तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सा. फु. मा. वि., म. फु. कृ. वि. >>> हे सर्व राहुरी का.

राहुरीच्या कृषी विद्यापीठाचं नाव हेच आहेना. तिथल्या शाळेचं नाव नाही माहिती.

हे सर्व राहुरी का.
हो.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ.

म्हणजे अहमदनगर ना?
आईचे नातेवाईक राहतात राहुरी त.
लग्नाच्या आधी नेहमी जायचे मी.

नवऱ्याच्या बदलीमुळे काही वर्ष श्रीरामपुरला राहिल्याने राहुरीबद्दल माहिती, एरवी नगर जिल्हा आम्हाला अगदीच अपरिचित होता. नवऱ्याला जायला मिळालं होतं कृषी विद्यापीठात, तो राहुरीच्या बँकेत पण होता आठवडाभर. एकदम खुश होता तिथलं सर्व बघून, मला काही तिथे जायला मिळालं नव्हतं. आम्ही राहायचो त्या गल्लीत कृषी विद्यापीठात काम केलेले एकजण रहायचे, ते आपल्या बागेत विविध प्रयोग करताना दिसायचे.

असो बरंच अवांतर झालं पण आठवणी जागृत होतात पटकन.

मायबोलीकर 'मी आर्या' त्याच शाळेत शिकली आहे बहुतेक.

अ.ए.सो. चे भा.फि.हा.

जिद्दु, तुम्ही पण नगरचे का? भाई सथ्था नाईट स्कूलचा डायरेक्ट संबंध नाही पण व्यक्तिगत कारणाने दादा चौधरी शाळेशी नाते जोडले गेले आहे.

प्रगत विद्यामंदिर - डि एन नगर अंधेरी
न ग पुरंदरे हायस्कुल - मुलुंड १९८९-९०
एम सी सी - १९९४-९५
Submitted by king_of_net on 28 September, 2020 - 18:38

आता प्रगत शाळेची जागा बदलली आहे. आता ती शाळा डी. एन. नगर मध्ये नसून आझाद नगर मध्ये (अपना बाजारच्या बाजूची गल्ली) विठ्ठल मंदिराजवळ आहे. साधारण ३-४ वर्षे तरी झाली असतील जागा बदलून.

चला, आमच्या सन्मित्र मधील कोणीतरी सापडले!
btw गायतरी, तुमची नेमकी batch नाही सांगितली तरी तुमच्या वेळेस मुख्याध्यापक कोण होते ते सांगाल का?
कांबळे सर की जोशी बाई ??? >>>
माझी बॅच 2008 ची. मुख्याध्यापक कांबळे सर होते. भूगोल शिकवायचे आणि मुलींचे मार्क हमखास वाढवून द्यायचे

आता प्रगत शाळेची जागा बदलली आहे. आता ती शाळा डी. एन. नगर मध्ये नसून आझाद नगर मध्ये (अपना बाजारच्या बाजूची गल्ली) विठ्ठल मंदिराजवळ आहे. साधारण ३-४ वर्षे >>>>>>>>>
ओह... आमच्या वेळी २ इमारतीं मध्ये भरायची शाळा...
मैदानच्या ह्याबाजुला आणि त्याबाजुला...

सेंट परशु महाविद्यालय, बॉकलवाडी.
मुख्याध्यापक प्राचार्य दाबे सर, चित्रकलेला नयन बाई, गणिताला बोकडे मास्तर, भूगोलाचे भुक्कड अशोक सर, शाळेचा चपराशी बद्री... आणि असे अनेक. एक नंबर ची धमाल शाळा! मायबोलीवर असलेल्या रॉकेट, पायथागोरसचे अद्भुत प्रकरण, नकळत घडलेली चूक या कथात शाळेचं वर्णन आलेले आहे.

माझी पण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय!
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी Happy
१९८२ पर्यन्त तिथे होते. नन्तर कमलाबाई कन्या शाळा, धुळे.
११ वी १२वी, जे आर सिटि हायस्कुल धुळे.

सन्मित्र मंडळ विद्यामंदिर

इथे दोघे सापडले. पण मला ओळखतात की नाही माहीत नाही, मला तरी ओळखू आले नाहीत.

सन्मित्र मंडळ विद्यामंदिर
इथे दोघे सापडले. पण मला ओळखतात की नाही माहीत नाही, मला तरी ओळखू आले नाहीत.
Submitted by हर्षल वैद्य on 30 September, 2020 - 08:46

तुमचे 'हर्षल वैद्य' नाव बघून कळले नव्हते परंतु profile मध्ये पूर्ण नाव पाहिल्यावर लक्षात आले. तुमच्या बहिणीचे नाव 'माणिक' आहे ना? आता ओळखा पाहू!!!!

रच्याक, @गायतरी, तुम्हाला भाऊ आहे का? त्याचे नाव 'चिन्मय' आहे का?

वी मु
तुम्ही माझ्याच batch चे आहात

शाळा वेगळी

सन्मित्र मंडळ विद्यामंदिर
इथे दोघे सापडले. पण मला ओळखतात की नाही माहीत नाही, मला तरी ओळखू आले नाहीत.>>
@हर्षल वैद्य, माफ करा, मी पण ओळखू शकले नाहीये तुम्हाला.

@गायतरी, तुम्हाला भाऊ आहे का? त्याचे नाव 'चिन्मय' आहे का?>>>
@विमु: नाही, चिन्मय नावाचा माझा कोणी भाऊ नाही, (आणि माझा भाऊ सन्मित्रमध्ये पण नव्हता)

आदित्य सिंग ..
मी विमलीज चा..

निर्झरा ...
आदित्य सिंग , आणि त्यांच्या म्हंणण्यानुसार हर्पेन , फारएन्ड तिथले आहेत.
निलाक्षी , आणखीन कोण दोघे सांगा की.

१ ली -७ वी - अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी
८वी - १०वी- के. व्ही. कन्या विद्यालय, पनवेल
११वी -१२वी - व्हि. के. ज्युनियर कॉलेज, पनवेल
पदवी - MPASC कॉलेज, पनवेल

परदेसाई
माझा मित्र गजानन ढोरे कुडाळचा...आणि त्याचे वडील तिथेच शिक्षक होते...

Pages