हिरा(ठाकूर) है सदा के लिए

Submitted by म्हाळसा on 15 August, 2020 - 16:37

खरंतर माझ्या माहेरची लोकं फारच अरसिक..सिनेमा, नाटकं, गाणी.. कसली म्हणजे कसलीच आवड नाही..त्यामुळे एखाद्या सिनेमातील इमोशनल सिन बघताना रडणं तर दूर पण साधं एक टिप्पूसही कोणाच्या डोळ्यात आलं तर शप्पथ ..मी त्यांच्या अगदीच विरूद्ध..अर्थात नाॅर्मल.. इतरांसारखेच सिनेमा, गाणी, कॅरम, पत्ते यांसारखे शौक..आमच्या आवडी निवडी आणि स्वभावातील तफावत पाहता मला ह्यांनी लहानपणी खरच एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवरून उचलून आणलेले असावे असच कायम वाटायचं .. मग मोठेपणी ठरवलं की लग्नानंतर आपल्याला मिळणारं सासर तरी निदान थोडंफार..नाही नाही, बऱ्यापैकी रसिकच असाव..मग हिच ‘इच्छा माझी पुरी करा’ म्हणत पोह्यांचे कार्यक्रम उरकले.. म्हणजे, पोह्यांच्या कार्यक्रमात सासरच्यांना गाणी किंवा कोणते डायलाॅग्ज वगैरे मारायला लावले नाहीत..पण एका कोपऱ्यात लाजत खुर्चीवर बसण्याऐवजी त्यांच्याशी थेट संवाद साधत, त्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडी कितपत जुळतात हे जाणून घ्यायलाच मी उत्सुक असायचे..
असो, तर अशा प्रकारे देवाच्या नव्हे तर स्वःतच्याच कृपेने मी असं रसिक सासर पदरात पाडलं..

लग्न झाल्यावर सुरूवातीच्या तीन एक आठवड्यातच सासऱ्यांसोबत ‘दोस्ती’ चित्रपट पहाण्याचा योग आला..ब्लॅक ॲंड व्हाईट सिनेमा बघायची माझी चौथीच वेळ असावी... चित्रपट सुरूवातीपासूनच कमालीचा इमोशनल..त्यात “चाहूॅंगा मै तुझे सांज सवेरे” गाणं लागताच मन भरून आलं..आता सासऱ्यांसमोर लगेचच आपल्या अश्रूंना पाय फुटायला नकोत म्हणून मी सोफ्यावरून एक पाय खाली ठेवत तिथून सटकणार तितक्यातच हा भला मोठा हुंदका..माझा नव्हे, सासऱ्यांचा..माझ्याआधी त्यांच्याच अश्रूंनी उंबरठा ओलांडला होता..मी लगेचच रूमालाच्या शोधात लागले..तितक्यात सासू आतून टाॅवेल घेऊन आली आणि म्हणाली “रूमालाने नाही भागणार आज टाॅवेलच लागणार” (सासूला अशाच वेळेस बरोबर काव्य सुचतं).. एव्हाना माझ्या लक्षात आलेले की हे नेहमीचंच प्रकरण आहे..त्यांच रडणं बघून मला थोडंफार हसूही आलं.. थोडक्यात सांगायचं झालं तर “मर्द को भी दर्द होता है “ हे कळालं आणि ते सांगताही येतं आणि दाखवताही येतं ह्यावर विश्वास बसला .. मग काय..त्यानंतर आम्हा दोघा ढवळ्या-पवळ्याची जोडी चांगलीच जमली.

त्यांना गोडधोड खायला आवडतं मला बनवायला आवडतं..
त्यांना पत्ते पिसायला आवडतात मला लोकांचे पत्ते कट करायला आवडतात..
त्यांना जुनी गाणी ऐकायला आवडतात मला ती म्हणायला आवडतात..
त्यांना ग्लासभरून व्हिस्की आवडते तर मला ताटभरून चकना..
बरं, आमच्या ह्या आवडी-निवडीच्या लिस्टला चार चांद लावायला अजून दोन गोष्टी आहेत.. पहिली म्हणजे कॅरम खेळताना आम्हा दोघांचाही राणीसाठी केला जाणारा आटापीटा..त्यांना कॅरम खेळताना बघून मला कायम मुन्नाभाईतल्या पारसी बावाचीच आठवण होते.. मग वाटतं एवढी चांदीसारखी बायको असताना (सासूचे सगळे केस पिकलेत त्यामुळे सोन्याऐवजी चांदीसारखीच म्हणावं लागेल) का बरं त्या राणीच्या पाठी पडायचं?
तर दुसरी गोष्ट म्हणजे दोस्ती नंतरचे ‘सूर्यवंशम’ चित्रपटावर असलेले आम्हा दोघांचे अतोनात प्रेम ..

लोकांनी ह्या चित्रपटाला कितीही नावं ठेवली तरी “नाव काढलं बाप लेकाने” असं म्हणत आम्ही दोघे हा विचित्रपट दरवेळेस बघतो..
घरच्यांना मात्र आम्हा बापलेकाचे सूर्यवंशम वरचे प्रेम खटकतं.. हा सिनेमा लागणार म्हटल्यावर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागतं..मग त्यावर तोडगा म्हणून आम्हाला हा विचित्रपट लागण्याआधी थोडीशी जय्यत तयारी करावी लागते -

जसं की सगळ्यात आधी कामवाली बाई, बिनबुलाए मेहमान किंवा नेमक्या ह्याच वेळेस गाॅसिप नावाचा मसाला वाटायला दारात येणाऱ्या शेजारपाजारच्या बायका, अशांचा पत्ता कट करण्यासाठी दारावरची बेल बंद करून ठेवायची, लगेहात लॅंडलाईनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवायचा, त्यानंतर “अहो जरा ‘आम्ही सारे खवय्ये’ लावा ओ” अशी दर पाच मिनिटाला वाजणारी सासूची खरखर कॅसेट बंद करण्यासाठी
तिच्या फोनवरून माझ्या तीनही विवाहीत नंदांना मिसकाॅल मारायचा .. जेणे करून ताशी १ या हिशोबाने ३ तासांसाठी तीचापण पत्ता कट..
हे सगळं उरकल्यावर छान दोन पाण्याच्या बाटल्या .. हो पाण्याच्याच बाटल्या भरायच्या..एक सासऱ्यांसाठी दुसरी माझ्यासाठी, डोळे नाक पुसायला २ नॅपकिन्स आणि अधेमधे चरायला मिठी भात घ्यायचा (ज्यांनी सूर्यवंशम मन लाऊन बघितलाय त्यांनाच ह्या मिठी भाताची गोडी कळेल).. ह्या सगळ्या गोष्टींनी सोफ्यासमोरचा टेबल सजवायचा आणि मग टेबलाच्या दोन्हीबाजूंनी दोघांनी तंगड्या पसरवत एकदाचं सेटमॅक्स लावायचं.. मग त्याच त्याच प्रसंगांवर यथेच्छ रडायचं.. आणि सिनेमा संपला की टिव्ही बंद करून दोघांनी एकाच वेळी आणि एकाच सुरात म्हणायचं “आखिर हिरा(ठाकूर) है सदा के लिए”

आज माझ्या ह्याच भानुप्रतापचा उर्फ सासऱ्यांचा ७० वा वाढदिवस ..आता ठाणे सोडून अमेरीकेत आले त्याला जवळजवळ अडीज वर्षे झाली ..अर्थात तो टेबल सजून, एकत्र सिनेमा बघत रडून आणि त्यानंतर एकमेकांची चेष्टा करूनही तितकीच वर्षे झाली.. आता मात्र ह्या कोरोनाने चांगलीच गोची करून ठेवली आहे .. त्यामुळे आता फक्त वाट बघायची..

फिरसे वही मैफिल सजेगी..
जब मिल बैठेंगे तीन यार,
सून,सासरे और सूर्यवंशम

Group content visibility: 
Use group defaults

लोक्स् फारच ब्वॉ शंकेखोर झालेत हल्ली Sad छान लिखाणाचा आस्वाद घ्यायचा.. आवडले तर मनसोक्त तारीफ़ करायची... नाही आवडले तर मनमोकळेपणाने त्या लिखाणाचा समाचार घ्यावा पण चुकूनही त्या लेखकावर वैयक्तिक घसरु नए असे प्रांजलपणे वाटते.

अनंतनी
योग्य मत आहे तुमचे.
Troling होत असेल तर डू आयडी आहे का असा प्रश्न पडणे गैर नाही पण छान लिखाण वाचायला मिळत असेल तर त्या आक्षेप ला काहीच अर्थ नाही

ये जो आप ग्यान बाटते हो.. ये मुफ्त का है या इसके कुछ पैसे चार्ज करते हो“ Lol
>>>>
फुकट..
म्हणूनच जनतेला किंमत नाही Proud

मजा केली हं.. बाय दवे वर लिहीलेलं समजून घ्यायला २-४ वेळा व्यवस्थित वाचावं लागेल Happy
>>>>
नका वाचू आता
लोकांच्या शंका मिटल्या आहेत.
सत्याचा विजय झाला
दरवेळी शेवटी होतो, यावेळी लवकर झाला Happy

अवांतर - नशीब बाय दवे लिहीलेत. बाई दवे नाही Happy

@मामी,जाई,वत्सला,ऋन्मेष,कमला,मी_अस्मिता,देवकी,Hemant 33, अनंतनी - प्रतिसादांसाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद Happy

छान लिखाणाचा आस्वाद घ्यायचा.. आवडले तर मनसोक्त तारीफ़ करायची... नाही आवडले तर मनमोकळेपणाने त्या लिखाणाचा समाचार घ्यावा पण चुकूनही त्या लेखकावर वैयक्तिक घसरु नए असे प्रांजलपणे वाटते.>>> सहमत

हो एक्चुअली ! सहमत +७८६

एखादा नवीन आयडी जर तुमच्यावर वैयक्तिक टिका करत नसेल वा तुमच्या विचारपूसमध्ये वैयक्तिक गप्पा मारायला येत नसेल तोपर्यंत त्या आयडीमागील व्यक्ती कोण आहे याने खरे तर आपल्याला शून्य फरक पडायला हवा.

अर्थात मनुष्यस्वभाव चिकीत्सक असतो त्याला अनुसरून कोणाला अमुकतमुक आयडीमागील व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यात रस असू शकतोच. त्यामुळे यात तितके काही वावगे नाही. कुतूहल जरूर शमवावे.

पण आरोपीसारखे पिंजरयात उभे करत टोमणे मारणे वा जाब विचारणे हे होऊ नये. मग तो आयडी ओरिजिनल असो वा डु आयडी. प्रत्येक आयडीमागील व्यक्ती ओरिजिनलच असते. जसे ते कटप्पा. त्यांना आपली खरी ओळख लपवून जर आंतरजालावर वावरायचे असेल तर आपण त्यांच्या या निर्णयाचा आदर करायला हवा.

तसेही ईतरवेळी आपण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सोशलसाईटवर आपली फार वैयक्तिक माहिती देऊ नका म्हणून सजग राहतो. पण तेच कोणी काहीच दिली नाही तर तेव्हा मात्र ती हुडकावीशी वाटते Happy

म्हाळसा यांनी प्रोफाईलवर आपला ओरिजिनल फोटो लावला नसता, त्यांना तो सुरक्षिततेच्या दृष्टीने लावायचाही नसता, तर विचार करा त्यांना किती काळ आपल्या प्रत्येक लेखावर हे डु आयडी शंकेचे प्रतिसाद झेलावे लागले असते.

मला नाहीय शंका.
निदान तुम्ही आणि ऋन्मेष ड्युआयडीज नक्की नाहीत --- सहमत मानवजी Happy
लेख भारी आहे Happy

म्हाळसा माझी du id आहे Lol
(अजून एक किडा Wink )

me ekatich baghate ase sagale picture ani radate pan ekatich. tevha gharat swyampak matra hot nahi.

स्टाईल ऋन्मेषचीच आहे असं वाटतंय. जाऊ द्या. एखाद्याला आयुष्याचा अर्थच जर नवनवीन ड्यु आयडी काढण्यात गवसत असेल तर आपलं काय जातंय.>>+१

म्हाळसा आमच्या गावात रहाते. अमेरीकेत. तिला ओळखणार्‍या कॉमन मैत्रिणी आहेत. त्यामुळे ती ऋन्मेषची ड्यु आयडी नक्की नाही. चांगल्या लेखांवर भलत्याच प्रतिक्रीया येऊन नेहमीच्या वाटेने चर्चा जाऊ नये म्हणून इथं लिहीलं.

tevha gharat swyampak matra hot nahi >> Lol

स्टाईल ऋन्मेषचीच आहे असं वाटतंय. जाऊ द्या. एखाद्याला आयुष्याचा अर्थच जर नवनवीन ड्यु आयडी काढण्यात गवसत असेल तर आपलं काय जातंय.>>+१ >>
इथे चर्चा दोन गोष्टींवर होतेय - १. ऋन्मेष स्टाईल २. ड्यु आयडी -
ड्यु आयडीची शंका मिटली असावी, उरला प्रश्न ऋन्मेष स्टाईल चा, तर थोडीफार स्टाईल सिमिलर आहेच..पण ह्याच
स्टाईलमधे मायबोलीवर लिहीण्याआधी मी फेसबुकवर बरेच लेख लिहीले आहेत..त्यामुळे ज्यांना शंका आहे त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टची आतूरतेने वाट बघतेय:)

दर धाग्यात काय ती ड्यू आय चर्चा. अवांतर चर्चेला हरकत घेणारा मी कोण, पण तेच तेच वाचायला बोअर होते. या जगात एकच व्यक्ती अशी आहे जिने तेच तेच केले तरी चाहते बोअर होणार नाहीत. आणि ती व्यक्ती म्हणजे..... अर्थात आपला मायबोलीचा लाडका शाहरूख Happy

छान लिहिले आहे. हा कोरोन लवकर संपो आणी तुम्हाला सासरेबुवांबरोबर पुन्हा सूर्यवंश पहायला मिळो.
एकदा त्यांच्याबरोबर "माहेरची साडी" बघा. पण टॉवेल वगैरे तयार ठेवूनच !

दर धाग्यात काय ती ड्यू आय चर्चा. अवांतर चर्चेला हरकत घेणारा मी कोण, पण तेच तेच वाचायला बोअर होते.
+१

रच्याकने माझ्याही साबु सोबत एकदा सूर्यवंशम बघेनच म्हणते. (दोघांनाही झोप आली नाही तर नक्कीच बघू)

एकदा त्यांच्याबरोबर "माहेरची साडी" बघा. पण टॉवेल वगैरे तयार ठेवूनच->> मग म्हणावं लागेल “टाॅवेलने नाही भागणार, सासूची साडीच लागणार“ Happy

रच्याकने माझ्याही साबु सोबत एकदा सूर्यवंशम बघेनच म्हणते. (दोघांनाही झोप आली नाही तर नक्कीच बघू) >> रडून रडून झोप येऊ शकते Happy

Pages