी चांगली आली आहे. पण थोड्याच दिवसात इकडे ऑटम चालू होइल येव्हा रोपे जळुन जातिल की काय असे वाटते. कारण भोपळ्याचा वेल पिवळा पडु लागला आहे आणि पाने गळुन जात आहेत.

अस्मिता, नीम oil खतांच्या दुकानात मिळते. ते 5मिली घेऊन त्यात 1लिटर पाणी घालायचे. नीट हलवून spray मध्ये भरायचे. मग हवे तेव्हा आपण ते spray करू शकतो. सेंद्रिय पद्धतीने किडींच्या नायनाटासाठी उत्तम आहे.>>>>
धन्यवाद नादिशा.
नीम पेंड पण मिळते खतांच्या दुकानात.....कुठे मिळाली तर बघते.

@जाई., @BLACKCAT
धन्यवाद Happy

@मी_अस्मिता
(नीम पेंड पण मिळते खतांच्या दुकानात.....")
खूप कमी ठिकाणी मिळते. Amazon वर available आहे

@नादिशा
धन्यवाद Happy
(100gm दही घ्यायचे. 100gm लसूण सोलुन त्याची paste करायची......") हे try करून बघते

@निर्झरा
हवामान आणि मिरची कोणत्या जातीची लावली आहे त्यावरही त्याची वाढ अवलंबून असते. आज न उद्या नक्की मिरच्या लागतील. All the best

@देवकी
खरंच. मिरचीच्या रोपाची खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर लगेच दूर्दशा होते

@कविन
(जास्वंदीची कुंडी बाजूला असल्याने.....")
मीसुद्धा ही चूक केली होती

@वावे
धन्यवाद Happy
(रंगब्रश जो असतो तो घेऊन एका फुलाच्या पोलन ग्रेनवरुन फिरवून दुसऱ्या फुलावर तो फिरवायचा.....") रंगब्रश आणि earbuds.

हुर्रे मिरचीच्या रोपांना इटुकली चार फुलं आली एकदाची. आता फुडं ब्कारश वगैरे घेऊन ही करायचं की वाट बघावी?

फुलं यायला सुरुवात झाली त्याला आता महिना होऊन गेला. 2-3 दिवसात सुकून गळून पडतात . काय करावे ?

lucky you

आमच्याकडे अजूनही फुलं येणं आणि गळणंच सुरु आहे

IMG-20201017-WA0019.jpg
चार आल्यात.देवीच्या नैवेद्यात चटणीकरिता दोन वापरल्या. शांकभरी माता प्रसन्न.

अजुनही मिरची येत नाही. फुल बरीच येतात. गळुन जातात. कळ्याही आहेत. इथे हॅन्ड पोलिनेशन लिहिलंय ते कसं करायचं? म्हणजे नर फुल मादी फुल कसं कळतं?

इथे हॅन्ड पोलिनेशन लिहिलंय ते कसं करायचं? >>> पूर्वीच्या काळी फुलावर फूल आपटायचं ना , तोच प्रकार . Seriously , 2 मिरच्या आल्या आमच्या रोपाला

सस्मित, रंगब्रश जो असतो तो घेऊन एका फुलाच्या पोलन ग्रेनवरुन फिरवून दुसऱ्या फुलावर तो फिरवायचा - इति कविन चं मार्गदर्शन.

Pages