घरच्या बागेत कमळाची लागवड कशी करावी?

Submitted by मी चिन्मयी on 29 July, 2020 - 03:21

चिपळूणला सासरी एक तलाव आहे. त्यात अत्यंत सुंदर अशी फिकट गुलाबी रंगाची कमळं फुलतात. त्यातले एक-दोन कांदे आणुन बागेत लावायचा विचार आहे. कुंडीत लावता येतील का? आणि काय काय तयारी लागेल? चिखलात लावायचे की स्वच्छ पाण्यात? कुणाच्या बागेत आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठ्या टबात एक पसरट कुंडी ठेऊन त्या कुंडीतल्या चिखलात कंद लावावेत. हळूहळू टबात अशा सावकाश गतीने पाणी सोडावं जेणेकरुन कुंडीतली माती फार बाहेर येणार नाही.
डास होऊ नयेत म्हणून टबात गप्पी, ट्रँजेलीन किंवा स्वोर्डटेल मासे सोडावेत... माशांमुळे पाण्यात शेवाळंही कमी गतीने वाढेल..

बागेत म्हणजे बाल्कनीत/ टेरेसवर? का मोठी जागा आहे?
-----–------
टब काळा हवा. उन्हाने फाटत नाही. कमळास ऊन लागते.

thank u निरु. माशांची आइडिया छान आहे. गरज असणारच. पण टबात कुंडी का ठेवायची? नुसतीच कुंडी ठेवली तर काय होईल? म्हणजे रंग किंवा सिमेंटने पूर्ण poreless करुन.

Srd, जागा मोठी आहे. गावाला राहतो आम्ही. अंगणात अशी कमळाची मोठी कुंडी करुन ठेवायचा विचार आहे.

खूपच मोठी कुंडी असेल, हल्ली सिमेंटच्या मिळतात बाऊल/बोलच्या आकाराच्या तर तळाशी माती टाकून त्या चिखलात कंद लावले तरी चालतील. मला घरच्या बाल्कनीतल्या बागेत वाटलं होतं..

>>गावाला जागा मोठी आहे >>

मग
१. छोटे शेततळे चारफुटी करायचे. डबल पन्ना (२ मिटर) चे काळे प्लास्टिक २मिटर आणा.
२. दीड दोन फुट खोल खड्डा खणून तो आडवा चौकोनी वाढवत कडेला उतार ठेवायचा.
३. खड्ड्यातलीच काढलेली माती कडेला उंचवटा करून पसरायची. चौकोनी बोल करायचा.
४. तळाला खडे नसलेली चिकण माती लिंपायची व त्यावर काळे प्लास्टिक पसरून कडेचा भाग उंचवट्यावरून आला पाहिजे. तिथे त्यावर चिकणी मातीने दाबून टाकायचे.
५. या पल्लास्टिकवर मऊ माती अधिक चाळलेले शेणखत आठ नऊ इंच पसरायचे.
६. तळ्यातल्या मातीला भिजवून वर थोडेच पाणी राहील एवढे ठेवायचे. सुकले की परत बुडेल एवढेच घालायचे.
७. उंचवट्यामुळे पावसाचे वाहणारे पाणी आत येत नाही. सध्या पावसामुळे आतल्या पाण्यावर लक्ष ठेवणे.
८. साधारण महिन्याभरांत खालची माती आणि शेणखत पूर्ण कुजून वेलासाठी तयार करावे लागते. शिवाय पाण्याच्या दाबाने कापड खाली बसायला वेळ द्यावा लागतो. फाटले तर चिखल लगेच कोरडा पडलेला दिसतो.
९. नंतर बी किंवा छोटे वेल चार लावून पाणी वाढवायचे नाही आणि सुकवायचेही नाही.
१०. जेव्हा वेल वाढू लागल्यावरच पाणी वाढवून मासे सोडा.

अरे वा Srd छानच माहिती दिली. आत्ताच आमचं गावाकडचं टुमदार घर बांधुन झालं आहे. त्यासमोर मोठं अंगण आहे. तुमच्या टीप्स वाचुन मीही तिथं असंच छोटं तळं करुन कंद लावेन. तुमची आणि निरु यांछी माहिती फारच उपयुक्त वाटली मला.

खूप छान माहिती Srd. पण हा माझा हट्ट आहे. बाबांचं मत वेगळं आहे. इथे आसपास खूप झाडी वगैरे आहे. त्यामुळे साप, विंचू खूप असतात. बाबांचं मत फारसं अनुकूल नाही मोठा हौद वगैरे करुन त्यात कमळं लावण्यासाठी. कुंडीसाठी पण कुरकुरतायत. त्यात एखादा साप येऊन बसला तर इ. इ.
त्यामुळे आधी कुंडीत लावून फुलं आल्यावर त्यांची भुरळ पाडून मग मोठा हौद करेन म्हणते. Happy

पण टबात कुंडी का ठेवायची? नुसतीच कुंडी ठेवली तर काय होईल? म्हणजे रंग किंवा सिमेंटने पूर्ण poreless करुन.>>>

कमळाला पाणी हवे. खाली मुळांना चिखल व वर पाणी असे नसल्यास वाढणार नाही.

टबात कुंडी नको तर मोठया कुंडीत मुळाशी माती टाकूनही करता येईल.

पण कुंडी ठेवली तर हलवाहलवी, साफसफाई साठी चांगले होईल.

ह्या मोठया हौदातही बादलीत लिली लावल्या होत्या.

DSC08775.jpg

इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ पण बघा:

https://youtu.be/iy16fDZBano

सतीश गाडीयाना मी भेटून आलेय. त्यांनी अतिशय उत्कृष्ट कमळशेती केलीय, त्यापासून उत्पन्न मिळवताहेत. पण उत्पन्न हा मुख्य हेतू ठेऊन त्यांनी हे काम केले नाही. सुरवात कमळाच्या वेडाने झाली आणि नंतर त्याचे रूपांतर व्यवसायात झाले. वेड इतके कुठूनही कमळाच्या
अपरिचित जातीबद्दल काही कानी आले की हा माणूस हातातले काम सोडून निघालाच, खाण्यापिण्याची शुद्ध नाही की जीवाची भीती नाही. पुण्याजवळच आहे फार्म. तुम्ही पुण्यात असाल तर जरूर भेट द्या.