आभास आहे

Submitted by निशिकांत on 12 July, 2020 - 00:10

चांदणे आभास आहे
हाच माझा त्रास आहे

स्वप्न पडते जे पहाटे
सत्त्य कसले? भास आहे

दूध का प्यावे? जरी तो
वासरांचा घास आहे

वेदनांच्या मी ऋतूला
मानतो मधूमास आहे

कायद्यांना तोडणारा
उच्चभ्रू हमखास आहे

लाचखोरी धर्म झाला
सत्त्य का बकवास आहे?

वाळल्या झाडास आता
भोगणे वनवास आहे

सत्त्यवादी का बिचारा
भोगतो उपहास आहे?

लागल्यावर ठेच धरली
विठ्ठलाची कास आहे

वाहिली देवा फुले पण
ओंजळीला वास आहे

भक्तिचा "निशिकांत" तुझिया
लेखणीला ध्यास आहे

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"वाहिली देवा फुले पण
ओंजळीला वास आहे" ---> आइ आइ ग!!

भरून आल बघा निशिकांत दादा
कोणते आशिर्वाद घेऊन जन्माला आलायत काय माहीत खरचं