भुकेपल्याड जात नाही

Submitted by अविनाश राजे on 5 August, 2020 - 13:14

भुकेपल्याड जात नाही,अजून माझी नजर ही
देता कशास मज तुम्ही, सीमेवरची खबर ही

माझा आजा अन बाप त्याचा, मेले उपाशी
नातू माझा न लिहो, भुकेची शापित बखर ही

सूर्यासह जन्मून, वयात येते मध्यरात्री
उफाड्याची बघा किती, भूक आमची अजर ही

मारून एकमेकांस, निर्वंश बापास करती
क्रूर भूक हीच घडवे, सख्ख्या भावांत समरही

लयास जातात युगाचे देव, युगांतासवे
बुभुक्षित जगात, एक केवळ भूकच अमर ही

Group content visibility: 
Use group defaults