हुंडाबळी

Submitted by रूपाली विशे - पाटील on 14 June, 2020 - 01:49

महान कवी कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध ' कणा' ह्या कवितेच्या धर्तीवर हुंडाबळी गेलेल्या स्त्री वर एक शब्दरचना

हुंडाबळी

ओळखलतं का मॅडम मला
स्वप्नी आली कोणी
कपडे होते जळालेले
अन् डोळ्यामध्ये पाणी...

क्षणभर बसली , भकास हसली
बोलली खाली पाहून
सांगायचे होते खुप काही
जे गेले आता राहून...

गरिबाघरची मी लेक लाडकी
माता- पित्यांस मी भासे परि
अजाणता हो केली त्यांनी
पाठवणी त्या निष्ठूर घरि...

नवलाईचे ते दिन पळती
मजपासून दूर- दूर
जाणवला मज मग सासरी
लालसेचा नवा सूर...

गरिब पिता मग करे विनवणी
संसाराच्या मज लेकीचे नका करू मोल
पैश्यापेक्षा असे माझी लाडकी
लेक अनमोल...

अन् एके दिनी माझा
केला त्या निर्दयांनी घात
कारस्थानी असती हैवान ते
जगी दर्शवती घडला जणू अपघात...

सांगायला आले होते तुम्हांस
चिरडायला हवा आता हुंड्याचा हा विषारी फणा
सांगा.... मॅडम तुम्ही तरि
कसा राहिल हो सावित्रीच्या लेकींचा ताठ कणा...

सौ. रूपाली गणेश विशे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ धन्यवाद हिरा
@ अजय - तुमचं बोलणं मनावर घेतलं. मी तुम्हाला विपू केली आहे. तुम्ही पाहिली का?

अप्रतिम लिखाण....'कणा' याच धर्तीवर काही तरी लिहावं असा विचार मी कित्येक दिवस करत होतो... पण इतकं सुंदर लिखाण मला पण जमलं नसत.... खरचं खूप छान... पुढील लिखाणासाठी शुभेच्छा