लॉक डाऊन

Submitted by रूपाली विशे - पाटील on 27 May, 2020 - 10:18

लॉक डाऊन

लॉक डाऊनच्या नजर कैदेत
आम्ही सर्व अडकलोय घरि- दारी
देश- विदेशातला प्रवास झालाय बंद
अन् करतोय फक्त आंतरजालावर जगाची वारी...

शाळेतील ऑनलाईन अभ्यासाचा
उडालाय पुरता फज्जा
मुलं म्हणताहेत नको तो अभ्यास
आम्ही करू फक्त मज्जा....

सौभाग्यवतींचा वेळ चाललाय
फक्त स्वयंपाक घरि अन्
नवरोबा म्हणताहेत फोडणी दे चांगली
येऊ दे तेलाची मस्त तर्री...

तिथे वर नारदमुनी जाऊन
बाप्पाला लावती कळ
हे गणेशा तूच देतोस का रे
सुगरणींना हत्ती एवढे बळ...

बाप्पा, तू म्हणतोस मला
चतुर्थीला तुला मोदकच हवा
अन् बघ जरा पृथ्वीवर
बायकांनी संपवलीय सगळी साखर
अन् खवा....

बाप्पा हळूच गाली हसूनी म्हणती नारदमुनींना '
आता लावतो मी ह्या कोरोनाची वाट
फक्त खाली जाऊन सांग माझ्या लाडक्या लेकींना
येत्या चतुर्थीला ठेवा मला एकवीस मोदकांचे ताट...

सौ. रूपाली गणेश विशे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults