महाराष्ट्र वजा मुंबई = बिहार

Submitted by रॉकऑन on 3 November, 2009 - 06:21

खरंतर आपण सगळे महाराष्ट्रीयन लोकं मुंबईच्या बडावर मोठ्या मोठ्या डिंग्या हानतो.
महाराष्ट्राची झगमगाट एकट्या त्या मुंबईच्या जिवावर चालते.
जरा विचार करा, महाराष्ट्राच्या एकुण उत्पन्नातुन आपल्याला मुंबईतुन येणारे उत्पन्न वजा करुन बघा,
मग आपला महाराष्ट्र त्या बिहार पेक्षा फार श्रिमंत नाही हे दिसुन येईल.
आपला प्लस पॉईंट एकच तो म्हणजे आपल्याकडे मुंबई आहे. अन्यथा आपली आर्थीक परिस्थीती बिहा-यांपेक्षा फार वेगळी नाही.
आणी मुंबईचे बोलायचेच झाले, तर मुंबईतील उत्पन्नात मराठी माणसाचा वाटा किती ?
सगळा व्यापार तो अमराठ्यांचाच आहे. आपल्यात पैसे कमविण्याची दमक असती तर मुंबईतील व्यापार त्या अमराठ्यानी का उभ केलं, मुंबईच्या प्रगतीचं खर श्रेय त्या अमराठयानाच जातं, असं नाही का वाटत तुम्हाला. उत्तर भारतीय नेत्यांच्या वाक्यात काहीच तथ्य नाही अस ज्याना ज्याना वाटतं त्यानी प्रामाणिक पणे महाराष्ट्राच्या उत्पन्नाचे आखडे काढावे आणि हे समिकरण मांडुन बघावे. आपल्या महाराष्ट्राला संपन्नता देणारं सगळ्यात मोठ शहर म्हणजे मूंबई व कारखाने, आणि या दोन्ही ठीकानी आपण फार मागे पडतो. या क्षेत्रात ज्यांची चलती आहे ते सारेच (काही अपवाद वगळता) अमराठी आहेत. व याच अमराठ्याने या राज्याची जलद प्रगती करण्यास हातभार लावला. आपण सगळे मराठी त्या वेळी कारकूनी करत बसलोत, हे विसरता कामा नये. आता हेच अमराठी त्यांच्या राज्यात कशी प्रगती करत आहेत हे बधायचे असेल तर हरियाणा,हिमाचल व नोएडा या भागातील नविन औद्योगिक भरभराटी बघावी, गुजरात व तामिलनाळून तर महाराष्ट्राला टक्कर देत आहेत. इथल्या औषध कंपन्या उत्तरेकडे स्थलांतर करत आहेत. आणि आपण लोडशेडींग मधुन बाहेर पडण्यासाठी नुसते धडपडतोय. महाराषट्राचा आर्थीक पाया भक्कम करताना मराठी जनतेपेक्षा अमराठी लोकं जास्त झेजलेत हे तुम्हाला जागो जागी दिसेल.

महाराष्ट्राचे एकुन उत्पन्न-मुबंईचे उत्पन्न= यूपी किंवा बिहार ( यापेक्षा वेगळे उत्तर नसणारच)

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करुन, मुंबईला महाराष्ट्रात जोडण्याचे महान कार्य करणा-या त्या सर्व महान लोकांचे परत एकदा आभार मानतो. नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नव्हतं.

प्रतिसाद येऊ दया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुमोदन, कटु सत्य. तरीही युपी / बिहार एवढे महाराष्ट्र वाइट नाही. मी स्वतः नोएडात रहातो येथेही खुप वेगाने प्रगती आहे पण मुलभुत सुविधांचा अजुनही आभाव आहे.
मोठे मराठी उद्योजक कमीच आहेत. गेल्या दशकात महाराष्ट्राची फक्त अधोगती चालु आहे आणि एकंदरीत राजकीय परिस्थीती पाहता चित्र फारसे आशादायक नाही. मनसेला पण फक्त राडा करण्यातच इंटरेस्ट आहे. असो
पण ह्या धाग्याचे स्थान चुकल्यासारखे वाटते.

अहो पण त्या पुणे, नागपूर, नाशीक इ. गावांचे काय झाले? तिथे पण असतील ना उद्योगधंदे नि पैसे! आणि माणसे तर बिहारी लोकांपेक्षा नक्कीच चांगली आहेत!

महाराष्ट्राचे एकुन उत्पन्न-मुबंईचे उत्पन्न= यूपी किंवा बिहार ( यापेक्षा वेगळे उत्तर नसणारच)
---- मला काही समजले नाही. मुंबईचे उत्पन्न किती आहे ? महाराष्ट्राचे किती आहे ?

जरा विचार करा, महाराष्ट्राच्या एकुण उत्पन्नातुन आपल्याला मुंबईतुन येणारे उत्पन्न वजा करुन बघा,
मग आपला महाराष्ट्र त्या बिहार पेक्षा फार श्रिमंत नाही हे दिसुन येईल.
---- मुंबईतून येणार्‍या उत्पन्नाचा किती भाग महाराष्ट्राला (किंवा मुंबईला) मिळातो ? तुम्ही कुठल्या आधारावर तुलना करत आहात ?

रॉकऑन, समहाऊ, तुमच्या मताशी मी सहमत नाही
मूळात मुम्बै म्हणजे प्रगती अन पैसा अन समृद्धी अस जे काही "पैशाधारीत" गणीत आहे तेच चूकीचे असे माझे मत
किम्बहूना, असे गणीत ज्यास ग्रामिण जीवनाची जराही माहिती नाही व शहरी जीवनाची चटक लागली आहे तोच मान्डू शकतो
आजही, मुबै वजा जाता उर्वरीत महाराष्ट्र काय भीकेला लागेल अस वाटतय का?
८० टक्के जनता खेडेगावातून रहाते व ती स्वबळावर, स्वकष्टाने अन्नधान्य पिकवुन खाऊनपिऊन सुखाने जगते ते मुबै मुळे वा तिथल्या पैशामुळे नाहीच नाही!
त्यान्ची सुखसमृद्धीची गणिते अत्यन्त वेगळि आहेत
मुबलक धान्य (गिळायला), स्वच्छ पाणी, दुधदुभत या बाबी मुबैतल्या पैशाने ग्रामिण भागात पुरवल्या जात नाहीत, मुबैकर एका कणानेही यास मदत करत नाहीत.
अन्न वस्त्र निवारा या पैकी अन्न व निवार्‍याकरता ८० टक्के जनता मुम्बै, मुबैकर वा तेथिल पैक्यावर अवलम्बुन नाहि
उरतो प्रश्न वार्षिक वस्त्राच्या गरजेचा, त्याबाबतीत देखिल ग्रामिण जनतेच्या गरजा, व वस्तुन्चा पुनर्वापर हा मुबैकर वा कोणत्याही अन्य "शहरी" लोकान्पेक्षा आत्यन्तिक उच्च दर्जाचा आहे. गोधडीने थन्डी भागत असता परदेशी बनावटीची "ब्ल्यान्केट" लपेटून "एसी" मधे झोपणे यास जर समृद्धी म्हणत असाल तर ती मुबैला लखलाभ होवो! Wink
अन हीच समृद्धि ही केवळ महाराष्ट्रीयन ग्रामिण जनतेच्या उद्यमशीलतेतून, कष्टातून, प्रयोगशीलतेतून आलेली आहे, जी अन्य राज्यान्मधे दिसून येत नाही. त्यास अनेक कारणे आहेत, पैकी महत्वाचे कारण जे नजरे समोर येते ते असे की "जातपन्चायती" ऐवजी "ग्रामपन्चायतीची" स्विकारलेली व आधिक्याने अवलम्बिलेली ग्रामिण व्यवस्था महाराष्ट्राखेरीज अन्य कुठेही प्रकर्षाने आढळत नाही. वाढत्या शहरी कारखानदारीच्या रेट्यापुढेही येथिल बलुते अजुनही टीकुन आहेत. एरवी जातीपातीत भान्डतील, पण "गाव करील ते राव काय करील" हे देखिल येथेच बघायला मिळते व आजही एकमेकान्च्या मदतीला धावुन जाण्याची वृत्ती याच महाराष्ट्रदेशी शिल्लक बघायला मिळते.
यातील काहीच विचारात न घेता, केवळ मुबैबरोबर "तुलना" (कशाची डोम्बलाची? ) करुन उर्वरित महाराष्ट्राला "बिहार-युपी"च्या रान्गे सरसहा बसविणे हे बुद्धिमत्तेच्या दिवाळखोरीचेच लक्षण आहे वा अननुभवाचे लक्षण आहे!

मोहनदासान्न्नी सान्गितले होते की "खेडी अधिक स्वयम्पूर्ण" करा
राज्यकर्त्यान्नी त्यान्ना "राष्ट्रपिता" "महात्मा" वगैरे उपाधी देऊन त्यान्ना "देवघराच्या कोनाड्यात" बसवले, व नेमके उलटे करत राहीले
खेडी स्वयम्पुर्ण राहूदेच, तेथिल जनता देशोधडीला कशी लागेल, लुटली कशी जाईल हेच बघितले, आता तर जागतिक ब्यान्केचीच अट आहे शहरीकरणाची असे नुकतेच कुठे वाचले!
८० टक्के जनता कोणकोणत्या शहरातुन कोम्बुन बसविणार, अन एकदा का हे येत्या वीसपन्चवीस वर्षात पूर्ण झाले कि अन्नधान्य कोण पिकवणार, अन्नधान्याकरता हा देशच किती परावलम्बी होईल याचा कसलाही विचार होताना दिसत नाही.
अत्यावश्यक गरजा अन चैनिच्या गरजा यातिल फरकच कळत नसेल वा कळूनही वळत नसेल तर अवघड आहे! अन चैनिच्या गरजा भागविण्याकरता मुम्बै सारख्या शहरातुन उभारलेली "अर्थव्यवस्था" बाकी ८० टक्के करता कशी उपयोगी व काय कामाची? तुलनाच कशी काय होऊ शकते?
मुबैत ब्र्याण्डेड(?) परदेशी कम्पनीचा शर्ट प्याण्ट घेणारा सहजरिया त्याची किम्मत शेकड्यात सान्गु शकतो जेव्हा तेवढ्या रक्कमेत ग्रामिण भागात एक कुटुम्ब जगते! Happy
ब्र्याण्डच्य नावाखाली प्याण्टीला दीड दोन हजार फुकटचे मोजणे (?) ही समृद्धी ???
की असे दोनचार हजार रुपये उधळता येणे ही समृद्धी??? की असे दोनचार हजार रुपये उधळण्याकरता "गिर्‍हाईकान्ना" आकर्षीत करण्याकरता होणारा जाहिरातबाजीवरील खर्च, वीज इत्यादिकान्ची उधळपट्टी म्हणजे समृद्धी????
समृद्धीची तुमची नेमकी व्याख्या काय ते तरी कळूदे!

रॉक ऑन हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो अगदी खराही आहे.त्यात आणखी एक गम्मत दडलेली आहे. त्यावर जरा विस्तारानेच लिहीन तो म्हणजे इथले राजकारणी आणि देशभरातल्या नोकरशाहाना असलेली मुम्बईच्या लुटीची हाव.व त्यामुळे उर्वरित महाराश्त्राला त्यानी लावलेले तेल . त्यावर नन्तर कधी तरी

मलाही झक्कींसारखं वाटतं की बाकी अनेक जिल्हे आहेत त्यांच्याकडून काहीच आर्थिक भर होत नाही का? मुंबईला शेती व्यवसाय नाही पण बाकी जिल्ह्यांना मात्र आहे.

रॉकऑन,
महाराष्ट्राच्या उत्पन्नात खुप मोठा वाटा मुंबईचा असणार हे उघड सत्य आहे पण...
"महाराष्ट्राचे एकुन उत्पन्न-मुबंईचे उत्पन्न= यूपी किंवा बिहार" हे समीकरण म्हणजे जरा अतिशयोक्ती वाटतीये!
जरा त्या वरच्या समीकरणात आकडे टाकले तर बरे होइल!

RockOn च्या बातमीचे स्त्रोत ते देतीलच, पण हि घ्या eSakal ची बातमी...

http://72.78.249.125/esakal/20091115/4849346142058953780.htm

यात राऊतसाहेब म्हणतात:

"मराठी माणसाच्या पीछेहाटीचे आणखी एक कारण म्हणजे आपली मराठी माणसाचा आर्थिक कमकुवतपणा. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातून मुंबई जर वेगळी केली तर ओरिसा, छत्तीसगड अशा राज्यांबरोबर आपण येतो"

न पटणारे विदारक सत्य?

चांगभलं

>>महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातून मुंबई जर वेगळी केली तर
का करायची पण? एखाद्या राज्याची तुलना करताना ती पुर्ण राज्याची करा ना!
उगाच हे वजा करुन ते वजा करुन याला काय अर्थ आहे?

आणि जेंव्हा तुम्ही दरडोई उत्पन्नाचा विचार करता तेन्व्हा cost of living पण विचारात घेतले पाहिजेल ना!
शहरातल दरडोई उत्पन्न जास्त असते पण खर्च पण तेव्हढाच नसतो का?
आता खेड्यात किंवा छोट्या शहरात एखादा माणुस आपल्या वडिलोपार्जित घरात राहुन शेती, घरचा व्यवसाय किंवा नोकरी करुन समजा १५,००० रुपये महिना कमवत असेल आणि एखादा शहरात रहणारा नोकरदार भलेही ३०,००० रुपये कमवत असेल पण त्यातले १५,००० रुपये फ्लॅटचा हफ्ता जात असेल किन्वा
१०-१२ हजार रुपये घरभाडे जात असेल तर मग फक्त उत्पन्नाच्या आकड्यावरुन तुम्ही शहरातल्या नोकरदार माणसाला अधिक श्रीमंत ठरविणार का?

फक्त उत्पन्नाच्या आकड्यावरुन सुखवस्तुपणा जोखणेच मुळात चुकीचे आहे!

लिम्बुभाउना अनुमोदन.... खेड्यांची सम्रुद्धी मुंबईवर काडीमात्र अवलंबून नाही... आता ती खेडी मॅनेज करणारी डोकी मुंबईत बसलेली असतात, हा एक मुद्दा.. पण तो इथे कामाचा नाही.

मुंमबै वर म्हराष्ट्र अव्लम्बुन नाहि.
पुने ,नसिक, कोल्हपुर, सान्गलि ,सातारा, नाग पुर, नगर, औरन्गाबाद, जळगाव, सोलापुर लातुर नांदेड
झालच तर सटाणा कराड अकलुज इचल्करान्जि मिरज जय्सिंग्पुर, नारायण्गाव हि काहि भिकेला लगलेलि नाहित
हि सुध्दा सम्रुध्द शहरे आहेत