Urgent- सध्याच्या परिस्थितीत भारतात ट्रॅव्हल करण्याविषयी

Submitted by म्हाळसा on 21 September, 2020 - 16:21

फॅमिली एमर्जंन्सिमुळे तातडीने (कदाचित उद्या/परवाच) मुंबईला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. घरातल्या दोन व्यक्तींची सिच्युएशन क्रिटीकल आहे.
इतक्यात (गेल्या १-२ आठवड्यात)कोणी भारतात गेलंय का?
काॅरंटाईनची गरज आहे का?
इथून काही टेस्ट्स करून जाणं गरजेचं आहे का?
ड्राॅपबाॅक्सची डेट आधीच घेऊन जाणे गरजेचे आहे का?
ड्राॅपबाॅक्सची डेट मिळायला साधारण किती वेळ लागतोय?
कोणत्या गोष्टी इथून घेऊन जाणे अधिक गरजेचे आहे?

प्लिज इतर कोणती माहिती जी मी इथे विचारायला विसरतेय, ती देखिल द्या. खूप धन्यवाद.
.
.
.

तीन दिवसांपूर्वीच राले ते मुंबई प्रवास केला. सध्या दोन आठवडे घरीच काॅरन्टाईन आहे. मी एकटी दोन १० वर्षाखालील मुलींसोबत ट्रॅव्हल करणार होते म्हणून exemption form भरला, कोविड टेस्ट केली आणि प्रवास केला. प्रवास नेहमी पेक्षा फारच वेगळा होता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली टाकते.

India travel during Covid - Raleigh—> Newark->Mumbai
 
Documents required per person:
1. Original Passport
2. 2 copies for passport (front & back)
3. Traveling ticket for flight approved under ‘Vande Bharat’ Mission.
4. Printed Boarding passes (e-Boarding pass is not helpful for Newark to Mumbai travel. They ask for a physical boarding pass. Detailed explained later.)
5. Self Declaration Form (2 physical print outs per person)
6. Exemption Form (2 physical print outs per person)
7. India pick up details - Vehicle Model, Number, Driver Name, Driver Phone #, India Contact #
8. India residential address
 
Other things required per person:
1. Lots of sanitizer and wipes
2. Masks are compulsory. Shields are optional. Even if you wear a shield, they will ask you to wear a mask.
3. Lots of gloves
4. Food for kids for the long journey to India
5. Warm clothing for the flight from Newark to India
6. Empty water bottle
 
Raleigh to Newark travel
Documents needed for this travel: Passport and Boarding pass
 
1. Maintain social distancing protocols throughout
2. Do online check-in. Mention the number of bags in there.
3. The United app will tell you the gate number for the current and next flights
4. At the airport, you will go to the kiosk and get the bags checked in.
5. Airport security – Show the passport and the boarding pass to the officer
6. Normal security check to remove the laptop, tabs, jacket, etc.
7. If you have wipes in the cabin bags, then they might take your bag separately for checking, but its ok, they will clear it.
8. After the security clearance, look for contact less water refills in the airport to fill the bottles
9. There are some food options opened, but you can carry your own food with you in the cabin bags
10. No food served on this flight. Carry your own food. Only water served if needed.
11. The boarding process is as usual for this flight which has 2 seats on each side of the plane generally. No section which has 3 seats together.
12. Make sure you go to the restroom before boarding the flight. The flight usually takes around 1 hour only and reaches before the mentioned time
13. Sanitize the following: Seats, headrest, seat belts, arm rests, food trays, window panes near window seat
14. If you have registered your phone number in the United app, they will send you the notification of the gate number and how long is the other gate by foot once you land
 
Newark to Mumbai travel
Documents needed for this stage: Passport, Paper Boarding pass, Exemption form, Self Declaration form
 
1. Check the SMS for gate number
2. Generally the flight departs at gate C-98 and the documentation happens at gate C-95. Both are nearby
3. You have to take the documents mentioned above to the gate C-95 for the document verification. For the Flight leaving at 8:25pm, they started the document verification at 7pm
4. They will mark the boarding pass as document verified and then you can go to the boarding process.
5. Same boarding process and sanitization to be followed
6. No contact less water refill options at this terminal. Use the normal water taps
7. There is a food corner just near the restrooms and you can get Pizza for the flight.
8. Food options:
a. Dinner served 1 – 1.5 hrs after the flight takes off
i. Bread, Butter, Chana Masala, Basmati rice, cauliflower vegetable, canned fruits, pretzel, M&M (large pack), Water, Cold drink/Juice/Coffee
b. Snacks served after around 5 hours of Dinner
i. Bread with Apricot chai cheese, M&M (small pack), Water/Coffee
c. Breakfast (served 1.5 hours before landing)
i. Mezze platter (pita bread, hummus, falafel, some vegetables salad), Water, Cold drink/Juice/Coffee
9. Take extra care for the use of restrooms
10. During the landing process, they will ask if you have filled the Self Declaration form online and if you have 2 printouts of it. If not, they will ask you to fill physical printouts. If you have printouts already, you are all set.
11. After you land, restart your phone 3-4 times till you get the T-Mobile Data network. Make sure that you have turned the airport wi-fi off
 
Mumbai airport exit process:
Documents needed for this stage: Passport, Paper Boarding pass, Exemption form, Self Declaration form, India pick up details - Vehicle Model, Number, Driver Name, Driver Phone #, India Contact #
 
1. Health documents verification:
a. After exiting the airplane, follow the queue to verify the passport, boarding pass, self declaration form.
b. If you have filled the form online and show them the printout, they will stamp your boarding pass
c. They will ask you to remove the shield during verification process
2. Immigration:
a. Go to the immigration officer and show the passport and boarding pass. No other documents required
b. Officer will ask you to remove the mask and look into camera and stamp your passport
3. Aarogya setu app:
a. After immigration, you will go to a section for downloading Aarogya setup app. You will pass through duty-free shop for this
b. There will be 2 sections (To get wi-fi & to get local sim cards)
c. Go to the wi-fi section. They will give you a certificate that you do not have local sim card and hence cannot download the app
d. You show this to the security guard and he will let you pass through to the baggage area without the app
4. Baggage section:
a. Pick the bags
b. Restrooms are located near the baggage section in case you need to visit.
5. Green channel:
a. After picking the bags, go through Green channel
b. You will get the trolleys near the baggage area
c. You will need to scan all the bags that you have in this Green channel
6. Quarantine process:
a. After the green channel, you will go to the counter based on your residential address zone. There are counters for Mumbai, Thane, Pune, Other Maharashtra, Outside Maharashtra
b. Go to the counter based on your address where they will already have your information
c. Provide the India pick up details - Vehicle Model, Number, Driver Name, Driver Phone #, India Contact #
d. For Thane, they generally will ask to go to Vihang’s Inn hotel in Thane
e. Make sure that you have access to the India contact number given. They will call that number if you don’t reach there in time and also mention that if not done, they will do a police complaint
f. Exit outside the airport
7. Vihang’s Inn (Qurantine center)
a. Take the passport, boarding pass, self declaration form, exemption form, passport copy to the officer
b. Get a photo or xerox of the stamped boarding pass for your records as they will take the stamped boarding pass with them
c. They will ask you to sign some documents. Take a photo of that as well
d. Once all done, they will stamp your left hand with the date

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

One of my friends had to go on a short notice last month. He had his Covid test done in the US before flying out. The negative test along with drs. certificate helped him at Mumbai airport in not requiring him to be quarantined.

v. Travelers may also seek exemption from institutional quarantine by submitting a negative RT-PCR test report on arrival. This test should have been conducted within 96 hrs prior to undertaking the journey. The test report should be uploaded on the portal for consideration. Each passenger shall also submit a declaration with respect to authenticity of the report and will be liable for criminal prosecution, if found otherwise. The test report could also be produced upon arrival at the point of entry airport in India.

टेस्ट करुन गेलात तर इन्स्टिट्युशनल कॉ. लागणार नाही असं इथे वाचलं. अनुभव नाही.
एक ओळखीच्यांची आई दोन तीन आठवड्यांपूर्वी परत गेलेली. त्यांना विचारुन सांगतो. काळजी घ्या.

धन्यवाद त्रिशंकू, अमितव. बहुतेक वरची माहिती ३ आठवड्या पूर्वीची आहे. मला वाटतंय काही चेंजेस झाले आहेत. RT-PCR रिपोर्टची गरज अजूनही आहे का? एनी वेज मी पण चेक करतेय.

कोणत्या गोष्टी इथून घेऊन जाणे अधिक गरजेचे आहे? >>
ड्राॅपबाॅक्सची डेट आधीच घेऊन जाणे गरजेचे आहे का? >>If you qualify for an interview waiver. You will need to follow the same process on the USATravelDocs website to pay the visa fees and then answer the dropbox eligibility questions.
The system will automatically ask you to take a DropBox appointment if you are eligible.
खलिल लिन्कवर अधिक माहीती मीळेल.

https://www.am22tech.com/us-visa-dropbox-eligibility/

quarantine :
https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedguidelinesforInternationalArrivals02...

Only for compelling reasons/ cases of human distress such as pregnancy, death in family,
serious illness and parent(s) with children of the age of 10 years or below, home quarantine
may be permitted for 14 days
.
iv. If they wish to seek such exemption under para (iii) above, they shall apply to the online portal
(www.newdelhiairport.in) at least 72 hours before boarding. The decision taken by the
government as communicated on the online portal will be final.

https://blog.wego.com/india-quarantine-guidelines/

ओसिआय होल्डर्स विथ किड्सना क्वारंटाईन लागत नाही असा एक तिरपाकडा नियम ही वाचलेला. आत्ता लिंक सापडत नाहिये.

म्हाळसा होम क्वारांतयीन करतायत आजकाल... माझे इन लॉ गेले होते 4 आठवड्यापूर्वी...त्यांना डायरेकट घरीच क्वारांतयीन करायला लावले..
मला वाटते नियम असा आहे की पोर्ट ऑफ एन्ट्री च्या जवळ घर असेल तर होम क्वारांतयीन... थोडा शोधून बघा...

म्हाळसा, तुमच्या सोबत जर 10 वर्षांखालील अपत्य असेल तर घरी जाऊ देतील. समजा सोबत अपत्य नसेल तरी हरकत नाही. तुमचे घरचे लोक जिथे उपचार घेत आहेत त्या डॉक्टर किंवा हॉस्पिटलचं त्यांच्या लेटरहेडवर तसं सर्टीफिकेट घ्या. त्याचा फोटो काढून तुम्हाला इमेल किंवा व्हॉट्सअप करायला सांगा. (जर तिथे कोणी नातेवाईक उपस्थित असतील तर ते हे काम करू शकतील किंवा सरळ डॉक्टरना विनंती करा.) या लेटरच्या बेसिसवरही तुम्हाला घरी सोडतील.
(डिस्क्लेमर- ही माझी अशीच लोकांकडून कळलेली ऐकीव माहिती आहे.)

आता बरोबर न्यायच्या गोष्टी-
1. ड्रॉपबॉक्स साठी लागणारी सर्व कागदपत्रे आठवणीने घेऊन जा. नवे जुने सर्व पेपर्स न्या.
2. तुमचे व इथून जाणाऱ्या सर्वांचे मेडिकल रिलेटेड महत्वाचे पेपर्स न्या. जर काही नेहमीची औषधं वगैरे भारतात न मिळणारी असतील तर ती पुरेश्या प्रमाणात न्या.
3. फायनान्सची गरज पडणार असेल तर त्यानुसार प्लॅन करून ठेवा. भारतात रेडी पैसे आहेत? भारतीय डेबिट क्रेडिट कार्ड्स आहेत? किंवा कसं असेल त्याप्रमाणे.
4. विमानप्रवासासाठी हॅन्ड सॅनिटायझर, ग्लोव्हज सोबत ठेवा. कोरडे स्नॅक्स सोबत घ्या.
5. हेही तितकंच महत्वाचं- प्रवासात उगाच काळजी करून स्वतःचं टेन्शन वाढवू नका. त्याऐवजी हलकेफुलके मुव्ही/सिरीज काहीतरी डाउनलोड करून ठेवा (इयरबड्स विसरू नका!) किंवा वाचायला पुस्तक सोबत घ्या. मुलं सोबत असली तर फोन किंवा टॅबवर डाउनलोड केलेली कार्टून्स, वाचायला पुस्तकं, कलरिंग पेजेस याचा त्यांना एंगेज ठेवायला उपयोग होईल.

सनव- सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. डाॅक्टरांच्या सर्टिफिकेट बद्दल मलाही एकाने सांगितलंय आणि ते अरेंज झालंय. तुम्ही सांगितलेल्या इतर गोष्टीही ध्यानात ठेवते.

काळजी घे. कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा.>>+११ आणि सनव च्या पोस्ट (5) ला ही मम.

Bring Covid 19 negative certificate to avoid any quarantine. My friend came last week. He shown negative certificate at airport. They allowed him to go without any quarantine stamp.

. कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा.>>+११ आणि सनव च्या पोस्ट (5) ला ही मम.....+१.

कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा.>>+११ आणि सनव च्या पोस्ट (5) ला ही मम.....+१.

कुटुंबातील सदस्य बरे होतील काळजी करु नका.कुटुंबातील सदस्य व तुम्ही काळजी घ्या,घाई गडबड करु नका.शुभेच्छा!

प्रत्येक दिवशी नवीन नियम येतोय त्यामुळे येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मुंबई विमानतळावर सहकार्य करतात असेच तिकडे गेलेल्या मित्रांकडून ऐकले आहे तेव्हा काळजी नसावी. प्रवासासाठी शुभेच्छा. तुमचा प्रवास सुखाचा होवो.

मुंबई मध्ये सुखरुप पोहचल्याबद्दल अभिनंदन .

किती दिवस क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे?

तुम्ही कोवीड निगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊन आला नव्हता? >> घेऊन आले होते म्हणून इंस्टिट्यूशनल काॅरंन्टाईन नाही.. घरीच काॅरन्टाईन करू शकतो.

मग या भानगडीत ज्या कामासाठी आलात ते व्हायचे कसे?>>नगरपालिकेतून ओळखीने सर्टिफिकेट मिळवा आणि सब्मिट करा असा ॲाप्शन सांगितला होता. आता नगरपालिकेत ओळख तर नाही पण कोविडच्या गाईडलाईन्स फाॅलो करत ज्या कामासाठी आलोय ते करतोय.

मला कुणीतरी देशांतर्गत प्रवासाबद्दल सांगू शकेल का? कारण, मला पुढच्या आठवड्यात काही अपरिहार्य कारणाने नागपूरहून दिल्लीला जायचे आहे. विमानप्रवासाबद्दल सध्या विविध नवनवीन नियम येत असल्याने मी अजून तिकीट काढले नाही पण पुढच्या आठवड्यात जायचे तर नक्की आहे. जसे प्रवासात किती बॅगा नेता येतात, quarantine करतात का? कारण दिल्लीला जायचेच असले तरी परत कधी यायचे ते निश्चित नाही.

राहुल माझा एक मित्र जुलै मध्ये पुण्याहून दिल्लीला गेला नव्या नोकरीसाठी आणि लगेच जॉईनही झाला. तेव्हा विमानतळावर फक्त ताप बघितला quarantine व्हायला नाही सांगितले ना की कुठला स्टॅम्प वगैरे मारला.

भारताबाहेरुन आल्यास quarantine करतात असे दिसते.

आता आपल्याच देशात सगळीकडे पसरलाय कोरोना तर बाहेरून आलेल्यांना उगाच का क्वारण्टाईन करत आहेत? टेस्ट करून आले पुरेसे नाही का? ईथे नवी मुंबईत तर बघतोय असेही सारे जनजीवन गर्दी करत सुरळीत चालूय. एक मास्क तेवढा ८०-८५ टक्के लोकांनी लावला असतो. त्यातही निम्मे नुसते शोभेचे लटकलेले. उगाच कागदोपत्री दाखवण्यापुरता कोरोना उरलाय असे वाटते.

चाचण्या कमी केल्या की करोना उतरतो. तशाही महाराष्टात चाचण्या फार कमी होतात इतर राज्यांच्या तुलनेत.

मास्क नुसती औपचारिकता झालीय... इकडे जिम मध्ये रुल आहे नो मास्क नो एन्ट्री .. लोक एन्ट्री करण्यापूर्ती घालतात मास्क नंतर काढतात...
आतमध्ये मास्क घातलेला एकही दिसत नाही...

लोक एन्ट्री करण्यापूर्ती घालतात मास्क नंतर काढतात... >>> फिजिकल ऍक्टिव्हिटीजच्या वेळेस मास्क घालू पण नये. व्यायाम करताना मास्क घालून धोका जास्त आहे. आणि म्हणून मग जिम्स चालू करायलाच नको होती

आता आपल्याच देशात सगळीकडे पसरलाय कोरोना तर बाहेरून आलेल्यांना उगाच का क्वारण्टाईन करत आहेत? >> मला इंटरनॅशनल ट्रॅव्हल फार सेफ वाटलं पण मुंबई एअरपोर्टवर अर्धाअधिक स्टाफ मास्कच्या नावाखाली रूमाल लावून, तो ही नाकावर नाही फक्त तोंडावर, ते बघूनच भिती वाटायला लागली.
त्यानंतर बाबांना ज्या हाॅस्पिटलमधे ॲडमिट केलंय, तीथल्या स्टाफच्या निष्काळजीपणामुळे असं वाटतंय की सध्या जरी ते कोविड पेशंट नसले तरी घरी येईपर्यंत कोविडची लागण होण्याची दाट शक्याता आहे Sad

म्हाळसा मे शेवटला आठवडा ते जून पहिला आठवडा माझे बाबा रुग्णालयात ऍडमिट होते पंधरा दिवस आणि सोबत मी होतो २४ तास. तेव्हा मलाही असे वाटले होते की आम्ही दोघेही इथुन कोव्हीड लागण घेऊनच बाहेर पडु. पण काही झाले नाही. रुग्णालयाचा स्टाफ हायजीन व्यवस्थित पाळत होता. एकावर एक दोन मास्क्स, डोक्यावर कॅप, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझरचा सढळ हस्ते वापर वगैरे.
त्या रुग्णालयात कोव्हीडचे सुद्धा रुग्ण होते. रुग्णांची वेगळी लिफ्ट होती पण तिकडे जाणार स्टाफ इतर लिफ्टस ही वापरायचा. इतर ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळले जायचे पण लिफ्टमध्ये गर्दी व्हायचीच. कँटीनमध्येही गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंगचे बरेचदा बारा वाजायचे. तिथेच बरेच लोक खायचे (टेबल खुर्च्या अंतर ठेवून लावले होते) पण मास्क काढावा लागेल म्हणुन मी रूम वर नेऊन खायचो. नाश्ता, दुपार, रात्रीचे जेवण, औषध-पाण्याच्या बाटल्या यासाठी लिफ्ट मधुन रोज पाच सहा चकरा व्हायच्याच. तेव्हा मला लागण होऊन माझ्यामुळे बाबांना होणार असे मला तीव्रतेने वाटे केव्हा केव्हा. दिसतात का लक्षणे याची उजळणी करायचो. पंधरा दिवसांनी डिस्चार्ज मिळुन घरी आलो आणि त्यांनतर पंधरा दिवस जाऊनही लक्षणे दिसली नाही तेव्हा खूप हायसे वाटले. ( या आधीही नॉन कोव्हीड रुग्णालयात काही दिवस होतो.)

थोडक्यात कोव्हीड रुग्णालयात राहून सुद्धा काही झाले नाही.
तेव्हा तुम्ही काळजी करू नका, योग्य ती काळजी तुम्ही घेत असालच. तुमचे बाबा लौकर बरे होण्यास शुभेच्छा.

Pages