पाककृती स्पर्धा 2 - {नैवेद्यम स्पर्धा} -लतांकुर

Submitted by लतांकुर on 1 September, 2020 - 05:54

|| श्री गणेश ||

नैवेद्याचे पान
IMG_20200901_141942__01.jpgIMG-20200901-WA0000.jpg

पदार्थ :

भाज्या : भरली वांगी, सुका बटाटा
ताकाची कढी
मेतकूट, चटणी, लोणचं
कोशिंबीर : काकडी -टोमॅटो, कोबी
वरण भात
पोळी
तळणीचा पदार्थ : कुरडई
गोड पक्वान्न : शेवई खीर, उकडीचे मोदक
कोथिंबीर वडी
ताक

पदार्थांची माहिती:

भरली वांगी : ओलं खोबरं, लसूण यांचं वाटण लावून नेहमीच्या पद्धतीने

सुक्का बटाटा : आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची मिक्सर ला वाटून घेऊन, त्यामध्ये उकडलेले बटाटे परतले.अर्थातच नेहमीचीच पद्धत Happy
IMG-20200901-WA0003.jpg

आणि हे मोदक

मायबोली वरच्या मोदकांच्या रेसिपी ने inspire होऊन, साचा न वापरता मोदक करायला तर घेतले पण काही जमेचना.शेवटी मोदकांची पुरचुंडी करून चमच्याने थोडा बाहेरून आकार दिला.

IMG-20200901-WA0001.jpg

खरं तर सगळेच पारंपरिक रेसिपी वापरून केलंय बाकीचं तर त्याची काय वेगळी रेसिपी द्यावी कळत नाहीये.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! एवढे सारे पदार्थ आणि वाढलेत पण नाजूकपणे.
दक्षिणी पद्ध्तीने पान पाहून वेगळेच वाटले.आमच्याकडे केळीचे पान उभे घेतात.

छान!

धन्यवाद देवकी, मंजूताई !

दक्षिणी पद्ध्तीने पान पाहून वेगळेच वाटले.>> मला माहितीच न्हवतं की असाही फरक असतो, मम्मी ला फोटो पाठवले तेव्हा ती केरळी पद्धतीचं वाटतेय असं का म्हणाली ते आत्ता कळलं Happy

https://youtu.be/_bpZgw9fBFA हे पुढच्या वेळीसाठी हवे असल्यास.
(आमच्यासारखी मंड्ळी असतील तर उत्तर ध्रुवावर भात नि दक्षिण ध्रुवावर पोळी वाढली तर "ये मेरा इंडीया" म्हणून मधली अळूवडीच फस्त करतील बघ.... Happy )

मस्त!

रुचकर नैवेद्यम. दोन पदार्थांमध्ये योग्य सुरक्षित अंतर ठेवले आहे.

छान नैवेद्य. आम्ही कांदा लसूण घालत नाही नैवैद्यात. पण प्रत्येक घरात वेगवेगळी पद्धत असते.
सीमंतिनी, लिंक बद्दल धन्यवाद. मस्त व्हिडिओ आहे.

धन्यवाद मानव, किशोर, झंपी, प्राचीन.

सीमंतिनी, लिंक बद्दल धन्यवाद.पुढच्या वेळी नक्की मदत होईल.

लसूण वगैरे घालतात काय?>>> हो घालतात आमच्यात, genarally नेहमी जे मसाले घालतो तेच नैवेद्या साठी पण वापरतो.एकदा आई ला पण विचारेल Happy

हस्तलेखन स्पर्धेत हायझेनबर्गने (जाणीवपूर्वक) दिलेल्या एंट्रीसारखी नैवेद्यम स्पर्धेतली ही (बहुतेक नकळतपणे झालेली) एन्ट्री आहे Proud

आवडली!!

(बादवे ब्राह्मणीकरण न झालेल्या बहुजन घरी काय नैवेद्य असतो गणपती, गौरी/महालक्ष्मीसाठी?
मला आठवतंय त्यानुसार माझ्या काकुकडे पुरणपोळी, दुधतुप, कटाची आमटी, भात, कुरडया, बटाटा (भाजी की भजी आठवत नाही) एवढंच असायचं.
तेव्हा १०० कुटुंब असलेल्या चाळीत जास्तीजास्त १५ जणांकडे लक्ष्मी असतील. पितळेचे मुखवटे असलेल्या, उग्र दिसणाऱ्या, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या. आजकाल सात्विक दिसणारे मुखवटे मिळतात. कशाचे बनवलेले असतात माहीत नाही.