फ्रेंच ओपन २०२०

Submitted by मुकुंद on 30 September, 2020 - 06:14

यंदाचे फ्रेंच ओपन जुन ऐवजी आता सुरु झाले. सुरुवात वेगळ्या ऋतुत होत आहे .... पण शेवट नेहमीसारखाच... नदालच्या विजयाने होइल का ... की डॉमिनिक थिम किंवा जाकोव्हिक या वर्षी त्याला यशस्वी आव्हान देतील?

त्या तिघांनी सुरुवात तर स्ट्रेट सेटमधे त्यांचे सामने जिंकुन केली आहे. पण ऑक्टोबरच्या थंड हवेत.. टेनिस बॉल व रोलां गॅरसची तांबडी माती.. वेगळे रुप दाखवतील का?

तुमचे काय मत?

Group content visibility: 
Use group defaults

स्टॅन द मॅन.
मरेची अवस्था बघवत नाही... तो ह्या लेवलवर कंपीट करण्यासाठी सिरिअस असेल तर त्याला काहीतरी मेजर बदल करावे लागणार आहेत.

हायझेनबर्ग.. मरे जेव्हा त्याच्या प्राइममधे होता तेव्हासुद्धा त्याचा खेळ मला बघवत नव्हता.. Happy नेव्हर ऑफ द कॅलिबर ऑफ ग्रेट फेडरर, नॉर नदाल.. नॉर जाकोव्हिक..

स्टॅन द मॅन मधे दम आहे जाकोव्हिक/ नदाल/ थिम ला आव्हान द्यायचे.. पण जोपर्यंत नदालला इथे कोणी डिथोर्न करत नाही तोपर्यंत तोच माझ्या नजरेत इथे फेव्हरेट असेल.

कोण बघतय का क्वार्टर फायनल .. डिअ‍ॅगो श्वार्ट्झ्मन- डॉमिनिक थिम.. जबरी.. थिमच्या तोंडाला फेस आणला आहे श्वार्ट्झ्मनने.. .. ५ वा सेट चालु आहे.. अर्जेंटिनाचा वर्ल्ड फेमस क्ले कोर्ट स्पेशलिस्ट.. गिलेर्मो विलास.... आज गर्वाने बघत असेल त्याच्या फेलो कंट्रीमनची आजची मॅच ( माझ्या मते नदाल, बोर्ग व गिलेर्मो विलास.. हे ऑल टाइम क्ले कोर्ट स्पेशलिस्ट मधे टॉप ३ मधे गणले जातील)

स्टॅनला जर फेडी सारखे ईमोशन्स कंट्रोल करणे जमले असते तर Sad

जबरी झाले पहिले ४ सेट, मधून मधून बघितली. थिम बर्‍याच म्हणजे दोनेक वर्षांनी नसणार फायनलला, म्हणजे नदालला जरा तेव्हढाच चेंज ऑफ फेस मिळेल.
गिलेर्मो विलास ला डेल पोर्टोने दोनदा सेमीज मध्ये हरून नाऊमेद केलं असेल...ह्यावेळी श्वार्ट्झ्मन निदान फायनलला तरी यायला हवा.
नदाल अजून रोलँ गॅरोस ची फायनल हरालेला नाही ना.... जोकोविक ही सुद्धा अभूतपूर्व किमया करू शकेल असे वाटते.

हायझेनबर्ग.... हो रे .. खरच.. जाकोव्हिक खरच एकदम वेगळ्याच पातळीवर खेळत आहे या वर्षी. शिवाय नदाल फारच कमी खेळला आहे या वर्षी.. जाकोव्हिकपेक्षा.... ते कारण आणी यंदाचे फ्रेंच ओपन ऑक्टोबरमधे.. त्यामुळे क्ले कोर्ट सरफेस वेगळा वागत आहे.. नदालचा काका म्हणत होता नदालचा टॉप स्पिन फोरहँड जुनमधे जसा होतो तसा ऑक्टोबरमधे इथे होत नाही आहे. बघुयात.. त्या दोघात जर फायनल झाली तर या तुल्यबळ टेनिसपटुंमधली अजुन एक मेमोरेबल मॅच आपल्याला बघायला मिळेल हे निश्चित!

बंद केल बघायच. काहीच मजा नाही आली आज दोन्ही मॅचमधे.

बिझेनेस अ‍ॅज युज्वल फॉर राफा.. ९९ विन्स हिअर अँड काउंटींग!

जाकोव्हिक.. किरकोळीत हरवतोय त्याच्या प्रतिस्पर्ध्याला.

या टॉप ३ मधे व बाकींच्यात अजुनही प्रचंड मोठी दरी आहे. ( डॉमिनिक थिम कदाचित अपवाद म्हणता येईल) ज्या पद्धतीने जाकोव्हिक खेळतोय ते बघुन अस वाटतय की धिस यिअर ही इज अ सिरिअस थ्रेट टु नदाल्स डॉमिनंस हिअर .फायनल चांगली होउल अशी अपेक्षा आहे.

श्वार्झमन याआधी खूपच चांगले खेळत होता. रोममधे तर चक्क नदालला हरवले पण आज नदालने त्याचा पार निकाल लावलेला दिसतो आहे. कदाचित आधीची मॅच हरल्याची खुन्नस असेल!

बिग ३ चार स्लॅम्स मध्ये जसा त्यांचा टॉप गेम जीव तोडून खेळतात तसे ईतर कुठल्याही ठिकाणी ते खेळत नाहीत... म्हणजे नक्कीच खेळू शकतात पण तसा प्रयत्न ते फारसा करत नाहीत हे अनेक वेळा दिसले आहे.
एल लोकल आणि एक स्लॅम अशा पाठोपाठ झालेल्या टुर्नामेंट्स मध्ये त्यांचा खेळ खूप वेगळा दिसतो.

जाकोव्हिकची मॅच मी बंद केल्यावर फिरली की.. ५ सेटमधे गेली.. जिंकला जाकोव्हिक पण ५ सेट होतील असे वाटले नव्हते..

शेंडेनक्षत्र... रोममधे नदाल त्याच्याकडुन हरला होता हे खर आहे पण त्याच्याआधी ७ वेळा तो नदालकडुन हरला होता.. रोममधला नदालविरुद्धचा तो त्याचा एकमेव विजय होता.. मे बी नदाल टुक हिम फॉर ग्रांटेड.. पण आज मात्र तो सावध होता... Happy

हायझेनबर्ग.. तसे असेल तर मला माहीत नाही.. मी फक्त मेजर्सच बघतो. पण पुर्वी... म्हणजे कॉनर्स, मॅकेन्रो, बेकर,लेंडल इरामधे.. मी त्यांच्या बर्‍याच मेजर शिवायच्या मॅचेससुद्धा बघायचो.. तेव्हा त्या सगळ्यात.. कॉनर्स युज्ड टु स्टँड आउट... तो प्रत्येक मॅच अक्षरशः जिव तोडुन खेळायचा... नो वंडर ही स्टील हॅज द रेकॉर्ड फॉर मोस्ट टुर्नामेंट्स वन इन द हिस्टरी.. त्याची.. वयाच्या ३९ वर्षी झालेली १९९१ मधली ४ थ्या राउंडची.. १९ वर्षाच्या एरन क्रिकस्टिन विरुद्धची यु एस ओपनमधली मॅच कुठे बघता आली तर जरुर बघ.. दॅट मॅच सम्स अप हिज स्टाइल ऑफ प्ले..

आज कुठेतरी बघितले... नदालचा फ्रेंच ओपनमधला रेकॉर्ड...

WWWWWWWWWWWWWWWWWWWW
WWWWWWWWWWWWWWWWWWWW
WWWWWWWWWWWWWWWWWWLW
WWWWWWWWWWWWWWWWWWWW
LWWWWWWWWWWWWWWWWWW

अमेझिंग!

माझ्या लहानपणापासुन...मी फ्रेंच ओपन, विंबल्डन व यु एस ओपन फायनल्स गेल्या ४० वर्षापेक्षा जास्त दिवसांपासुन बघत आलो आहे.. पण अजुनही मेजर्स फायनलला.. प्लेयर्सचे कोर्टवर प्रवेश करायच्या आधीचे इंट्रोडक्शन बघताना.. अजुनही रोमांचक वाटते!

आजही अपवाद नव्हता.. मॅकेन्रो म्हणत होता.. राफा इथे १२ वेळा जिंकला असला तरी आज तो प्रथम कोर्टवर आला कारण तो नंबर २ सीड आहे व जाकोव्हिक नंतर आला.. दॅट् लुक्स व्हिअर्ड.... Happy

आज या दोघातली ही.. ५६ वी मॅच.. जाकोव्हिक लिडींग २९-२६ , या दोघातली ही १६ वी ग्रँड स्लॅम मॅच.. नदाल लिडींग ९-६ , आणी या दोघातली ही ९ वी ग्रँड स्लॅम फायनल.. दे आर ४-४ इन ग्रँड स्लॅम फायनल्स.. व्हॉट अ रायव्हलरी!

थोडक्यात आपण टेनिसप्रेमींसाठी आज अजुन एक मेजवानी...

छान प्रतिसाद मुकुंद.. तेंव्हा डीडी वर लागायच्या मॅचेस , रात्री जागून जागून पाहिल्या आहेत. मार्टिना, स्टेफी, सेलेस, सबातीनी, कॅप्रियाती, सांचेझ, कोंचिता, मेरी ज्यो इ इ.. मेरी पिअर्स च्या मॅचेस 'देखण्या' असायच्या Wink सर्विसलाच किती वेळ घ्यायची Happy याना नोवोतनाची हार आणि डचेस ऑफ केंटने केलेले सांत्वन Sad किती वाईट वाटले होते तेंव्हा .. 1998 ला जेंव्हा ती जिंकली तो क्षण Happy पिट सॅमप्रास, अगासी, एडबर्ग, बेकर, स्टिश, इवानसेवीच, रिचर्ड क्रॅजेक.. नोवोत्नना सारखंच एकदातरी इवानसेवीच जिंकावा असं वाटायचं आणि फायनली तो 2001 मध्ये जिंकला , तेंव्हा पण किती भारी वाटलं होतं. तो टेनिसचा काळ फार आवडतो.. आता कुठल्या प्लेअर बद्दल असे वाटत नाही..

लंपन.. मीही त्या सगळ्या मॅचेस बघीतल्या आहेत. नव्हाटनाचे रडणे व गोरानचा विंबल्डनमधला विजय.. तसेच स्टेफीचा खेळ हे सगळे अविस्मरणिय होते हे खरे.

पण हेही तितकेच खरे आहे की मी प्रत्येक पिढीतल्या टेनिसपटुंच्या मॅचेस तितक्याच एंजॉय केल्या आहेत.. आणी त्या मॅचेस मधे कॉनर्स- बोर्ग, बोर्ग- मॅकेन्रो, मॅकेन्रो- कॉनर्स, लेंडल- मॅकेन्रो, लेंडल- कॉनर्स,लेंडल-विलँडर, लेंडल-बेकर, बेकर-एडबर्ग, सॅम्प्रास- अ‍ॅगॅसी तसच महिलांमधे ख्रिस एवर्ट-मार्टिना नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ- मॉनिका सेलेस, स्टेफी ग्राफ- अरांचा सँकेज यांच्यातल्या मॅचेस या सगळ्या आल्या...

पण गेल्या १७-१८ वर्षात फेडरर, नदाल व जाकोव्हिक या तिघांनी टेनीस जसे डॉमिनेट केले आहे त्याला टेनीसच्या इतिहासात तोड नाही.. तिघात मिळुन ५७ ग्रँड स्लॅम टायटल्स... नदाल-जाकोव्हिक ५६ वेळा.. नदाल- फेडरर ४० वेळा व फेडरर जाकोव्हिक ५० वेळा एकमेकांशी खेळले आहेत... व्हॉट अ रायव्हलरीज..

टु पुट इन द पेर्स्पेक्टिव्ह.. अदर टेनीस रायव्हलरीज आर अ‍ॅज फॉलोज..

ख्ह्रिस एव्हर्ट- मार्टिना नवरातिलोव्हा..८० वेळा( रेकॉर्ड!), मॅकेन्रो-लेंडल-३६, कॉनर्स- लेंडल-३५, कॉनर्स -मॅकेन्रो-३४, बेकर- एडबर्ग-३५ व सँप्रास-अ‍ॅगॅसी..३४......

गेटींग बॅक टु धिस मॅच..

जाकोव्हिकने जर तिसर्‍या सेटमधे त्याचा खेळ उंचावला नाही तर.. ही मॅच अजुन ३० मिनिटांमधे संपेल..

पहिला सेट जरी नदालने ६-० असा जिंकला असला तरी तो सेट १ तास चालला... प्रॉबेबली.. मोस्ट कंपॅटिटीव्ह ६-० सेट आय हॅव्ह सीन...

पण ओव्हरऑल.. नदाल आज दाखवुन देतोय की.. तो क्ले कोर्टचा अनभिषिक्त राजा का आहे ते..

जोकोविचने अपेक्षेइतकी झुंज दिली नाही. निष्प्रभ वाटला. अनफोर्स्ड चुका जास्त करत होता. तिसरा सेट फिरवेल असे वाटत होते पण नाही. नदाल अभेद्य, अनबीटेबल!

जाकोव्हिककडे उत्तर नव्हते.. नदाल.. विन नंबर १०० अ‍ॅट फ्रेंच ओपन.. १३ वे फ्रेंच ओपन विजेतेपद.. फेडररच्या २० ग्रँड स्लॅमची बरोबरी..

मॅच जरी ३ सेटमधे संपली तरी स्कोर सांगतो त्यापेक्षा चुरशीची झाली.. काही काही गेम्स व शॉट्स तर अनबिलिव्हेबल होते!

थँक यु राफा.. थँक यु जाकोव्हिक.... अजुन एक मस्त ग्रँड स्लॅम फायनल..

मुकुंद हो आकडे थक्क करणारे आहेत, पण तरिही फार बघितल्या जात नाहीत हल्ली. खूप यांत्रिक वाटतात. वुमन्स टेनिस तर त्याहून कमी बघणे होते. फ्रेंच ओपन विजेतीला तर पहिल्यांदाच बघितले , फायनल मध्ये.

Score board सांगतोय तेवढी एकतर्फी झाली नाही असे म्हणु शकतो... पण number of unforced errors (drop shots) are going to haunt Djokovic... Hats off to Nadal for such a great dominance in this era of highest competitiveness.

शेंडेनक्षत्र, हायझेनबर्ग.. जाकोव्हिकने अनफोर्स्ड एरर्स केल्या म्हणुन राफा जिंकला असे म्हणणे राफावर अन्याय होइल..

त्यापेक्षा राफा जसा खेळत होता.. त्यामुळे फॉर जाकोव्हिक.... टु विन इच शॉट ही हॅड टु पुट समथिंग एक्स्ट्राऑर्डीनरी एफर्ट इन इच शॉट.. दॅट इज द रेसीपी फॉर कमीटींग अन्फोर्स्ड एरर्स.. इन माय हंबल ओपिनिअन...

बट दॅट मेड द मॅच व्हेरी वॉचेबल अँड एंटरटेनींग इव्हन दो इट वॉज अ स्ट्रेट सेट व्हिक्टरी फॉर नदाल....

जाकोव्हिकने अनफोर्स्ड एरर्स केल्या म्हणुन राफा जिंकला असे म्हणणे राफावर अन्याय होइल..
++===> Very perfect !!!!!
खूप दिवसांनी टेनिस बघितले, जाकोव्हिक काल खूपच कमी पडला अस जाणवत होत्ते , रफाचे शॉटवर निष्णात नियंत्रण होते पण जाको Sad

राफाचे खरेच कौतुक करावेसे वाटते , Roger Federer चा Peak Era मधून तो गेलाय & still going strong !!!!!!

No of grand slam titles
फेडरडर आणि नदाल - २०
जोको - १७
सँप्रस - ११

जाकोव्हिकने अनफोर्स्ड एरर्स केल्या म्हणुन राफा जिंकला असे म्हणणे राफावर अन्याय होइल..
++===> Very perfect !!!!! >> +१

राफा खरंच मस्त खेळला काल. त्याच्या सर्वीस चे उत्तर नव्हते जोको कडे.