नवरोबा

Submitted by Rajsmi on 24 June, 2020 - 11:42

नवरोबा

(Lockdown च्या काळात खूप गोष्टी नव्याने अनुभवायला मिळाल्या काही चांगल्या काही वाईट आणि काही मजेशीर.
असाच एक प्रसंग Lockdown च्या काळातला. )

नवरोबांची सदा जेवताना कटकट आज हे कमी,आज हे जास्त. नेहमी त्यांनाच प्रॉब्लेम असतो.
आणि हे फक्त त्यांनाच जाणवत होतं आम्हाला कोणाला काहीच फरक पडत नव्हता.
बाकी सासरे काही बोलत नाहीत ,मुलांना फार बोलता येतं नाही .
(सासूबाई मुलीला भेटायला गेल्या Lockdown मद्धे त्या तिथेच अडकल्या. )
आजही नेहमीप्रमाणे जेवणात जरा मिठ जास्त झाले असं म्हणत नवरोबा सुरु झाले .
लग्नाला एव्हढी वर्ष झाली तरी स्वयंपाक येतं नाही,मिठाचा अंदाज नाही, वगैरे वगैरे .
काही वेळाने मी म्हणाले, एवढं वाटतं तर स्वतः बनवून दाखवा,
ह्यावर त्यांत अवघड काय आहे, मी बनवू शकतो असं म्हणत त्यांनी शेवट केला .
ठरलं! उद्या पतीश्री भाजी बनवणार,काय बनवणार हेही ठरलं.
मातोश्रींना कॉल करून वालाची भाजी कशी बनवायची (रेसिपी) विचारली,
तसेच रात्री वाल भिजत घातले.
सकाळी ठरल्याप्रमाणे मी माझी काम करून बसले, बघत होते हे काय आणि कसं करणार ?
श्री गणेशा म्हणत मातोश्रींच्या guidance प्रमाणे त्यांनी काम सुरु केलं.
Cutting Chopping ची बोंबाबोम होती.
खूप हसू येतं होतं पण मी ते आवरलं .
नवरोबा चेहऱ्यावर काही जाणवू न देण्याचा प्रयत्न करत होते .
मी हॉल मध्ये जाऊन बसले. काही वेळाने फोडणीचा आवाजही आला आणि वासही आला .
Lunch Time ला सर्वजण डाईनिंग टेबलं जवळ आलो खरे,
पण मी आणि सासरे चुपचाप होतो फक्त मुलांचा आवाज होता.
पण त्यांना काय चालू आहे हे कळतंच नव्हतं.
जेवणाची ताटं वाढुन झाली.
मी मुलीला भरवत होते,त्यामुळे भाजीची चव कशी आहे हे सांगण्याची वेळ माझ्यावर येणार नव्हती.
सासर्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि जेवायला सुरवात केली.
बिचारे काही न बोलता गप्प राहिले.
आणि इकडे पती महाशय जेवताना स्वतः केलेल्या भाजीकडे आणि माझ्याकडे बघत होते.
त्यांना काय चुकलंय हेच कळत नव्हतं पण काय बोलणार? म्हणून शांतपणे जेवत होते.
मी त्यांना काय चुकलं हे सांगेल ह्या आशेने बघत होते, मुलीचं जेवण झाल्यावर मी जेवण करायला सुरवात केली.
एक घास खाऊन मी लगेच सासूबाईंना कॉल केला.
"आई त्यांनी आज वालाची भाजी केली, खरंच खूप छान झाली आहे.
next time भाजी बनवताना त्यांना वालाची सालं काढायची असतात हे सांगा. "
हे ऐकून नवरोबा मानत ओशाळले ,सासरेही हसू लागले. हसत हसत जेवण झालं.
त्यानंतरही आम्ही खूप हसलो
आता कधीच जेवणात चुका काढत नाहीत फक्त आज हे कमी ते जास्त हे चालूच असतं
म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं .......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl
कहानी घर घर की. ती गोष्ट आहे ना नवरोबाला कधी ऑम्लेट हवं तर कधी बुर्जी. म्हणून बायकोने दोन्ही बनवून ठेवले. तरी तक्रार. "ज्याचं ऑम्लेट बनवायचं त्याची बुर्जी केलीस आणि ज्याची बुर्जी करायची त्याचं ऑम्लेट." Uhoh

आधीपासून सवय लावावी, तू किती छान करतोस मला जमत नाही असा मस्का मारावा, मग करेल नवरोबा काम। Proud

(ह्या ट्रिक चा किल्लीच्या वैयक्तीक आयुष्याशी काही संबंध नाही,)

आधीपासून सवय लावावी, तू किती छान करतोस मला जमत नाही असा मस्का मारावा, मग करेल नवरोबा काम। Proud
बराच प्रयत्न केला. पण आमचे नवरोबा जरा हुशार निघाले आणी माझ्या अश्या म्हणण्यात काय गोम आहे ते त्यांना कळाले. त्यामुळे असे करता येत नाही. पण मुळात आमच्याकडे अन्नाला नावे ठेवत नाहीत ही पद्धत माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हिकडे असल्याने कोणाहीकडून जेवण कसे ही झालेले असले तरी ते मुकाट खाल्ले जाते. आपण घास तोंडात टाकल्यावर मग नेमके काय झाले ते कळते. Wink

हे असले ऐश करणारे नवरे फक्त कथेत असतात... आजपर्यंत आजूबाजूला एकही पुरुष पहिला नाही जो बायकोला स्वयंपाकात मदत करत नाही...

Lol

याबाबतीत मी नशीबवान आहे.
मला भाकऱ्या अन काही ठराविक भाज्या सोडल्या तर काहीच धड बनविता येत नाही. ताटात जे पडेल ते गपचूप खातो तो, कधीच नाव ठेवत नाही.
माझ्या अगदी उलट तो, मटण चिकन भाज्या सगळे खूप छान बनवितो. त्यामुळे विकांताला मी भाकऱ्या भात अन त्याने भाजी/चिकन मटण सोबत रस्सा बनवायचा हे न ठरवता घडत गेले.

भारी किस्सा आहे Proud

बाकी छान मवरा मिळालाय तुम्हाला. कापण्याचिरण्याची बोंब असलेल्या माणसाने भाजी बनवणे मजाक नाहीये.
आव्हान स्विकारले आणि धाडस केले त्यांनी. दुसरे म्हणजे पुरुष असल्याचा अहंकार नाहीये. हे माझे काम नाही म्हणून टाळले नाही त्यांनी. राहिला प्रश्न सल्ले द्यायचा तर ते गल्लीत क्रिकेट खेळणारी पोरंही सचिन तेंडुलकरला देतात. त्यात काय एवढे Proud

भारीच.. बाकी साल न काढता वालाची उसळ कशी लागली.. Proud Proud

आमच्याकडे वेगळा प्रकार आहे, सायंकाळी भरपेट खाणं होतं आणि नवरोबा म्हणतो आता रात्री काही नको जेवायला. दूध घेईन. पण जेवणाची वेळ झाली काहीतरी हवं असता..