पास्ता का बीस्था.. टाकाऊ पासून timepass

Submitted by ShitalKrishna on 12 September, 2020 - 12:24
pasta ka bistha

Ready to cook pasta packet संपले होते, कधीतरी मागे एकदा dmart मधून loose macaroni pasta shells packet आणून ठेवले होते. आता पहिले तर expiry date झाली होती.

तसं हे shells अगदी सुवस्थेत होते, खुळखुळ वाजत होते. पण नको म्हटलं उगाच रिस्क..

मग ते तसंच कचरापेटीत टाकायला चालले, तेवढ्यात पोरीचा रंगाच्या डब्यांचा पसारा पसरलेला दिसला. मग काय लागले तयारी ला..

पास्ता नेकलेस करायचा होता, पण चांगला भक्कम धागा नाही मिळाला.

सुरुवातीला थोडे थोडे शेलस वेगवेगळ्या प्लेट्स मध्ये घेऊन त्यात रंग आणि 2-3 थेंब पाणी टाकले, ब्रश घेऊन मिक्स मिक्स करत बसले.. अर्थात लेकीला घेऊन. तिने भरपूर पाणी टाकला. आणि कलरफुल पास्ता सूप म्हणून ओरडायला लागली..

IMG-20200912-WA0015.jpg

वेगवेगळ्या रंगात पास्ता रंगवला.. आणि 2-3 तास सुकू दिला. सगळ्या रंगाचे फोटो नाही काढले..
हे शेवटी आर्ट बनवून झाल्यावर उरलेले..

IMG-20200912-WA0012.jpg

दुसऱ्या दिवशी मॅडमने यात बसकाभर फेविकॉल ओतला.. (त्याआधी फोटू काढला होता)

हे जमवलेले आर्ट Proud

IMG_20200912_214800.jpg

Amazon च्या डिलीव्हरी बॉक्सेस चे आयत कापून, वरून पांढरा कागद चिकटवला.. त्यावर रंगवलेला पास्ता चिकटवला..

IMG_20200912_215225.jpg

राडा खुप होतो, पण माझ्या मुलीनं एंजॉय केला..

अजून वेगवेगळ्या designs करता येतील, glitters वापरून करता येईल काही. तसेच मोर बदकं वगैरे पक्षी करता येतील..
पास्ता शेलस वर बारीक टोकाचा ब्रश वापरून design करता येईल. हे नंतर सुचलं..

IMG_20200912_215528.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol पासता कि बीस्था
मस्तच.
राडा खुप होतो,......। मुलीने छान एन्जॉय केले ना मग झाले तर...राडा /पसारा सत्कारणी.

वा मस्त दिसतंय.
याला बुरशी येणार नाही का काही काळाने?

मला पण असं मुलांना बिजी ठेवायला आवडतं..नवीन काहीतरी करायचे म्हटलं कि मुले पण खुष होतात..

मस्त

अनु आली तर आली द्यायचा टाकून.. पण थोडा वेळ लहानानी मज्जा करून टाकून दिलेले बरं न..
तसही कलर केल्यामुळे बुरशीला पास्ता आवडणार नाही.. it will non edible after color.. Wink