पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna

Submitted by ShitalKrishna on 27 August, 2020 - 12:32

Chocolate brownie Modak 'मोदक' Version 1.0

साहित्य :

पारी - उकड - 1 वाटी रवा, दीड वाटी पाणी, पाव चमचा मीठ, पाव वाटी चॉकलेट पावडर, पाव वाटी साखर, 1 चमचा तूप.

(फक्त रव्याचे मोदक साठी सवा वाटी पाणी पुरे, इथे पाव कप चॉकलेट पावडर घेतली आहे, त्यामुळे दीड वाटी पाणी)

सारण- stuffing -
डार्क चॉकलेट कंपाऊंड तुकडे, व्हाईट चॉकलेट कंपाऊंड तुकडे, ड्रायफ्रूटसची भरड तुपात भाजलेली

कृती:
1. दीड वाटी पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप, मीठ, साखर घाला. पाण्याला चांगला उकळा आला कि गॅस फ्लेम लो करा.
2. रवा आणि चॉकलेट पावडर एकत्र करून चाळून घ्या. हे मिश्रण हळूहळू उकळत्या पाण्यात सोडा व कलथ्याने हलवत राहा.
3. गॅस बंद करून झाकण ठेवा. 15-20 मिनिट सेट होऊ द्या.
4. उकड मळून घ्या.
5. मोदक वळा.
6. आत मध्ये 1चमचा ड्रायफ्रूट्स भरड आणि चॉकलेट तुकडे घाला.
7. 5 मिनिट वाफवून घ्या.

क्रमवार फोटो:

1. उकड

IMG-20200827-WA0043.jpg

2. चोकलेट तुकडे (white n dark chocolate compound)

IMG-20200827-WA0046.jpg

3. तुपात परतलेली ड्रायफ्रुटस भरड

IMG-20200827-WA0045.jpg

4. मोदक पारी

IMG-20200827-WA0038.jpg

5. सारण भरले

IMG-20200827-WA0037.jpg

6. मोदक तयार

IMG-20200827-WA0030.jpg

7. वाफवण्यापूर्वी

IMG-20200827-WA0031.jpg

8. वाफवल्यावर

IMG-20200827-WA0036.jpg

9. उकलून

IMG-20200827-WA0026.jpg

अजून एक फोटो

IMG-20200827-WA0018.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद मानव Happy

मैत्रीयी.. धन्यवाद, अगदी चोकलेट ब्राउनी

वा या गटात आणि एक एन्ट्री आली.
चांगले लागतील. साधारण महाबळेश्वर ला मिळणार्या चोको वॉलनट फज सारखं टेक्सचर असेल.

अनु धन्यवाद Happy

<<साधारण महाबळेश्वर ला मिळणार्या चोको वॉलनट फज सारखं टेक्सचर असेल.>> ते नाही try केलं अजून

पण इथे कोणत्याही cake shopee मध्ये chocolate walnut brownie मिळते न.. तशीच चव आलीये

धन्यवाद सनव Happy

धन्यवाद ऋन्मेष Happy मुलीच बनवतानाचं चोकलेट खा, उकड खा असं चालू होतं. फायनल प्रॉडक्ट नंतर म्हणाली thank you mom for delicious food Happy

मस्त दिसतोय मोदक, पण मला एक शंका आहे स्टफिंगमधे एवढे मोठे तुकडे ठेवले तर मोदक वळताना त्रास नाही का होत? मोदक फुटण्याची भिती वाटतेय. तुझे मोदक छान वळले गेले आहेत.

धनुडी धन्यवाद, Happy
बरोबर शंका.. थोडं त्रास होतं होता.. खिसुन घ्यायला पाहिजे होता चॉकलेट.. पण खिसुन देणारा मनुष्य बाहेर गेला होता Wink म्हणून शॉर्टकट मारला..

फारच भारी कल्पना आहे! असेच व्हाईट चॉकलेट आवरण आणि डार्क चॉकलेटचं सारण घालून पण करता येतील. बाहेरून टेक्श्चर बदलतं का?

Pages