©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
या कथेचा पुढील भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवार, दिनांक २८ मे रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.
-------
"संपलो तर बरं होईल ग."
"ना, अजून बरच बाकी आहे.''
"पाणी देतेस?"
ती उठली, आणि आत गेली.
उदास! भकास! जुनाट पिवळट हिरवट रंगाची खोली, भिंतीला जागोजागी ओल आलेली, पोपडे पडलेली. वर एक काळाकुट्ट पंखा करकर करत फिरतोय.
कर्रर्रर्रर्रर्रर्र, कर्रर्रर्रर्रर्रर्र....
लोखंडी पलंग, आणि एक लोखंडी कपाट. कपाटाचं एक दार निखळलेलं. पलंगही आता दुगडुगु लागला.
"माझ्यासारखाच..." हेमलने स्वतःशीच विचार केला.
खोलीभर विस्कटलेले रंग, अर्धवट काढून फेकलेली चित्रे...
कसलाही अर्थ नसलेले.
तिने पाणी आणलं, व त्याच्या ओठाला ग्लास लावला. त्याने मोठ्या कष्टाने हळूहळू पाणी पिले.
"तू जा घरी, बराच वेळ झालाय. तुझा नवरा वाट बघत असेल."
"नाही, मी सांगितलंय त्याला."
"आज कुठली मैत्रीण???"
"नको ना हा विषय..."
"मला असलं खोटं सुख देऊन तुला काय मिळत? हं? जेव्हा मला गरज होती ना, तेव्हा तू त्याचा हात धरून निघून गेलीस. आता का दररोज येतेय मग माझ्याजवळ? हं?"
तो एकदम थांबला. त्याला प्रचंड धाप लागली, छातीचा भाता वरखाली होऊ लागला.
"शांत हो... पड जरा."
"हं," त्याच्या नजरेतल्या रागाची जागा हळूहळू लालसा घेत होती.
"ये ना माझ्या जवळ, त्या रात्री मला सोडून गेलीस, मला हवी होतीस तू... ये ना..."
तिने स्वतःला आवरलं, आणि म्हणाली.
"सगळी औषध नीट घेत जा. काळजी घे... मी येईन परत."
"आधी माझ्या जवळ ये ग, मग परत ये. ये चाललीस कुठे, ये ना"
तिने तिची पर्स उचलली, व ती खोलीबाहेर पडली.
--------
तिला त्या खोलीतून बाहेर पडताना बघून अनेक वखवखत्या नजरा तिच्याकडे वळल्या. एव्हाना तिला याची सवय झाली होती. एका घरातून वाहणारं सांडपाणी चुकवत ती गाडीजवळ पोहोचली. तिने गाडी स्टार्ट केली, आणि भरधाव वेगाने ती निघाली.
बंगल्याजवळ पोहोचता पोहोचता तिने कितीदा टॉप स्पीड गाठला होता, याची गणती नव्हती.
तिला वेगात येताना बघून वॉचमनने आधीच गेट उघडला, हे बघून तिला हायसं वाटलं.
आणि त्यानंतर तिचा श्वास घशातच अटकला...
बंगल्याच्या बाजूला आधीच एक काळी मर्सिडीज उभी होती.
क्षणभर तिच्या हातातलं त्राणच गळाल्यासारखं झालं. तिने हळूहळू गाडी बाजूला लावली, व ती सुन्नपणे बसून राहिली.
तीने पर्स हातात घेतली, व ती बंगल्याच्या दरवाजाजवळ आली. दार बंदच होतं.
ती दारासमोर आली. तिची बेल वाजवण्याचीसुद्धा इच्छा राहिली नव्हती. अंगातली सगळी शक्तीच गळून गेल्यासारखी झाली.
दार उघडल्याचा आवाज आला.
"मॅडम, किती वेळ बाहेर उभ्या राहणार? मी काचेतून बघितलं म्हणून तुम्ही उभ्या दिसल्या. या या, आत या."
अनुराधाने दार उघडलं. तिला हायसं वाटलं. कमीत कमी याक्षणी तिला त्याच्यासमोर उभं राहायचं नव्हतं.
तिने सोफ्यावर अंग टाकले.
"अनुराधा... पाणी देशील प्लिज?"
"अहो प्लिज काय मॅडम? लाजवतात तुम्ही गरिबाला." अनुराधा घाईघाईने आत गेली.
तिने डोळे मिटून घेतले.
ती खोली, ती गल्ली, ते खोकणार शरीर...
तिला अचानक किळीस आल्यासारखं झालं.
"मॅडम, पाणी..." अनुराधाच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.
तिने ग्लास उचलला.
"मॅडम, जरा गळून गेलेल्या दिसता. चहा किंवा कॉफी करू का? बरं वाटेल..."
"नाही ग. बरं मनू केव्हा आला."
"अर्धा तास झाला असेल. आल्याआल्या तुम्हाला विचारत होते. मला माहित नव्हतं कुठे गेल्या होत्या तुम्ही. तुम्ही सांगून गेल्या नव्हत्या का त्यांना?"
पर्वणीने दीर्घ सुस्कारा सोडला.
"अग, सांगून गेले होते. विसरला असेल बहुतेक." ती कसनुस हसली. तिने अनुराधाकडे ग्लास दिला.
"बरं..." अनुराधा आत गेली. पण तिच्या आवाजातला अविश्वास तिला जाणवलाच.
"आय हॅव हॅड अ व्हेरी हेक्टिक डे टुडे... सो आय फील, लेट्स फिनिश धिस अर्ली अँड सी यु!"
त्याचा आवाज ऐकून ती गर्भगळीतच झाली. तो तिच्या दिशेने येत होता.
"ही तुझी स्पेशल कॉफी." त्याने मग तिच्या हातात दिला, व तो तिच्या शेजारी बसला.
"अरे सॉरी मी ना..." तिने बोलायचा प्रयत्न केला.
"लिसन लिसन. दमली असशील तू. शांत हो. बादवे जस्ट तुला सांगायचं होतं, तुझी मैत्रीण आहे ना, आदिती... तिने आज माझा पूर्ण सेकंड हाफ घेतला. तिच्या बुटीक स्टोर साठी पूर्ण ऍड पॅकेज हवंय तिला."
तिची कॉफी घशातच अडकली.
आज नेमकं आदितीचं नाव ती सांगणार होती...
शीट!!! पर्वणी, काय करतेय तू हे.
"आणि हो... शर्मिष्ठा, माया आणि मिस मेनन, या तिघीसुद्धा तिच्याबरोबर होत्या. आय थिंक इट्स जॉईंट व्हेंचर..."
त्याच्या आवाजातला खोलवा, एकसुरीपणा ऐकून हळूहळू तिचं काळीज वरखाली होत होतं.
तो तिला परावृत्त करत होता, उघड पडणारं खोटं बोलण्यापासून!
त्याची नजर तिच्यावर नव्हती.
त्याला माहितीये, आपण काहीतरी लपवतोय... खूप गंभीर लपवतोय... पण...
तो विचारणार नाही. उलट तो सांगतोय, की मला सगळं माहीत आहे, पण प्लिज, असं काहीतरी सांग, की ज्याने तुला ओशाळल्यासारखं होणार नाही.
"मॅडम, जेवायला काय बनवू?" अनुराधाच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.
सुटका!!!
"नको आज तू राहू दे. मीच काहीतरी बनवते."
"अहो मॅडम, तुम्ही फार दमलेल्या दिसताय. नको ना..."
"अनुराधा..." तिचा आवाज वर चढला.
"अनुराधा. आज मीच काहीतरी बनवतो. तुला आज लवकर जायचं असेल तर जा. भांडी उद्या घासलीत तरी चालतील... ओके...?"
"हो, चालेल साहेब." अनुराधा गडबडून म्हणाली.
त्याने तिच्याकडे बघितलंही नाही. तो तसाच उठला, आणि किचनमध्ये गेला.
ती तशीच सुन्न बसून राहिली.
------
तिच्या घशाखाली घास उतरत नव्हता. एक असह्य शांतता घरात नांदत होती.
"पर्वणी, भाजी घे थोडी." तो म्हणाला.
तिने यंत्रवतपणे भाजी घेतली.
"उद्या थोडं ऑफिसला येशील? काही सिग्नेचर हव्या आहेत."
"हो..हो...येईल ना." अचानक शांततेचा भंग झाल्याने ती गडबडून गेली.
"काही स्ट्रॅटेजीक डिसीजन घ्यावव लागतील. मला तुझा वेळ हवा असेल ऑफिसमध्ये." तो जेवताना खाली मान घालूनच म्हणाला.
"नक्की..."
त्याने जेवण संपवलं. एरवी तिने त्याला टोकलं असतं, पण...
त्याने चमचे खाली ठेवले. रुमालाला हात पुसला.
"उद्यापासून ड्रायवरला घेऊन जात जा. अशा वस्तीत एकटं जाणं सेफ नाही!" तो म्हणाला आणि तिच्याकडे न बघताच निघून गेला.
संपलं सगळं...
तिच्या हातातला घास गळून पडला व ती सुन्न बसून राहिली
क्रमशः
मी पहिला , मी पाहिला
मी पहिला , मी पाहिला
उत्कंठा लागलीये. पुभाप्र
उत्कंठा लागलीये. पुभाप्र
मनु कसा रिऍक्ट होईल पुढे,
मनु कसा रिऍक्ट होईल पुढे,
अनुराधाला ऑफिस मध्ये बोलावून कशावर सह्या घेणार
अनु नि त्याच नात मनु स्वीकारेल का
त्याला काय आजार झालाय
नुसते प्रश्नच प्रश्न पडायला लागलेत lockdown मुळे
छान सुरुवात.. पुढील भागाच्या
छान सुरुवात.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
पुभाप्र
वाचतोय.
वाचतोय.
हि तरी वाचकांनी विसरण्याआधी
हि तरी वाचकांनी विसरण्याआधी पूर्ण कराल अशी अपेक्षा .
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
बरं....
अज्ञा, उंबरठा कथेसारखीच ही
अज्ञा, उंबरठा कथेसारखीच ही कथा तुझ्या इतर कथांपेक्षा पुर्णतः वेगळ्या धाटणीची वाटतीये.. तेव्हा पुभालटा.. प्रतिक्षेत!
सुंदर ...उत्कंठा वाढली आहे.
सुंदर ...उत्कंठा वाढली आहे.
Story vachaychi ki nahi yacha
Story vachaychi ki nahi yacha vichar krtey... Tumhi vachakana asch tangvun jatat.. next 2/3 part aale ki decide kren..
Story vachaychi ki nahi yacha
Wrongly double post
Story vachaychi ki nahi yacha
.
मस्त.. सुरूवात तर छान झालीय..
मस्त.. सुरूवात तर छान झालीय.. पटापट येऊ द्या पुढचे भाग..
उत्तम सुरुवात . अर्धवट ठेवली
उत्तम सुरुवात . अर्धवट ठेवली तरी वाचण्याची मजा वेगळी असते .
उर्मिलाजी गूगल इंडिक कीबोर्ड
उर्मिलाजी गूगल इंडिक कीबोर्ड डाउनलोड करा म्हणजे मराठीत लिहिता येईल तुम्हाला .
छानच !
छानच !
अनुराधाला ऑफिस मध्ये बोलावून कशावर सह्या घेणार
अनु नि त्याच नात मनु स्वीकारेल का >>>>>> नायिका - पर्वणी ...
अनुराधा - कामवाली
उर्मिलाजी गूगल इंडिक कीबोर्ड
उर्मिलाजी गूगल इंडिक कीबोर्ड डाउनलोड करा म्हणजे मराठीत लिहिता येईल तुम्हाला .
Submitted by कटप्पा on 27 May, 2020 - 23:05
Thanks for suggestion.. I will try the same.
इंग्रजीतच लिहत जा ... इग्नोर
इंग्रजीतच लिहत जा ... इग्नोर करायला बरे पडते
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद! ठरलेल्या वेळेप्रमाणे पुढचा भाग टाकला आहे.