मेडीकल इन्शुरन्स

Submitted by एविता on 11 November, 2020 - 00:12

" जया, अगं काय सर्फिंग करते आहेस एवढं?"

" अमेझॉन, दिवाळी जवळ आली, आता नव्या खरेदीसाठी काय काय मिळतंय ते बघते."

" छान, बेझोसच्या घश्यात घाल तू तुझे कष्टाने कमावलेले पैसे."

" अरे, अरे, अरे..! जणू काय तू ऑनलाईन घेतच नाहीस कधी?"

"घेते की. पण अगदी आवश्यक तेच आणि फक्त आईसाठीच घेते, माझ्यासाठी नाही. आणि दिवाळीला तर नाहीच."

"अरे हो. विसरलेच की. अग काय देऊ गं मी आई बाबांना गिफ्ट?"

"वय काय आहे गं आई बाबांचं?"

"बाबा एकसष्ट, आई अठ्ठावन."

"मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे का त्यांची?"

"कशाला गं? इथे कंपनीत ते माझ्या पॉलिसीत कव्हर आहेत की. मग वेगळी कशाला?"

" किती महान विचार आहेत तुझे जयाबाई.. व्वा! आणि तू नोकरी सोडली तर? वर्स्ट केस सिनारियो, तुला पिंक स्लीप दिली तर? दुसरा जॉब मिळायला वेळ लागेल. हो ना?"

"........ हं.... मग काय करायचं गं?"

" तू आई बाबांसाठी मेडिकल इन्शुरन्स घे."

" अगं हे काय..? ऐन सणासुदीला काय हा प्रश्न? जरा साड्या, दागिने, कपडे घे म्हण की..!"

"ते तर घेच. तुला वाटतं ना आईंनी साडी, दागिने घालून आनंद लुटावा? बाबांनी मस्त कपडे घालून आईला फिरायला न्यावं?"

"अर्थात्!"

"आणि ऐन दिवाळीत कुणा एकाची तब्येत बिघडली तर? आनंदावर विरजण. हो ना? आणि आजार काय असा सांगून येत नाही. आणि या वयात छोटा आजार म्हणजे मोठया आजाराची नांदीच. एकदा डॉक्टर कडे गेलं की हे टेस्ट आणि ते टेस्ट, पैसे पाण्यासारखे जातात."

" खरं आहे."

" मेडिकल इन्शुरन्स नसेल तर सिरीयस आहे गं, एस्पेशियली पोस्ट कोविड. तुझ्या आई बाबांसारखी ओल्ड कपल्स मला ठाऊक आहेत. एकांचे
आधी स्वत:चे मेडिकल इन्श्युरन्स होते. मुलगा मोठ्या कंपनीत नोकरीला लागला म्हणून त्यांनी ते मध्येच बंद केलं. म्हणाले, पालक म्हणून आम्हीही कव्हर आहोत मग कशाला दोन-दोन? त्या मुलांनी नोकरी सोडली. काका ६५, काकू ६३ त्यात डायबेटिस, बीपी, हायपरटेन्शन. काकांना रात्री त्रास झाला आणि नेलं दवाखान्यात. महिनाभर होते आणि दोन लाख खर्च. एफडी मोडावी लागली."

" अरे बापरे."

" दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काका दवाखान्यात. जस्ट इमॅजिन, काय हालत झाली असेल त्या मुलाची."

"खरंच ग बिचारा. किती धावपळ झाली असेल त्याची.."

" तुला सांगते, काहीजण असेही आहेत जे फक्त कॅन्सर कव्हर करणारी पॉलिसी घेतात."

"काय? वेडेपणा आहे. कशावरून तुम्हाला फक्त कॅन्सरच होईल आणि बाकी आजार होणार नाही?"

" आता नवा आजार कोरोना.. मग काय
करणार? त्यामुळे एक असं मेडिकल इन्शुरन्स घ्यायचं त्यात कॅन्सर सकट सगळं कव्हर झालेलं असलं पाहिजे."

"खरं आहे तुझं. पण कुठली पॉलिसी घ्यावी कसं कळेल? लाईफ इन्शुरन्स असला तर चालत नाही?"

"कसं चालेल? आपल्याला काही होणार नाही, होईल तेंव्हा पाहता येईल, आपल्याकडे लाईफ इन्शुरन्स आहे की. ठीक आहे पण आता कोविड आहे तर कोविड शिल्ड मेडिकल पॉलिसी घ्यायला पाहिजे."

" तू घेतला आहेस?"

" घेणार आहे लगेच. आपल्याला कोरोना होणारच
नाही याची खात्री नाही, आणि कोरोना इज हियर टू स्टे. इन्शुरन्स असलेला बरा."

" कितीचा आहे गं तो?

" २८५ दिवस आणि ५ लाखाचं इन्शुरन्स. घेतल्यानंतर ३० दिवसांनी तो लागू होतो. २५५ दिवस कव्हर असतं."

" मला दे नंबर तुझ्या इन्शुरन्स एजंटचा. मी आईबाबांना हीच दिवाळी भेट देते."

" गुड गर्ल. व्हॉट्सॲप करते तुला त्यांचा नंबर."

....

Group content visibility: 
Use group defaults