हितगुज

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ऑगस्ट १९९८ मधे हितगुज सुरू झालं आणि मग इतकं पुढे गेलं की मायबोली म्हणजेच हितगुज असं समीकरण बनलं.
हितगुजवरचा सगळ्यात पहिला संदेश आजही उपलब्ध आहे.

सगळ्यात पहिला संदेश

हितगुजचा पसारा इतका वाढला की त्याचे प्रशासन करणे अवघड होऊ लागले. हितगुजच्या नेमस्तकांनी हातभार लावला म्हणून आज इतके दिवस हितगुज आहे आहे हे नक्की. परशुराम (परेश केळवेकर) आणि मेधा (मेधा करंदीकर) हे सगळ्यात सुरुवातीचे नेमस्तक.

जून २००० मधे हितगुजवर प्रसिद्ध झालेली तेंव्हापर्यंतच्या नेमस्तकांची ओळख (काहींची स्वत:च्या शब्दात.. त्यांना काय माहिती हे प्रकाशीत होणार आहे, आणि पुन्हा २००६ मधे पुन्हा प्रकाशीत होणार आहे )

parshuram (परेश केळवेकर) :
मुळचा मुक्काम ठाणे, सध्या US . गुलमोहर मधे यांच्या काही सुंदर कविता सापडतील. सध्या "moderator" च्या कामातुन निवृत्ती. पण कधी कधी गुप्त पणे ते हितगुज ला भेट देतात

medha (मेधा करंदीकर) :
हितगुजवरच्या अनेक मेधांपैकी एक. सध्या moderator च्य कामातुन निवृत्ती. सुंदर चित्रकार. लहान मुलांना चित्रकला शिकवायचा उपक्रम सुरु केला. याही गुप्तपणे हितगुजला भेट देतात असे ऐकिवात आहे. !

Svsameer (समीर सरवटे):
He was born and brought up in the beautiful land of Goa. He completed his education there and came to mumbai for job. After working for 5 years, now he is in US. Currently staying at Harrisburg, PA- 3 hours drive from Edison, NJ. His hobbies are hanging around on Hitguj :-), listening to music, reading( mostly Marathi) and Nature.."

samrya (समीर कुलकर्णी):
मुळ्चा पुण्याचा, सध्या मुक्काम Milwaukee, WI, US. "सही करता येते" एव्हढे शिक्षण, सध्या व्यवसाय keyboard वरती निपुणता दाखवणे".

asami (बिपीन चौधरी):
अनुवंशिक वारसा मुम्बईशी नि सांस्कृतिक पुण्याशी... थोडक्यात सांगायचे तर born and brought up in Mumbai and stayed some time in Pune. इथे US मधे बॉस्टन मधे आहे for last 2 years. Educational background VJTI मधून electronics engineering. पुलं आणि हितगुज चा निस्सीम चाहता.

limboni (स्मिता करंबेळ्कर लिमये):
मुम्बईसह महाराष्ट्रातल्या अनेक गावाची आहे.
काही वर्ष कर्नाटकातही राहिलेली आहे. शिकायला पुण्यात होते. लग्नानंतर नवरा पुण्याचा म्हणून पुण्याचीही आहे. कलिफ़ोर्निआमधे गेली साडेचार वर्षांपासून राहते.

Ajay (अजय गल्लेवाले) :
नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर, नांदेड, बंगलोर, शिकागो, बॉस्टन या गावात हे वाढले. (अजुनही वाढ चालुच आहे, संपण्याची लक्षणे दिसत नाही). पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात "अभियंता" , पवईला "तंत्र" आणि "चव्हाटा" , बंगलोर ला "स. न.वि.वि." च्या रुपाने लोकांचा छळ करुनही यांचा आत्मा शांत न झाल्यामुळे सध्या हितगुजच्या मागे लागले आहेत.

Bhavana (भावना गल्लेवाले) :
कराड, औरंगाबाद, पुणे, मॉस्को या गावात शिक्षण. बाहेर १०-१२ तास interpreter म्हणून बडबड करुनही, घरात आल्यावर तेव्हढीच बडबड (जागेपणी)वेगवेगळ्या भाषांतून करण्याचा तगडा स्टॅमिना. त्यांनी काही वर्षांपूर्वी पुण्याला NDA मधे नोकरी केली असल्यामुळे सगळ्यांनी त्यांना (आणि त्यांच्या लष्करी खाक्याला) वचकून रहावे हे उत्तम.

अनिलभाई (anilbhai):
हे उत्स्फ़ुर्त कवि आणि लेखक आहेत आणि गेले १० वर्शे US मधे आहेत.

कलन्दर७७ (समीर पाटसकर)
व्यवसायाने कॉम्पुटर ईन्जीनीअर , शालेय शिक्शण बारामतीमध्ये, मग पुण्यात वास्तव्य. US मध्ये ४ वर्शे होउन गेली, सद्ध्या new jersey मध्ये आहेत.
हितगुजवर थोडे उशिराच आले २ वर्शांपुर्वी, a proud GTPkar since! तेव्हापासुन office, घर आणि मायबोली हेच त्यांचे रूटीन झाले आहे.

Storvi (शिल्पा तोरवी)
गेली सात वर्श Bay Area CA इथे तळ ठोकुन आहेत. आता अजुन तिन महिन्यांनी त्यांच्या तंबुत नवीन मेम्बर येणार आहे.. व्यवसायाने s/w engineer,पण ते सोडुन बाकी सगळं करण्यात त्या एकदम माहिर म्हणजे नाच, cultural programmes, आणि मायबोली वर जाउन V&C मध्ये भांडन करणे.

Yogibear (योगेश कासार)
त्यांच्या नावाची म्हणजे लै मोठी हिस्टोरीच हाय बघा. लौकरच पुस्तक छापणार हायेत म्हनले. तसं म्हणायला बघा IT मंदी काम करतायत आनि रहाया 'वार्‍याची शीटि' म्हणजे अहो ते 'windy city'(शिकागो) हो.. तीथं असत्यात.

Paragkan (पराग बुडुख)
यांची आजतागायत विद्यार्थी दशा चालू आहे. नावाच्या मागे Dr. लागावं या हट्टापायी अजून शाळेतून बाहेर पडले नाहियेत. सध्या मुक्काम US मध्ये ... पार दक्षिणेकडे ... mississippi राज्यात.

Maitreyee (वैशली पांडे)
तश्या त्या पुण्याच्या ! पण नवरा (तो पन HGkar) आणि मुलगा (वय ५ त्यामुळे अजुन HG कर नाहिये) यांच्या सह आत्ता शिकागोला आहेत. त्याना वाचायला आणि अधुन मधुन स्वत: काही लिहुन वाचकांना उपद्रव द्यायला अतिशय आवडते, त्यात, दोन-अडिच वर्शापुर्वी US मधे आल्यावर HG ची ओळख झाली. तेव्हा पासुन HG हा त्यांच्य रोजच्य रुटिनचा अविभाज्य भाग आहे.

Manya (महेन्द्र वागळे)
सध्या सिन्गापूर मधे. PHD पुर्ण करणार आहेत आणि लग्न करणार आहेत. (यातले कुठले अगोदर पूर्ण होणार हे सांगयला त्यानी नकार दिला ) Happy

Milindaa (मिलिंद आगरकर)
गेली ४ वर्षे लंडन मध्ये रहात आहेत.. आणि तितकीच वर्षे हितगुजवर पण...
शिक्षणाने मेकॅनीकल engineer आनि व्यवसयाने software consultant. hgवर कुठेही भांदन दिसले की तीथे "milindaa" id दिसणारच Happy

Itsme (आरती आवटी)
त्या सध्या कामामधे अतिशय व्यस्त आहेत आणि त्याना वेळ मिळाला की स्वत: त्या आपली ओळख करुन देणार आहेत. तारखेकडे लक्ष ठेवा Happy

admin

विषय: 
प्रकार: 

खुप छान वाटतय वाचायला Happy
आणखी भर भर लिहा Happy

मस्तच.... सगळ्यान्ना परत भेटुन आनन्द होतोय.... पुढे लिहा लवक्कर....
- येडचॅप

ओळख मस्तच.. अजुन बरेच राहिले असावेत.. तेव्हा लिहा लौकर.....

साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

अरेच्चा.. हे कसं काय सटकलं वाचनातून.. मस्त माहिती आहे सगळ्या जुन्या लोकांची.... जुन्या पुपु आणि सिंहगडरोड वरच्या पोस्टचा स्पीड वाढला की कशी मज्जा यायची ते आठवतय.. ती फेमस लाल रंगाची सूचना पण जबरीच होती..