Submitted by वरदा on 10 November, 2009 - 10:56
माझ्या कामानिमित्त दक्षिण महाराष्ट्रात हिंडताना टिपलेली ही काही क्षणचित्रे... गावोगावी वि़खुरलेल्या गतेतिहासाच्या खुणा..
या टेकाडाच्या पोटी २००० वर्षांपूर्वीचं एक गाव होतं.. या मे महिन्यात त्याच्यावरून बुलडोझर फिरवून ती जमीन लागवडीखाली आणणार होते. आत्तापर्यंत एक पीक घेऊन पण झालं असेल!
मध्ययुगीन इतिहासाचे साक्षीदार
शिल्पवैभव
असंच कुठंतरी आडोश्याला..
यांची स्थिती जरा बरी..
आणि गावोगाव आढळणारी मंदिरे..
आणि थोडासा अपवाद म्हणून देवळाचा असाही एक वापर
गुलमोहर:
शेअर करा
हम्म.. 'कालियामर्दन प्रतिक'
हम्म..
'कालियामर्दन प्रतिक' असं लिहिलेल्या दगडावर ते कोरीव काम आहे??
हो, दगडात कोरलेली मूर्ती आहे
हो, दगडात कोरलेली मूर्ती आहे ती. मुळात देवळावर वरती कुठेतरी असणार, पडझडीमुळे अश्या अवस्थेत आहे.
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो. आवडले.
शिल्पवैभव छानच. मंदिरांची झालेली पडझड पाहून वाईट वाटले :(.
अशा जुन्या गोष्टींना बाहेरच्या देशात किती जतन करुन ठेवतात, आणि आपल्याकडे तर खरं तर खजिना आहे अशा गोष्टींचा, पण....!
किती सुंदर रेखीव काम आहे.
किती सुंदर रेखीव काम आहे. गतकलावैभवाच्या खुणा विखुरल्या आहेत इस्तततः.
तुमचे अनुभवही वाचायला आवडतील.
कालियामर्दन काय सुरेख आहे.
कालियामर्दन काय सुरेख आहे. सगळी पडझड बघून वाईट वाटले.
हम्म. पडझड पाहुन वाइट नक्कीच
हम्म.


पडझड पाहुन वाइट नक्कीच वाटल.
त्यापेक्षा जास्त वाइट वाटल ते मंदीरात पत्ते पाहुन.
अर्थात धक्का नाही बसला.
कारण मागच्याच रविवारी सोनोरी किल्ला आणि सोनोरी गावातील पेशव्यांचे तोफखाना प्रमुख पानसे यांचा वाडा पाहुन आलोय.
वाड्याची अवस्था बिकट आहे. दोन दरवाजे, एक , दोन विहिरी आणि तटबंदीचा काहि भाग सोडुन वाडा जमिनदोस्त झाला आहे.
वाड्यात एक लक्ष्मिनारायणाच मंदीर (बहुद्धा मंदीर आहे म्हणुन बर्यापैकी स्थितीत असाव) आहे.
आजुबाजुला गाजरगवत आणि बराचसा कचरा घेवुन ते मंदीर उभे आहे. मंदीराच्या आजुबाजुला चक्क लोकानी प्रात:र्विधी केल्याच दिसर होत.
आणि मंदीरात पत्ते दिसलेच अजुन शोधल असत तर कदाचित रिकाम्या बाटल्या देखील सापडल्या असत्या.
किमंत नाहिये आपल्याला दुसर काय.
झकासराव, देवळात रिकाम्या
झकासराव, देवळात रिकाम्या बाटल्या आणि बिड्या - सिगरेटच्या थोटकांचाही खच होता, फोटोत आला नाहीये एवढंच!
बाकी या मंदिराचा फोटो काढायची / अभ्यासाची काय गरज? असाही प्रश्न मला तिथल्या गावकर्यांनी केला.. मजा म्हणजे याच गावाबाहेर मला सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या वस्तीचे अवशेष सापडलेत.
मो, खरंय ग तुझं म्हणणं... आपल्याकडच्या लोकांना आपल्या इतिहासाची, परंपरेची चाड नाही. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकारी पातळीवर अमाप पैसा उपलब्ध असूनही फक्त मूठभर लोक काम करतात, विद्यापीठांकडे पुरेसा निधी व मनुष्यबळाचा अभाव असतो, आपल्या समाजाचे या बाबतीत कधीच काही प्रबोधन करण्याची तसदी कुणी घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या अनेक संशोधकांचे प्रयत्न हे आकाशाला ठिगळ लावण्याचेच उद्योग ठरतात... काय करणार? बोलण्यासारखं बरंच आहे... पण तो एक स्वतंत्र बी बी होईल.
सुंदर फोटो पण बघताना मन
सुंदर फोटो पण बघताना मन विषण्ण झाले,
खरंच कधी आपण हा आपला अनमोल ठेवा जपायला शिकणार आहोत.
या पार्श्वभूमीवर
या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या अनेक संशोधकांचे प्रयत्न हे आकाशाला ठिगळ लावण्याचेच उद्योग ठरतात... काय करणार? बोलण्यासारखंतुमचे च आहे... पण तो एक स्वतंत्र बी बी होईल.>>> तुम्ही तुमचे हे अनुभव लिहिणार का कृपया? खरंच मला याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
तो कालियामर्दनचा देखावा अप्रतिम आहे!!
वरदा, वरच्या सगळ्यांना
वरदा, वरच्या सगळ्यांना अनुमोदन... फ़ारच इफ़ेक्टीव्ह फ़ोटो आहेत हे.... दु:ख झाले बघुन!
तुम्हाला जे काम करत आहात त्यासाठी अनेक शुभेच्छा.
तुमचे अनुभवही वाचायला आवडतील.
मन विषण्ण करणारा अनुभव . फोटो
मन विषण्ण करणारा अनुभव . फोटो मात्र अप्रतिम आहेत. निदान आपण सर्वांनी तरी पाहिले. धन्यवाद वरदा !
कालियामर्दन फारच सुरेख !
वरदा फोटो बघुन खुप वाईट वाटले
वरदा फोटो बघुन खुप वाईट वाटले .. वैभवसंपन्न वारश्याची अशी वाताहत बघुअन्..पण ते सिल्प वैभव खरच अप्रतिम...:) कालिया मर्दन अतिशय सुरेख.
तुमच्या सारख्या संशोधकाचे यावरचे अनुभव खरच ऐकण्या सारखेच असतील. कृपया लिहा अशी विनंती
फोटो आणि मुख्य म्हणजे
फोटो आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामागच्या भावना appreciate (याचा नेमका मराठी प्रतिशब्द काय?) केल्याबद्द्ल सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
माझे अनुभव तेवढाच रस घेऊन वाचण्यासारखे असतील की नाही माहित नाही.. पण संशोधनातला तांत्रिक भाग वगळून काही लिहिता येतंय का बघते...
अर्थात बासुरी किंवा नंदिनीएवढं छान नाहीच जमणार
सुरेख आहेत फोटो. खास करुन
सुरेख आहेत फोटो. खास करुन कालियामर्दन खूपच आवडला. ते कोरीवकाम आहे ना?
माझे अनुभव तेवढाच रस घेऊन
माझे अनुभव तेवढाच रस घेऊन वाचण्यासारखे असतील की नाही माहित नाही.. पण संशोधनातला तांत्रिक भाग वगळून काही लिहिता येतंय का बघते...>>> नक्की लिहा!! आम्ही वाचू. लिहिताना मदत हवी असेल तर बिनदिक्कत विचारा. आमच्या येथे शब्दांकन करून मिळेल!!
वरदा उत्सुकतेने वाट बघतेय.
वरदा उत्सुकतेने वाट बघतेय. नक्की लिहा..:)
हम्म, लिहायला सुरवात केली आहे
हम्म, लिहायला सुरवात केली आहे पण मराठीत टायपायला वेळ लागतोय.. इथे पोस्ट केले आहेत
http://www.maayboli.com/node/11999
अरेच्चा , ये तो मैने देखाचं
अरेच्चा , ये तो मैने देखाचं नही था .
कालियामर्दन आणि शिल्प अप्रतीम , किती सुंदर आणि नाजुक कोरीव काम आहे .
वरदा जर अशी काही अप्रतीम शिल्पं , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कळवली तर ते काही उपाययोजना करत नाहीत का ?
धन्यवाद
सुरेख.... पण या अवशेषांची अशी
सुरेख.... पण या अवशेषांची अशी पडझड पाहून वाईट वाटलं.
माझा आधीचा प्रतिसाद
माझा आधीचा प्रतिसाद गायबला?
वरदा फोटो सुंदर आहेत. बघतांना छान वाटतं. हे सगळं जपलं गेलं पाहीजे पण तसे चान्सेस कमी दिसतायत याचं वाईटही वाटतं.
हे उरलं सुरलं सुद्धा इतकं छान
हे उरलं सुरलं सुद्धा इतकं छान आहे तर पुर्वी कसं दिसतं असेल?? मला पण फार हळहळ वाटते , आपल्या ऐतिहासिक वास्तुंची , लेण्यांची पड्झड बघुन.
हल्लीच वेरुळ-अजींठा पाहिलं , आणि हाच विषण्ण करणारा अनुभव आला.
दृश्य अस्वस्थ करणारी आहेत.
दृश्य अस्वस्थ करणारी आहेत.
खूप छान विषय समोर आणला आहेस.
खूप छान विषय समोर आणला आहेस.
अप्रतिम!
अप्रतिम!
युरपमधे अगदी छोटे छोटे दगड
युरपमधे अगदी छोटे छोटे दगड देखील त्या लोकांनी जतन करुन ठेवले आहेत आणि त्यांच्याच भाषेत त्यांनी त्याचा इतिहासपण नोंदवून ठेवला आहे. एकूनच ही लोकं भुतकाळ जपतात.
वरदा खरचं चांगला विषय समोर आणलास.
अरेरे
अरेरे
ते कालियामर्दनाचे शिल्प काय
ते कालियामर्दनाचे शिल्प काय जबरदस्त आहे..!! त्याचे आणखी फोटो टाकणार का?
शिवाय इतरही फोटो आणि माहिती वाचायला आवडेल.
या टेकाडाच्या पोटी २०००
या टेकाडाच्या पोटी २००० वर्षांपूर्वीचं एक गाव होतं.................त्या गावाचा व मंदिरांचा पत्ता मिळेल काय?
वरच्या सर्वांना अनुमोदन ...
वरच्या सर्वांना अनुमोदन ... हळहळ वाटण सहाजिकच आहे...मलाही वाटली...
पण मायबोलीकरांनो त्यापुढे काय ? हा प्रष्न तुम्ही स्वत: ला विचारा..
याला कस वाचवता येइल ?
याकरता वरदा कॄपया आपण आम्हांस मार्गदर्शन करावे...
चू. भू. द्या . घ्या.
वा छानच, सोनेरी देवळं पहाण्या
वा छानच, सोनेरी देवळं पहाण्या पेक्षा मला अशीच पहायला आवडतात.
पण परिस्थिती वाईट आहे हे नक्कीच.
Pages