मजुरं

Submitted by दवबिंदू on 26 May, 2020 - 03:12

मजुरं

आली साथ महाभयंकर
कोरोनाची....
झाली टाळेबंदी जाहीरं.

झाले ठप्प् काम...
थांबले राबते हात,
रिकामे हातावरचे पोटं.

घरदार राहिले दूर...
आलो कामासाठी इथवरं,
नाही डोक्यावरं छप्परं.

बांधले किडुकमिडुकं गाठीला...
निघाले मजुरं शहर सोडून,
आपल्या गावाच्या वाटेला.

निघाले मजुरं चालतं चालतं...
हटकले की पोलिसांनी,
दिला आसरा शाळेतं.

गेले चार घास पोटात...
कळले कुटुंब सुखरूप गावात,
झाले मजुरं ते शांतं.

रंगकाम करावे म्हणून...
आणले होते शाळेत सामानं,
मजुरांनी घेतले बघून.

सगळ्यांनी एक होऊन...
त्या मुक्कामातं,
दिली शाळा रंगवून.

वाटा खारीचा उचलला...
देशकार्यातं.

करु वंदन भारत देशाला...
करु वंदन देवाला...
करु वंदन या श्रमपूजकांना.

_ दवबिंदू

Group content visibility: 
Use group defaults