तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एन् आर सी कॉलनी स्कूल मोहोने. >>> शहाडजवळची का. ती असेल तर त्याच्यासमोर आम्ही जायचो बिर्लामंदिरात. सुट्टीत ट्रीप करायचो टिटवाळा, शहाड. ती मजा आता कारने जाण्यात नाही.>>>>>> टिटवाळा आणि शहाड च्या मधलं स्टेशन आंबिवली. तिथे आहे NRC company आणि कंपनीची कॉलनी शाळा हॉस्पिटल क्लब! खुप मस्त होती आमची कॉलनी आता कंपनी बंद पडल्यानंतर सगळ्या कॉलनीची रयाच गेली. भकास झाली आहे. शाळा चालू आहे. पण पूर्वीसारऋी नाही. घरांची पडझड झालीये.

पाथफाइंडर तुम्ही नाशिकचे? पुरुषोत्तम चे की काय?
वर कोणीतरी अजमावलेला फॉरमूल्यानुसार सांगते, तेव्हा आचार्य सर होते.

नेने कन्याविद्यालय ,पेण
या शाळेतलं कुणी नसेल माबोवर.
<<<< माऊमैय्या मी आहे त्या शाळेची , कमाल आहे , मी म्हटलं कोणीच नसणार आपल्या शाळेचं म्हणून फक्त वाचून बघूया म्हणलं तर . भट मॅडम, नाडकर्णी मॅडम होत्या .
मला खूप आंनद झालाय की माबोवर आपल्या शाळेतील कुणी आहे .

तशी बदल्यांमुळे मी बऱ्याच शाळांमध्ये गेलीय. भेडशी ( म्हापसा - दोडामार्ग जवळ ) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल. , नन्तर चिपळूण चे युनायटेड हायस्कूल , मग पेण ची म . ना . नेने कन्याशाळा इतक्या शाळेत होते मी.
आणि कॉलेज पण पुढे तेच.

मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिर, परशुराम सायखेडकर (प सा) नाट्यमंदिरा शेजारी, नासिक Happy

कॉलेज - एच पी टी आर्ट एन्ड आर वाय के सायन्स कॉलेज, नासिक

माझ्या शाळेचे आहेत माबोवर काही, बॅचचे नसले तरी. ॲक्टिव्ह मेंबर म्हणजे अंजू Proud

मी आणि अंजू दोघी स्वामी विवेकानंद दत्तनगर शाखा डोंबिवली. अंजू अर्थात खूप आधीच्या बॅचची आहे.

अंजू अर्थात खूप आधीच्या बॅचची आहे. >>> Lol आता किती batch आधीची सांगितलं तर तुझं वय कळेल त्यामुळे सांगत नाही Wink .

येस स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माझी आणि कविताची शाळा. दोन वर्षापूर्वी शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा झालेल्या सुवर्णमहोत्सव समारंभात आम्ही दोघी गेलेलो.

NRC company >>> ह्याच्या समोरच आहेना बिर्ला विठ्ठल मंदिर, थोडं चढून वर जायचं आहे, फार सुंदर आहे तो परिसर. बिर्ला कंपनीज जिथे जिथे आहेत किंवा होत्या, तिथे तिथे त्यांनी फार सुंदर देवळं बांधली आहेत. मध्य प्रदेशात नागदा इथेही बिर्ला rayon आहे, कॉलनी आहे. तिथेही आहे लक्ष्मी विष्णु मंदिर, फार सुंदर आहे तेही.

खुप मस्त होती आमची कॉलनी >>> बिर्ला कॉलनीज फार सुंदर असणार, कल्पना आहे मला. नागद्याची बघितली आहे, मावशी होती.

NRC कॉलनीचं वर्णन माधवी देसाई यांच्या नाच ग घुमा पुस्तकात आहे. त्या काही वर्ष तिथे राहायच्या.

@ किशोर मुंढे ..तुम्ही तेरेसा हायस्कुल, ला होता का?..अरे वाह...मी समता विद्या मंदिर .. परेरावाडी, साकिनाका, मुंबई...एकदम आजू बाजूच्या शाळा ..

मागच्या पानावर पारावरच्या शाळेचा उल्लेख झालाय. मी खरोखर गेलीय देवळातल्या पारावरच्या शाळेत, चिपळूण ला केतकर बाईंची शाळा होती पागेवर .

जीवन शिक्षण विद्यामंदीर, वाई. द्रविड हायस्कूल, वाई. जिल्हा परिषद शाळा, खेड शिवापूर. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग.
माझे काही वर्ग मंदिरात, व्यायाम शाळेत भरायचे. Happy

माझे आजोबा टिळक हायसकूलचे शिक्षक होते . आणि पणजोबांनी घरोघरी जाऊन मुली गोळा करून लाहोटी कण्याप्रशाला सुरू केली होती. सुरवातीला फक्त 5 मुली होत्या. खूप जुनी गोष्ट आहे ही.

अरे वा, वर्णिता खरंच कमाल झाली. माझ्या शाळेतलं कुणीतरी आहे इथे हे फारच छान वाटतंय. भट मॅडम मुख्याध्यापिका होत्या. नाडकर्णी मॅडम, जोशी मॅडम, वाळके मॅडम.....
तुम्ही कोणत्या बॅचच्या?

सांगली हायस्कुल सांगली
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली
जे जे मगदूम इंजि कॉलेज जयसिंगपूर
आय आय टी रुरकी, हरिद्वार, उत्तराखंड
चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वांद्रे पूर्व

मला बहुतेक बरेच जण भेटतील माझ्या शाळा कॉलेजचे

सांगली हायस्कुल सांगली
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली
जे जे मगदूम इंजि कॉलेज जयसिंगपूर
आय आय टी रुरकी, हरिद्वार, उत्तराखंड
चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वांद्रे पूर्व

मला बहुतेक बरेच जण भेटतील माझ्या शाळा कॉलेजचे

मी मायबोली सदस्य झाले ती डोंबिवली बाफ वरच्या शाळा गप्पा वाचून. कविन आणि max यांनी शाळेचं नाव लिहिलं माझ्या, ते वाचून मी सदस्य झाले. त्याआधी मी वाचक होते आणि निसर्गाच्या गप्पा आवडता बाफ, दुसरा डोंबिवली. आता डोंबिवलीवर कोणीच लिहित नाही.

पाथफाइंडर तुम्ही नाशिकचे? पुरुषोत्तम चे की काय?
वर कोणीतरी अजमावलेला फॉरमूल्यानुसार सांगते, तेव्हा आचार्य सर होते.

Submitted by सान्वी on 16 September, 2020 - 08:57
>>>>
चला, तुमच्या पध्दतीने,
आचार्य सरांची कारकिर्द मोठी आहे, एक ठळक घटना सांगतो, RJCB मधे एक मुलगी सलग तीन वर्ष ८ ते १० पंतप्रधान होती. हे तुमच्या वेळी, आधी, का नंतर?

Saraswati Vidya Mandir
Bajirao Road, Pune..

मी माझ्या शाळेतर्फे चित्रकला स्पर्धेसाठी जायचे या शाळेत..
बहुतेकदा रविवारी असायच्या त्या स्पर्धा. Happy

Pages