वनस्पती आणि औषधे भाग २

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 14 October, 2020 - 03:27

वनस्पती आणि ओषधे भाग २
वनस्पती निरनिराळी रसायने बनवतात. त्यातील बरीच वनस्पती स्वसंरक्षण, बीज प्रसार किंवा परागीभवन ह्या साठी कार्य करतात.
ह्या active मुळे मनुष्य, इतर प्राणिमात्र किंवा सूक्ष्मजीवांवर निरनिराळे परिणाम होतात. जर ह्या वनस्पती खाण्यात आल्या, (कधी कधी डोळ्यात नाकात गेल्या किंवा त्यांचा स्पर्श जरी झाला तरी) तर त्या परिणाम दाखवतात.
मी इथे काही उदाहरणे देत आहे. (ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणून मी थोडीच उदाहरणे देत आहे.)
सिंकोना ह्या वृक्षाची साल पाण्यात उकळून प्याली तर तापावर उपयोगी आहे (ताप कमी करते).
सेना (सोनामुखी) ची पाने किंवा शेंगा ची पावडर बद्धकोष्टावर उपाय म्हणून घेतात.
ज्येष्ठमधाचे चाटण खोकल्यावर प्रभावी काम करते तसेच त्याची पावडर आम्लपित्त वर तसेच जठराच्या दाहावर उपयोगी ठरते. वेलदोडा, धणे, बडीशोप, बाळंत शोप, चव आणणे, अन्नाचे पचन करणे तसेच क्षुधा वाढीस उपयोगी ठरतात. कुरची वृक्षाची साल जंत तसेच कृमीवर उपयोगी आहे. तुळस, अश्वगंधा , शतावरी प्रतिकार शक्ती वर प्रभाव करतात. कुटकी (picrorrhiza) यकृत विकारावर तर पुनर्नवा वृक्क (किडनी) विकारावर वापरले जाते. (ह्या औषधांचे अजूनही निरनिराळे उपयोग सिद्ध झालेले आहेत)
अशी ऍक्टिव्ह औषधे त्यातील निरनिराळ्या रसायन मुळे प्रभावी ठरतात.
आधुनिक वैद्यक शास्त्रात मध्ये ह्या रसायन चा अभ्यास केला गेला आणि केला जात आहे. हि रसायने नक्की कशी आहेत. त्यांची chemistry काय? ती कश्या रीतीने कुठल्या अवयवावर परिणाम करतात. आणि सगळ्यात महत्वाचे त्यांचे रिसेप्टर कोणते? हे अगदी व्यवस्थित शोधले गेले आणि अजूनही संशोधन चालूच आहे.
त्यामुळेच वर उदाहरण दिलेल्या औषधांचे अजूनही नवीन उपयोग समोर आले आहेत.
आधुनिक वैद्यक हे एव्हिडन्स बेस्ड आहे. जसे जसे नवनवीन वैज्ञानिक शोध लागत गेले तसे तसे वनस्पती पासून मिळणाऱ्या रसायनाचे स्वरूप समजत गेले. त्यावरून शरीरातील रिसेप्टर पण समजत गेले.
मी वर दोन वेळा रिसेप्टर चा उल्लेख केला आहे.आता मी थोडक्यात रिसेप्टर काय ते समजावण्याचा प्रयत्न करते.
कल्पना करा कि रिसेप्टर म्हणजे एक कुलूप आहे (लॉक) आणि औषध तील रसायन म्हणजे एक किल्ली. असे वेगवेगळ्या प्रकारचे,असंख्य, अगणित रिसेप्टर आपल्या शरीरातील अवयव, पेशी, बाह्य त्वचा अंतर त्वचा येथे असतात. जशी एका कुलुपाला एका विशिष्ट design ची च किल्ली लागते तसेच इथे आहे. विशिष्ट रसायने केवळ विशिष्ट रिसेप्टर वर विशिष्ट कार्य करतात. प्रत्येक रसायन हे त्रिमित असते (3D ) आणि रिसेप्टर पण त्यामुळे औषधे विशिष्ट ठिकाणीच प्रभाव दाखवतात.
उदाहरणार्थ अफू मेंदूवर परिणाम करते. तर धोत्र्याच्या रस डोळ्यात गेला तर डोळ्यातील बाहुली वर कार्य करतो.नाकात मिरचीची पूड गेली गेली तर मिरचीत द्रव्ये नाकातील त्वचेवर प्रभाव दाखवतात.
ह्याला आम्ही लॉक आणि की मॉडेल म्हणतो.
ह्याचा अभ्यास केल्यावर माणसाच्या लक्षात आले कि सर्व औषधी द्रव्ये वनसंपत्ती कडूनच मिळवण्याची गरज नाही. किंबहुना वनस्पतीवर औषधासाठी अवलंबून राहणे अवघड आहे.
कारणे १. वनस्पती पासून औषध मिळवणे बेभरंवशायचे आहे ते पूर्णपणे निसर्गाच्या लहरी नुसार चालते. दर वेळी वनस्पती औषधी रसायने बनवतीलच असे नाही.
२. वनस्पती हवामानाच्या लहरीनुसार वाढतात.
३. त्यांपासून कायम हवे तेव्हढे औषध मिळेल च असे नाही.
४. वनस्पती मध्ये दुसरी हि काही द्रव्ये असतात त्यामुळे औषधाची मात्रा जास्त घ्यावी लागेल.
५. वनस्पती दुर्मिळ होत आहेत त्यामुळेही (ह्यावर मी पुढचा लेख लिहीन)
६. बऱ्याचदा भेसळ हि केलेली असते.
ह्या सर्व कारणामुळे वनस्पती जन्य रसायन चा अभ्यास करून आधुनिक पूर्णपणे कृत्रिम किंवा अर्ध कृत्रिम औषधे बनवली गेली आणि आपण ती घेत आहोत.
इफेक्ट आणि side इफेक्ट:
प्रत्येक औषध ते आधुनिक असो कि वनस्पती जन्य ते इफेक्ट तसेच side इफेक्ट हि असतात.रिसेप्टर केवळ एकाच विशिष्ट्य प्रकारच्या अवयव, ऊती अथवा पेशींवर असतील असे नाही. ते निरनिराळ्या ठिकाणी असतात. औषधी रसायने मग ती कारखानयात बनवलेली असोत किंवा वनस्पती जन्य ती तोंड वाटे घेतली तर सर्वत्र परिणाम देणारच. (तो परिणाम dose म्हणजेच मात्रेवर पण अवलंबून असतो)
उदाहरण : ज्येष्ठ मध अगदी साधे सोपे औषध आहे. बऱ्यापैकी safe आहे. आपण लहान मुलांनाही देतो. खोकला तसेच जठराच्या दाहावर वापरले जाते. पण high ब्लड pressure वाल्यानी जरा जपूनच कारण ते ब्लड प्रेशर वाढवते. जास्त प्रमाणाबाहेर खाल्ले तर हृदय विकाराचा झटका पण येऊ शकतो.
आज इथेच थांबते पुढच्या भागात एक्ससिपीएंट्स वर लिहीन.

रोहिणी चंद्रात्रे वाघमारे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

औषधी रसायने मग ती कारखानयात बनवलेली असोत किंवा वनस्पतीजन्य ती तोंडावाटे घेतली तर सर्वत्र परिणाम देणारच. (काही आयुर्वेदिक औषधे मूळ वनस्पतीस्वरुपात घेतल्यास गुणकारी हे पटु लागलं असावं.
बाकी संशोधन चालू असावेच.

चांगले विवेचन.
एक मुद्दा:
‘साईड इफेक्ट’

>>>>> योग्य शब्द दुष्परिणाम (adverse effect) हा आहे.
‘साईड इफेक्ट’ कधीकधी उपयुक्तही असतो !